सदस्य व मराठी संकेतस्थळे
ईतर भाषेतील संकेतस्थळांचे माहीत नाही पण मराठी भाषेतील सर्व संकेतस्थळे ही सदस्यांच्यावरच निर्भर आहेत हे सर्व मान्य जसे उपक्रम, मनोगत, माझे शब्द व ईतर मराठी संकेतस्थळे.
जर सदस्यांना वजा करुन तुम्ही काहीही निर्णय घेतलात तर संकेतस्थळाची किंमत काहीच नाही, अजून एक फरक मराठी संकेतस्थळे अजून बाल अवस्थेत आहेत अजून खुप मोठी मजल मारणे बाकी आहे, आपली मराठी संकेतस्थळे एक तर स्व निर्मीत नाही आहेत फक्त मुळ व्यवस्थेमध्ये थोडाफार बदल् व भाषांतर करुन प्रकाशीत केलेली आहेत (drupal), ह्यामागे दोन कारणे आहेत जसे एकतर जेवढे मला माहीत आहे त्यानूसार मनोगतचे प्रशासक, उपक्रमचे उपक्रमराव व मी हे महाजाल भाषेच्या (asp, php, java other) क्षेत्रातील नाही आहोत आम्ही स्वः प्रयत्नानी, काही मित्रांच्या मदतीने ही संकेतस्थळे चालू केली व देवाच्या कृपेने सर्वांनाच वाचकांचा / सदस्यांचा भरगोस पाठींबा भेटला व दुसरे कारण आर्थिक.
माझे शब्द वर तसेच उपक्रमवर नेहमी मनोगतच्या मराठी टंक लेखन सुविधेची तारीफ केली जाते पण एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की मनोगत वरील ती सुविधा पैसे देऊन विकत घेतली आहे व त्याकाळी म्हणजेच तीन-चार वर्षामागे मनोगतकारांनी कमीत कमी ४० हजार रुपये खर्च केले होते व आज देखील ती प्रणाली (DevEdit) विकत घेणे महागच आहे (१९००० रु.) उपक्रम व माझे शब्द वर मराठी लेखन सुविधा गमभनकार ह्यांच्या कृपेने चालू आहे व त्यात ते नवनवीन बदल करीतच आहेत लवकरच मला वाटते की मनोगतपेक्षा जास्त उपयुक्त लेखन सुविधा उपलब्ध होईल.
सदस्य व सदस्यांचे प्रतिसाद
उपक्रम व माझे शब्द ही नवीन संकेतस्थळे आहेत, उपक्रम चालू होऊन २ ते ३ महीने झाले आहेत व माझे शब्द (ठीक ठाक चालू होऊन ) चार महीनेच झालेली आहेत व मनोगत ला चार वर्षे ! मग सदस्यांची / प्रतिसादांची वर्गवारी कशी होणार .... उपक्रम - ६०० सदस्य, माझे शब्द १९०० सदस्य, मनोगत ८००० सदस्य.
जर एखाद्या लेखाला उपक्रमवर १० प्रतिसाद मिळतात तर काही हरकत नसावी उलट ही चांगली गोष्टच आहे की कमीत कमी १० प्रतिसाद ६०० सदस्यांमधे ... काय वाईट आहे.. उपक्रम वर ६०० सदस्य असावेत त्या नूसार प्रतिसाद संख्या ही योग्यच आहे (कारण ६०० च्या ६०० हे लेखक नाही आहेत फक्त १० % च लेखन व प्रतिसाद देतात व बाकीचे फक्त वाचक आहेत)
माझे शब्द वर १९०० च्या आसपास सदस्य आहेत पण माझे शब्द वर येणारा प्रत्येक सदस्य हा प्रतिसाद देत नाही कारण रुपरेखा ! माझे शब्द वर चर्चा खुपच कमी आहेत तसेच माझे शब्द वर सदस्य हा फक्त साहित्य प्रतिलीपी करण्यासाठीच येतो हा माझा अनुभव आहे ( ८००० च्या आसपास आहे downloaded PDF संख्या आहे फक्त 6 आठवडे 4 दिवसामध्ये)
मनोगतवर सदस्य संख्या ही ८५०० च्या आसपास आहे व मनोगतवर लेखन हे चर्चेच्या / कवितेच्या / ललित लेखाच्या स्वरुपात आहे तेव्हा तेथे प्रतिसाद संख्या देखील जास्त आहे व संकेतस्तळाला चालू होऊन चार वर्षे झाली आहेत तेव्हा मराठी महाजाल वाचकांना मनोगतची सवयच झाली आहे असे समजा कारण मधली चार वर्षे मराठी सदस्यांना / वाचकांना असे एक ही संकेतस्थळ उपलब्ध नव्हते.
माझी अशी अपेक्षा आहे की मराठी संकेतस्थळांनी एकत्र यावे व माहीतीची / सदस्यांची देवाण घेवाण करावी.
सदस्यांनी जेवढे जमेल तेवढे माझे शब्द !, उपक्रम, मनोगत व ईतर संकेतस्थळांची तुलना करत राहावे व फक्त तुलना न करता ते प्रसिध्दीस देखील द्यावे, जेणे करुन प्रशासकांना / व्यवस्थापकांना कल्पना येत राहील की आपले संकेतस्थळ कुठे मागे पडत आहे अथवा अजून काय गरजेचे आहे काय बदल महत्वाचे आहेत.
मराठी भाषेमध्ये जी संकेतस्थळे आहेत त्यांच्या मालकांना व व्यवस्थापकांना विनंती व्यवस्थापकीय बडगा वापरु नका, जेवढे जमेल तेवढे सदस्यांना स्वातंत्र द्यावे त्याना लिहते करावे, माझे शब्द चालू केले तेव्हा फक्त पुस्तके ठेवावी ह्याच विचारांचा मी होतो पण लवकरच मला लक्षात आले की सदस्यांना अजून ही काही व्यक्त करावयाचे असते (उदा. कोणाला एखाद्या विषयी चर्चा करावयाची असते, अथवा एखादी कविता / छान से स्वतः खेचलेले छायाचित्र प्रकाशीत करावयाचे असते अथवा कोणाला सदस्यांचे मत जाणून घ्यावयाचे असते ) तेव्हा सदस्यांना स्वातंत्र द्या, जर एखादी सुविधा आपल्याकडे नसेल तर ती प्रयत्न पुर्वक चालू करावी तेव्हाचा तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज आहे !!
जर साध्य झालेच तर सर्व मराठी संकेतस्थळाची सुची प्रत्येक संकेतस्थळावर ठेवावी जेणे करुन सदस्यांना देवाण घेवाण करणे सोपे जाईल.
व्यक्ती / सदस्य स्वातत्र्य हे असायलाच हवे !
पण सदस्यांनी ( ६००+१९००+८५००= ११०००) ही आपली मर्यादा व आपले अधिकार स्वतःच ठरवावे त व त्याची प्रतीलिपी सर्व संकेतस्थळावर प्रकाशीत करावी, जेवढे साध्य होईल तेवढे सामाजिक नियम तयार केले जावेत एखादा सदस्य एखाद्या संकेतस्थळावरील नियमांकडे दुर्लक्ष करु लागला तर सर्वच संकेतस्थळावर ठरावी़क काळासाठी त्या सदस्यास प्रतिबंध करावा.
बघा विचार करुन आपल्याला ह्यातून एक नवीन मार्ग सापडेल, जसे Durpal सर्वांना मुक्त प्रणाली देत आहे तशीच काहीशी सुविधा आपण सर्वजण मिळून देऊ शकतो का ह्याचा देखील विचार करावा.
नवनवीन गोष्टी येतच राहतील नवनवीन संकेतस्थळे बनतच राहतील पण मराठी भाषेतील संकेतस्थळांसाठी सदस्य हेच दैवत आहे तेव्हा त्याना दुखवून अथवा त्यांच्या कडे दुर्लक्ष करुन आपलाच तोटा आहे.
धन्यवाद.
आपलाच मित्र,
राज जैन
* सुचना : - वरील लेखन हे फक्त एखाद्या संकेतस्थळाला लक्ष करुन लिहले नाही आहे फक्त जे मनात आले तेच येथे लिहले आहे तेव्हा लेखनाचा विपर्यास करु नये ही विनंती.
Comments
माहिती आवडली.
राज साहेब,
माहिती आवडली. आपले विचारही आवडलेत.नवनवीन गोष्टी येतच राहतील नवनवीन संकेतस्थळे बनतच राहतील पण मराठी भाषेतील संकेतस्थळांसाठी सदस्य हेच दैवत आहे तेव्हा त्यांना दुखवून अथवा त्यांच्या कडे दुर्लक्ष करून आपलाच तोटा आहे.
वरील वाक्याचा अभ्यास करण्यास वेळ हवा आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब
नवनवीन गोष्टी येतच राहतील नवनवीन संकेतस्थळे बनतच राहतील पण मराठी भाषेतील संकेतस्थळांसाठी सदस्य हेच दैवत आहे तेव्हा त्यांना दुखवून अथवा त्यांच्या कडे दुर्लक्ष करून आपलाच तोटा आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब,
एक संकेतस्थळाचा व्यवस्थापक व नवीन संकेतस्थळाचा admin ह्या नात्याने मी खुप विचार केला पण वरील वाक्य हे १००% सत्यच आहे असे मला तरी वाटते.......
