इसविसनाचा विचार

इतिहासाचा प्रभाव व्यक्तिमत्वावर वा विचारधारेवर होत असतो हे गृहित धरून खालिल कल्पनेचा विचार व्हावा...
इसवि सन २०१० म्हणजे २००० च्या वर वर्ष झाली. परन्तु इसवि सना पुर्वी ८००० वर्ष आपली सभ्यता अस्तित्वात होती
२०१० वर्षापुर्वी चा काल आपण कसा आठवणार? तो तर मानवाचा बालपणिचा काल.
जर आपण १ ही सन्ख्या २०१० च्या अगोदर लिहुन १२०१० अस्सा लिहु लगलो तर आपसुक त्या १०००० वर्षाचि आठवण होईल.
जग काहि ईसवि सनाने सुरु झाले नाहि. हा पोकळ अहन्कार नसुन आपल्यासर्व मानवान्चा एवढ्या मोठ्या काळा चा वारसा स्मरण केला जाइल.तसेच भारताचा सुवर्ण काल हा मानवतेचा इतिहास म्हणुन आठवेल.कदचित नवीन पिढिला आपली नवीन ओळख घडविण्यासाठी आधारभूत ठरेल. पहा पटते का??
रज

लेखनविषय: दुवे:

Comments

पण हे कसे करायचे?

+१ सुंदर विचार! सहमत! पण हे कसे करायचे? मराठी माणसे तर हे आवश्यक आहे की नाही ह्यात भांडत बसतील. तिकडे अमेरीकेत झाले की, सगळ्या सिस्टीम्स दुरुस्त करण्यासाठी हजारो कोटी डॉलरचे कॉन्ट्रॅक्ट भारतीयांना मिळेल व त्यात मराठी आणि इतर भारतीयांची इतिहासाबद्द्लचा आदर नक्कीच वाढेल कारण आयटी वाल्यांनी ह्या भानगडीत मिळवलेल्या पैशात आणखी २-३ फ्लॅटस ते नक्कीच घेऊ शकतील. मग बिल्डर लोकही..आणि मग...

चालू द्या

चालू द्या

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

कैच्या कै!

कायच्या काय. मी तर नुसतेच १० लावणार. (थोडे कमी आहेत म्हणा, पण १२०१० पेक्षा बरेच) ;)

-Nile

मर्यादित सहमती

सन किंवा शक सुरू झाल्याच्या आकड्याबद्दल काही भावनिक ठसा असतो - सहमत. जर एखादा आकडा पुन्हा-पुन्हा वापरायचा असेल तर "उणे क्ष" असे म्हणणे थोडेसे त्रासदायक होते, हेसुद्धा खरे. (बर्फाळ प्रदेशात, हिवाळ्यात मला सेल्सियसपेक्षा फॅरेनहाइट तापमान कळायला सोयीचे जाते.)

हजारो-लाखो वर्षांच्या पूर्वीचा ढोबळ काळ सांगण्यासाठी वैज्ञानिक निबंधांत "इसवी सनापूर्वी" असे न म्हणता "सध्यापूर्वी (बिफोर प्रेझेंट)" असे कालमापन करतात.

मात्र खूपच हल्लीहल्लीचा काळ सांगायचा असला तर "परवाच्या वादळानंतर चार-पाच दिवसांनी" वगैरे नवीन कालमापन सोयीचे पडते.

"आम्ही नैनीतालला केव्हा गेलो, म्हणता... हंऽऽ... आमची बेबी तेव्हा साडेतीन वर्षांची होती..." असे इसवी सनाऐवजी बेबी सन वापरलेले आपण ऐकतोच. ते सोयीचे असल्यामुळे ऐकतो.

बहुतेक लोक रोजव्यवहारात पूर्ण इसवीसन वापरत नाहीत, तर केवळ १०० वर्षांचेच सन वापरतात. म्हणजे हे साल '१० (तारीख २०/जुलै/१०) अशी. कित्येकदा १०० वर्षांपेक्षा मोठे कालमापन करण्यात काहीएक सोय नसते. दीर्घ इतिहासाचे स्मरण करण्याच्या श्रमाने फायदा काही होत नाही.

