उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय
राजकुमार
June 8, 2010 - 10:22 am
मी बरेच दिवसांपासून घरगुती वापराच्या वीजेच्या निर्मितीचे स्वस्तातले उपाय ह्यावरील माहिती शोधत आहे. (ह्यात उर्जेचा स्त्रोत हा "solar energy" असेल असे मानतो. दुसरा स्त्रोत ही चालू शकेल.
वापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक.
वीजेची गरज : किमान ७-८ तास.
जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती.
दुवे:
Comments
तुम्हाला काय माहीती मिळाली
तुम्हाला काय माहीती मिळाली हे लिहिलं तर पुनरूक्ती टळेल.
पुनरूक्ती टळेल
जी काही माहिती मिळाली ती "solar energy" च्या संर्दभातच आहे. मात्र बरीचशी प्रकरणे खर्चिक वाटत आहेत. पुनरूक्ती चालेल. ती माझ्यासाठी उजळणीच ठरेल.
हे पहा
हे संकेतस्थळ पहा. यांचे एक उत्पादन मी वापरतो आहे आणि वापरा बद्दल आनंदी सुद्धा आहे. जमेल तेंव्हा मोबाईलची बॅटरी चार्ज करणे, वीज नसताना दिवा वापरणे यासाठी मला याचा उपयोग होतो. उत्पादने खास भारतीय आणि आफ्रिकन लोकांच्या गरजा वापरून बनवली आहेत. ज्या ठिकाणी वीज नेणे खर्चीक आहे त्या ठिकाणी तर हे उत्तम.
अजून माहीती ?
चाणक्य यांस-
१) कोणते उत्पादन वापरता?
२) किंमत?
३) उत्पादनाच्या बॅटरीचे आयुष्य?
४) इतर खर्च?
तत्सम् माहिती उपयुक्त ठरेल.
अन्यः
ग्रामीण भागात बायोमास वापरून वीजनिर्मिती प्रचलित आहे.
नोवा
उत्तम...
चाणक्य, या संकेतस्थळाच्या दुव्याबद्दल आभारी आहे. उत्पादने चांगली वाटताहेत. शिवाय तुमचा अनुभवही चांगला आहे.
विकत घेण्याचा विचार करतो आहे.
विशेषतः किरण हे उत्पादन तर एकदम आवडण्यासारखे आहे.
==================
+
नोवा
धन्यवाद चाणक्य ! तुम्ही सुचविलेली उत्पादने खरोखरीच चांगली असावीत मात्र माझी गरज थोडी वेगळी आहे.
मला वापरावयाच्या वस्तू : २ सीएफएल , २ पंखे, १ संगणक. वीजेची गरज : किमान ७-८ तास.
माहिती
आणखीन माहिती येथे मिळेल. अनेक उपयुक्त उत्पादने आहेत. त्यातला पॉवर पॅक तुम्हाला उपयोगी पडेल कदाचित. गरज असल्यास व्य. नि. ने संपर्क करा. मी संबंधीत व्यक्तिचा संपर्क क्रमांक देऊ शकेन.
सौर उर्जा
आर्य चाणक्य यांनी दिलेल्या दुव्यावर जाण्याचा प्रयत्न दोन तिनदा केला पण जमले नाही.
तुम्ही काय उत्पादन निवडता ते ठरवल्यास कळवा म्हणजे मलाही तसाच विचार करता येईल.
माझी याबाबतची माहिती अशी. सौरउर्जा विजेच्या स्वरुपात आणणे हे अजून यश प्राप्त तंत्रज्ञान नाही. उन्हात सुर्याला लंब दिशेने ठेवलेल्या १ स्क्वे. मिटर पृष्ठभागावर साधारण १५०० वॉट एवढी उर्जा पडते. सध्याचे तंत्रज्ञान यातील केवळ ६ (काही बाबतीत ८) टक्के उर्जा विजेत विजेत रुपांतर करते. म्हणजे साधारणपणे ९० वॉट. ही वीज सहसा व्याटरीत साठवून ठेवावी लागते. कारण ज्यावेळेला ती तयार होते त्यावेळेला तुम्हाला तिचा उपयोग करता येतो असेच नाही. सध्या जे सौरसेल्स उपलब्ध आहेत ते प्रती स्क्वे.मि.ला ४०००० रु. किमतीने उपलब्ध आहेत असे समजले. (चिनी बनावटीचे याहून स्वस्त आहेत असे ऐकले. पण त्यांच्या बाबतीत वापरून पाहिलेला कोणी नव्हता.) यातून आठवणीप्रमाणे १५-१६ वोल्टस डी.सी. तयार होतात. अशा वोल्टेज मधून तुम्हाला नेहमीची लेड ब्याटरी चार्च करता येते. त्यापुढे तुम्हाला इन्वर्टर लावावा लागेल. ज्यातुन २३० वोल्टस एसी तयार होतील. हे झाल्यावर तुम्ही तुमची नेहमीधी उपकरणे चालवू शकाल.