तुम्ही जर मनोगत मधून वजा झालात तर मनोगत वर काय फरक पडेल ? ह्याचा विचार करा माझ्या वरील वाक्याचा अर्थ तेथेच लागेल.
माझ्या मते तुम्हाला काही फरक पडो ना पडो पण संकेतस्थळाला जरुर फरक पडतो.... हा माझा अनुभव आहे.
मागे तात्यांनी कुठेतरी लिहले होते शक्यतो त्यांच्या अनुदिनीवर त्याचा मनोभाव असा आहे " जर एक तात्या गेला तर मनोगतला ५६ तात्या भेटतील पण जर एक मनोगत गेले तर तात्याला ५६ मनोगत भेटतील" येथेच तर तात्या चुकीचे बोलले.... एक तात्या जर गेला तर मनोगतला दुसरा तात्या भेटणे अशक्यच आहे ! का तर जेवढे लेखन तात्यानी मनोगतवर केले त्या पेक्षा जास्त लेखन करणारे सदस्य मनोगतवर आहेत, जेवढे प्रतिसाद तात्यांच्या लेखनाला मिळाले त्या पेक्षा जास्त प्रतिसाद असणारे लेखन देखील मनोगत वर आहे पण जसा तात्या एकच, जसे राज जैन एकच अथवा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे एकच दुसरा पैदा न होणे ! हीच तर सदस्य खासियत आहे ! तुमची, माझी , तात्यांच्या एक लेखन शैली आहे ...ती वाचकांना आवडो अथवा ना आवडो ! ती तर जशी आहे तशीच राहणार पण तुमच्या , माझ्या , तात्यांच्या लेखनाचा चाहता हे नाही पाहणार की वरील व्यक्तीने लेखन कुठे प्रसिध्द केले आहे तो हे पाहील की कुठले संकेतस्थळ आहे जेथे वरील व्यक्तीचे लेखन प्रसिध्द होत आहे..... तेव्हा सांगा पाहू महत्वाचे कोण ? सदस्य की संकेतस्थळ ?
एक व्यक्ती हा व्यक्ती नसून ग्राहक आहे हे आजकालच्या बाजाराचे ब्रिद-वाक्य !!!! तेव्हा ह्याच तत्वानूसार मी जर असे म्हटले की एक सदस्य हा सदस्य नसून संकेतस्थळाचा गाभा आहे.... ह्याच्यामुळेच तर संकेतस्थळ आहे (उदा. याहू, गुगल व ईतर बडी संकेतस्थळे ही सदस्याच्या गरजेनूसार सेवा देत आहेत जसे गुगल ने ओपन ऑफिस चालू केले अथवा जीमेल सर्वांसाठी खुले केले ) तेव्हाच ही महाजालाची दुनिया साबूत आहे ............
विचार करा जर ७० % सदस्यांनी ठरवले की आम्ही याहू सोडुन गुगलला पकडू तर मला सांगा काही दिवसामध्ये याहू कोठे पोहचेल ?
रसातळाला !
एखादा सदस्य / एखादा वाचक / एखादा भेटकर्ता जर संकेतस्थळावर येतो तेव्हा तो संकेतस्थळाला दोन फायदे देतो...
१. जाहीरातीवर कळत-नकळत टिचकी मारतो व संकेतस्थळाची कमाई होते अथवा जाहीरात त्याच्या समोर येते.
२. जर जाहीरातीवर टिचकी जरी मारली नाही पण नुसतेच संकेतस्थळ उघडुन पाहीले तरी देखील संकेतस्थळाचाच फायदा आहे कसा... तर जेव्हा एखादा उत्पादन कर्ता एखाद्या उत्पादनाची जाहीरात एखाद्या संकेतस्थळावर देतो तेव्हा तो दोन गोष्टी पाहतो की ह्याचे वापरकर्ते किती आहेत व रोजच्या संकेतस्थळ भेटी किती आहेत.
तेव्हा सांगा सदस्य महत्वाचा की संकेतस्थळ.
राज जैन
निषेध! निषेध!! निषेध!!!
मागे तात्यांनी कुठेतरी लिहले होते शक्यतो त्यांच्या अनुदिनीवर त्याचा मनोभाव असा आहे " जर एक तात्या गेला तर मनोगतला ५६ तात्या भेटतील पण जर एक मनोगत गेले तर तात्याला ५६ मनोगत भेटतील" येथेच तर तात्या चुकीचे बोलले....
पण जसा तात्या एकच, जसे राज जैन एकच अथवा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे एकच दुसरा पैदा न होणे
व्यक्तिगत उल्लेख!
त्रिवार निषेध!! ;)
तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
http://tatya7.blogspot.com/
वरील उल्लेख हा फक्त उदाहरण
वरील उल्लेख हा फक्त उदाहरण दाखल होता, जर मला साध्य असले असते तर् मी तुमच्या त्रिवार निषेधानंतर वरील लेखन काढले असते पण हे माझ्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे.
पण उपक्रमराव तुम्हाला विनंती आहे जर साध्य असेल तर प्रतिसाद व लेख दोन्ही ही काढून टाका.
धन्यवाद.
राज जैन
दैवत
मराठी भाषेतील संकेतस्थळांसाठी सदस्य हेच दैवत आहे.
हे वाक्य प्रत्येक सद्स्याला आवडावे असेच आहे नाही का ;).
कुठलीही (आर्थिक) अपेक्षा न ठेवता केवळ वाचकांच्या सोयीसाठी आपला बहुमूल्य वेळ व तांत्रिक ज्ञान वापरून संकेतस्थळ निर्माण करणार्या/ते चालवणार्याचा, आपल्या कार्यालयीन किंवा धरगुती वेळेचा दुरूपयोग करत निव्वळ करमणुकीसाठी घटकाभर (जोवर स्वस्त तोवर मस्त भावनेने) येणारा वाचक/सदस्य दैवत ही कप्लना पचनी पडणे त्याला जड जाईल. सोय पुरविणारा श्रेष्ट की वापरणारा?
अर्थशास्त्रातही जिथे ग्राहक राजा म्हणवला जातो, तिथेही व्यवहाराचे मूळ गुंतवणुकदारांच्या गुंतवणुकीचा सर्वाधिक परतावा हेच आहे. या उद्दिष्टाकडे जाताना ग्राहकाला राजा/दैवत वगैरे म्हणून भुलवावे लागते इतकेच ;)
तो साहेब,
कुठलीही (आर्थिक) अपेक्षा न ठेवता केवळ वाचकांच्या सोयीसाठी आपला बहुमूल्य वेळ व तांत्रिक ज्ञान वापरून संकेतस्थळ निर्माण करणार्या/ते चालवणार्याचा,
अहो पण संकेतस्थळं निर्माण करणार्यांना आणि ती चालवणार्यांना कुठलीही (आर्थिक) अपेक्षा न ठेवता, आपला बहुमूल्य वेळ व तांत्रिक ज्ञान वापरून मराठी संकेतस्थळं काढा, हे काय आम्ही सांगितलं होतं?!! ;)
केवळ वाचकांच्या सोयीसाठी
वा! वाचकांवर उपकारच केलेत की!! थांबा हां, पंचारती घेऊन येतो!! ;)
च्यामारी वाचकांची सोय?? हे बघा 'तो'राव, सोय होते हे आम्हीही नाकारत नाही, अहो पण कुणी मागितली होती ही सोय?
संकेतस्थळ काढणार्यांनी अन्य कुठला व्यावसायिक हेतू नसेल तर केवळ स्वतःच्या हौशीकरता संकेतस्थळं काढली आहेत असे माझे मत आहे. काहीही अर्थिक हेतू नसल्यास जे काम वेळ आणि पैसा खर्चून केले जाते त्याला आम्ही "हौस" असे म्हणतो!
तेव्हा काढणर्यांनी त्यांची हौस म्हणून संकेतस्थळं काढली! त्याला उगाच थोरपणाचा, उपकाराचा रंग देण्यात येतो आहे असे मला वाटते! ;)
हॅट! म्हणे वाचकांची सोय!! ;)) (स्वगत!)
आपल्या कार्यालयीन किंवा धरगुती वेळेचा दुरूपयोग करत निव्वळ करमणुकीसाठी घटकाभर (जोवर स्वस्त तोवर मस्त भावनेने) येणारा वाचक/सदस्य दैवत ही कप्लना पचनी पडणे त्याला जड जाईल.
ठीक आहे! नका मानू दैवत!
बरं का रे 'तो'सायबा, बाकी आम्हीही 'जोवर स्वस्त तोवर मस्त' ह्याच तत्वात बसणारे हो! अगदी प्रांजळपणे कबूल करतो. अरे खिशात नाहीत दमड्या, मग करणार काय लेका? ;)
सोय पुरविणारा श्रेष्ट की वापरणारा?
