सदस्य व मराठी संकेतस्थळे

ईतर भाषेतील संकेतस्थळांचे माहीत नाही पण मराठी भाषेतील सर्व संकेतस्थळे ही सदस्यांच्यावरच निर्भर आहेत हे सर्व मान्य जसे उपक्रम, मनोगत, माझे शब्द व ईतर मराठी संकेतस्थळे.

जर सदस्यांना वजा करुन तुम्ही काहीही निर्णय घेतलात तर संकेतस्थळाची किंमत काहीच नाही, अजून एक फरक मराठी संकेतस्थळे अजून बाल अवस्थेत आहेत अजून खुप मोठी मजल मारणे बाकी आहे, आपली मराठी संकेतस्थळे एक तर स्व निर्मीत नाही आहेत फक्त मुळ व्यवस्थेमध्ये थोडाफार बदल् व भाषांतर करुन प्रकाशीत केलेली आहेत (drupal), ह्यामागे दोन कारणे आहेत जसे एकतर जेवढे मला माहीत आहे त्यानूसार मनोगतचे प्रशासक, उपक्रमचे उपक्रमराव व मी हे महाजाल भाषेच्या (asp, php, java other) क्षेत्रातील नाही आहोत आम्ही स्वः प्रयत्नानी, काही मित्रांच्या मदतीने ही संकेतस्थळे चालू केली व देवाच्या कृपेने सर्वांनाच वाचकांचा / सदस्यांचा भरगोस पाठींबा भेटला व दुसरे कारण आर्थिक.

माझे शब्द वर तसेच उपक्रमवर नेहमी मनोगतच्या मराठी टंक लेखन सुविधेची तारीफ केली जाते पण एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की मनोगत वरील ती सुविधा पैसे देऊन विकत घेतली आहे व त्याकाळी म्हणजेच तीन-चार वर्षामागे मनोगतकारांनी कमीत कमी ४० हजार रुपये खर्च केले होते व आज देखील ती प्रणाली (DevEdit) विकत घेणे महागच आहे (१९००० रु.) उपक्रम व माझे शब्द वर मराठी लेखन सुविधा गमभनकार ह्यांच्या कृपेने चालू आहे व त्यात ते नवनवीन बदल करीतच आहेत लवकरच मला वाटते की मनोगतपेक्षा जास्त उपयुक्त लेखन सुविधा उपलब्ध होईल.

सदस्य व सदस्यांचे प्रतिसाद

उपक्रम व माझे शब्द ही नवीन संकेतस्थळे आहेत, उपक्रम चालू होऊन २ ते ३ महीने झाले आहेत व माझे शब्द (ठीक ठाक चालू होऊन ) चार महीनेच झालेली आहेत व मनोगत ला चार वर्षे ! मग सदस्यांची / प्रतिसादांची वर्गवारी कशी होणार .... उपक्रम - ६०० सदस्य, माझे शब्द १९०० सदस्य, मनोगत ८००० सदस्य.

जर एखाद्या लेखाला उपक्रमवर १० प्रतिसाद मिळतात तर काही हरकत नसावी उलट ही चांगली गोष्टच आहे की कमीत कमी १० प्रतिसाद ६०० सदस्यांमधे ... काय वाईट आहे.. उपक्रम वर ६०० सदस्य असावेत त्या नूसार प्रतिसाद संख्या ही योग्यच आहे (कारण ६०० च्या ६०० हे लेखक नाही आहेत फक्त १० % च लेखन व प्रतिसाद देतात व बाकीचे फक्त वाचक आहेत)

माझे शब्द वर १९०० च्या आसपास सदस्य आहेत पण माझे शब्द वर येणारा प्रत्येक सदस्य हा प्रतिसाद देत नाही कारण रुपरेखा ! माझे शब्द वर चर्चा खुपच कमी आहेत तसेच माझे शब्द वर सदस्य हा फक्त साहित्य प्रतिलीपी करण्यासाठीच येतो हा माझा अनुभव आहे ( ८००० च्या आसपास आहे downloaded PDF संख्या आहे फक्त 6 आठवडे 4 दिवसामध्ये)

मनोगतवर सदस्य संख्या ही ८५०० च्या आसपास आहे व मनोगतवर लेखन हे चर्चेच्या / कवितेच्या / ललित लेखाच्या स्वरुपात आहे तेव्हा तेथे प्रतिसाद संख्या देखील जास्त आहे व संकेतस्तळाला चालू होऊन चार वर्षे झाली आहेत तेव्हा मराठी महाजाल वाचकांना मनोगतची सवयच झाली आहे असे समजा कारण मधली चार वर्षे मराठी सदस्यांना / वाचकांना असे एक ही संकेतस्थळ उपलब्ध नव्हते.

