मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे कोणते किबोर्ड लेआऊट चा वापर करता येईल काय..?

मी जात्याचा वेब डिजायनर आहे परंतु मराठी मध्ये अजुन एकहि संकेतस्थळ तयार केलेले नाहि.
आता मला एक खाजगी संकेतस्थळ तयार करावयाचे आहे.
तरी गमभन मराठी लेआऊट वापरा व्यतिरीक्त मराठी संकेतस्थळ सुरु करावयासाठी दुसरे किबोर्ड लेआऊट
चा वापर करता येईल काय..?
जसे APS - Anglo Nagari Keyboard Layout / Godrej Layout / Remington Layout..
उपाय सुचवावेत हि विनंती...

लेखनविषय: दुवे:

Comments

जात्याचा??

मी जात्याचा वेब डिजायनर आहे

'जात्याचा' वेब डिजायनर म्हणजे काय हे कळेल का?

की आपल्याला,

'मी जात्या वेब डिजायनर आहे' असे म्हणायचे आहे?

आपला,
(जात्या-ओवीतला!) तात्या.

बाय द वे, मराठी माणसांनी एकत्र येणे, फाळणी, मराठी माणसांकरता काय करता येईल, गाभा, खोली अन् काय काय अगम्य शब्दांची चर्चा सुरू असताना अजून एक मराठी माणूस नव्याने एक नवं संकेतस्थळ उभारू पाहण्यास उत्सुक आहे हे बाकी गंमतीशीर आहे! ;)

मराठी विद्यार्थ्यांकरताही एक संकेतस्थळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे कळते. बरं का दिपकजी, आपल्यालाही एक संकेतस्थळ उभारायचे आहे असे आपण म्हटले आहे. आपणच का नाही या निमित्ताने शाळेत समाधान न झालेल्या मराठी विद्यार्थ्यांकरता एखादे संकेतस्थळ उभारून देत? मराठी विद्यार्थ्यांकरता पहिले संकेतस्थळ उभारण्याचे श्रेय लाटायला मिळेल! ;) बघा बुवा! मस्तपैकी चान्स् आहे! ;)

लोहा गरम है, मार दो हातोडा!! ;)

आपला,
(फुकटचा सल्लागार!) तात्या.

१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

इंडिक वेब इनपुट

इंडिक वेब इनपुट ही आणखी एक मुक्त टंकलेखन प्रणाली आहे. तिचा वापर करून मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखन करता येते. उच्चारानुसारी (फोनेटिक) पद्धतीबरोबरच Inscript आणि WX हे पर्याय उपलब्ध आहेत.

इंडिक वेब इनपुट इथून उतरवून घेता येईल. चालते उदाहरण इथे पाहता येईल. इंडिक वेब इनपुट ड्रुपलबरोबर कसे जोडावे याची माहिती चित्तरंजन यांनी इथे दिली होती.

 
^ वर