छोटा विकिपीडिया

काही वेळा विकिपीडियामधील माहिती ही खूपच शब्दबंबाळ स्वरूपात समोर येते. आपल्याला जर त्यातील सारांशरुपाने २-४ महत्त्वाची वाक्ये हवी असतील तर इतक्या मोठ्या पानावर शोधताना खूप वेळ लागतो. तसेच मोबाईलवर व लहान लॅपटॉपपर्यंत ती पाने पोहोचायला खूप वेळ लागतो व पानाचा आकारही काही स्क्रीनवर बेढब दिसू शकतो. या सगळ्याचा विचार करून विकीची मोबाईल आवृत्ती जाणीवपूर्वक विकसित केली गेली आहे. "मराठी" या भाषेची थोडक्यात ओळख हवी असेल तर सरळ ह्या पानावर जायला काय हरकत आहे?
http://mobile.wikipedia.org/transcode.php?go=marathi

इतकी माहिती पुरेशी वाटली नाही तर पूर्ण पान आहेच, येथे...
http://en.wikipedia.org/wiki/Marathi

आपण जर फायरफॉक्स वापरत असाल तर विकिपीडियाच्या कोणत्याही पानावर जाण्यासाठी सर्च बॉक्समध्ये तशी सोय "बाय डिफॉल्ट" असतेच. पण मोबाईल विकीच्या वर दिलेल्या पानावर जाण्यासाठी अशी सोपी वाट नाही, त्यासाठी मी एक एक्स्टिंशन लिहीले आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/192492/

कोणत्याही पानावरील शब्द सिलेक्ट करून उजव्या टिचकीवरील "Wikipedia description" हा ऑप्शन निवडल्यावर आपण सरळ त्या शब्दाच्या विकी पानावर जातो. बरं ते पान मोबाईल विकीचं लहान पान असल्यामुळे क्षणार्धात समोर येतं. नेहमी विकी वापरत असाल तर वेळेची बचत लक्षात येण्याइतकी होते.

याचा सोर्स कोड आहे अवघ्या १३ ओळींचा आणि आपण तो खाली दिलेल्या पानावर अभ्यासू शकता.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/files/browse/93306
त्यात थोडेफार बदल करून स्वतःचे एक्स्टिंशनदेखील बनवू शकता. अर्थात सोर्स कोड पाहण्यासाठी आधी रजिस्टर करावे लागेल.

Comments

अरे वा!!

छान आहे हे...

विकीसर्च कन्साईज

विकीसर्च कन्साईज या नावाचे असेच एक एड्-ऑन मी लिहीले आहे. ते येथून मिळवता येईल.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/193691/

यामुळे मोबाईल विकीपिडीयाचे कोणतेही पान आपल्याला उजव्या टिचकीवर मिळवता येईल. वर दिलेल्या एड्-ऑन मध्ये फरक असा आहे की त्यात केवळ मोबाईल विकीचे सर्च इंजिन निवडता येते. उजव्या टिचकीवरील मेन्यू त्याप्रमाणे बदलतात. या नवीन एड्-ऑनमध्ये मोबाईल विकीचा ऑप्शन कायम उजव्या टिचकीवर मिळेल.
दोन्ही एड-ऑन एकात आणायचा प्रयत्न चालू आहे. जमले की/ तर येथे लिहीनच.

 
^ वर