म्हणून सहमती आंशिकच आहे. २०१० ऐवजी सन १२०१० असे लिहिण्याची माझी काहीही इच्छा नाही. २०००-२००९ काळात मी आवर्जून चार-आकडी वर्ष लिहीत असे. आता पुन्हा दोन-आकडी लिहू लागणार आहे. उलट लांबलचक पाच आकडे मला नको आहेत.
- - -
(भारताचा बर्‍यापैकी सुवर्णकाळ हल्ली वर्तमानकाळात आहे. भविष्यकाळात याहूनही उन्नती आहे, अशी आशा आहे. पाच आकडी सन लिहिताना वर्तमानाचा विसत पडला नाही, तर बरे.)

अनुमोदन दिलेच आहे.

वाय३के अजुन ८००० वर्षानी येण्यापेक्षा ह्याच पिढीत आणखी एकदा आलेले केव्हाही चांगले. त्यामुळे ह्याप्रस्तावाला अनुमोदन दिलेच आहे.
तुमचा हेतू उदात्त आहे. जे द्न्यानेश्वरीने, दासबोधाने, होऊ शकले नाही, ते एका आकड्याच्या प्रभावाने झाले तर किती चांगले.

ज्या जनतेला "कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन ।" चा अर्थ कळला तरी अभिमानाने ते वचन मिरवण्यापेक्षा हे- "इट इज अमेझिंग व्हॉट यु कॅन अकम्प्लिश इफ यु डू नॉट केअर व्हू गेटस धि क्रेडीट" (प्रेसिड्न्ट हॅरी ट्रूमन)- जवळपास त्याच अर्थाचे वचन अधिक बौद्धिकतेचे लक्षण वाटते त्यामनांवर असे केल्याने जर ओरखडा जरी उमटला तरी छानच.

८००० वर्षे?

वाय३के म्हणजे इ.स. ३००० ना? अजून ९९० वर्षे तर बाकी आहेत.
||वाछितो विजयी होईबा||

वाय१०के

अरे खरंच की! वाय१०के म्हणायला हवे होते. :-)

+१

त्याला वाय-एक्स-के (YXK) म्हटलेले पण चालेल का?
की १०K साठी एखादे रोमन अक्षर आहे?

बेस आहे!

हा! हे बेस आहे!

रोमन

मला वाटते 1000 साठी रोमन चिन्ह M आहे, K नाही.

बरोबर, पण..

१००० साठी रोमन अंक M, पण दशांश मापन पद्धतीत हजारपटीसाठी K.
रोमन आकडे : I, II, III, IV. V, X, L(=50), C(=100), D(=500), M(=1000).
दशांश पद्धत : एक्झॅ-(दशपरार्धपट १०‍‍^१८ पट), पेटा- किंवा पेन्टॅ-(अन्त्यपट)(१०‍^१५ पट)
टेरा-(महापद्मपट), गिगा-(एक अब्जपट), मेगॅ-(एक अयुतपट, एक दशलक्षपट), आणि किलो- सहस्रपट.
त्याचप्रमाणे : मिलि=हजारावा हिस्सा, मायक्रो दहालाखावा, नॅनो=अब्जावा, पिको=१/ महापद्म, फ़ेम्टो=१/अन्त्य आणि अ‍ॅटो=१/दशपरार्धावा हिस्सा.--वाचक्‍नवी

धन्यवाद

K M G T P E ही लॅटिन चिन्हे आहेत तर L C D M ही रोमन, असे मला सांगायचे होते. भ्रमणध्वनीवरून सविस्तर लिहिले नव्हते.

'अयुत' हा नवा शब्द समजला. पूर्वी मिपावर कोणीतरी १०^१०० पर्यंतचे घात सांगितले होते.

मिपावर..

मिपावर शोधायला हवेत. मी इथेच उपक्रमावर १०^५३ पर्यंतच्या संख्यांची नावे २ ऑक्टोबर २००८ रोजी दिली होती.--वाचक्‍नवी

फरक

ट्रुमनचे वचन आणि कर्मण्ये.. मध्ये खूपच फरक आहे. ट्रूमन श्रेय मिळण्याबाबत म्हणत आहे. गीता फळ मिळण्याबाबत म्हणत आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

फळाची व्याख्या

फार फरक नाही कारण फळाची व्याख्या खूप व्याप्त आहे.

फरक

काय म्हणता फार फरक नाही? खूप फरक आहे.