माझी अशी अपेक्षा आहे की मराठी संकेतस्थळांनी एकत्र यावे व माहीतीची / सदस्यांची देवाण घेवाण करावी.

सदस्यांनी जेवढे जमेल तेवढे माझे शब्द !, उपक्रम, मनोगत व ईतर संकेतस्थळांची तुलना करत राहावे व फक्त तुलना न करता ते प्रसिध्दीस देखील द्यावे, जेणे करुन प्रशासकांना / व्यवस्थापकांना कल्पना येत राहील की आपले संकेतस्थळ कुठे मागे पडत आहे अथवा अजून काय गरजेचे आहे काय बदल महत्वाचे आहेत.

मराठी भाषेमध्ये जी संकेतस्थळे आहेत त्यांच्या मालकांना व व्यवस्थापकांना विनंती व्यवस्थापकीय बडगा वापरु नका, जेवढे जमेल तेवढे सदस्यांना स्वातंत्र द्यावे त्याना लिहते करावे, माझे शब्द चालू केले तेव्हा फक्त पुस्तके ठेवावी ह्याच विचारांचा मी होतो पण लवकरच मला लक्षात आले की सदस्यांना अजून ही काही व्यक्त करावयाचे असते (उदा. कोणाला एखाद्या विषयी चर्चा करावयाची असते, अथवा एखादी कविता / छान से स्वतः खेचलेले छायाचित्र प्रकाशीत करावयाचे असते अथवा कोणाला सदस्यांचे मत जाणून घ्यावयाचे असते ) तेव्हा सदस्यांना स्वातंत्र द्या, जर एखादी सुविधा आपल्याकडे नसेल तर ती प्रयत्न पुर्वक चालू करावी तेव्हाचा तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज आहे !!

जर साध्य झालेच तर सर्व मराठी संकेतस्थळाची सुची प्रत्येक संकेतस्थळावर ठेवावी जेणे करुन सदस्यांना देवाण घेवाण करणे सोपे जाईल.

व्यक्ती / सदस्य स्वातत्र्य हे असायलाच हवे !

पण सदस्यांनी ( ६००+१९००+८५००= ११०००) ही आपली मर्यादा व आपले अधिकार स्वतःच ठरवावे त व त्याची प्रतीलिपी सर्व संकेतस्थळावर प्रकाशीत करावी, जेवढे साध्य होईल तेवढे सामाजिक नियम तयार केले जावेत एखादा सदस्य एखाद्या संकेतस्थळावरील नियमांकडे दुर्लक्ष करु लागला तर सर्वच संकेतस्थळावर ठरावी़क काळासाठी त्या सदस्यास प्रतिबंध करावा.

बघा विचार करुन आपल्याला ह्यातून एक नवीन मार्ग सापडेल, जसे Durpal सर्वांना मुक्त प्रणाली देत आहे तशीच काहीशी सुविधा आपण सर्वजण मिळून देऊ शकतो का ह्याचा देखील विचार करावा.

नवनवीन गोष्टी येतच राहतील नवनवीन संकेतस्थळे बनतच राहतील पण मराठी भाषेतील संकेतस्थळांसाठी सदस्य हेच दैवत आहे तेव्हा त्याना दुखवून अथवा त्यांच्या कडे दुर्लक्ष करुन आपलाच तोटा आहे.

धन्यवाद.
आपलाच मित्र,
राज जैन

* सुचना : - वरील लेखन हे फक्त एखाद्या संकेतस्थळाला लक्ष करुन लिहले नाही आहे फक्त जे मनात आले तेच येथे लिहले आहे तेव्हा लेखनाचा विपर्यास करु नये ही विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

तुम्ही लोक व्यनि करा एकमेकांना

अरे भावांनो...

तुम्ही लोक् एकमेकांना व्यनि का करत नाही?

आजकाल उपक्रमराव थंड आहेत..

मध्ये सगळे सुरळीत झाले असताना परत गजाली सुरु झाल्या.

तात्यानू तुम्ही व्यक्तिगत टिप्पणीवर प्रतिक्रिया न् दिल्याने आभार.. :-)

अभिजित..