तुमची गरज ४० वॉट सि एफ एल्., १०० वॉट पंखे, एक संगणक १५० वॉट अशी साधारण ३०० वॉट आहे. असे धरून चालू की ही वीज तुम्ही केवळ ४ तास वापराल म्हणजे दिवसाला तुम्हाला १.२ युनिट वीज हवी आहे.
सौर सेल्स उन्हात राहण्याची जागा असेल तरी ते तुम्हाला सतत सुर्याच्या दिशेकडे तोंड फिरवत ठेवता येत नाही. म्हणजे कोना प्रमाणे तुम्हाला पुरेपूर उर्जा मिळणार नाही. समजा असे धरले की साधारण सरासरी ४० टक्के उर्जा तुम्ही गाठू शकाल. ही उर्जा जर तुम्हाला सकाळी ९ ते ५ दरम्यान मिळाली तर एका स्क्वे. मि. मागे तुम्हाला (८ तास् गुणिले ०.४ गुणिले ९०) ०.३ युनिट वीज मिळेल तुमची गरज १.२ युनिट ची असल्याने तुम्हाला ३ स्क्वे. मि. म्हणजे अंदाजे १,२०,००० रु. सौरसेल्स वर खर्च करावे लागतील. याशिवाय इन्वर्टर ब्याटरी यावर १५,००० आणि वायरिंग वर अजून दोन हजार खर्च करावे लागतील. एकंदरीत खर्च दीड लाखात जाईल. (वार्षिक व्याज दर १० टक्के धरला तर १५००० रु दर साल साधारण ३०० युनिट चा दर भांडवली ख्रर्चातून आला.)
यातील लेड ब्याटरी नाशवंत असल्याने साधारणपणे ३ वर्षांनी बदलावी लागेल्. या तीन वर्षात तुम्ही (पावसाळ्याचे तीन महिने सोडल्यास) साधारण १००० युनिटची बचत करू शकाल. ज्या किमतीत कदाचित तुम्हाला लेड ब्याटरी घेणे परवडणार नाही.
या किमती मी बाजारात जाऊन चौकशी करून घेतलेल्या नाहीत.
हे सर्व पाहिल्यावर सौर उर्जेच्या अशा वापराबद्दल मला मोठे प्रश्नचिन्ह वाटते.
यावर माझ्या डोक्यात काही उपाययोजना होत्या पण सध्या त्यावर काम करणे कठीण वाटते.
सौर उर्जा उष्णतेसाठी वापरायला मात्र याहून खूप परवडते.
प्रमोद
इन्व्हर्टरशिवाय?
संगणकाला खरे तर डी.सी विद्युतच लागते. (लॅपटॉपला २३० ए.सी.चे ६ किंवा १२ डी.सी करणारे अडॅप्टर असतात.)
दिवे, पंखे सुद्धा डी.सी. वर चालू शकतात.
चर्चा प्रस्तावकाची निकड अशा प्रकारे भागवली तर लेड-ऍसिड बॅटरी आणि इन्व्हर्टरचा खर्च कदाचित वाचू शकेल.
इन्व्हर्टर
सहमत आहे. डीसीवर चालणारे ब्रशलेस डीसी पंखे लवकरच बाजारात येतील / आलेही असतील. रेमी कंपनीचे डीसी पंखे मिळतात असे ऐकून आहे पण बाजारात (लोहार चाळीत सुद्धा) मिळाला नाही.
सीएफएल मात्र डीसीवर चालत नाहीत. एल ई डी दिवे चांगले पण बर्यापैकी उजेड पडेल असे एल ई डी दिवे महाग असतात. एल ई डी टेबललँप मिळतात असे वाटते ते वापरू शकतील आणि साधारण प्रकाशासाठी साधे गाडीचे हेडलाईटचे बल्ब वापरता येतील.