शेतात पीक लावल्यावर तुमच्या मेहनतीने खूप पिक आले तर

ट्रुमन म्हणताहेत की ते खूप पीक तुमच्यामुळे आले असे क्रेडिट घेऊ नका. (पीक मात्र तुम्ही घ्याच).
गीता म्हणत आहे की ते पीक दुसराच कोणी घेऊन जाऊ लागला तरी दु:ख करू नका. पीक लावणे आणि मेहनत करणे यावरच तुझा अधिकार आहे. आलेल्या पिकावर तुझा अधिकार नाही.

ट्रुमन श्रेय घेण्याच्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टीबद्दल बोलत आहे. गीता पीक या फिजिकल गोष्टीबद्दल बोलत आहे.
गीतेचा संदेश अत्यंत वाईट आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

इट इज योर वर्ड अगेन्स्ट माय वर्ड.

मला तरी त्यात काहीच वेगळा अर्थ दिसत नाही. फलाची व्याख्या माझ्या दृष्टीने दोन्ही एकच असल्याचे सांगते. इट इज योर वर्ड अगेन्स्ट माय वर्ड.

थोडा फरक

गीतेचा संदेश 'अधिक वाईट' आहे असे म्हणता येईल. श्रेय मिळणे हा मेहनतान्याचा एक भागच असतो. अर्थात, आऊटसोर्सिंगच्या हमालांना त्याची सवय नाही हे मान्यच आहे.

कै च्या कै अर्थ काढलाय

>>>गीतेचा संदेश अत्यंत वाईट आहे.

स्वतःला हवा तसा (शक्यतो वाईट) अर्थ काढायचे ढळढळीत उदाहरण.

याच उदाहरणाबद्दल बोलायचे झाले तर गीता असे म्हणते की शेतात व्यवस्थित/नेमाने काम करणे, पिकांची निगा राखणे हे तुझे कर्म आहे. ते तू नीट कर. तुझे कर्म तू नीट पार पाडल्यावरही, पीक नीट येणे / न येणे या वर (तुझ्या अखत्यारी बाहेरच्या गोष्टींमुळे) तुझा अधिकार (कंट्रोल या अर्थाने) नाही (त्या मुळे तू त्याचे दु:ख करत बसू नकोस).

आलेले पिकावर तुझा अधिकार नाही (ते दुसर्‍याला दे) असे यात गीता कुठेही सांगत नाही. पीक चांगले येणे / न येणे यावर तुझा अधिकार नाही.

असहमत.

अधिकार या शब्दाचा कंट्रोल असा अर्थ अभिनव आहे. पण गीता तरी हा शब्द राईट/हक्क या अर्थानेच वापरत आहे.

गीता पीक येणे न येणे यावर अधिकार नाही असे कुठेही म्हणत नाही ती फळावर अधिकार नाही असेच म्हणते. पीक येणे नयेणे हे तुझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे म्हणून तू फळाची अपेक्षा करू नको असे म्हणणे योग्य झाले असते. त्या ऐवजी फळावर तुझा अधिकार (कदापि) नाही असे स्पष्ट आणि नि:संदिग्धपणे म्हणत आहे.

आलेले पीक दुसराच नेतो ही वस्तुस्थिती होती/आहे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

स्पष्ट आणि नि:संदिग्धपणे काय सांगितले आहे?

अहो चांगले पीक येणे हेच शेतीत तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ आहे. पण ते तसे येईलच अशी अपेक्षा धरू नकोस असे गीता सांगते. (फळ तुला हवे तसे येईल असे समजण्यावर तुझा अधिकार नाही).

जर चांगले फळ आले तर दुसर्‍याला देऊन टाक असे सांगत नाही.

असो. जो तो आपापल्या परीने अर्थ लावायला समर्थ आहे. त्यामुळे ही चर्चा इथेच थांबवू.

स्पष्ट आणि नि:संदिग्ध

'मां फलेषु अधिकार: ते' असा उल्लेख आहे, म्हणजेच 'फळावर अधिकार नाही' किंवा 'फळाची अपेक्षा करू नकोस' असा अर्थ घेऊ की! 'फळाच्या अपेक्षेवर अधिकार नाही' असा अर्थ का?

