तर्कक्रीडा - पहेचान कोन?

एक फार रोचक गोष्ट अनुभवास आली. सनस्क्रीन लोशन ऐकले असेल. सुर्याकिरण-युव्ही इ बचाव करण्यास व त्वचारक्षणास उपयुक्त म्हणून याचा वापर आहे. यात परत एस पी एफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) असा एक प्रकार आहे SPF 15, SPF 30, SPSF 50 etc. म्हणजे किती मिनटे हे क्रीम/लोशन तुमचे सरंक्षण करु शकते. आता सनस्क्रीन आणा म्हणजे काय मेडीकल शॉप मधे जाउन "एखादे चांगले सनस्क्रीन दाखवा" मग उपलब्ध उत्पादनांपैकी जे बरे वाटते (कंपनी, किंमत इ) ते घेणे. इतका सरळसोट मामला.

तर अश्या पर्सनल केअर नावाने ओळखल्या जाणार्‍या काही प्रतिथयश ब्रँडसचे आपल्यापैकी बरेच जणांनी नाव वाचले असते उदा. पाँडस् क्रीम, निव्हीया, गार्निएर् इ. आता बर्‍याच जणांना हेही माहीत असेल की पाँडस् हा ब्रँड युनिलिव्हर कंपनीचा (डच-युके), निव्हीआ हा ब्रँड बेयर्स्डॉर्फ (उच्चार?? - जर्मन) तर् गार्निएर् हा ब्रँड लोरिआल (फ्रेंच) आहे. आता ह्या तिन्ही कंपन्या म्हणायला एकमेकांच्या प्रतिस्पर्धी त्यामुळे जाहीरातींद्वारे आपलेच उत्पादन महान कसे वेगळे, आकर्षक आहे या करता कोट्यावधी खर्च करत असतात. दुसर्‍या उत्पादनांपेक्षा वेगळे पॅकेजींग इ.

असो तर तर्कक्रीडा - पहेचान कोन नक्की काय भानगड असा प्रश्न पडला असेलच. तर खाली दिलेले फोटो पहा. एकच उत्पादन एकच पॅकेजिंग पण तिन्ही कंपन्यांची नावे आहेत. हे कसे काय शक्य आहे?

ज्या दुकानातुन घेतले तिथे चौकशी केली असता आता पाँडसने हे उत्पादन करणे बंद केले आहे, निव्हीआ करते इतकी माहीती मिळाली, ती खरी की खोटी कल्पना नाही. :-) पण तेच उत्पादन, तेच पॅकेजिंग फक्त शिक्का वेगळा. अगदी एक्पायरी डेट देखील एकच आहे :-)

मी जेव्हा ऑनलाईन शोध घेतला तेव्हा मला हेच उत्पादन गार्निएर-लोरीआल कंपनीच्या नावाचे असल्याचे दिसले.

नक्की हे उत्पादन कोणाचे व पुण्यात वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांच्या नावाने विकले जात आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

च्यामारी?

च्यामारी आतून एकच आहेत की काय हे लोक?
की एकच (चीनी?) प्रमुख उत्पादक ज्याचे नाव नाही आणि हे चोर लोक त्याच्या कडून खरेदी करून अव्वाच्या सव्वा भाव लाऊन विकतात?

ट्युब तर एकच आहे - लोच्या आहे नक्कीच!

आपला
गुंडोपंत

आठवण

मी दुकानात पाहिलेल्या बाटलीच्या आठवणीप्रमाणे निव्हीयाचं प्रोडक्ट् असं दिसतं; आणि पाँड्सचं सनस्क्रीन दुकानात पाहिल्याचं आत्ता तरी आठवत नाही.

पण हा लोचा आहे खरा!

लोचा

लोचा आहे असे वाटते आहे. किंबहुना प्याकेजिंग इतके सारखे असेल तर ज्या कंपनीचे आधी आले असेल ती दुसरीला कोर्टात खेचू शकते. इथे दोघी गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे पाहून आश्चर्य वाटले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

काही शक्यता

१. दोन्ही उत्पादने नकली आहेत.
२. दोन्ही उत्पादने असली आहेत. (म्हणजे दोन्ही कंपन्यांचे संगनमत आहे.)
३. कुठले तरी एक उत्पादन नकली आहे.

तिन्ही शक्यतांवर विचार करतो आहे. तुम्हाला काय वाटते?