कस्सं कस्सं! ;)

तात्यानू तुम्ही व्यक्तिगत टिप्पणीवर प्रतिक्रिया न् दिल्याने आभार.. :-)

अरे बाबा, मनात आणलं असतं तर अस्सल देवगडी बोलीभाषेमध्ये काहीतरी जोरदार प्रतिक्रिया मलाही नक्कीच देता आली असती. पण म्हटलं सध्या 'पायर्‍या-पातळ्यांचा' खेळ (शो!) सुरू आहे, तेव्हा आपण आपली पायरी न सोडता सर्वात वरच्या पायरीवर बसून गंमत बघावी! ;)

असा विचार करून उपक्रमरावांकडे अत्यंत सभ्य भाषेत, लोकशाही पद्धतीने आणि तेवढ्याच साळसूदपणे माझ्यावरच्या वैयक्तिक टिप्पणीबद्दल तक्रार नोंदवून मोकळा झालो! ;) आता उपक्रमराव घेतील तो निर्णय मला शिरसावंद्य आहे! ;)

उगाच कुणी आपली पायरी-पातळी काढली तर भडका कशाला? हमारी पायरी क्या है, उपर है या निचे है, ये हम अच्छी तरहसे जानते है. लेकीन अगर कोई बिना वजह हमे हमारी पायरी बताने लगता है तो हम कौनसी पायरीपर खडे है, और बिना वजह हमे हमारी पायरी बतानेवाला कौनसी पायरीपर खडा है इसका तुरंत पता लग जाता है!! ;)

चलो! कोई बात नही, कोई शिकवा नही! भगवान सबका भला करे!

आपला,
(हिंदी!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

सहमत आह..

संकेतस्थळाचे महत्व त्यावरील सदस्यांवरूनच ठरते (गुण आणि संख्या ह्या दोन्ही दृष्टीकोनातून) ह्या मूळ लेखातील विचाराशी पूर्ण सहमत आहे.

शेवटी देश म्हणजे देशातील माणसे, हेच खरे.

सहमत आहे!

तात्या.

(मजकूर संपादित - व्यक्तीगत प्रतिसादासाठी खरडवहीचा वापर करावा ही विनंती.)

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

;)

शाळेत ० ते ९ मर्यंत संख्या न कळणार्‍या लोकांसाठी आणि चौथी नापास लोकांना इंग्रजी शिकवण्यासाठी संकेतस्थळे बनत नाहीत तोवर आम्ही वल्गना करणारच.

;)

दे टाळी!

तात्या.

स्पष्टीकरण हवे ...

शाळेत ० ते ९ मर्यंत याचा अर्थ काय? असो मी काही एक करायचा दावा केलेला नाही. राज जैन यांना काही गोष्टी सुचवल्या आहेत.


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

पुन्हा मूळ मुद्याकडे वळतो.

कुठलीही (आर्थिक) अपेक्षा न ठेवता केवळ वाचकांच्या सोयीसाठी आपला बहुमूल्य वेळ व तांत्रिक ज्ञान वापरून संकेतस्थळ निर्माण करणार्‍या/ते चालवणार्‍याचा,

हे कुठल्याही संकेतस्थळाबद्दल कितपत खरे आहे याबद्दल मला शंका आहे. मला असे वाटते की बहुतांशी प्रत्येक चालकाचा यात आर्थीक लाभ व्हावा हा अंत्यस्थ हेतू असतो. पण तो उघड केला तर फु़कटात लेखक कसे मिळणार? कारण आपल्या मराठी मनाला लगेच अशा स्थळावर लिहायला पटत नाही. (जसे काही दुसरे कोणी तुम्हाला पैसे देणार आहेत ! पण हे लेखकाना कोण सांगणार.) मूळात मी पैसे मीळवण्यासाठी संकेतस्थळ काढणार, तुम्हाला यायचे तर सामील व्हा, सध्या फुकटात लिहा , तुमचे नाव झाले तर दोन पैसे तुम्हालाही देईन अशी निखळ भावना न ठेवता मराठीच्या प्रेमासाठी मी हे करतो आहे असे म्ह्टले तरच सभासद मिळतील ही वस्तुस्थीती याला कारणीभूत असावी.

की काहीतरी करावयाचे आहे... काही तरी आपल्या भाषेला परत द्यावयाचे ज्याच्या कृपेने मी दोन वेळची भाजी-भाकरी खात आहे ....