यू कॅन बट यू मे नॉट

फळाच्या अपेक्षेवर तुम्ही अधिकार ठेवू शकता पण ठेवू नका.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

संत्री आणि सफरचंदे

तेथे दोन वेगवेगळ्या फळांविषयी चर्चा चालू होती. चिनार यांचा युक्तिवाद आहे की "फळ (पक्षी: पीक) येईल अशी अपेक्षा धरू नको, पीक आले तर तुला घे" असा अर्थ आहे. थत्ते यांचा युक्तिवाद आहे की "फळ (पक्षी: जे काही उगवेल त्या पिकाची मालमत्ता) तुला मिळेल अशी अपेक्षा धरू नको" असा अर्थ घ्यावा. मला थत्तेंनी दिलेला अर्थ पटतो.

सहमत

चिनार ह्यान्च्या मताशी सहमत.

अहो हे भौतिक आणि आधिभौतिक विचारांची गल्लत करत आहेत.

गीता जे सांगते ते आध्यात्मिक पातळीवर आहे, तिथे भौतिक सुखांचा विचार नाही, आणि जरा नीट वाचा कि गीता.
त्याचा संदर्भ असा आहे कि कृष्ण अर्जुनाला म्हणतो - तू एक साधन आहेस, तू मारणारा कोण आणि ते मारणारे कोण जे काही आहे ते सर्व मीच करत आहे, तू फक्त एक साधन आहे. सामान्य माणसाने त्याचा असा अर्थ लावायचा कि कर्म करणे हे आपल्या हातात आहे, त्याच्या फलाबद्दल आसक्ती धरू नकोस, त्यातून तमोगुणाची वाढ होते. आणि ते तमोगुण वाढले कि माणसे असे काही अर्थ काढत बसतात.

उगाच शब्द आहेत म्हणून अर्थ काढायचे म्हणजे शिक्षकासारखे आहे.

अध्यात्मिक?

>>गीता जे सांगते ते आध्यात्मिक पातळीवर आहे,

टिळक चुकले म्हणायचे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

??

तुमच्या हिशोबाने गीताच चुकीची/वाइट आहे, त्याचे सार सांगणारे टिळक बरोबर कसे म्हणता?

इसविसन

आभार.
व्यवहारात गणपती व उन्दीर वजनाच्या भावाने तोल्तात्. कदाचित उन्दराचे वजन जास्त व गणपतीचे कमी असु शकते.
प्रेरणा स्रोत म्हणुन पहाता तिरन्गा झेण्दा त्या च्या कापडा पेक्शा वेगळा आहे. अश्या अर्थाने १२०१० कडे पहावे.सोय म्हणुन निश्चित दोन् अन्कि सन चालेल.
रज

काही कळले नाही.

इ. स. पूर्व ८००० वर्षे आपली सभ्यता होती तर २०१० पूर्वी १ आकडा का लावायचा? ८००० ची १०००० कधी आणि कशी झाली?

जग इसवि सनाने सुरु झाले नाही हे मान्य. जग काळाच्या नेमक्या कोणत्या एककाने सुरु झाले?

भारताचा सुवर्णकाळ हा मानवतेचा इतिहास म्हणजे काय? नेमका कोणता सुवर्णकाळ वगैरे?

सगळे डोक्यावरून पार.

अजब शोध

परन्तु इसवि सना पुर्वी ८००० वर्ष आपली सभ्यता अस्तित्वात होती
हा शोध आपण कोठून लावलात? काही संदर्भ दिल्यास योग्य ठरावे.
चन्द्रशेखर

नाही पटत.

>>... इसवि सना पुर्वी ८००० वर्षे आपली सभ्यता होती <<
सभ्यता होती का संस्कृती?

(साधारण) ४५ लाख वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली, तेव्हापासून कालगणना का सुरू करू नये? शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला, तो का सोडून द्यायचा?

बाकी धनंजय यांच्या प्रतिसादातील 'बेबी सन' फारच आवडला.

हे सजेशन त्यांनीही दिले असतेच.

(साधारण) ४५ लाख वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली, तेव्हापासून कालगणना का सुरू करू नये? - कारण त्यांना असे म्हणायचे आहे की, मानव जेव्हा नोंद घ्यावी वाटेल अशी कामे करु लागला- तेव्हा पासूनचा काल घ्यावा अन्यथा हे सजेशन त्यांनीही दिले असतेच.