जाता-जाता
पुरुषाला कशाला हवे मेकपचे सामान!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तर्क

१) दोन्ही उत्पादने नकली असावीत. - असेच् वाटतेय..
२) देशांतर्गत करार होउन एकमेकांना काही बिझनेस/उत्पादने विकली असावीत
३) अजुन खात्री झाली नाही पण फ्रेंचमधला मजकुर पाहून ते लोरीयालचे असावे असे वाटते व तसे असल्यास निव्हीया व पाँडस् दोन्ही नकलीच. जसे फुटपाथवर जीन्स सर्व प्रकारच्या लेबल्स असलेल्या.

अजुन एक फरक निव्हीयाचे सनस्क्रीन पॉम्डसपेक्षा ५०-१०० रु नी स्वस्त. जर पाँडसने धंदा बंद केला (पक्षी निव्हीयाला मोकळे रान) तर् स्वस्त कसे?

जाता-जाता
पुरुषाला कशाला हवे मेकपचे सामान!

हा प्रश्न धाग्याशी संबधीत नाही असे वाटते कारण सनस्क्रीन मेकपचे साहीत्य नसुन, सुर्यकिरणांपासुन बचावाकरता असते.

त्यामुळे पुरुषाला मेकपचे सामान बहुदा ती व्यक्ती कॅमेरासमोर असल्यास लागत असावी. अन्यथा आवड :-) मराठी ब्लॉग स्पर्धा होतात त्यावेळी कुठल्यातरी चॅनेलवर मुलाखत कार्यक्रम होत असेल तर पुरुष ब्लॉगर्सना पावडर मारली गेली होती का शोधा ;-)

आश्चर्य आहे

काहीतरी गडबड आहे खरी. असे कसे झाले असावे कळत नाही!

या सर्वांना कोणता एक प्रश्न विचारला तर गुंता सुटेल म्हणता! ;-)

हा गुंता

हा गुंता बहुतेक असुटणीय आहे :-)

खाली अक्षय यांनी जर निर्वाळा दिला की तीनही उत्पादने योग्य व हानी न पोहोचवणारी खरीखुरी सनस्क्रीन आहेत तर सुटेल अन्यथा मला वाइट वाटू नये म्हणून मी वापरायची किंवा टाकून द्यायची :-(

खरच अज्ञानात सुख असते हो! पाँडसचे सन क्रीम ओके आहे समजुन चाललो होतो अगदी तश्याच पॅकेज मधे आले नसते तर निव्हीयाचे पण चालून् गेले असते. आत्ता दोन्ही खोटी उत्पादने आहेत असे वाटते आहे.

असो काळजी करु नका, घरात डोव्ह, लोटस, सन ऑफ ऑस्ट्रेलिया व अजुन एक ऑस्ट्रेलीयन उत्पादन आहे. :-)

प्रतिसाद

माझे म्हणणे विसंगत असेल / कॉन्स्पिरसी थिअरी वाटत असेल तर दुर्लक्ष करावे , पण यामधे ग्राहकाची फसवणूक आहे आणि एका साध्या कन्ज्युमर प्रोडक्ट् मधे जर का इतका गोंधळ उडू शकत असेल तर शंभर कोटी ग्राहकांच्या या बाजारपेठेत नक्की कुठे कुठे काय काय घोटाळे होत असतील याची किंचित् कल्पना त्यातून येते असे मला वाटले.

हेच

अजुन कशात काय होत असेल? हाच मोठा प्रश्न आहे.

टिपीकली घराजवळच्या मेडीकल शॉपमधल्या फार्मसीवर विश्वास ठेवला जातो कारण बहुसंख्यांना नेमके औषध, पर्यायी औषध याबाबत एवढी माहीती नसते. त्या सनस्क्रीनमुळे काही तोटा झालाय का? दृश्य तोटा तरी नाही. आता ते सनस्क्रीन नक्की आहे की असेच क्रीम कल्पना नाही.

इतर औषधांच्या बाबत काय परिस्थीती कल्पना करायची तर चिंतेचा विषय आहे.

मेडीकल शॉपमधील फार्मसी

मेडीकल शॉपमधल्या फार्मसीवर

म्हणजे काय?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

स्वॉरी

मेडीकल शॉपमधल्या फार्मसीस्टवर

माझ्या माहीतीनुसार मेडीकल शॉपमधे सहसा डीप्लोमा इन फार्मसी, बी फार्म लोक असतात. चू. भू. दे. घे.

काय फरक पडतो?

तीनही कंपन्यांनी एकच उत्पादन विकल्याने काय फरक पडतो, हे कळले नाही.

अहो

पण तिन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे एकच उत्पादन फक्त वेगळ्या शिक्याखाली विकायची शक्यता कमी / नाही आहे.

