ब्र - कविता महाजन
ब्र - कविता महाजन:
किमंत: १८० भारतीय रुपये
पृष्ठे: ३३६
प्रकाशक: राजहंस प्रकाशक
आवृती: दुसरी, ऑक्टोबर २००५
हे अनुभव लेखन आहे आहे एका सामान्य स्त्रीचे. एक सर्वसामान्य गृहीणी ते एक समाजसेविका असा प्रवास झालेला.
ती स्त्री ’प्रगत’ या स्वयंसेवी संस्थेतर्फ़े महाराष्ट्रातील राजकारणातील स्त्रीयांच्या अडीअडचणी जाणुन घ्यायच्या प्रकल्पावर काम करत असते. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या राजकारणातील, समाजकारणातील स्त्रीयांना भेटावे लागते. पुस्तकात बहुतेक वर्णने ही आदिवासी भागातील स्त्रीयांची आहेत.
पुस्तकात असलेली माहीती:
स्त्रीयांचा राजकारणात होणार्या प्रवेशामागची कारणे ही मुख्यत: सरकारने राखीव केलेल्या जागा हे आहे. काही स्त्रीया ह्या समाजकारणातुन(बचतगट वैगरे) ह्यातुन राजकारणात आलेल्या आहेत. राखीव जागावर येणार्या स्त्रीया, ह्या पुरुष मंडळीना एक रबरी शिक्का म्हणुन हव्या असतात. न शिकलेल्या, अधिकार न गाजवणार्या स्त्रीया जास्त हव्या असतात. तसे नसलेल्या स्त्रीयांना वेगवेगळ्या मार्गाने नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जातात.
बरेचदा आदीवासी स्त्रीया ह्या सरपंच होउन बरोबरीने बसतात हे परंपरागत राजकारणी(येथे मराठा जातीतील) लोकांना फारसे रुचत नाही. मराठा जातीकडुन आदीवासी जात ही वेठविगार, खालच्या थरातील समजली जाते.
राजकारणातील स्त्रीयांना असमान वागणुकीला तोंड द्यावे लागते, उदा. स्त्रीयांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न मिळणे, महत्वाच्या राजकिय कार्यक्रमांना न बोलावणे, झेंडावंदनाचा मान केवळ स्त्री आहे म्हणुन नाकारणे, पुरुष उपसरपंचाकडे सर्वकारभार ठेवणे इत्यादि. त्यात निरक्षरतेचा सगळ्यात जास्त त्रास होतो आहे. स्त्रीयांना घरचे काम करुन, समाजकार्यासाठी द्यावा लागणारा वेळ; त्यातुन बुडणारे काम/मजुरी, सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य ह्यातुन कोणतेही नसलेले उत्पन्न/सरकारी वेतन ह्या देखील अडचणी आहेत.
निवडुन येण्यासाठी करावा लागणारा खर्च हा देखील स्त्रीयांची मुख्य अडचण आहे. दारु, पैसे वाटुन मते विकत घेण्याची प्रथा चांगले काम करणार्या स्त्रीयांना राजकारणात येण्यापासुन वंचित ठेवत आहे.
राजकारणातील स्त्रीया ह्यांना आपल्या मार्गातुन बाजुला काढण्यासाठी त्यांच्या घरच्या माणसांना त्यांच्या विरोधात फ़ितवणे, प्रसंगी पैश्याची लालुच दाखवणे, दारु पाजणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात. प्रसंगी एकाद्या भगताची मदत घेउन स्त्रीबद्दल चुकीचे समज पसरवुन तीला मार्गातुन हटवले जाते. सरपंच झालेल्या स्त्रीयांना अविश्वासाचे ठराव आणुन सरपंचपदावरुन दुर केले जाते. त्यात बरेचदा ग्रामसेवक, तहसिलदार या सरकारी अधिकार्यांची मदत असते.
बरेचसे चित्र हे स्त्रीयांना राजकारणातुन येणापासुन रोखणारे असले तरी स्त्रीया ह्या खंबीरपणे तोंड देत आहेत. त्यांना वेगवेगळ्या आदिवासी संघटना, स्वयंसेवी ह्या मदत करत आहेत.
निवडणुका लढवायला लागणारा पैसा त्यामुळे सुरु झालेला भ्रष्टाचार, स्वयंसेवी संस्था खोटे प्रकल्प दाखवुन परदेशी/सरकारी मदत हडपणे, आदिवासीतील व्यसनाधिनतेमुळे काही ठिकाणी चांगल्या योजनांची वाट(सरकारी मदत म्हणुन मिळालेली शिलाई यंत्रे, अवजारी विकणे, त्या पैशात दारुन पिणे), संस्थाचालकांचा स्वार्थीपणा, नक्षलवादी समजुन केलेली आदीवासींना मारहाण/दिलेला त्रास ह्यांची काही उदाहरणे आली आहेत.
त्रुटी: हे पुस्तक हे जवळपास पुर्णपणे राजकारणातील स्त्रीयांनी दिलेल्या किंवा स्त्रीयांच्याबद्दल सहानुभुती बाळगणार्या मंडळीनी दिलेल्या माहीतीवर लिहीले आहे. राजकारणातील स्त्रीयांचे राजकिय पुरुष विरोधक ह्यांचे दृष्टीकोन/मते ह्या पुस्तकात येत नाहीत. लेखिकीने त्या राजकीय विरोधकांबद्दलची मते स्त्रीयांनी दिलेल्या माहीतीवरुन बनवली आहेत. पुस्तकात कोणताही संख्याशास्त्रीय विदा आढळला नाही.
Comments
चांगला आढावा
पुस्तक मिळाल्यास वाचण्याबद्दल थोडेसे कुतूहल वाटते आहे.
छान
ओळख आवडली. याच पुस्तकावर नंदनने लिहीलेला लेख इथे वाचता येईल.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
अजून एक लेख
या पुस्तकावरील अजून एक लेख इथेही आहे.