काहीही

>> मानव जेव्हा नोंद घ्यावी वाटेल अशी कामे करु लागला<<
म्हणजे आत्ताचा कालसुद्धा सनापूर्वीचाच घ्यावा लागेल!

तुमचे म्हणणे खरे आहे.

हो, चालू शकेल की! नोंद घेण्यासारखे काहीच नसले तर तुमचे म्हणणे खरे आहे. ब्युटी इज इन द आय ऑफ द बिहोल्डर.

ठ्यां

=))

सिक्सर!

म्हणजे आत्ताचा कालसुद्धा सनापूर्वीचाच घ्यावा लागेल!

खलास !

?

(साधारण) ४५ लाख वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली, तेव्हापासून कालगणना का सुरू करू नये?

त्याच्या आधीपासून का नको? सध्याचा चालू इसवी सन २०१०, म्हणजे शालिवाहन शक(२०१०-७८=)१९३२. जेव्हा शून्य शक चालू झाला, तेव्हा चालू कल्पापैकी ६ मनु, २७ महायुगे. २८व्या महायुगाचे कृत, त्रेता, द्वापार हे तीन चरण व कलीची ३१७९ वर्षॆ होऊन गेली होती. ६ मनूंची १,८४,०३,२०,००० वर्षे, त्यांच्या सात संधींपासून* होणार्‍या ७ कृतयुगांची १,२०,९६,०००, २७ महायुगांची ११,६६,४०,०००, २८ व्या महायुगातील गत चरणत्रयाची ३८,८८,०००, होऊन कलियुगाचे (३१७९+१९३२=)५१११ वे वर्ष चालू आहे म्हणजे कल्पारंभापासूनचे १,९७,२९,४९,१११ वे वर्ष सध्या चालू आहे. माझ्या मते, इसवी सनाऐवजी तोच सन वापरावा.--वाचक्‍नवी
*दोन मनूंच्या मधल्या काळात एका कृतयुगाइतके(१७,२८,००० वर्षे) अंतर असते.

चूक

४५ लाख वर्षे नसून ४५० कोटी असे वाचावे. चूक् लक्षात आणून दिल्याबद्दल चिनार यांचे आभार.

स्केल

सध्या जो सन वापरला जातो तो जगात एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी वापरला जातो. मग इसवीसनापूर्वी संस्कृती असलेल्या चीन, ग्रीस, इजिप्त या प्रत्येकाने आपल्या इतिहासाप्रमाणे आकडा वापरायचा ठरवला तर अवघड होईल.

८००० वर्षापूर्वी आमच्या महाराष्ट्रात सभ्यता होती की नाही याची कल्पना नाही. नसेल तर मग आम्ही का बरे १०००० वाढवावे?

धनंजयशी सहमत.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

सनसनीखेच धागा

सन सनन सन्

राजा अशोकाच्या कालावधी पासुन हे भारतसन झाले पाहीजे ही मागणी.. ;-)

+ १

सनसनीखेच धागा- होय. खापकन् ५० प्रतिसाद आले.

कारण काय?

मूळ लेखाचा मुद्दा मानसिक समाधान मिळण्याशी संबंधित असावा.

खरेतर अमेरिका सध्याचा सर्वात बलवान देश आहे त्यामुळे त्यांनी इसवीसन न वापरता त्यांच्या स्वातंत्र्यापासून कालगणना करायला हवी आणि ती सगळ्या जगावर लादायला हवी. त्यामुसार सध्याचा सन २३४ यावा.

अर्थात बलवान असलेल्यांना अशा क्षुद्र विषयांत आपला स्वाभिमान शोधावा लागत नाही.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

मस्त

अर्थात बलवान असलेल्यांना अशा क्षुद्र विषयांत आपला स्वाभिमान शोधावा लागत नाही

सर्वात मस्त!

आकडे

तुम्हाला आकडे च मोजायचे असतील तर माझ्या कडे http://4.bp.blogspot.com/_oxnDGasv6ig/TCuU4slkCHI/AAAAAAAAAEM/AnCJ4j0I1W...
ही लिन्क आहे.१ वर् ९६ शुन्य म्हनजे दश् अनंत पर्यंत मोजता येते. मला अमेरीकेच्या एका ग्रुपवरुन मेल द्वारे हा खजीना मिळाला आहे. १०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००. हा आकडा दश अनंत आहे.
धन्यवाद.

 
^ वर