जैन साहेब, तुमची तळमळ समजली. तुम्ही आधी एक अधिकृत विनालाभ TRUST का चालू करत नाही? म्हणजे तुमच्या तळमळीचा आर्थीक लाभ खरोखरच कुणा एका व्यक्तिला न होता , समाजाला होईल आणि तुम्हाला मदत करायला अधिक लोक पुढे येतील. आणी त्याची नोंदणी करणे हे संकेतस्थळ चालवण्यापेक्षा कितीतरी सोपे आहे. किंवा सरळ म्हणा चार पैसे मिळवायचे आहेत आणि झालेच तर भाषेची सेवा करायची आहे. आणि तसाही हेतू असेल तर चांगलेच आहे. किंबहुना मी स्वतः तरी अशा प्रामाणिक प्रयत्नाना जास्त पाठींबा देईन. मराठी भाषेच्या प्रेमासाठी खूप प्रयत्न झाले आणि त्यातून काहीही फायदा मराठीला झाला नाही. त्यापेक्षा मराठीतून खूप फायदा झाला कुणाला तर आपोआप मराठी भाषेकडे लोक येतील आणि त्यातून मराठीचा खरा फायदा होईल.

माझी अशी अपेक्षा आहे की मराठी संकेतस्थळांनी एकत्र यावे व माहीतीची / सदस्यांची देवाण घेवाण करावी.
कल्पना चांगली आहे पण सगळ्याच संकेतस्थळाना व्यवहाराच्या दृष्टिने योग्य वाटेल का ते माहीती नाही. उदा. अ (१०००), ब (६००) व क (३००) अशी सदस्य संख्या असेल आणि ते सगळेच सदस्य एका मोठ्या गटाचा (१२००) भाग असेल तर अ संकेतस्थळाला , ब आणि क बरोबर हातमिळवणी करून फार काय नवीन मिळणार? क ला जरूर मीळेल. पण उद्या क ला विचारून पहा ड(५०), ई(३०) आणि फ(१०) यांच्याबद्दल हात मिळवणी कर आणि पाहू त्याचे काय म्हणणे आहे !

धन्यवाद - सहमत

जितेन, चर्चा मूळ मुद्याकडे आणलीत ते बरे झाले. धन्यवाद.. आपल्या विचारांशी सहमत...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

सुपर डुपर बंपर हिट

मूळात मी पैसे मीळवण्यासाठी संकेतस्थळ काढणार, तुम्हाला यायचे तर सामील व्हा, सध्या फुकटात लिहा , तुमचे नाव झाले तर दोन पैसे तुम्हालाही देईन अशी निखळ भावना न ठेवता मराठीच्या प्रेमासाठी मी हे करतो आहे असे म्ह्टले तरच सभासद मिळतील ही वस्तुस्थीती याला कारणीभूत असावी.

लई भारी!

किंबहुना मी स्वतः तरी अशा प्रामाणिक प्रयत्नाना जास्त पाठींबा देईन. मराठी भाषेच्या प्रेमासाठी खूप प्रयत्न झाले आणि त्यातून काहीही फायदा मराठीला झाला नाही.

खरं आहे बॉस!

पण उद्या क ला विचारून पहा ड(५०), ई(३०) आणि फ(१०) यांच्याबद्दल हात मिळवणी कर आणि पाहू त्याचे काय म्हणणे आहे !

सॉल्लीड! ;)

वा वा जितेनराव,

आपला प्रतिसाद सुपर डुपर बंपर हिट जाणार! आम्हाला आपला प्रतिसाद अतिशय आवडला आहे!

जियो...

तात्या.

सदर प्रतिसादाला उपक्रमरावांनी वेगळ्या चर्चेचे रूप द्यावे अशी विनम्र मागणी मी करत आहे!

तात्या.

हेतू

"कुठलीही (आर्थिक) अपेक्षा न ठेवता केवळ वाचकांच्या सोयीसाठी आपला बहुमूल्य वेळ व तांत्रिक ज्ञान वापरून संकेतस्थळ निर्माण करणार्‍या/ते चालवणार्‍याचा,