तुम्हाला खात्री आहे का की तिन्ही कंपन्यांनी वर फोटोत दिलेले उत्पादन सहमतीने बाजारात आणले आहे?

उत्पादन वेगळे असल्याचा दावा

बर्‍याचवेळा कंपन्या आमचे उत्पादन इतरांपेक्षा सरस कसे आहे हे दाखवण्यासाठी स्पर्धकांच्या उत्पादनामध्ये न आढळणार्‍या किंवा त्रुटी असलेल्या बाबींची जाहीरात करतात. उदा. टुथपेस्टा. तशी जाहिरात या कंपन्यांनी या उत्पादनाबाबत केली असल्यास या कंपन्या काहीतरी गैर करत आहेत असा निष्कर्ष काढता येईल.

पेटंटविरहीत झाल्यानंतर अनेक औषधकंपन्या एकच उत्पादन वेगवेगळ्या ब्रँडखाली विकतात. पैसे वाचवण्यासाठी अनेक कंपन्या एकाच काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चररकडून औषधे विकत घेतात व स्वत:चे लेबल लावून विकतात.

मालक

वर दाखवलेल्या फोटोप्रमाणे फक्त नाव वेगळे बाकी सर्व मजकूर जसाच्या तसा व एकाच प्रकारच्या साईझ्, कलर, शेपच्या ट्युब मधे तुम्ही टुथपेस्ट पाहीली आहे का?

वर दाखवलेली सन्स्क्रीन खात्रीलायक तिन्ही कंपन्यांनी समजुन उमजुन पॅकेज करुन बाजारात आणल्याची आपणास माहीती आहे का?

कृपया हो अथवा नाही मधे उत्तर आवडेल.

माहीत नाही

तुम्हाला माझा मुद्दा न समजल्यासारखे वाटत आहे म्हणून हो-नाही पलिकडे टंकावे लागत आहे. आमच्या टूथपेस्टमध्ये अमूक काहीतरी आहे त्यामुळे दातांची निगा योग्य प्रकारे राखली जाते असे टुथपेस्ट कंपन्या जाहिरातीत कायम सांगतात. आपले उत्पादन असल्याचा दावा ते करत असल्याने एकसारख्याच टुथपेस्टा दिसल्यास त्यात काही गैर किंवा ग्राहकाची फसवणूक होत आहे असे म्हणता येऊ शकेल. या कंपन्यांच्या स्न-स्क्रीन लोशनमध्ये वेगळे काही असल्याच्या दावा करणार्‍या जाहिराती तुम्ही पाहील्या आहेत का?

माहीत नाही

माहीत नाही
प्रेषक अक्षय

खुलाशाबद्दल धन्यवाद्!

मान्य आहे

मान्य आहे की, पेटंटविरहीत झाल्यानंतर अनेक औषधकंपन्या एकच उत्पादन वेगवेगळ्या ब्रँडखाली विकतात. पैसे वाचवण्यासाठी अनेक कंपन्या एकाच काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चररकडून औषधे विकत घेतात व स्वत:चे लेबल लावून विकतात.
पण......
ते 'डिट्टो' एकसारख्या पॅकिंग मध्ये विकत नाहीत.(स्वतःची ओळ्ख् व एकमेवाद्वितियता (युनिकनेस) सांभाळण्यासाठी)

||वाछितो विजयी होईबा||

गडबड दिसते.

एकच उत्पादन वेगवेगळ्या नावानेही विकत असतील काय सांगावे !

ग्राहकाने किती चौकस राहावे, काही कळत नाही.
बाकी, आपले कोडे मात्र अवघडच आहे.

-दिलीप बिरुटे

सर अहो

एकच उत्पादन वेगवेगळ्या नावानेही विकत असतील काय सांगावे !

सर तसे असेल तर उत्तमच हो!

>ग्राहकाने किती चौकस राहावे, काही कळत नाही.
तेच म्हणतो हो. फार्मसिस्टवर विश्वास टाकून चालणार नाही. औषधे खरेदी केल्यावर डॉक्टरकडून पुन्हा तपासुन घेणे हा बोध होतो आहे.

हे तर केलेच पाहिजे.

>>>फार्मसिस्टवर विश्वास टाकून चालणार नाही. औषधे खरेदी केल्यावर डॉक्टरकडून पुन्हा तपासुन घेणे हा बोध होतो आहे.

