प्राथमिक गणित

येथे गणिताबद्दल समुदाय पाहुन आनंद झाला. बरेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षणात गणिताची भीती घेतात अन् मग गणिताची भीती काही जात नाही. आपण् येथे अगदि बाळबोध गणिता पासून चर्चा करूयात का?

लेखनविषय: दुवे:

Comments

गणित ?

गणित म्हणजे आमचे चष्मा घातलेले , रागीट सर... माझं त्यांच्यावतर जेवढं प्रेम(?) तेवढंच गणितावरही आहे.
मात्र येथे गणितावर सुरुवातीपासून चर्चा होतेय म्हटल्यावर नक्कीच सहभागी असेन.

गणितासारख्या विषयात सुध्दा काही गमती जमती आहेत म्हणे. मराठीत श्री श्याम मराठे यांचे या विषयांवर काही पुस्तके आहेत. तसेच वैदीक गणित नावाचा प्रकारही अलिकडे भलताच फार्मात आहे .

नीलकांत

सुंदर कल्पना

ही तर फारच उत्तम कल्पना आहे. गणिती कोडे, अंकांच्या गमती-जमती यांवर खूप रंगतदार चर्चा करता येईल.

शैलेश

सुंदर कल्पना

ही तर फारच उत्तम कल्पना आहे. गणिती कोडे, अंकांच्या गमती-जमती यांवर खूप रंगतदार चर्चा करता येईल.

शैलेश

वाह...

आपला उत्साह पाहून माझा उत्साह वाढला. चला तर मग सुरू करू.
आपण अस समजू की, आपण पहिलीच्या वर्गात आहोत आणि पहिल्यांदाच गणित् शिकणार् आहोत. तर आजच्या आपल्या शाळेत कशी बर सुरवात करता येइल्?

अहो गुरूजी...

करा की सुरुवात .

तर आजच्या आपल्या शाळेत कशी बर सुरवात करता येइल्?

गुरुजी लिखाळ ला गणित शिकवत आहेत.

लिखाळ, सांग पाहू ! तु उपक्रमावर जातोस, तेथे काय असते?

:( ऊउम्म्म्..तेथे वेगवेगळे लोक येतात आणि लिहितात. चाणक्य, शैलेश, सर्किट, नीलकांत..आअ...

अरे मग आता पाहा बरं. तुझे वाक्य आपण् गणितात बसवून पाहू !
उपक्रमावर लिखाळ जमा करता पाच जण गणितावर लिहित आहेत.
हे कसे झाले? तर पाहा आपण संख्यांचा वापर करून त्या एक मेकांत मिसळल्या आणि मोठे वाक्य, लहान होउन जास्त माहिती देणारे बनले.
उदा. लिखाळ १, शैलेश १ म्हणजेच लिखाळ + शैलेश = २ जण

तेव्हड्यात शाळेची घंटा वाजली.
:)
आज आकडे आणी बेरिज शिकलो. उद्या पुढचे गुरुजी अजून नवे काही शिकवतील.
-- (ढ ) लिखाळ.

बाळबोध म्हणजे?

बाळबोध म्हणजे नक्की कसे अभिप्रेत आहे तुम्हाला?

०, १ ,२, ३.. कसे लिहायचे यापासून की ते कसे समजून घ्यायचे यापासून?
बेरीज - वजाबाकी कशी करायची यापासून की वर्ग/घन-वर्गमूळ/घनमूळ कसे काढायचे यापासून?
...

नक्की अभिप्रेत अर्थ कळल्यास नीट प्रतिसाद देता येईल असे वाटते.

- वेदश्री.

तुम्हाला जे लिहायचे ते लिहा...

असा विचार करा कि उद्या शाळेत शिकणारी मुले उपक्रम् पाहातील कारण येथे सहज सोप्या भाषेत लिहिलेले गणिताचे बरेच काही आहे म्हणून..


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

बघते कितपत जमतंय मला ते..

मी अजमावलेले काही उपाय देत आहे -

नुकतीच शाळेत जाऊ लागलेली मुले असतात त्यांना गणित शिकवायला कधीही पाटी-पेन्सिल/वही-पेन वगैरे घेऊन बसायचे नाही.. त्यांचा चेहरा खट्टू होऊन भुवया वक्र होतात कारण त्यांची दोस्तमंडळी बाहेर मैदानात मस्तपैकी खेळ खेळत असतात. अशावेळेस सर्व मुलांना एकत्र बसवून एखाद्या गंमतशीर खेळातून त्यांचा अभ्यास घेता आला तर उत्तम परिणाम साधता येतो.

दोरीच्या उड्या - अगदी लहान मुलांसाठी ५ उड्यांची एक भेंडी आणि थोड्याशा मोठ्यांसाठी १० उड्यांची, २५ उड्यांची, ५० उड्यांची, १०० उड्यांची... असे करत जावे. एकेक उडी मारताना आपोआप मनातल्या मनात प्रत्येकाकडूनच १,२,३ आकडे मोजले जातात आणि अभ्यासही होतो आणि खेळही ! हाच प्रकार झोक्यांचा करता येतो..

आकडे लिहायचे कसे हे शिकवण्यागोदर ते असतात कसे हे शिकवावे. त्यांचा आकार त्यांच्या मनात पूर्णपणे रुजल्यावर ते गिरवणे त्यांना सोपे जाते. आकडे 'असतात कसे' हे शिकवण्यासाठी आकड्यांच्या चकल्या/कडबोळी बनवावीत. चकल्या आवडत नसतील तर छोट्याछोट्या जिलब्या बनवाव्यात. या मेजवानीची छोटीशी ताटली घेऊन आकडे शिकवावेत. '१' आकड्याची चकली घेऊन 'हा आकडा कोणता रे?' असे विचारावे. छोट्याने 'एक' उत्तर दिल्यास तीच चकली उलट करून दाखवावे आणि 'आता?' असे विचारावे. उत्तर 'नऊ' असे मिळाल्यास उलट एक आणि नवातला फरक समजवून सांगावा. उत्तर् चुकीचे सांगितल्यास बोनस चकली नाही मिळणार.. आणि बरोबर उत्तर दिल्यास मिळेल अशी काहितरी मेख ठेवावी.. हे सर्व अभ्यास करून घेतोय या धाटणीवर न होता - ताई/दादा/आई/बाबाने केलेला घोटाळा सोडवायला मदत करतोय अशा धरतीवर घेतले गेल्यास उत्तम प्रतिसाद मिळतो.

(आत्ता दिल्यात त्या जर आवडणेबल/उपयुक्त असल्या तर ) वेळ मिळेल तसा आणखीन युक्त्या इथे लिहित राहिनच.

- वेदश्री.

लिहा

हे सुद्धा चालेल. तसेच. गणिताचे काही प्राथमिक ज्ञान जे आपल्याला आहे. पण पुढे मागे, उपक्रमावर वाच जमले तर. असे सांगायला बरे पडेल असे काही लेख पण चालतील.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

 
^ वर