हे कुठल्याही संकेतस्थळाबद्दल कितपत खरे आहे याबद्दल मला शंका आहे. मला असे वाटते की बहुतांशी प्रत्येक चालकाचा यात आर्थीक लाभ व्हावा हा अंत्यस्थ हेतू असतो. पण तो उघड केला तर फु़कटात लेखक कसे मिळणार? कारण आपल्या मराठी मनाला लगेच अशा स्थळावर लिहायला पटत नाही. (जसे काही दुसरे कोणी तुम्हाला पैसे देणार आहेत ! पण हे लेखकाना कोण सांगणार.) मूळात मी पैसे मीळवण्यासाठी संकेतस्थळ काढणार, तुम्हाला यायचे तर सामील व्हा, सध्या फुकटात लिहा , तुमचे नाव झाले तर दोन पैसे तुम्हालाही देईन अशी निखळ भावना न ठेवता मराठीच्या प्रेमासाठी मी हे करतो आहे असे म्ह्टले तरच सभासद मिळतील ही वस्तुस्थीती याला कारणीभूत असावी. "
जितेनराव,
आपल्या म्हणण्याशी काही प्रमाणात सहमत. पण कधीकधी अशी संकेतस्थळे उघडण्यामागे आपली तांत्रिक क्षमता वाढवणे/तपासणे/चांगल्या प्रकारे वापरात आणणे व हा प्रयोग सफल होऊन तांत्रिक ज्ञान वाढल्यावर भविष्यात पूर्ण वेगळ्या व्यावसायिक हेतूने, पूर्ण वेगळे असे दुसरे संकेतस्थळ काढणे हाही हेतू असू शकतो. दुसर्‍यांवर उपकार, आणि पूर्णपणे स्वतःचा स्वार्थ याच्या मधली अशी एक अवस्थाही माणसाच्या/आपल्या काही कार्यांमागे असू शकते असे माझे मत आहे.
असो. हा झाला पोटमुद्दा. विषयांतराचा हेतू नाही. मूळ चर्चेकडे परत वळू(म्हणजे मूळ चर्चेकडे जाऊ,मूळ चर्चेकडे बैल नाही बरंका!)..

मी वापरते.

खुलासा.

उपकार, आणि पूर्णपणे स्वतःचा स्वार्थ याच्या मधली अशी एक अवस्थाही माणसाच्या/आपल्या काही कार्यांमागे असू शकते असे माझे मत आहे.

सहमत. पण माझा मुद्दा तो नाही. होते आहे काय की ही ती अवस्था "निखळ"पणे पुढे मांडली जात नाही किंवा येत नाही म्हणा. पुढे येते ती "उपकार" भावना. त्यामुळे आपल्या समाजात असलेली, " ते विनालाभ तत्वावर केले ते खूप चांगले, त्याला पाठिंबा द्यायचा. पण कुणी फायद्यासाठी करत असेल तर वाईट" ही भावना जास्त वाढीला लागते. आज आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे असे माझे मत आहे. म्हणून् जे उघडपणे फायद्याचं बोलत आहे त्याना पाठींबा द्यावा असे म्हणतो आहे.

सहमत..

पुढे येते ती "उपकार" भावना.

कुणी फायद्यासाठी करत असेल तर वाईट" ही भावना जास्त वाढीला लागते.

आज आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे असे माझे मत आहे. म्हणून् जे उघडपणे फायद्याचं बोलत आहे त्याना पाठींबा द्यावा असे म्हणतो आहे.

जितेनराव,

पुन्हा एकदा आपल्याशी सहमत.

एकंदरीतच आपल्या प्रतिसादातून, मराठी माणसं धंद्यात मागे का आहेत याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी महत्वाची कारणं उद्घृत होतात असं मला वाटतं.

आपला,
(मराठी) तात्या.

पंजीकृत ?

यासाठी पर्यायी सुंदर मराठी शब्द नोंदणी असा आहे.

आंगठे..

आपले जोडे फाटल्यास कळवा. आमच्या कातड्याचे जोडे करून देऊ.

सर्कीटदेवा,

टाचा आणि जोड्याचा इतर भाग तू घे, आंगठ्यांकरता मात्र मी माझी कातडी रिझर्व ठेवली आहे आणि ती मीच देणार ;)

आपला,
(मोची!) तात्या.

पर्यायी - समानार्थी

मागची भावना जाणून घ्या. प्रत्येक मराठी शब्दाचे घाऊक हिंदीकरण होऊ नये म्हणून हा मराठी शब्द सुचवला.
तुमचे जोडे आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावे लागेल. (कारण पायात घातले तर ते चावतील याची खात्री आहे!)

मस्त! ;)

तुमचे जोडे आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावे लागेल. (कारण पायात घातले तर ते चावतील याची खात्री आहे!)

मस्त! ;)

बाकी हा जोडा मात्र तुम्ही मिलिंदाला सहीच हाणला आहे!