प्रस्तावकाची निकड ब्याटरीशिवाय भागणारच नाही कारण डीसी वापरायचे असेल तरी साठवणूक हवीच. इन्व्हर्टरशिवाय काम चालेल बहुधा.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
थोडी अजून आकडेमोड
जे-जे विकतील त्यांच्या सौर विजेला १८ रुपये प्रति युनिट दराने विकत घेण्याचे भारत सरकारचे आश्वासन आहे. म्हणजे हे दीड-दोन लाख रुपये (नव्या बॅटरीची किंमत, इ. धरून) पाच-सहा वर्षांत वसूल होतील. सौर सेल्स वीस वर्षे टिकतात. पुढील चौदा-पंधरा वर्षांत पाच वेळा बॅटरी बदलावी लागेल. सौदा वाईट नाही.
अवांतरः
तरी परवडणार नाही
१८ रु दर बराच कमी आहे. वर्षाला ३०० युनिट म्हणजे ५४०० रु. दीड लाखासाठी ३० वर्षे!
हा दर मिळवण्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक लागेल. म्हणजे ग्रिड सिंक्रोनायझेशन करावे लागेल. त्याशिवाय यासाठी स्वतंत्र मीटरींग यंत्रणा लागेल. नाहीतर सरकारचीच ६ रु.ची वीज सरकारला १८ रु. ने विकता येईल.
मोठ्या भांडवलात या उद्योगाची एफिशियंसी वाढवता येते. म्हणजे माझ्या गुणाकारात ०.४ चा गुणक होता त्याला सूर्याबरोबर फिरवणारा करून, परावर्तित आरसे वापरून १ करता येईल. ते केल्यास ३०० युनिटस् चे ७५० युनिटस् बनतात. आणि दीड लाख मिळवण्याच्या ३० वर्षांचे १२ वर्षे होतात. सरकारला विकायची असेल तर इन्वर्टर लागेल पण ब्याटरी लागणार नाही. आता १२ वर्षे हे सर्व टिकले पाहिजे. नाहीतर बारा वर्षात यावर परत तेवढाच खर्च व्हायचा.
या प्रकल्पासाठी जमीन केवढी लागेल याचे गणित केले तर ते असे होईल. १ स्क्वे.मि. (सौर सेल्स) मधे १०० वॉट एक मेगावॉट विजे साठी १ हेक्टर सोलर सेल्स. यात आत पोचण्याला वाटा आणि इतर रस्ते धरले तर २ हेक्टर जागा लागेल. आज काल १००० मे.वॉट चे औष्णिक प्रकल्प असतात. तेवढ्यासाठी २००० हेक्टर किंवा २० स्क्वे. कि.मि. जागा लागेल. (घराघरांवर हे टाकले तर खालची जागा वापरात येईल हा हिशोब वेगळा.) ही वीज ८ तास चालत असल्याने या वीज केंद्राची क्षमता तेवढी कमी धरावी लागेल. एवढ्या परिसरातील झाडे मात्र काढावी लागतील.
या ऐवजी तेवढ्याच जमीनीत मका (?) लावला आणि बायो डिजेल तयार केले तर? सुबाबुळ सारखी झाडे लावली व त्याचे लाकूड जाळून वीज तयार केली तर? माझा जवळ हिशोब नाही. पण कदाचित झाडांची एफिशियन्सी ही सध्याच्या सौरसेल्स ना मागे टाकेल असा कयास करावासा वाटतो.
प्रमोद
पटले
मी आकडेमोडीत गोंधळ केला त्यामुळे माझा निष्कर्ष चुकला.
बॅट्रीवर फुकटातल्या सोइ
=--------
डी. सी. १२ व्होल्ट वापरातील धोका
घराचे वायरींग बॅट्रीवर करता येते.
यासाठी जाड वायरी वापरा. आग लागू शकते कारण बेटरीचा येणारा करंट जादा कडक असतो. ए. सी. करंट वायरी येथे वापरू नये!
ऑटोमोबाईलच्या दुकानातल्या चांगल्यातल्या वायरी घ्या नाहीतर् डबल वायरींग टाका. आमच्याकडे अशी आग लागली होती.
=--------
सी एफ एल ऐवजी ४.५ व्होल्टसचे एल. इ. डी वापरून भारी लाईट पडतो. हे वापरलेले आहे. म्हाग आहेत पन् लाईट भारी आहे.
आमच्या इलेक्ट्रोनिकवाल्याकडून त्याचे ४-५ लाम्ब पॅनेल बनौन घेतले आहेत. (१२ वोल्ट चे ४.५ वोल्ट करवे लागतात्)
ते बल् - टुब ऐवजी घरात लाउन् टाकले.