फुकटची सोय पुरवणारा हा श्रेष्ट नसून हौशी असतो आणि त्याबद्दल त्याचं आम्हाला वाजवी(!)कवतिकच आहे हो. पण श्रेष्ठ म्हणाल तर त्यावर वावरणारे, लिहिणारे सभासदच बरं का!! ;)
अहो तात्या, तो, सर्कीट, अत्त्यानंद, संजोपराव, शशांक(!), ............................... आणि असे हज्जारो आहेत म्हणून तर मनोगत, उपक्रम यासारख्या संकेतस्थळांना शोभा आहे!
काय? खरं की नाही? ;)
आपला,
(उपक्रमाचा एक सन्माननीय सभासद, बिल्ला क्रमांक - ४७) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
विचारतो कोण?
अहो तात्या, तो, सर्कीट, अत्त्यानंद, संजोपराव, शशांक(!), ............................... आणि असे हज्जारो आहेत म्हणून तर मनोगत, उपक्रम यासारख्या संकेतस्थळांना शोभा आहे!
नाहीतर अजून अशी दहा संकेतस्थळं बसा की उघडून! च्यामारी त्यावर मेंबर लोकच नाही आले तर विचारतो कोण या संकेतस्थळांना??
काय 'तो' साहेब? खरं की नाही? !! ;)
तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
वाचक -चालक
अच्छा म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता एकाहून एक सुंदर लेख/कविता लिहिणारा लेखक सदस्य आणि ते साहित्य वाचून त्याला दाद देणारा (टिका करणारा) वाचक सदस्य ह्यांचे योगदान म्हणजे कार्यालयीन किंवा घरगुती वेळेचा दुरूपयोग? मग आपल्या वरिष्ठांना न सांगता कार्यालयीन वेळात असली संकेत स्थळे निर्माण करणारा चालक मात्र आपल्या कार्यालयीन वेळेचा सदुपयोग करतो म्हणायचं का? संकेत स्थळ बनवणार्याला ते बनवण्याचा कंड आहे आणि इथं लिहिणार्याला ते लिहिण्याचा कंड आहे.. एकाचा वेळ बहुमुल्य आणि दुसर्याचा वेळ म्हणजे कार्यालयीन किंवा घरगुती वेळेचा दुरुपयोग हे कसं काय बुवा? अर्थातच (जो पर्यंत विना नफा तत्वावर चालले आहे तो पर्यंत) सदस्यांना दैवत वगैरे मानायची काहिच गरज नाही पण त्याचबरोबर सदस्यांनीही चालकांना दैवत समजण्याची देखिल अजिबात गरज नाही!! आपल्या वरील प्रतिसादातुन काहिसा असाच सुर दिसतो आहे.. दोघांचेही अस्तित्व एकमेकावर अवलंबून आहे.. तेव्हा एखाद्या संकेतस्थळाने त्याच्या सदस्यांचे अजिबात लाड करू नयेत पण त्याचबरोबर सदस्यांनीही चालकांना अजिबात डोक्यावर बसवू नये!
इथं असलेल्या विसंगतींवर बोट ठेवले असता.. "गप्प बसा!! हे फुकत मिळतय ना??" असले प्रतिसाद देणे योग्य आहे का?
आजचीच विसंगती पहा - तात्यांचा 'भाई काकांची एक आठवण' हा लेख संपादक मंडळींना अजुनही इथल्या धोरणांशी विसंगत वाटला नाही.. पण मागे ऐहिक रावांनी केलेले एक विडंबन मात्र आम्हाला दिसण्या आधीच इथून नाहिसे झाले होते.. असे का? ह्याचा कसलाही खुलासा नाही.. ही विसंगती नाही का?
डिस्क्लेमरः-अर्थातच तात्यांचा लेख काढून टाकावा अशी आमची इच्छा नसून ऐहिक रावांचा लेख देखिल प्रकाशीत करावा इतकेच ;-)
वरूणदेवा,
अच्छा म्हणजे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता एकाहून एक सुंदर लेख/कविता लिहिणारा लेखक सदस्य आणि ते साहित्य वाचून त्याला दाद देणारा (टिका करणारा) वाचक सदस्य ह्यांचे योगदान म्हणजे कार्यालयीन किंवा घरगुती वेळेचा दुरूपयोग?
क्या बात है वरूण! अगदी मार्मिक सवाल विचारला आहेस! पटला आपल्याला..
सभासदांच्या चांगल्या लिखाणामुळेच हे चालक लोक संकेतस्थळांच्या स्पर्धेत मारे पहिले नी दुसरे नंबर पटकावतात ना! ;)
की त्याकरता काही वेगळे निकष आहेत, हेही जाता जाता कळले तर बरे होईल!
संकेत स्थळ बनवणार्याला ते बनवण्याचा कंड आहे आणि इथं लिहिणार्याला ते लिहिण्याचा कंड आहे..
लाख रुपयेवाली बात!
आपल्या वरील प्रतिसादातुन काहिसा असाच सुर दिसतो आहे..
सहमत आहे. अहो म्हणून तर आम्हालाही आमची लेखणी उचलावी लागली! ;)
इथं असलेल्या विसंगतींवर बोट ठेवले असता.. "गप्प बसा!! हे फुकत मिळतय ना??" असले प्रतिसाद देणे योग्य आहे का?
स ह म त आहे! जाऊ दे, आता अधिक बोललो तर चामारी भांडणं होतील! ;)
तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
भाईकाका तसे फेमस आहेत! ;)
आजचीच विसंगती पहा - तात्यांचा 'भाई काकांची एक आठवण' हा लेख संपादक मंडळींना अजुनही इथल्या धोरणांशी विसंगत वाटला नाही..
सदर लेख संपादक मंडळींना इथल्या धोरणांशी सुसंगतच वाटला असेल म्हणून त्यांनी तो अद्याप इथे ठेवला असेल असे वाटते. याचं कारण सांगतो.
संगीत, साहित्य आणि इतर कलेच्या क्षेत्रातील फेमस माणसांशी निगडीत काही लेखन असेल तर ते उपक्रमावर चालते, असे मागे एकदा केव्हातरी उपक्रमराव, की उपसंपादक, यापैकी कुणीतरी म्हटल्याचे आठवते!
सदर लेख हा भाईकाकांशी निगडीत आहे, आणि भाईकाका हा सुदैवाने बर्यापैकी फेमस मनुष्य असल्याने त्यांच्या संदर्भातल्या लेखनाला इथे स्थान आहे असे वाटते! ;)
अर्थात, उपक्रमरावांनी सदर लेख इथुन काढून टाकला तरी माझ्या जिभेवरची नारळाच्या वडीची गोडी जराही कमी होणार नाही, हा भाग वेगळा!! ;)
भाईकाका की जय!
गजा खोत की जय!
;)
आपला,
तात्या खोत.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
बरोबर..
अहो तेच तर म्हणतोय ना.. ऐहिक रावांचा लेख देखिल अनेक 'फेमस' माणसांशी निगडीत होता..बर्मनदा, पंचम, दीदी हे लोक देखिल बर्यापैकी फेमस असल्याने त्यांच्या संदर्भात लेखाला स्थान नाही काय?
खरं आहे..
अहो तेच तर म्हणतोय ना.. ऐहिक रावांचा लेख देखिल अनेक 'फेमस' माणसांशी निगडीत होता..बर्मनदा, पंचम, दीदी हे लोक देखिल बर्यापैकी फेमस असल्याने त्यांच्या संदर्भात लेखाला स्थान नाही काय?
वरूण,
येस, तुझा प्वाईंट व्हॅलिड आहे. याच न्यायाने ऐहिकरावांचा लेखही येथे प्रकाशित व्ह्यायला पाहिजे होता.
आपला,
(न्यायमूर्ती) तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
तांत्रिक माहिती
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
गमभनचा इथे वापर होतो. तांत्रिक माहिती पुरवली.
लेखात सुद्धा
गमभनचा इथे वापर होतो. तसेच इतर ठिकाणी सुद्धा होतो या बद्दल राजने लेखात सुद्ध माहिती दिलेली आहे...
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
समजत नाही!
तसेच इतर ठिकाणी सुद्धा होतो या बद्दल राजने लेखात सुद्ध माहिती दिलेली आहे...
राजसाहेबांचे 'मराठी' आम्हाला पुष्कळदा समजत नाही असे इथे नमूद करू इच्छितो. व्यक्तिशः राजसाहेबांबद्दल पूर्ण आदर बाळगून आम्ही हे विधान करत आहोत.
तात्या.
माझे मराठी
राजसाहेबांचे 'मराठी' आम्हाला पुष्कळदा समजत नाही
तात्या साहेब्,
माझा कुठला प्रतिसाद व लेख तुम्हाला समजला नाही हे कळेल का ?
नाही मी परत एकदा मराठीच्या वर्गामध्ये जाऊन बसेन :) काय म्हणता.... तुम्ही घेता का माझा वर्ग ?
राज जैन
धन्यवाद,/अजून एक शंका..
गमभनचा इथे वापर होतो. तांत्रिक माहिती पुरवली.
ओंकारदादा, ही माहिती पुरवल्याबद्दल आपले आभार..
तरीही आमच्या मनात एक प्रश्न उरतोच!
विकीपिडियासारख्या दुसर्या एका परक्या संकेतस्थळाचा प्रसार आणि प्रचार आम्ही समजू शकतो, पण इथे डायरेक्ट लिहिताना जर आपोआपच गमभनचा वापर होत असेल तर मग येथील काही मंडळी आपल्या सहीच्या (footnote by default!) माध्यमातून "गमभन वापरा" असे वेगळे का सांगत असावेत ही आमची एक शंका आहे.