तात्या.

नक्किच

हा प्रतिसाद वाचून, ही मरगळ आता गेली आहे, असे मानायला हरकत नाही....... बरोबर् आहे...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

मरगळ

केवळ हा प्रतिसादच नव्हे तर दर दोनेक दिवसांनी येणार्‍या 'उपक्रमाचे काय होणार? उपक्रमाची काळजी वाटते/उपक्रम काल आज उद्या/उपक्रम गंभीर होते आहे' छाप चर्चा देखिल मरगळ घालवण्यात यशस्वी ठरत आहेत.
-वरूण
------------------------------------------------------------------------
मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

अभिमान

"मराठीचा विश्वजालावर वापर वाढावा" ह्या दृष्टीकोनातून एक विनालाभ संस्था कॅलिफोर्निया राज्यात पंजीकृत करण्यासाठी अर्ज भरलेले आहेत.
आम्हाला तुमचा अभिमान आहे...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

अरे वा !

छान बातमी दिलीत. मनापासून पाठींबा. (आणि खिशापासून द्यायचीही तयारी आहे !)

विनालाभ

तुम्ही आधी एक अधिकृत विनालाभ TRUST का चालू करत नाही? म्हणजे तुमच्या तळमळीचा आर्थीक लाभ खरोखरच कुणा एका व्यक्तिला न होता , समाजाला होईल आणि तुम्हाला मदत करायला अधिक लोक पुढे येतील.

मी समाजासाठी काय करीत आहे व काय करणार आहे हे तुम्ही अथवा ईतर कोणी ही सांगण्याची गरज नसावी असे मला वाटते कारण हा प्रत्येकाचा व्यक्तीगत प्रश्न आहे.... तरी देखील तुम्ही विचार लेच आहे व ईतर सर्व सदस्यांचा असा ग्रह झाला असावा की मी एक विनामोबदला संकेतस्थळ चालू केले होते व ते मी पैसे घेऊन विकले तर हे सत्य आहे एखादे काम करताना रक्कम ही हवीच असते तुम्ही माझ्या नवीन संकेतस्थळाची रुपरेखा न पाहता , त्यावर येणारा खर्च हा न योजता माझ्यावर आरोप करीत आहात अथवा मला एखादी विनालाभ संस्था चालू करावयास सांगत आहात तर तो तुमचा अधिकार ही नाही व तुम्ही त्या पातळीचे देखील नाही.........

राग आला ना माझे उत्तर वाचून ... येणारच हे ग्रहीत धरुन मी उत्तरे देत आहे व कारण एक महाजालावर प्रत्येक व्यक्तीरेखा ही खरी आहे हे कधी ही समजू नका. असे देखील असू शकते की राज जैन नावाची कोणी व्यक्तीच ह्या जगात नाही आहे पण महाजालावर वावरत आहे ! अथवा एखादी दुसरी व्यक्ती आहे जी राज जैन ह्या नावाने वावरत आहे का तर आपले खरे रुप कोणा समोर येऊ नये असे त्या व्यक्तीला वाटत असेल ! माझे मत आहे ह्या जगामध्ये विनालाभ कोणीच काम करीत नाही.... येथे तर आपला देवच नाही करीत तर सामान्य मनुष्याची काय कथा !

१. माझा अधिकृत विनालाभ TRUST आहे की नाही ? पहीला प्रश्न !
नाही. माझा कुठला ही TRUST नाही आहे व विचार देखील नाही आहे तयार करावयाचा पण शक्य तीत की मदत करीत असतोच मी ! कुठे / कशी / का ? ह्याचे उत्तर मी देऊ शकतो पण येथे दिल्लीला तुम्हाला यावे लागेल व पाहावे लागेल की मी कोण आहे व मी काय केले.... जे मनोगती, माझे शब्दचे सदस्य, उपक्रमचे मित्र मला व्यक्तिशः भेटले आहेत त्याना माहीत आहे मी कसा आहे व मी काय केले ते !

२. मी पैसे मीळवण्यासाठी संकेतस्थळ काढणार, तुम्हाला यायचे तर सामील व्हा, सध्या फुकटात लिहा , तुमचे नाव झाले तर दोन पैसे तुम्हालाही देईन अशी निखळ भावना न ठेवता मराठीच्या प्रेमासाठी मी हे करतो आहे असे म्ह्टले तरच सभासद मिळतील ही वस्तुस्थीती याला कारणीभूत असावी. प्रश्न दोन !