ट्रायल ला आमच्या हिरो होन्डाची बॅटरी काढून वापरली होती. चान्गली चाल्ते.
आता मोठी बेटरी आहे. ट्रेक्टर, जीप् कारची जुनी - इंजिन चालू न करू शकलेली कंडम बॅटरी घरगुती लाईट चान्गला देते.
बेटरीवाल्याकडे रु.१०० ला विकत मिलते. वीज येते तेव्हा चार्ज करू ठेवतो. १ विकत घेतली तर त्याने २ फुकट दिल्या. आता अशा २-३ बॅटर्या झाल्या लाईटचा प्रोब्लेम् फुकटात गेला.
आता आमच्याकडे प्रत्येकाला सेपरेट पंखा आहे.
जुन्या कंडम कोंप्युटरच्या पोवर सर्कीटमधले छोटे पंखे १२ वोल्टवर चालता. त्याला प्लग लौन ते बॅट्रीला जोदले आहे.
आता हवा पन् भेटते आनि लाईट् पन्. असे मोठे पंखे पन् भेटतात. कंपन्यात् पाहिले आहेत्. (पन् फुकटचे छोटे अस्ले तरी बरे म्हनून कंडम कोंप्युटरच्या पोवर सर्कीटमदले घेत्ले)
एक एलेडी लाईट् आणि एक कोम्प्युटर पंखा एका होन्डाच्या बॅट्रीला जोदून टाकले आहे. आता ते कुटे पन् नेता येते - पायजे तेथे हवा अन् लाईट. ४-५ तास चालते. आपले काम होते. परत लागली तर मोट्या बेट्रीवर ल्हान बेट्री चाज होते.
आमच्याकडे सगळे वायरीन्ग आता १२ वोल्ट् आहे. लाईटवर आम्ही काहीच वापरत नाही. शिवाय पायजे तेव्हा लाईट. आमच्या संडासात तर कायमचा एक एल् इ डी लावलेला आहे. कायम लाईट असतो.
आमच्या इलेक्ट्रोनिकवाल्याने बेटरी चार्गर पन बनौन दिला आहे.
एका मेकेनिकने फ्रिज पन बॅटरीवर करून देतो असे सान्गितले आहे.
पन् अजून झाला नाही, करन् नवीन बॅटरी पाहिजे.
ते झाले तर बर्फ पन् भेटल्.
आता माज्या आयड्यावर इलेक्ट्रोनिकवाला धन्दा करून आहे.
लाईट् गेल्यावर् आमचे घर दाखवतो आनि
मी माझ्या आयड्यानी बनौन घेतले तसेच लाम्ब पेनेल लोकान्ना विकतो.
बेटरीवाला त्याचा मित्र झाला आता - बोला आता!
आपला
अण्णा
लई भारी
अण्णांच्या गणिताने मागील हिशोबात खूप फरक पडेल. अशाच रितीने सौरसेल्स बनवणारे मेक्यानिक मिळोत. (मधे कंडम क्यालक्युलेटरचे सेल काढण्याची कल्पना आली होती. त्यात पाच पाच रुपयाला एकावर एक फुकट मिळाल्यास वेगळीच मजा येईल.
आता अडचणी. लेड व्याटरी प्रदूषणकारी असते. ती लोक फेकून देतात म्हणून सरकारने हल्ली एक कायदा केला अहे. (असे माझ्या व्याटरीवाल्याने सांगितले.) तुमच्या कडची जुनी ब्याटरी परत् दिल्याशिवाय तुम्हाला नवीन मिळणार नाही. त्या जुन्या ब्याटरी मग उत्पादकाकडे परत् जातील आणि तो त्याचा पुनर्वापर करेल. असे झाले तर १०० रु जुनी ब्याटरी कदाचित मिळेनाशी होईल.
डीसी वर अमुक वोल्ट मिळाले तर एसी सारखे त्याचे दुसर्या वोल्टस मधे परिवर्तन सहज शक्य नसते. म्हणजे सर्व उपकरणे त्या त्या वोल्टस ची घ्यावी लागतील. यातील एल.ई.डी. दिवे हे वापरायला सोपे जातील. डी.सी पंखे (ब्रशलेस) हे महाग असायला हवेत. संगणक ल्याप टॉप असेल तर त्याला डी.सी वीज चालेल पण ती बहुदा रेग्युलेटेड असायला हवी असे वाटते. यातून इन्वर्टर चा खर्च वाचतो. पण इन्वर्टर कदाचित याकिमतींना टक्कर देऊ शकेल.