ते तर केलेच पाहिजे. औषधांचे तर आपल्याला काहीच कळत नाही. वरीजनल कंपन्यांची औषधी कोणती आणि डुप्लीकेट कंपन्यांची औषधी कोणती काय कळत नाही. आपण देव भरोशावर औषध गोळ्या पचवतो असे वाटते.

-दिलीप बिरुटे

डॉक्टर काय तपासणार?

तेच म्हणतो हो. फार्मसिस्टवर विश्वास टाकून चालणार नाही. औषधे खरेदी केल्यावर डॉक्टरकडून पुन्हा तपासुन घेणे हा बोध होतो आहे.

डूप्लिकेट नोटा ओळखायचे यंत्र ब्यांकेत असते तसे डॉक्टरांकडे डूप्लिकेट औषधे ओळखायचे यंत्र असते का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

तिसराच उत्पादनकर्ता?

पाँड्स व् निव्हीयाच्या (कुणी एम आर ओळखीचा असेल तर) कॅटलॉगमध्ये पहा बरं हे प्रोडक्ट असेच आहेका. मलातरी, कुठल्याश्या कंपनीने बड्या कंपन्यांचा नावावर् डुप्लीकेट बनवले आहे असे वाटते, भारतात् अशी इतर काही डूप्लीकेट्स पाहिली आहेत.

-Nile

मजाच आहे

मजाच आहे. पण मागे बारीक-छपाई बघा. कधीकधी मोठ्या कंपन्या तिसर्‍या उत्पादकाकडून उत्पादन करून घेतात. हे कदाचित कायदेशीर असू शकते.

(माझ्याकडे पूर्वी "सुझुकी स्विफ्ट" जातीची गाडी होती. हीच गाडी - हेच उत्पादन - Suzuki Forsa, Suzuki Jazz, Chevrolet Swift, Chevrolet Sprint and Sprint Metro, Geo and Chevrolet Metro, Pontiac Firefly, Maruti 1000, Holden Barina and Subaru Justy, या सर्व नावांनी विकले जायचे! आता सुझुकी, शेव्रोले, सुबरू - या वेगवेगळ्या बर्‍यापैकी मोठ्या "स्वतंत्र" कंपन्या होत. मारुति-सुझुकी सारख्या जोड कंपन्या नव्हेत. पैकी अनेक कंपन्यांच्या मोटारगाड्या एकाच वेळी अमेरिकन बाजारात उपलब्ध होत्या. जीएम कंपनीच्या सुझुकी आणि सुबरू कंपन्यांमध्ये थोडासा वाटा होता खरा...)क्ष्

शक्य असेल

आधीक संशोधनाअंती मागे एकदा पॉन्डस सेफ सन नावाची ट्युब घेतली होती तेव्हा हिंदुस्तान लिव्हर कंपनीसाठी, सेल्व्हासाच्या एरोफार्मा नामक कंपनीने बनवले आहे अशी नोंद होती.

काही कळत नाही कदाचित वेगळ्या पॅकेज मधे अस्सल माल भरुन दिला असेलही. कारण भारतात फार्मास्युटिकल कंपन्या परदेशी प्रतिथयश कंपनींकरता कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर आहेत असे ऐकल्या-वाचल्यासारखे वाटते. कदाचित झोल फक्त पॅकेजचा असेल सनस्क्रीनचा नसेलही. पण इतर कंपन्यांचा खरा पत्ता, मेड ईन <देशाचे नाव> ही माहीती तसेच इन्ग्रेडीयन्ट्स.. गायब :-(

गडबड

सहजरावांनी फोटोशॉपी-गडबड केली नसेल तर खरीच गडबड आहे, हे मानावे लागेल!!!

:-)

तुमच्या ह्या प्रतिसादाच्या पार्श्वभुमीवर एक फोटो घेतला पाहीजे :-)

उत्पादनकर्ते नक्की कोण्?

रीबॉक, नायकी, आडिडास या कंपन्यांची पायताणं भारतात कोणीतरी लोकल उत्पादक तयार करतो आणि या कंपन्या ते प्रॉडक्ट फक्त मार्केट करतात. त्या उत्पादनांच्या खोक्यावर प्रत्यक्ष तसा उल्लेख ही असतो manufactured by XYZ at ASDF, marketed by PQRS
ली, लीवाईस, या जीन्सविषयीही असेच् म्हणता येईल.
वरील प्रकार असाच वाटत आहे. एखाद्या लोकल उत्पादकाने ही उत्पादने पाँड्स व नीविया साठी तयार केली असतील आणि कंपन्यांनी चुकून एकाच दिझाईनच्या पॅकमध्ये मार्केट केली असतील.
||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर