उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नवीन ब्लॉग चालू करण्यासाठी मदत हवी आहे.
राजकुमार
July 14, 2010 - 8:52 am
नमस्कार ,
मला एक नवीन ब्लॉग चालू करायचा आहे. खालील बाबीं करीता मदत हवी आहे.
१. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस पैकी काय वापरु ?
२. ब्लॉगची भाषा मराठी असेल. मराठी टंकलेखनासाठी वेगवेगळे पर्याय सुचवा. (आता दुसरीकडून कॉपी करुन डकवला आहे.)
३. मी ऊबंटू वापरत आहे. साह्जीकच फायरफॉक्स वापरावे लागेल. (क्रोमचा पर्याय आहे) मराठीतला 'ठ' टंकण्यास अडचण येते आहे. त्यावर उपाय सुचवावा.
४. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस ने दिलेल्या टेम्प्लेटस् व्यतिरीक्त इतर टेम्प्लेटस् कसे वापरावे ?
अजून काही शंका नंतर येतील तसतशा विचारीत जाईन.
धन्यवाद !
दुवे:
Comments
खाली दुव्यावर पाहा.
इथे काही मदत मिळेल तुम्हाला.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
आपण दिलेला दुवा पाहिला...
आपण दिलेला दुवा पाहिला...फारच उपयुक्त. मात्र फक्त ब्लॉगस्पॉटविषयीचीच माहिती मिळाली.
वर्डप्रेसबद्दल उत्सुकता आहेच.
काय मदत हवी !
१. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस पैकी काय वापरु ?
दोन्हीही वापरा.
२. ब्लॉगची भाषा मराठी असेल. मराठी टंकलेखनासाठी वेगवेगळे पर्याय सुचवा.
टंकलेखनासाठी बरहा वापरा. [बाकी कोणी कितीही कशाचे महत्त्व पटवून दिले तरी 'बरहाच' वापरा]
बरहाचा दुवा इथे
मराठीतला 'ठ' टंकण्यास अडचण येते आहे.
बरहात टंकन करीत असाल तर कळफळकावरील शिफ्ट 'टी' आणि नॉर्मल कळफलकावरील 'एच' दाबल्यास 'ठ' उमटेल.
ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस ने दिलेल्या टेम्प्लेटस् व्यतिरीक्त इतर टेम्प्लेटस् कसे वापरावे ?
वर्डप्रेसवर मात्र त्यांनी दिलेल्याच टेम्प्लेट्स वापरता येतात. दुसर्या टेम्प्लेट्ससाठी पैसे भरावे लागतात. वर्डप्रेसवर फुकट पाहिजे तशा टेम्पल्टेसचा जरा अभावच आहे. :(
अजून काही शंका नंतर येतील तसतशा विचारीत जाईन.
नक्की विचारा. मला जेवढी माहिती आहे. तेवढी नक्की देईन.
-दिलीप बिरुटे
टंकलेखनासाठी बरहा वापरा.
धन्यवाद दिलीप साहेब,
आपण दिलेला दुवा तपासला मात्र ते फक्त विंडोज प्रणालीवरच चालेल असे दिसतेय. मी विंडोज ला कंटाळून जानेवारी २०१० मध्ये उबंटू लिनक्स वापरण्यास सुरुवात केली आहे. काही उपाय करता येईल काय ?
ब्लॉग सुरू तर करा!
१. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस पैकी काय वापरु ?
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी देखील वर्डप्रेसची निवड केली आहे. नवीन ब्लॉग लेखकांना ब्लॉगरपेक्षा वर्डप्रेस सोयीचे वाटत असावे. सध्या वर्डप्रेसचे पारडे जड दिसते. (का ते माहीत नाही!)
http://aabapatil.wordpress.com/
२. ब्लॉगची भाषा मराठी असेल. मराठी टंकलेखनासाठी वेगवेगळे पर्याय सुचवा. (आता दुसरीकडून कॉपी करुन डकवला आहे.)
सध्यातरी कॉपी-पेस्ट पर्यायच बरा आहे.
http://saraswaticlasses.net/shabdasampada/
वर दिलेल्या पानावर मराठी टंकलेखन खूप सोपे आहे.
३. मी ऊबंटू वापरत आहे. साहजिकच फायरफॉक्स वापरावे लागेल. (क्रोमचा पर्याय आहे) मराठीतला 'ठ' टंकण्यास अडचण येते आहे. त्यावर उपाय सुचवावा.
फायफॉक्समध्ये मराठी टाईप करण्यासाठी एकूण ५ अॅड-ऑन आहेत. त्याची यादी येथे मिळेल.
http://mr.upakram.org/node/2634#comment-42039
आपण लिहीले आहे, ठ टाईप करता येत नाही. पण ट तर टाईप करता येतो ना? मग जर स्पेल-चेकचे अॅड-ऑन टाकले असेल तर सरळ मराटी असे टाईप करून त्यावर राईट क्लिक केल्यावर "मराठी" असा ऑप्शन दिसतो, तो निवडावा.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/
ही युक्ती इतर अनेक जटील शब्दांसाठी लागू होते.
४. ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस ने दिलेल्या टेम्प्लेटस् व्यतिरीक्त इतर टेम्प्लेटस् कसे वापरावे ?
आधी ब्लॉग सुरू तर करा!
ब्लॉग सुरू तर करा!
शंतनू साहेब,
फारच उपयुक्त माहिती. आपण दिलेल्या सगळ्या दुव्यांना भेट दिली. एक-दोन दिवसातच ब्लॉग चालू करीन म्हणतो.
आधी ब्लॉग सुरू तर करा! हे तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे.
पाण्यात उडी मारतो. बघू पोहता येते का ते ! बुडायला लागलो तर आजूबाजूला मंडळी आहेतच वाचवायला हा आत्मविश्वास आला आहे.
कळविण्यास आनंद होतो की.....
कळविण्यास आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने नुकताच ब्लॉग सुरु केला आहे. दुवा खालीलप्रमाणे...
http://rajdharma.wordpress.com/