तात्या.
गमभन
गमभन चा उपक्रम मध्ये वापर आपोआप (डिफॉल्ट)होतो. उपक्रम/मनोगत वापरण्यासाठी महाजालाशी जोडणी आवश्यक. गमभन ही सुंदर सुविधा वापरुन ऑफलाईन असताना मराठी टंकलेखन/तसेच शु. चि. आणि तक्ते वगैरे बनवणे आरामात साध्य होऊ शकते व नंतर जोडणी करुन हे लिखाण चिकटवता येते.
(ऑफलाईन लिहीण्यासाठी गमभन वापरा) असे कोणी सांगितले तर त्यात आपणासाठी/इतर कोणासाठी काही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही. असल्यास काय आक्षेपार्ह आहे ते कळवावे.
(डिस्क्लेमरः गमभन मला आवडते. गमभनचा प्रचार आणि प्रसार माझ्या तळसहीमुळे झाला तर मला आनंद वाटतो कारण त्यात माझ्यासारख्याच एका/अनेक प्रोग्रामरचे/प्रोग्रामरांचे कष्ट आहेत. गमभन कारांशी किंवा गमभन तयार करणार्यांची भलामण म्हणून ही तळसही करत नाही व गमभनकारांना माझ्या भलामणीची आवश्यकताही नाही.)
अनुजी,
अनुजी,
गमभन ही सुंदर सुविधा वापरुन ऑफलाईन असताना मराठी टंकलेखन/शु. चि. आणि तक्ते वगैरे बनवणे आरामात साध्य होऊ शकते व नंतर जोडणी करुन हे लिखाण चिकटवता येते.
हे आम्हाला माहित नव्हतं! आम्ही गमभन वर गेलोही होतो, पण तेव्हा आम्हाला काहीही उलगडा झाला नाही. आता पुन्हा एकदा सवडीने पाहू!
(ऑफलाईन लिहीण्यासाठी गमभन वापरा) असे कोणी सांगितले तर त्यात आपणासाठी काही आक्षेपार्ह आहे असे मला वाटत नाही.
आम्हालाही त्यात काहीही आक्षेपार्ह वाटत नाही/वाटलेले नाही याची खात्री असू द्यावी. आम्ही फक्त शंका विचारली होती. परंतु आमच्या स्वभावापायी आम्ही काही आक्षेप घेत आहोत, किंवा खोडसाळपणा करत आहोत असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही! ;) परंतु यावेळेस मात्र तसे नाही. आम्ही खरोखरच प्रामाणिकपणे शंका विचारली होती, तिचे निरसन आपण केलेत याबद्दल आभार! आमच्या स्वभावापायी एक दिवस आमची अवस्था 'लांडगा आला रे आला' अशी होईल की काय याची भिती वाटते! ;) असो..
(डिस्क्लेमरः गमभन मला आवडते. गमभनचा प्रचार आणि प्रसार माझ्या तळसहीमुळे झाला तर मला आनंद वाटतो कारण त्यात माझ्यासारख्याच एका प्रोग्रामरचे कष्ट आहेत.
Yes Mam, I do understand!
गमभन कारांशी किंवा गमभन तयार करणार्यांची भलामण म्हणून ही तळसही करत नाही व गमभनकारांना माझ्या भलामणीची आवश्यकताही नाही.)
अहो हो हो! एकदम अश्या चिडू नका प्लीज! ;)
आता एक खाजगीतली गोष्ट सांगतो! 'गमभन'कारांच्या कामाचे एक लहानसे कौतुक म्हणून ठाण्याच्या 'मालवण' हॉटेलात आम्ही गमभनकारांना एक लहानशी पार्टीसुद्धा दिली होती बरं का! ;)
बाय द वे, आम्हाला अजून एक मदत करा प्लीज. गमभन वापराची वळणदार, रंगतदार सही कशी बनवायची तेवढं सांगा. आम्हाला ते माहीत नाही म्हणून आपले सहकार्य मागतो. म्हणजे आम्हीही आमच्या सहीत यापुढे गमभन चा उल्लेख करू!
धन्यवाद,
(आपला जुना मनोगती मित्र!) तात्या.
मित्र?
(आपला जुना मनोगती मित्र!) ऐवजी 'आपला जुना मनोगती सहाध्यायी किंवा सहसदस्य' असे वाचायला अधिक आवडले असते.असो.
क्षमा असावी..
क्षमा असावी. आम्ही 'मित्र' हा शब्द अनवधानाने लिहून गेलो!
असो!
तात्या.
तात्या
तुमच्या सदस्य-संपादन मध्ये स्वाक्षरी अंतर्गत खाली दिलेला कोड टाका. मराठीतील अक्षरे हवी तशी बदला.
मराठी टंकलेखनासाठी वापरा.
माहिती
तात्या, गमभनचा प्रवासाचा लेख वाचा.गमभन जेथे चढवले आहे तेथे एकदा भेट द्या. गमभनच्या अनेक वापरांपैकी हा एक वापर आहे. गमभनचा वापर करण्यासाठी संकेतस्थळे असलीच पाहिजेत हा मुद्दाच मुळात ॐकारने खोडुन काढला आहे.
अवांतरः सही करिता आंग्ल शब्द signature आहे. footnote नाही.
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
चाणक्य गुरुजी,
तात्या, गमभनचा प्रवासाचा लेख वाचा.गमभन जेथे चढवले आहे तेथे एकदा भेट द्या. गमभनच्या अनेक वापरांपैकी हा एक वापर आहे.
धन्यवाद. नुकत्याच अनुजींना दिलेल्या प्रतिसादात आम्ही आमचे म्हणणे सविस्तरपणे मांडले आहे. केवळ तांत्रिक माहितीचा अभाव, आणि अनुत्साह यामुळे आम्ही काही शंका विचारल्या होत्या इतकेच! असो..
गमभनचा वापर करण्यासाठी संकेतस्थळे असलीच पाहिजेत हा मुद्दाच मुळात ॐकारने खोडुन काढला आहे.
सही बोला भिडू!
सही करिता आंग्ल शब्द signature आहे. footnote नाही.
धन्यवाद. आम्ही ही माहिती लक्षात ठेवू!
तात्या.
शब्दसंपदा!
उपक्रमी गमभन वापरतात हे आहेच. बरोबरच शब्दसंपदा देखील वापरत असतील तर "शुद्धलेखनासाठी आम्ही शब्दसंपदा वापरतो असे लिहीले" तर नवख्या लेखकांना/वाचकांना ही माहिती उपयुक्त ठरेल!
असे पाहा
सदस्यांना दैवत वगैरे मानायची काहिच गरज नाही पण त्याचबरोबर सदस्यांनीही चालकांना दैवत समजण्याची देखिल अजिबात गरज नाही!!
असाच काहीसा प्रतिसाद यावा म्हणून खुसपट काढली झालं. चालकांनाही दैवत (किंवा श्रेष्ठ देखील न म्हणता) त्याने एक प्रश्न पुढे केला इतकेच.
'गप्प बसा. फुकट मिळतय ना?' हा त्याचा सूर नाही. पण मोबदल्याविना पुरवलेली सेवा कशी वापरली जावी, कितपत विकसित व्हावी, कशी विकसित व्हावी, कसे सदस्य मिळावेत, सदस्य कसे मिळावेत हे ठरवण्याचा अधिकार प्रथम चालकांचा आहे. सदस्यांनी सुचवण्या कराव्यात (सल्ले, निर्देश नव्हे) ज्या मानणे न मानणे चालकांच्या मर्जीवर असावे असे त्याचे सदस्य म्हणून मत आहे.
(अर्थात तो चालक असता तर त्याचे मत, "सदस्यांसाठीच तर ना हे सारे? मग त्यांना आपली मते 'हक्काने' मांडायचा हक्क आहेच!" असे ही असू शकले असते.)
धन्यवाद.
धन्यवाद.
मी माझ्या जिवनातील काही महत्वाचे क्षण येथे देऊन एक लेख लिहला व एक मोठा :) प्रतिसाद देखील लिहला कारण माझी तळमळता होती जी मला गप्प बसू देत नव्हती की काहीतरी करावयाचे आहे... काही तरी आपल्या भाषेला परत द्यावयाचे ज्याच्या कृपेने मी दोन वेळची भाजी-भाकरी खात आहे .... पण मनोगत नंतर मला येथे देखील हाच अनुभव यावा ह्याच्या सारखे दुखः नाही.
वर वर पाहता येथे ११ प्रतिसाद आले आहेत , एक माझा राहिले १०.
पण त्या दहामध्ये देखील मला एकच प्रतिसाद लेखनाशी सुसंगत वाटला... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांचा.
दुसरा प्रतिसाद तात्या ह्यांचा : - ह्यानी माझा निषेध केला त्रिवार !!! पण मुळ गाभा .... त्या विषयी एक अक्षर नाही.
तीसरा प्रतिसाद "तो" ह्यांचा : ह्यांनी जरा योग्य तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला व मला त्यांचे विचार देखील मान्यता आहेत पण ह्यावर काही चर्चा होण्याआधीच परत तात्यांचा प्रतिसाद.