महाराष्ट्रात बहुतेक सधन घरात इन्वर्टर ब्याटरी सकट आहेत. (म्हणजे जे सौर उर्जेची चैन करू शकतात त्यांच्याकडे.) यावरून मला कल्पना सुचली होती की या सर्वांसाठी सौर उर्जा वापरणे फार सोयीचे आहे. पण सेल्सचा खर्च पाहून काढता पाय घेतला.
प्रमोद
पन्खे
सगळ्य् पीसी मद्ये पन्खे असतात.
माग्च्या बाजूला पाहा हवा येते, हात लाउन पाहा.
बंद् पडलेला पीसी चा पन्खा काड्ला तर् चालतो.
हे पन्खे मी १२ -१४ तास चालवले आहे. बंद पडत् नाही.
तुमच्याकदे बंद् पीसी नसेल तर् जुन्या बाजारात किती पीसीचे पंखे मिळतात्.
चेहेरावर हवा मारायला चान्गले असतात. गार हवा येते.
बेट्रीवर चान्गले चालतात. काही जादा करंट पन् ओडत नाही.
पन्ख्याच्या मागे ओला रुमाल वाळत् घात्ला तर फुकटमदे कुलर्!
नाही तर् पान्याच्या माठच्या पुडे पंखा ठेवला तरी कुलर्.
मस्त् बिन आवाजाची झुलझुल् हवा...
पन्ख्याला ताकद् नाही लहान मुलन्साटी एकदम सेफ्. हात घातला तर लगेच थाम्बतो.
मी तरीपन् त्याला पी.सीची बोक्सात जालीच्या आत बसवले आहे. असा पन पोवरचा बोक्स वाया जानार होता.
त्याचेतच एक बेट्रीपन बसली.
त्याचाच् अंगचे बटन् पन् आहे. तेच् वापर्ले त्यावर् पन्खा चालू बन्द् होते.
त्याला अंगचे सोकेट् होते, त्याचे बेट्रीला वायरिन्ग केले. सोकेटला पिन जोदली की चार्जिन्ग.
त्याला एक तारेचे हेंडल केले.
बिन वायरचा एक्दम् मोबाइल् पन्खा. कुटे पन् न्या, कुटे पन् टेवा. पाय्जे तर् चाल्ता चाल्ता हवा खा.
हे लहान् बालान्साटी एक्दम् चान्गले अहे. उन्हाल्यात फार् उप्योग होतो.
मुलान्ना शोट् बसायची भिती नाही. बालान्ना हवा पन् गार मिलते.
बेट्री कुटे पन् मिळते. जुनी नवी कशीपन. जुनी पाय्जे असेल तर् साद्या दुकानात जा.
एक्साइड् मदे गेले तर ते देत नाइ. देशी मेक्यनिककडे जा.
देशी - म्हन्जे चालू दुकानाच्या बनावटीची नविन् घेतली तर् स्वस्त्.
पन् नवी कशाला घ्याची?
कंडम् बेट्री अजून कंडम् झाल्यावर त्याच्याकडून २५ रुपयला बदलून घ्याची.
माजी कंडम् बेट्री एक वर्श झाले तरी चालते आहे.
१२ वोल्ट् चा मिक्सर् बनव्ता येतो.
पन्खा आहेच. लाईट् आहे.
अजून काय उपकरणे पाय्जे?
काय् लाग्ते?
आपला
अण्णा
हे
अवांतर आहे, पण पूर्णपणे नाही -
आता हवेवर हे पाहिले आहे का?
तेथील एक प्रतिसाद काहीसा संपादित करून खाली देत आहे.
उच्च दाबाची हवा पवनचक्कीद्वारेही मोठ्ठ्या टाक्यांमध्ये भरून ठेवता येईल.
किंवा सौर शक्तीवरच्या स्टर्लींग इंजिनानेही भरता येईल, म्हणजे कोणतेच प्रदुषण नाही. अर्थात या उपायांच्या मर्यादांचीही कल्पना आहे. त्यामुळे हे उपाय वीजेला 'जोड' म्हणून गृहीत धरावेत.
येथे वीज साठवायची नसून फक्त हवा टाकीत भरून ठेवायची आहे, हा फार मोठा फरक आहे! बॅटरीज मेंटेन करण्यापेक्षा नुसती टाकीत हवा भरून ठेवायला तसा मेंटेनंस काहीच नाही! फक्त चांगल्या दणकट टाक्या हव्यात!
घरगुती वापरासाठी, जुन्या ट्रकच्या चांगल्या टाक्या आणि त्याचेच हवेचे पंप येथे कामाला येऊ शकतात.
कदाचित सरकार तर अश्या 'हवा भरणार्या' पंप जोडलेल्या पवनचक्क्या जागोजागी उभारून ठेवू शकेल. आणि घरगुती जोडण्या देउ शकेल.
कदाचित प्रत्येक इमारतीच्या गच्चीवर किंवा तुमच्या गॅलरी मध्येही अशी छोती पवनचक्की जोडता येईल.
तुमच्या इमारतीत जिम असेल तर जिम मधल्या सगळ्या सायकली आणि वजनाची यंत्रे थोड्या प्रयत्नाने हवा भरण्याच्या पंपाला जोडता येतील. व्यायाम आणि उर्जा हातोहात मिळवता येईल.
हवेच्या टाक्या जमिनीखाली ठेवता येतील. हवेचा घरगुती वापर करता येईल. मात्र त्यासाठी उपकरणांमध्ये काही बदल करावे लागतील. यासाठी कोणताही तंत्रज्ञ मदत करू शकेल. दट्ट्या फिरवण्यासाठी विजेच्या मोटर ऐवजी न्युमॅटीक तंत्रज्ञान वापरायचे आहे.
स्टर्लींग इंजिनाचा घरगुती वापर या कल्पनेवर अजून चर्चा आवडेल.
-निनाद
मोबाइल्
बेट्री वाप्रुन मोबाइल् चार्ग् करू नका.
मी करत होतोत् तर् माझा मोबाइल् फुटला आहे.
माजी चुक होती. डायरेक बेट्रीला जोडाला नको पाहिजे होता.
त्याच्यासाटी सर्कीट् करावे लाग्ते.
बेट्री आनि मोबाइल् चे वोल्ट वेगले असतात्.
पन् घाइत् १ मिनित् मदे बोलायला होइल् वाटून् केला.
जागेवरच मोबाइल् फुटल्ला.
मी वाच्लो. बेट्रीची वायर पक्डायला मोबाइल खाली टेव्ला होता.
आता मोबाइल् नाही.
आपला
अण्णा
धन्यवाद !!
जाणकारांचे प्रतिसाद वाचून आनंद झाला. वरील चर्चाप्रस्ताव मांडण्याचे कारण म्हणजे गावी घर बांधले आहे. शासनाच्या कृपेने १०-१२ तास वीज नसते. नवीन मीटर घेण्यासाठी रु. १५००/- अनामत रक्कम भरावी लागते. वीज देयक वेगळे ! जर सुविधाच मिळणार नसेल तर दाम का मोजावा ?
गावी वीजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करता येते पण चोरी करायची नाहीये.
१) मी चायना मेक चा एक एल.ई.डी. दिवा रु. ५००/- ला विकत घेतला आहे. यात ६० एल.ई.डी. आहेत.
१ बाजूस १५, ह्याप्रमाणे चारी बाजूंना ६० दिवे आहेत. बटण वापरुन एका वेळेस १५, ३० किंवा ६० एल.ई.डी. प्रकाशमान करायची सोय आहे. त्याप्रमाणे ते १५ ते ६० तास चालतात. पण एल.ई.डी. च्या प्रकाशात डोळे दुखतात असे घरातील मंडळी म्हणतात. (कदाचीत सवय नसेल म्हणून्.) तसेच चीन ला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपात मदत नको वाटते.
२) लेड व्याटरी प्रदूषणकारी असते. ती लोक फेकून देतात म्हणून सरकारने हल्ली एक कायदा केला आहे.
हे बरोबर आहे. पण मी भारतात राहत असल्यामुळे मला हा माल अजूनही विनासायास उपलब्ध होऊ शकतो. पण प्रदूषण टाळण्याकडेच शक्यतो कल आहे. नवीन ब्याटरी चा पर्याय थोडा महाग आहे पण चालू शकेल.
३) पवनचक्क्या हा एक उपाय चांगला आहे. (माझ्या गरजेसाठी महागडा असेल कदाचित पण गावच्या वाडीचा विचार केल्यास (१०-१५ घरांचा समुह) तर परवडू शकेल.
४) इंटरनेटवर सगळ्याच प्रकारची माहिती उपलब्ध आहे पण तिथे यावर चर्चा करता येत नाही म्हणून हा प्रपंच.
माहिती
येथे बरीच माहिती आहे.