समजा आज उद्या उपक्रम रावांनी आपले संकेतस्थळ विकले तर? तुमचा प्रतिसाद काय असेल ?
माझ्या संकेतस्थळावर फक्त एकदाच पैसे घेण्याचा आरोप झाला होता व त्याचे उत्तर मी न देता माझ्या सदस्यांनी दीले होते व नंतर मी !
मी तुम्हाला चार गोड गोष्टी सांगेन एक दिवस तुम्ही माझ्या संकेतस्थळाचे सदस्य व्हाल ही.... दोन दिवस राहाल / लेखन कराल पण जर संकेतस्थळावर तुमच्या माहीतीचे गरजेचे काहीच नसेल तर ? तुम्ही दोन दिवसात निघुन जाल व परत कधी येणार ही नाही ! ही सत्य परस्थीती !

३. हे कुठल्याही संकेतस्थळाबद्दल कितपत खरे आहे याबद्दल मला शंका आहे. मला असे वाटते की बहुतांशी प्रत्येक चालकाचा यात आर्थीक लाभ व्हावा हा अंत्यस्थ हेतू असतो.

जर आजच्या जगामध्ये देव जरी समोर येऊन उभा राहीला व मी देव आहे असे बोलला रे बोलला त्याला मार देणा-या लोकांची कमी नाही आहे हे परत एकदा सिध्द झाले..... मनोगत कारांविषयी कोणी ही किती ही वाईट बोलू दे अथवा दुश्मनी करु दे तो देखील हे मान्य करील की त्या मानवाला मराठी भाषा व महाराष्ट्राविषयी खरोखर प्रेम आहे.. एखादे वर्ष संकेतस्थळ चालवणे व चा वर्षे मुफ्त मध्ये संकेतस्थळ चालवणे ह्यात खुप मोठा फरक आहे ह्या साठी स्वतः एक संकेतस्थळ चालू करा व चालवून दाखवा ! मग पाहून कोणाचा काय हेतू आहे तो !

ब आणि क बरोबर हातमिळवणी करून फार काय नवीन मिळणार? क ला जरूर मीळेल !

का "क" मराठीची सेवा करत नाही आहे..... नाही करतो आहे पण तुमची नजर वेगळी आहे विचार वेगळे आहेत, विचार करा एक सदस्य म्हणून जर अ ब क मिळाले तर सदस्यांना किती फायदा होईल त्याचा तुम्ही व्यवस्थापक अथवा मालक ह्यांचा का विचार करता ? .

आपल्या मराठी मनाला लगेच अशा स्थळावर लिहायला पटत नाही !
का ? पैसा नको झाला आहे की काय ? अथवा तुमचा विचार वेगळा व मराठी जनमानसाचा विचार वेगळा असे ग्रहीत धरावे.

हे बघा नाटके खुप आहेत करण्यासाठी पण पैशाचे नाटक फक्त पैसा खिश्यामध्ये असेल तरच करता येते ! तेव्हा सदस्य म्हणून विचार करा ... मालक / व्यवस्थापक ह्या नात्याने ह्या विषया कडे पाहू नका हि विनंती.

आपलाच मित्र,

राज जैन !

खुलासा

माझ्यावर आरोप करीत आहात अथवा मला एखादी विनालाभ संस्था चालू करावयास सांगत आहात तर तो तुमचा अधिकार ही नाही व तुम्ही त्या पातळीचे देखील नाही
माझा हेतू तुमच्यावर आरोप करण्याचा नसून काय केले तर त्यात जास्त पारदर्शकपणा येईल हे सांगण्याचा होता. पटले नाही तर सोडून द्या. उलट जे जे संचालक फायद्यासाठी उघडपणे काम करतील त्याना मनापासून पाठींबा देण्याचे मी ठरवले आहे.

समजा आज उद्या उपक्रम रावांनी आपले संकेतस्थळ विकले तर? तुमचा प्रतिसाद काय असेल ?
मी भरघोस पाठींबा देईन. किंबहुना सगळ्याच संचालकानी त्यांचे संकेतस्थळ आर्थिकदृष्ट्या फायद्याचे करावे अशा मताचा मी आहे. आणि त्यातूनच मराठीची प्रगती झाली तर् होईल नुसत्या प्रेमापोटी नाही. तुम्ही तुमचे संकेतस्थळ विकले याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. कारण या तुमच्या कृतीमुळे मराठी संकेतस्थळांचा जो फायदा झाला आहे तो "मराठीच्या प्रेमासाठी काहीतरी करण्यामूळे" जे होईल त्याच्या कितीतरी पटीने जास्त् झाला आहे.

