अभिनय कुलकर्णी यांचा अपघाती मृत्यु

आज सकाळी मराठी बातमी पत्रात इंदूरहून मुंबईकडे येत असलेल्या लक्झरी बसला झालेल्या दुर्दैवी अपघाताची बातमी पाहिली. मृतात वेबदुनिया या पोर्टलच्या मराठी आवृत्तीचे प्रमुख अभिनय कुलकर्णी (वय ३२) यांचा समावेश आहे.

काही दिवसापूर्वी "उपक्रम" वर त्यांच्या "ब्लॉग जगत" या लेखावर श्री.वसंत लिमये यांनी दिलेला लेख/धागा वाचला होता. धाग्यात उल्लेख झालेले श्री.अभिनय कुलकर्णी म्हणजे हेच कालच्या अपघातात मृत झालेले अभिनय कुलकर्णी होत असे एका निरोपाद्वारे समजले.

या तरूण होतकरू सदस्याच्या अकाली मृत्युमुळे फार वाईट वाटले. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो !

लेखनविषय: दुवे:

Comments

फार वाईट झाले

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

श्रद्धांजली

फारच वाईट झाले. श्रद्धांजली.

माझीही श्रद्धांजली !

बातमी वाचून सुन्न झालो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

दु:खद

अतिशय वाईट वाटल.भोचक नावाने लिहिणारे आपले उपक्रमचे सदस्य होते. प्रथम मिपावर श्रावण मोडक यांनी हे प्रकटन केले. ई सकाळ मधे बातमी पहा.
प्रकाश घाटपांडे

श्रद्धांजली

भोचक म्हणजे अभिनय कुलकर्णी हे माहित नव्हते. विनम्र श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगातून जाण्यासाठी मानसिक बळ मिळावे हीच इच्छा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

+१

त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगातून जाण्यासाठी मानसिक बळ मिळावे हीच इच्छा.

हेच म्हणतो.

दुर्दैवी अपघात

>>> प्रथम मिपावर श्रावण मोडक यांनी हे प्रकटन केले. <<<

"सकाळ" पूर्वी म.टा. वर हे वृत्त वाचले होते. मी "मिपा"चा सदस्य नसल्याने तेथील घडामोड समजणे शक्य नव्हते, मात्र "मायबोली"वरील एका सदस्य मित्राने व्य.नि.ने हे कळविले आणि इथे "उपक्रम" वर या बातमीचा उल्लेख नसल्याने ती द्यावी असे वाटले.

(जादाची माहिती समजली ती अशी की, श्री.अभिनय यांची पत्नी [भाग्यश्री] आणि छोटी मुलगी या दुर्दैवी अपघातातून बचावल्या आहेत. ईश्वर, या कठीणसमयी श्रीमती भाग्यश्री यांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.)

त्यांचा ब्लॉग

भोचक हा त्यांचा ब्लॉगही आहे. मी आहेच मुळी भोचक हे शब्द कानात घुमतात. श्रावण मोडक यांनी प्रत्यक्ष न भेटलेल्या या सच्चा माणूस बद्दल लिहिलय ते वाचा.
प्रकाश घाटपांडे

धक्का बसला

भल्या सकाळी फारच वाईट वृत्त ऐकावयास मिळाले. :-( त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगात धीर मिळो.

असेच झाले

भल्या सकाळी फारच वाईट वृत्त ऐकावयास मिळाले. :-(

असेच झाले. खूप धक्का बसला आणि वाईट वाटले.

अतिशय वाईट वाटले

धक्कादायक बातमी. श्रद्धांजली.

श्रद्धांजली

वाचून वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

राधिका

सद्गती

अभिनय कुलकर्णी यांच्या आत्म्याला ईश्वर सद्‌गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाची कल्पनाही करवत नाही. आपणही त्यांच्या दुःखात सहभागी होऊ या.--वाचक्‍नवी

सद्गती लाभो...

अतिशय वाईट बातमी.

गेल्या वर्षी व्यंकटेश चपळगावकर हा `स्टार माझा` वाहिनीचा तरुण पत्रकार असाच रात्री-मध्यरात्री झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला. ही बातमी कळल्यानंतर त्याच्या घरी उडालेला तो हलकल्लोळ आजही डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभा राहतो.

आता ही बातमी. तीच रात्रीची वेळ...

अभिनयच्या आत्म्याला सद्गती लाभो. त्याच्या जाण्याचे दुःख सहन करण्यासाठी आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना बळ मिळो.

अतिशय वाईट बातमी.

वाचून वाईट वाटले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

शैलु.

धक्कादायक

कळते समजते या ब्लॉगवर प्रथम वाचले तेंव्हा हेच का ते अशी शंका आली. माझी त्यांची ओळख फक्त त्यांच्या भोचक या ब्लॉगमुळे. त्यांचा "पाव मार्काचा धडा!" मला कधीच विसरता येणार नाही.
http://bhochak.blogspot.com/2010/01/blog-post_09.html

त्यांच्या ब्लॉगचा आर.एस.एस. फीड रीडरमधून डिलीट करताना घरातल्याच एखाद्या माणसाला शेवटची भेट देत असल्यासारखं वाटलं.
_____
अपघाताचे तपशील वाचल्यावर हा ईश्वराचा कोणता न्याय आहे तेच समजेनासे झाले आणि अशी काहीतरी काल्पनिक समजूत करून घेतली...

रात्रं गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिस्यति पंकजश्री |
इत्थं विचिन्त्ययति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहार ||

ही रात्र सरेल, सूर्याच्या आगमनाने दशदिशा उजळून निघतील. संध्याकाळी कमळाच्या पानात अडकून पडलेला भुंगा विचार करतो, आपली मुक्ती आता ही आलीच जवळ. पण एक मदन्मोत्त हत्ती बेमुर्वतपणे आपल्या सोंडेने ते कमळच उखडून फेकून देतो, आणि अखेर होते ती त्या भुंग्याची आणि त्याच्या स्वप्नांचीही!

 
^ वर