४ था व पाचवा प्रतिसाद तात्या ह्यांचा : ह्यानी जरा विचार करुन लिहले असावे असे वाटून वाचावे तर हे उल्लेख "वा! वाचकांवर उपकारच केलेत की!! थांबा हां, पंचारती घेऊन येतो!! ;)" "हॅट! म्हणे वाचकांची सोय!! ;)) (स्वगत!) " " अरे खिशात नाहीत दमड्या, मग करणार काय लेका? ;) " ही वाक्ये "तो" ह्याचा अपमान करावा अथवा हेटाळणी करावा ह्या उद्देशाने लिहली असावीत असे वाटले. पण मुळ गाभा .... त्या विषयी एक अक्षर नाही.
६ वा वरुण ह्यांचा : प्रथम दर्शनी ह्यानी लेखाकडे दुर्लक्ष करुन तात्याना प्रतिऊत्तर देणे महत्वाचे समजले. तरी देखील प्रतिसाद महत्वाचा काही महत्वाचे मुद्दे ह्यानी वापरले व दाखवून देखील दीले. पण विषांतर देखील केले शेवटी शेवटी का तर शक्यतो त्याना उपक्रमराव ह्यांची चुक दाखवावी असे वाटले असेल अथवा तात्यांची खोड काढावी असे वाटले असावे.
७ वा व ८ वा प्रतिसाद परत तात्या :- मुळ मुद्द्यावर वरुण ह्यांना प्रती उत्तर.
९ वा प्रतिसाद वरुण ह्यांचा : तात्यांना प्रतिउत्तर. पण मुळ गाभा .... त्या विषयी एक अक्षर नाही.
१० वा प्रतिसाद तात्यां ह्यांचा : - वरुण ला प्रतिउत्तर. पण मुळ गाभा .... त्या विषयी एक अक्षर नाही.
जैन साहेब,
जैन साहेब,
मी माझ्या जिवनातील काही महत्वाचे क्षण येथे देऊन एक लेख लिहला व एक मोठा :) प्रतिसाद देखील लिहला कारण माझी तळमळता होती जी मला गप्प बसू देत नव्हती की काहीतरी करावयाचे आहे...
मनातली तळमळ इथे उतरवलीत ना? मग आता दु:ख कशाचं?
ह्यांनी जरा योग्य तो मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला व मला त्यांचे विचार देखील मान्यता आहेत पण ह्यावर काही चर्चा होण्याआधीच परत तात्यांचा प्रतिसाद.
का बुवा? तो यांच्या प्रतिसादावर मी उपप्रतिसाद देऊ नये असा काही नियम आहे का? तसं असेल तर सांगा बुवा, आपण काही लिहिणार नाही! ;)
ही वाक्ये "तो" ह्याचा अपमान करावा अथवा हेटाळणी करावा ह्या उद्देशाने लिहली असावीत असे वाटले.
आपला काहीतरी गैरसमज झाला आहे असे वाटते. तो यांचा अपमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. तो यांच्या प्रतिसादात एकूणच मराठी संकेतस्थळ चालक हे मराठी वाचकांवर काही उपकार वगैरे करत आहेत असा सूर मला दिसला. (असाच सूर उपक्रमाचे एक सन्माननीय सभासद श्री वरूण यांनाही दिसला!) त्या उपकाराच्या भाषेला आम्ही आमच्या भाषेत पंचारतींचं उदाहरण देऊन प्रत्त्युत्तर दिलं आहे इतकंच! तो यांचा व्यक्तिशः अपमान करण्याचा ह्यात कुठे संबंध आला?
तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
प्रतिसाद
६ वा वरुण ह्यांचा : प्रथम दर्शनी ह्यानी लेखाकडे दुर्लक्ष करुन तात्याना प्रतिऊत्तर देणे महत्वाचे समजले.
जैन साहेब,
आपले दोन्हिही निष्कर्ष चुकिचे आहेत.. एकतर माझा प्रतिसाद हा तात्यांना प्रतिउत्तर नसून 'तो' ह्यांना उद्देशुन आहे.. आणि दुसरे म्हणजे..मूळ लेखाला प्रतिसाद दिला नाही ह्याचा अर्थ मूळ प्रस्तावाकडे 'दुर्लक्ष' केले असाच होत नाही...
महत्वाची बाब !
वरुण जी ,
तुमच्या प्रतिसादातील खालील वाक्ये वाचूनच मी वरील निर्णयावर पोहचलो होतो, ह्यात काही चुकीचे असेल तर क्षमा !
आजचीच विसंगती पहा - तात्यांचा 'भाई काकांची एक आठवण' हा लेख संपादक मंडळींना अजुनही इथल्या धोरणांशी विसंगत वाटला नाही.. पण मागे ऐहिक रावांनी केलेले एक विडंबन मात्र आम्हाला दिसण्या आधीच इथून नाहिसे झाले होते.. असे का? ह्याचा कसलाही खुलासा नाही.. ही विसंगती नाही का?
वेळ सर्वात महत्वाची बाब !
प्रत्येक संकेतस्थळासाठी / व्यवस्थापनासाठी वेळ हवा असतो, कधी कधी नजर चुकीने अथवा वेळेच्या अभावी नियमाबाहेरील लेखन संकेतस्थळावर राहून जाते, सदस्यांनी ह्या चा बाणा प्रमाणे उपयोग न करता तेथेच प्रतिसाद देऊन व्यवस्थापकास ह्याची सुचना लिहावी अथवा व्यक्तीगत निरोप पाठवावा !
परत आजचीच विसंगती पहा ... उपक्रमरावांनी माझे व अत्यानंद ह्यांचे प्रतिसाद उडवले कारण माहीत नाही, व्यक्तीगत निरोपाद्वारे अथवा जाहीरपणे काही ही न सांगता पण अत्यानंद राव जी तुम्ही ज्या कष्टाने गझल लिहली होती तेव्हढेच कष्ट मी प्रतिसाद लिहण्यासाठी वापरले होते पण उपक्रम रावांनी ते काढून टाकले का ?
ह्याचे उत्तर देखील मी देत आहे ! उपक्रम ह्या संकेतस्थळाच्या नियमामध्ये माझे काही प्रतिसाद व आपले काही प्रतिसाद बसत नव्हते व येथे देखील नियम हे वाचकांच्या नजरेस पडतील अश्या जागी नाही आहेत तरी देखील ना तुम्ही ना मी व ना ईतर उपक्रमी सदस्यांने ह्यावर आपेक्ष घेतला कारण नियम तो नियम आहे नाही तर एखादा सहव्यवस्थापक व व्यवस्थापक ह्यात फरक काय् ? काहीच नाही पण निर्णय हा व्यवस्थापकच घेते का तर त्याला ईतर सदस्यांना त्रास होऊ नये असे वाटते अथवा आपल्या संकेतस्थळाचे रुप बदलू नये असे वाटते त्यामुळे.
धन्यवाद.
तात्या
व्यक्ती / सदस्य स्वातत्र्य हे असायलाच हवे !
पण सदस्यांनी ( ६००+१९००+८५००= ११०००) ही आपली मर्यादा व आपले अधिकार स्वतःच ठरवावेत
हेच मला लिहावयाचे होते.
तात्या....
मनातली तळमळ इथे उतरवलीत ना? मग आता दु:ख कशाचं?
लिहण्याचे दुख्: नाही आहे मला मला वाईट वाटते ती तुमच्या सारख्या मानसिकतेची जी फक्त लाताड्या मारु शकते .... विधायक काही करावे असा विचार देखील तुम्हाला येत नसावी असे वाटावे असे तुमचे वागणे / प्रतिसाद आहेत (त्या संकेतस्थळवरुन आपण बाहेर पडल्या नंतर ) अथवा असे वाटते की काही चांगले घडत आहे तेथे काड्या करावयाच्या अथवा प्रतिसादांचा रोख ईतर जागी करावयाचा ही तुमची सवय झाली आहे असे वाटत आहे.
"नाहीतर अजून अशी दहा संकेतस्थळं बसा की उघडून! च्यामारी त्यावर मेंबर लोकच नाही आले तर विचारतो कोण या संकेतस्थळांना??"
जरा प्रयत्न करुन पाहा संकेतस्थळ बनवायचा अथवा मी नवीन बनवलेले संकेतस्थळ देतो तुम्हाला चालवायला काही महीने व मग सांगा की एक संकेतस्थळ साभाळणे कीती सोपे आहे ते !!!! महीनो महीनो कष्ट करावे लागतात .... एखादा नीलकांत अथवा सर्कीट महोदय ह्यांनी लेख लिहला / भाषांतर लिहले व तुम्ही दोन-चार तासात संकेतस्थळ तयार केले असे होते नाही तात्या.... खुप काही गोष्टी कराव्या लागतात संकेतस्थळ संभाळताना..... कधी कधी आपले महत्वाचे काम सोडुन महाजालाच्या पाठीमागे पडावे लागते... का तर सदस्यांना त्रास होऊ नये ह्या साठी.
एखाद्या व्यवस्थापकाच्या नावाने बोंबा मारणे सोपे आहे पण त्या व्यवस्थापकाच्या जागी बसून पाहा ना काय होते ते :) आहे तयारी ?
मी जागा देतो व संकेतस्थळाचे नाव देखील..... तुम्ही म्हणाल की मला तांत्रिक माहिती नाही... तेव्हा वरच मी नमुद केले आहे माझे शब्द, उपक्रम व तुमचे पहिले वाहीले प्रेम मनोगत ही संकेतस्थळे ही क्षेत्रा बाहेरील व्यक्तीनीच बनवली आहेत ... तुमच्या मदतीला अनेक सदस्य आहेत मी स्वतः आहे.... गुगल् आहे / Drupal आहे... मग आहात तयार ?
तो तात्या कोठेतरी हरवला आहे जो संगीतावर / संगीतकारावर / गाणांच्यावर / गायकांवर लेख लिहावयाचा, मस्त प्रतिसाद लिहायचा, एखादा चांगला लेख भेटला तर् त्याला दिलखुलास पणे प्रतिसाद लिहायचा तो तात्या हरवला आहे.
क्षमा असावी पण आपल्याला माझा हा शेवटचा प्रतिसाद असावा असे मला वाटत आहे, आज पर्यंत तुम्ही मला जे प्रोत्साहन दीले त्या बद्दल मी आपला आभारी आहे. चुक-भुल द्यावी - घ्यावी.
राज जैन
जैन साहेब,
लिहण्याचे दुख्: नाही आहे मला मला वाईट वाटते ती तुमच्या सारख्या मानसिकतेची जी फक्त लाताड्या मारु शकते .... विधायक काही करावे असा विचार देखील तुम्हाला येत नसावी असे वाटावे असे तुमचे वागणे / प्रतिसाद आहेत (त्या संकेतस्थळवरुन आपण बाहेर पडल्या नंतर ) अथवा असे वाटते की काही चांगले घडत आहे तेथे काड्या करावयाच्या अथवा प्रतिसादांचा रोख ईतर जागी करावयाचा ही तुमची सवय झाली आहे असे वाटत आहे.
वरील संपूर्ण उतारा हे माझ्यावरचे आपण केलेले वैयक्तिक लेखन आहे. संकेतस्थळ चालवायचा आपला अनुभव असूनही सार्वजनिक संकेतस्थळावर वैयक्तिक लेखन करू नये, करायचेच असेल तर ते व्य नि ने करावे एवढेही आपल्यासारख्या अनुभवी संकेतस्थळचालकाला समजू नये याचा अचंबा वाटतो! ;)
अथवा असे वाटते की काही चांगले घडत आहे तेथे काड्या करावयाच्या
उपक्रम ह्या संकेतस्थळाची ध्येयधोरणं मला माझी भाषा वापरायला परवानगी देत नाही म्हणून! नाहीतर...;)
"नाहीतर अजून अशी दहा संकेतस्थळं बसा की उघडून! च्यामारी त्यावर मेंबर लोकच नाही आले तर विचारतो कोण या संकेतस्थळांना??"
माझ्या या प्रश्नाचं,
जरा प्रयत्न करुन पाहा संकेतस्थळ बनवायचा अथवा मी नवीन बनवलेले संकेतस्थळ देतो तुम्हाला चालवायला काही महीने व मग सांगा की एक संकेतस्थळ साभाळणे कीती सोपे आहे ते !!!! महीनो महीनो कष्ट करावे लागतात .... एखादा नीलकांत अथवा सर्कीट महोदय ह्यांनी लेख लिहला / भाषांतर लिहले व तुम्ही दोन-चार तासात संकेतस्थळ तयार केले असे होते नाही तात्या.... खुप काही गोष्टी कराव्या लागतात संकेतस्थळ संभाळताना..... कधी कधी आपले महत्वाचे काम सोडुन महाजालाच्या पाठीमागे पडावे लागते... का तर सदस्यांना त्रास होऊ नये ह्या साठी.
एखाद्या व्यवस्थापकाच्या नावाने बोंबा मारणे सोपे आहे पण त्या व्यवस्थापकाच्या जागी बसून पाहा ना काय होते ते :) आहे तयारी ?
मी जागा देतो व संकेतस्थळाचे नाव देखील..... तुम्ही म्हणाल की मला तांत्रिक माहिती नाही... तेव्हा वरच मी नमुद केले आहे माझे शब्द, उपक्रम व तुमचे पहिले वाहीले प्रेम मनोगत ही संकेतस्थळे ही क्षेत्रा बाहेरील व्यक्तीनीच बनवली आहेत ... तुमच्या मदतीला अनेक सदस्य आहेत मी स्वतः आहे.... गुगल् आहे / Drupal आहे... मग आहात तयार ?
या सबंध उतार्यात मला उत्तर कुठेच सापडलं नाही! मेबर लोकंच जर आली नाहीत तर कितीही संकेतस्थळं काढली तर त्याला काही किंमत आहे का? असा माझा अत्यंत साधा प्रश्न होता!
असो!!
तो तात्या कोठेतरी हरवला आहे जो संगीतावर / संगीतकारावर / गाणांच्यावर / गायकांवर लेख लिहावयाचा,
कुठेही हरवला नाहीये! आहे इथेच! ;)
मस्त प्रतिसाद लिहायचा, एखादा चांगला लेख भेटला तर् त्याला दिलखुलास पणे प्रतिसाद लिहायचा तो तात्या हरवला आहे.
हल्ली माझी उपक्रमावर ये जा सुरू असते. मी भरभरून प्रतिसाद द्यावेत असे चांगले लेख उपक्रमावर क्वचितच लिहिले जातात. हे काही लेखन होतं ते सर्व माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचं. त्यात मला काहीच रस नसल्यामुळे भरभरून आणि मनमोकळे प्रतिसाद निदान मी तरी कुणाला देणार? सांगा पाहू! ;)
तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
तात्या
या सबंध उतार्यात मला उत्तर कुठेच सापडलं नाही! मेबर लोकंच जर आली नाहीत तर कितीही संकेतस्थळं काढली तर त्याला काही किंमत आहे का? असा माझा अत्यंत साधा प्रश्न होता!
तात्या मी देखील तेच म्हणतो आहे की ! सदस्य हाच संकेतस्थळाचा गाभा आहे, ह्याला अनूसरुनच संकेतस्थळाचे नियम व रुपरेखा ठरली पाहीजे.
कुठेही हरवला नाहीये! आहे इथेच! ;)
आहे ईथेच.. मग असा विस्कळीत का झालेला आहे :) त्या १ वर्षामागच्या तात्याला बाहेर काढा व सध्याच्या तात्याला पाठवा मागे भुतकाळात.
जैनसाहेब,
आहे ईथेच.. मग असा विस्कळीत का झालेला आहे :) त्या १ वर्षामागच्या तात्याला बाहेर काढा व सध्याच्या तात्याला पाठवा मागे भुतकाळात.
ओक्के बॉस...;)
आपला,
(विस्कळीतचा सुरळीत झालेला!) तात्या.
१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
परत, परत, आणि परत तेच!
परत, परत, आणि परत तेच!
विषय भरकटतोय !
मूळ लेखांत काही तथ्य आहे असं मला वाटते.
एखादी गोष्ट चालवण्यात पण काही मेहेनत पडतच असते आणी भरपुर वेळ द्यावा लागतो या विषयी शंका नाही.
मुख्य मुद्यावर चर्चा झाली तर बरे!
संपादना साठी मंडळ असावे.
वरची चर्चा पाहून, मनोगत च्या प्रशासकिय धोरणाला नाके मुरडणारा मी, ते खरंच हवे का याचा विचार करायला लागलो आहे.
फक्त संपादना साठी मंडळ असावे. एका मालकाने घेतलेला निर्णय नको!
शक्यता
आपले म्हणणे योग्य आहे. पण तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे का हे तज्ञांनी सांगावे.
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
तांत्रिकदृष्ट्या
संपादन मंडळ तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे
शक्यतो मला असे वाटते की, मनोगत वर व उपक्रम वर ही सुविधा चालूच आहे व माझे शब्द वर देखील आम्ही संपादन मंडळ वापरतो व ते व्यवस्थीत पणे कार्य करीत आहे.
पाच सदस्यांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे कामाचा लोड कमी झाला :)
राज जैन
मराठी संकेतस्थळे
राज,
आपल्या भावना आणि मराठीविषयी ची तळमळ पोहचली व पटली. माझे शब्द साठी आपण देत असलेला वेळ व सतत दाखवत असलेली सुधारणांची तयारी स्तुत्य आहे.
पण
"मनोगतवर सदस्य संख्या ही ८५०० च्या आसपास आहे व मनोगतवर लेखन हे चर्चेच्या / कवितेच्या / ललित लेखाच्या स्वरुपात आहे तेव्हा तेथे प्रतिसाद संख्या देखील जास्त आहे व संकेतस्तळाला चालू होऊन चार वर्षे झाली आहेत तेव्हा मराठी महाजाल वाचकांना मनोगतची सवयच झाली आहे असे समजा कारण मधली चार वर्षे मराठी सदस्यांना / वाचकांना असे एक ही संकेतस्थळ उपलब्ध नव्हते."
मायबोली विसरलात का? १९९८ पासून कार्यरत असलेल्या या मराठी संकेतस्थळावरही बरीच उपयुक्त माहिती,चर्चा,कविता आढळतात. मायबोलीच्या 'पराग फोल्डर'(फोल्डर मे फोल्डर रचना) रचनेमुळे जरा शोधाशोध जास्त करावी लागते इतकेच.
माझी अशी अपेक्षा आहे की मराठी संकेतस्थळांनी एकत्र यावे व माहीतीची / सदस्यांची देवाण घेवाण करावी.
माहितीच्या देवाणघेवाणीशी १००% सहमत. 'सदस्यांची' देवाणघेवाण हे जरा विचित्र वाटते.
"सदस्यांनी जेवढे जमेल तेवढे माझे शब्द !, उपक्रम, मनोगत व ईतर संकेतस्थळांची तुलना करत राहावे व फक्त तुलना न करता ते प्रसिध्दीस देखील द्यावे, जेणे करुन प्रशासकांना / व्यवस्थापकांना कल्पना येत राहील की आपले संकेतस्थळ कुठे मागे पडत आहे अथवा अजून काय गरजेचे आहे काय बदल महत्वाचे आहेत."
अशी तुलना वेळोवेळी या सर्व संकेतस्थळावर होत असतेच. मनोगत,माझे शब्द,उपक्रम वर प्रतिसादांत/चर्चेत अशी बरीच माहिती असल्याचे स्मरते.
"मराठी भाषेमध्ये जी संकेतस्थळे आहेत त्यांच्या मालकांना व व्यवस्थापकांना विनंती व्यवस्थापकीय बडगा वापरु नका, जेवढे जमेल तेवढे सदस्यांना स्वातंत्र द्यावे त्याना लिहते करावे, माझे शब्द चालू केले तेव्हा फक्त पुस्तके ठेवावी ह्याच विचारांचा मी होतो पण लवकरच मला लक्षात आले की सदस्यांना अजून ही काही व्यक्त करावयाचे असते (उदा. कोणाला एखाद्या विषयी चर्चा करावयाची असते, अथवा एखादी कविता / छान से स्वतः खेचलेले छायाचित्र प्रकाशीत करावयाचे असते अथवा कोणाला सदस्यांचे मत जाणून घ्यावयाचे असते ) तेव्हा सदस्यांना स्वातंत्र द्या, जर एखादी सुविधा आपल्याकडे नसेल तर ती प्रयत्न पुर्वक चालू करावी तेव्हाचा तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज आहे !!"
यामागची आपली तळमळ आवडली. पण सदस्य हे 'दैवत' वगैरे तत्व फारसे पटले नाही. प्रत्येक 'इमोशनल' तत्व व्यवहारात व प्रात्यक्षिकात पूर्ण यशस्वी होईलच असे नाही. सध्या सर्व स्थळी चाललेल्या लाथाळ्या पाहून 'प्रशासकीय बडग्याला पर्याय नाही' असेच मनापासून म्हणावेसे वाटते. दुसरे म्हणजे, 'खेचलेले छायाचित्र' हे हिंदीचे शब्दशः भाषांतर वाटते. त्याऐवजी 'काढलेले छायाचित्र' जास्त मराठी वाटणार नाही काय?
"जर साध्य झालेच तर सर्व मराठी संकेतस्थळाची सुची प्रत्येक संकेतस्थळावर ठेवावी जेणे करुन सदस्यांना देवाण घेवाण करणे सोपे जाईल."
हो असे करावे असे मलाही वाटते.(अर्थात माझ्या मालकीचे असे एकही मराठी संकेतस्थळ नसल्याने फक्त मला वाटून उपयोग नाही असेही वाटते!)
सदस्यांची देवाणघेवाण! ;)
माहितीच्या देवाणघेवाणीशी १००% सहमत. 'सदस्यांची' देवाणघेवाण हे जरा विचित्र वाटते.
सहमत!
अरे भाई तात्या को १५ दिन के लिये मायबोलीपे पार्सल कर दो, सर्कीट को १० दिन के लिये मनोगतसे उठा लो, और संजोपको ८ दिन के लिये माझे शब्द पे भिजवा दो! ;))
आपला,
(पार्सल अधिकारी!) तात्या.
इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/
अनु
'सदस्यांची' देवाणघेवाण हे जरा विचित्र वाटते.
जर हे वाक्यच वाचले तर विचित्र तुम्हाला का..... मला सुध्दा वाटेल.
पण मुळ संपुर्ण उत्तारा वाचला की अर्थ बोध होईल.
जर साध्य झालेच तर सर्व मराठी संकेतस्थळाची सुची प्रत्येक संकेतस्थळावर ठेवावी जेणे करुन सदस्यांना देवाण घेवाण करणे सोपे जाईल.
व्यक्ती / सदस्य स्वातत्र्य हे असायलाच हवे !
पण सदस्यांनी ( ६००+१९००+८५००= ११०००) ही आपली मर्यादा व आपले अधिकार स्वतःच ठरवावे त व त्याची प्रतीलिपी सर्व संकेतस्थळावर प्रकाशीत करावी, जेवढे साध्य होईल तेवढे सामाजिक नियम तयार केले जावेत एखादा सदस्य एखाद्या संकेतस्थळावरील नियमांकडे दुर्लक्ष करु लागला तर सर्वच संकेतस्थळावर ठरावी़क काळासाठी त्या सदस्यास प्रतिबंध करावा.
ओके ओके
"सदस्यांची देवाणघेवाण" म्हणजे "सदस्यांनी केलेली देवाणघेवाण" हा अर्थ घेतला तर भा. पो.
स्पष्टोक्ती
राज साहेब...
सर्वात पहिला आपले अभिनंदन...
१. माहितीची देवाणघेवाण हे तर सगळीकडेच होते. त्यासाठी प्रशासकांनी एकत्र यायची गरज का? आपली तळमळ व दूरदृष्टी मला चांगलीच पटते पण एका गोष्टीचा खेद वाटतो कि सदस्यांना याच्याशी काहिहि देणे घेणे नसते. आपला झेंडा घेऊन प्रत्येक सदस्य प्रत्येक ठिकाणी तीच कृती करतो.
२. आपण गमभनचे वापरकर्ते आहात. हे आपल्याला माहितच असेल कि गमभनची प्रसिद्धी सगळीकडे तेवढ्यात आनंदाने होते आणि माहितीची देवाणघेवाण सुद्धा. असे प्रयत्न सर्वत्र वाखाणले जातातच. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायची गरजच काय?
३. सगळ्यांनी एकत्र राहून चांगले नक्किच काही ना काही करता आले असते. पण मग मनोगत असताना, माझे शब्द, उपक्रम इत्यादींची निर्मीती झालीच कशाला? हे म्हणजे आधी फाळणी आणि मग परत जोडणी नाही का?
४. मला वाटते कि आपल्या म्हणायचे आहे ते म्हणजे मराठीसाठी मराठी माणसांनी एकत्र येउन प्रयत्न घ्यावेत. अन् ते आम्हाला पुर्णपणे मान्य आहे.
मी काही मुद्दे सुचवतो आहे. आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
१. आपण सर्वांनी एकत्र येउन नवे काही करावे का? जसे कि, शालेय शिक्षणासाठीची माहिती, मराठीत आणि महाजालावर सहजा सहजी सापडेल असे काही बनवणे. शाळेत ज्या मुलांचे समाधान झाले नाही वा ज्यांना आणखी माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचे एक संकेतस्थळ. हे एक् उदाहरण झाले. असे बरेच् काही करता येईल.
२. मराठी माणुस अनेकदा व्यावसायिक गोष्टीत मागे पडतो. असे काही तयार करणे जे मराठी लोकांचा आत्मविश्वास वाढवेल.
अवांतर,
आपण जी गोष्ट मराठी संकेतस्थळांसाठी मांडली ती खरतर जागतिक पातळीवर सुद्धा लागू होते. पण मग, याहू आणि गुगल एकत्र न येता याहू आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र का येत आहेत? आपल्याला या बद्दल काय म्हणायचे आहे?
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
चाणक्य साहेब
चाणक्य साहेब,
१. माहितीची देवाणघेवाण हे तर सगळीकडेच होते. त्यासाठी प्रशासकांनी एकत्र यायची गरज का?
जसे मी वर लिहलेच आहे की संकेतस्थळावर वावरताना सदस्यांसाठी सामाजिक नियम तयार करणे.
३. मनोगत असताना, माझे शब्द, उपक्रम इत्यादींची निर्मीती झालीच कशाला? हे म्हणजे आधी फाळणी आणि मग परत जोडणी नाही का?
मनोगत हा वेगळा उपक्रम आहे, माझे शब्द ची वेगळी खासीयत आहे व उपक्रमने तर यासर्वांच्या पुढे जाऊन बाळबोध का होईना orkut सारख्या संकेतस्थळाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला ह्यात फाळणी कुठली. तुम्हाला माहीतच असेल की माझे शब्दची रुपरेखा ही मनोगतवरच एका चर्चे द्वारे ठरली होती, आपले मित्र सर्किट राव, निलकांत व ईतर मनोगतीनी आपले विचार मांडले होते. ही फाळणी नसून मला वाटतं ही घरासाठी नवीन खोली अथवा नवीन जागा घेतली कारण मनोगत ची संकल्पना ही वेगळीच होती व आहे व माझे शब्द हा वेगळा प्रकल्प. व मनोगतच्या आधी देखील मायबोली होती ना मग ?