आपल्या मराठी मनाला लगेच अशा स्थळावर लिहायला पटत नाही !
यात मी माझ्याबद्दल बोलत नसून इतरांबद्दल् बोलत होतो. फक्त सेवाभावी वृत्तिने जे होते ते चांगले. फायद्यासाठी असते ते वाईट अशी एक मानसिकता आपल्या समाजात येते आहे ती चुकीची आहे हे माझे मत आहे.
मनोगत कारांविषयी कोणी ही किती ही वाईट बोलू दे
माझा रोख मनोगत कारांवर नव्हता. आणि तो ध्वनीत होत असेल तर तो वाईट अर्थाने नसून जर कुणी अर्थार्जन म्हणून करत असेल तर चांगलेच अशा अर्थाने होता.

कारण एक महाजालावर प्रत्येक व्यक्तीरेखा ही खरी आहे हे कधी ही समजू नका.
अगदी बरोबर. ते माझ्याही बाबतीत तितकेच खरे आहे. मी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय केले हे सांगणे, हे माझी विश्वासार्हता वाढवण्यासाठी मला कधी गरजेचे वाटलें नाही. कारण मी कोण आहे यापेक्षा माझे विचार काय आहेत हे पहा. पटले नाही तर सोडून द्या. मला वाटते माझी ओळख माझ्या लिखाणातून् होते तेव्हढी पुरेशी आहे.
मला एखादी विनालाभ संस्था चालू करावयास सांगत आहात तर तो तुमचा अधिकार ही नाही व तुम्ही त्या पातळीचे देखील नाही
१०० % सहमत. ! (अरेरे कधीतरी तुम्हाला दिल्लीत किंवा गेला बाजार Davos सारख्या एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरात भेटायला आवडले असते पण आता या वयात माझी पातळी कुठून् वाढवणार?)

माफ करावे

तुमचा अधिकार ही नाही व तुम्ही त्या पातळीचे देखील नाही

मी हा वरील शब्द प्रयोग फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केला होता की जर तुम्ही मनापासून काही काम केले व त्या बद्दल तुमच्या वर आरोप /शिवीगाळ / चुकीचा प्रसार केला जातो तेव्हा कीती यातना होतात, शक्यतो तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असू शकता अथवा लहान ही ...व माझी चुक माझ्या लक्षात आली आहे.... ह्यामुळे मी वरील शब्द प्रयोग पर घेत आहे..... व तुम्ही / सर्वानी मला माफ करावे ही विनंती.

राज जैन

चु़कीची माहिती

मनोगत वरील ती सुविधा पैसे देऊन विकत घेतली आहे व त्याकाळी म्हणजेच तीन-चार वर्षामागे मनोगतकारांनी कमीत कमी ४० हजार रुपये खर्च केले होते व आज देखील ती प्रणाली (DevEdit) विकत घेणे महागच आहे (१९००० रु.)
मी सर्कीट यानी स्थापन केलेल्या एका याहू गृपचा सभासद् आहे. त्यात कुणीतरी केलेल्या संशोधनावरून असे सिध्द झाले की हे फक्त नाम साधर्म्य आहे. तुम्ही म्हणता ती प्रणाली (DevEdit) अजिबात देवनागरी लिहत नाही आणि त्याचा मनोगता वरच्या प्रणालीशी काहीही संब्ंध नाही. मला जी माहिती आहे ती अशी
मनोगतकारानी मनोगताच्याही पुर्वी ही प्रणाली लिहायला सुरुवात केली
नंतर त्यांनी आणि मायबोलीकारानी मिळून, ती अजून विकसीत केली व मायबोलीवर वापरली.
पुढे मनोगतकारानी , मनोगत सुरू करून ती आणखी विकसीत केली.

अर्धसत्य

माझी त्या संस्थेशी बोलणी झाली होती व त्यानी तर मला रक्कम व सुविधा चालू करण्यासाठी लागणार खर्च हे दोन्ही ही सांगीतले होते दुवा त्या संस्थेचा दुवा खाली प्रकारे आहे : ह्या संबधातील माहीती आपले मित्र व एक मनोगती जे मिलिंद रावांना ओळखतात त्याना मी दिलेली होती.

www.interspire.com/devedit/

राज जैन

 
^ वर