व माझे मत असे आहे की संकेतस्थळाचा गाभा (मुळ रुप) न बदलता जर सर्व संकेतस्थळे एकत्र आली तर वाचकांना ह्यातून काहीतरी चांगलेच हाती लागेल. जसे मनोगत वर एखादा लेख चर्चा वाचताना त्याच्या उजव्या बाजूला त्या विषयानूसार असलेल्या लेखांची सुची येते पण ती फक्त मनोगत वरील लेखांची.... तेथे आपण उपक्रम, मराठी गझल, माझे शब्द वरील लेखांची सुची देऊ शकतो का ? असा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो.
४. मला वाटते कि आपल्या म्हणायचे आहे ते म्हणजे मराठीसाठी मराठी माणसांनी एकत्र येउन प्रयत्न घ्यावेत. अन् ते आम्हाला पुर्णपणे मान्य आहे.
सहमत माझे मत देखील असेच आहे.
१. आपण सर्वांनी एकत्र येउन नवे काही करावे का? जसे कि, शालेय शिक्षणासाठीची माहिती, मराठीत आणि महाजालावर सहजा सहजी सापडेल असे काही बनवणे. शाळेत ज्या मुलांचे समाधान झाले नाही वा ज्यांना आणखी माहिती हवी आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचे एक संकेतस्थळ. हे एक् उदाहरण झाले. असे बरेच् काही करता येईल.
ह्यावर प्रयत्न करावयास मी तयार आहे व ... साथी हात बढा ना ! साथीची वाट पाहतो आहे.
२. मराठी माणुस अनेकदा व्यावसायिक गोष्टीत मागे पडतो. असे काही तयार करणे जे मराठी लोकांचा आत्मविश्वास वाढवेल.
ह्यावर माझे कार्य चालू आहे लवकरच पुर्ण व्यावसायिक मराठी संकेतस्थळ चालू होईल अशी अपेक्षा. ( व ह्या संकेतस्थळामध्ये Drupal वापरले नसेल )
पण मग, याहू आणि गुगल एकत्र न येता याहू आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र का येत आहेत? आपल्याला या बद्दल काय म्हणायचे आहे?
मी वर लिहले होते की सदस्य हाच दैवत आहे, काहीनी त्याचा विरोध केला की सदस्य दैवत वैगरा काही नाही. (सदस्य = संकेतस्थळ वापर करणारा कोणी ही... पाहुणा देखील्)
ह्याचेच हे उत्तर आहे. माजंर व उंदीर दोस्ती करीत आहेत का ? ह्यांना काय दोस्तीचा पुळका नाही आलेला आहे...ते व्यवसाय करित आहेत त्याना लाडग्याला टक्कर द्यावयाची आहे म्हणून ( गुगल ) ह्यावर भाष्य तर आपले मित्र सर्किट राव करतील ही अपेक्षा आहे.
धन्यवाद.
साथ
राज साहेब..
१. आपण मुळ मुद्दा बाजुला ठेवला आहे. हेच सगळे प्रयत्न एकाच संकेतस्थळावर व्हायला काय हरकत आहे? तुम्ही म्हणत आहात कि प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. हेच कारण आहे कि प्रत्येकाचे वेगळेपण प्रत्येकाला जपायचे आहे. आपल्या सुचना योग्य आहेत. पण त्यासाठी वेगळेपण बाजुला ठेवायचे तर ते सुरुवातीलाच ठेवता आले असते. व्यावसायिकपणा एकतर कोणालच धड जमत नाही वा करायचा नाही.
२. काहि सदस्य असे आहेत कि जे फक्त वल्गना करतात. करत काहीच नाही. वेळ आली कि शेपुट घालतात. हा प्रकार ते सगळीकडे जाउनच करतात. अशा प्रकारचे सदस्य सगळ्या संकेतस्थळांना मान्य आहेत का?
३. मायबोली असताना मनोगत कशाला? याचे उत्तर आपणच दिले आहे.
एकत्र प्रयत्न करायला माझी तयारी आहे. मी आहे साथ द्यायला बाकि कोणीही काही म्हणो. कदाचित आणखी सहकारी पण मिळतील.
अवांतरः मांजर, उंदीर आणि लांडगा हे बाळबोध आहे. सर्किटराव काही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. चर्चा मात्र भरकटवतात. असो.
- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.
चाणक्य साहेब
१ . हेच सगळे प्रयत्न एकाच संकेतस्थळावर व्हायला काय हरकत आहे?
हरकत नाही आहे, पण सगळे सांभाळण्यासाठी पुर्णकालीन सदस्य अथवा व्यवस्थापक हवा. ह्याच कारणामुळे मी ५० % माझे शब्द हे एका व्यवसायीक संस्थेला दिले. लवकरच (एक दोन महीन्यामध्ये) ते संकेतस्थळ सांभाळायला सुरु करतील व मी दुसरे काम करावयास मोकळा !
तुम्हाला एक पुर्ण संकेतस्थळ म्हणजे काय अपेक्षीत आहे...
२. काहि सदस्य असे आहेत कि जे फक्त वल्गना करतात. करत काहीच नाही. वेळ आली कि शेपुट घालतात. हा प्रकार ते सगळीकडे जाउनच करतात. अशा प्रकारचे सदस्य सगळ्या संकेतस्थळांना मान्य आहेत का?
ह्या करताच मी सदस्य देवाण घेवाण हा शब्द वापरला होता, जर सदस्याची ठरावीक माहीतीची देवाण घेवाण झाली तर अश्या सदस्यांना प्रतिबंध करता येईल जसे orkut वर ती सोय आहे व मी काही दिवसापुर्वी माझे शब्द वर देखील चालू केली आहे.
एकत्र प्रयत्न करायला माझी तयारी आहे. मी आहे साथ द्यायला बाकि कोणीही काही म्हणो. कदाचित आणखी सहकारी पण मिळतील.
धन्यवाद.
आपण ह्या विषयी लवकरच काही ना काही मार्ग काढू. संपर्कामध्ये राहा ही विनंती.
राज जैन
सर्किटराव
सर्किटराव जी,
मी तर असे लिहले नाही ना मग ?
तुम्ही आपले मत व्यक्त करावे ही विनंती.
चाणक्य साहेब,
तुमचे व सर्किटराव ह्यांचे काही ही दावे असोत माझा व सर्किटराव ह्याचा कुठला ही विवाद नाही आहे.
धन्यवाद.
राज जैन
एक उदाहरण म्हणून खालील अनुभव देत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी!
(मजकूर संपादित)
राजसाहेब आणि त्यांच्यासारखे इतर संकेतस्थळांचे मालक-प्रशासक ह्यांना माझे नम्र आवाहन आहे की त्यांनी त्यांचे धोरण पक्के करावे आणि त्याप्रमाणे वर्तन करताना सर्व सदस्यांना ते धोरण सहजपणे समजेल अशा भाषेत मांडावे. कोणतेही आक्षेपार्ह साहित्य इथून हटवण्या आधी निदान २४-४८तासांचा अवधी द्यावा. त्याबद्दल त्या लेखकाला व्यनि द्वारे अथवा जाहीर प्रतिसादाद्वारे त्याची जाणीव करून द्यावी. इतके केलेत तरी मी म्हणेन की आपणा सगळ्या मालक-प्रशासक मंडळींना इथल्या सदस्यांप्रती काही तरी आदर आहे.ह्यापेक्षा जास्त काही अपेक्षा नाहीत. नियमावर बोट न ठेवता थोडे तारतम्य आणि सबुरी बाळगली तर असे प्रसंग वारंवार येणार नाहीत असे वाटते.
बघा पटतंय का!
महत्वाचा नियम
अत्यानंद राव,
तुमच्या प्रतिसादामध्ये मला दोन चांगले व महत्वाचे नियम भेटले.
नियम १ :- कोणतेही आक्षेपार्ह साहित्य इथून हटवण्या आधी निदान २४-४८तासांचा अवधी द्यावा. त्याबद्दल त्या लेखकाला व्यनि द्वारे अथवा जाहीर प्रतिसादाद्वारे त्याची जाणीव करून द्यावी
नियम २ : सर्व सदस्यांना ते धोरण सहजपणे समजेल अशा भाषेत मांडावे
धन्यवाद अत्यानंद.
राज जैन
सामाजिक नियम
मान्य.
नियम ठरवण्यासाठीच मी वर हे लिहले होते
" सदस्यांनी ( ६००+१९००+८५००= ११०००) ही आपली मर्यादा व आपले अधिकार स्वतःच ठरवावे त व त्याची प्रतीलिपी सर्व संकेतस्थळावर प्रकाशीत करावी, जेवढे साध्य होईल तेवढे सामाजिक नियम तयार केले जावेत एखादा सदस्य एखाद्या संकेतस्थळावरील नियमांकडे दुर्लक्ष करु लागला तर सर्वच संकेतस्थळावर ठरावी़क काळासाठी त्या सदस्यास प्रतिबंध करावा."