सामाजिक क्षेत्राशी संबंधित नवीन ब्लॉग

सस्नेह नमस्कार,

सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था व संबंधित घटकांसाठी मी ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉगद्वारे भारतातील तसेच विविध देशांमधील स्वयंसेवी संस्था व सामाजिक उद्यमशीलतेशी संबंधित घडामोडींची माहिती करुन देण्याचा विचार आहे.

या ब्लॉगचा मुख्य भर हा महाराष्ट्रातील सेवाक्षेत्रावर असेल, म्हणुनच जाणीवपुर्वक त्यासाठी मराठी भाषेचे माध्यम निवडले आहे. स्वयंसेवी संस्था व संबंधित व्यक्तिंमध्ये आपआपसांत विविध विषयांवर आदान प्रदान व्हावे, सेवाक्षेत्रातील ताज्या घडामोडींची माहिती करुन देणे व अनोख्या समाजोपयोगी प्रयोगांची व तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे हे ब्लॉग सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश आहेत.

जर तुम्ही एखाद्या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित असाल किंवा विकासात्मक कार्यामध्ये सहभागी असाल तर तुमच्या संस्थेच्या कार्यक्रमांची आगाऊ माहिती मला कळवा. याबरोबरच तुमच्या संस्थेमधील नोकरीच्या, सेवेच्या व अभ्यासाच्या संधींबद्दलही जरुर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ब्लॉगच्या माध्यमातुन आपण आपले विचार व विविध लेखानावरील मतं मांडावीत ही आंपणांस आग्रहाची विनंती.

ब्लॉगची ही चाचणी आवृत्ती (बीटा व्हर्शन) असून बदलास वाव आहे. उपक्रमींनी मजकूर व अन्य तांत्रिक बाबींबद्दल आपली मतं कळवावी. विशेषतः खालील गोष्टींवर आपल्या सूचना जाणून घेण्यास उत्सुक आहे.

१. मजकूरासाठी कोणत्या टंकाचा वापर करावा?
२. वेगवेगळ्या न्याहाळकांमध्ये दिसण्यास काही अडचण आहे का? असल्यास काय उपाय करावा?
३. ब्लॉगवर कोणती विजेट्स / गॅजेट्स असावीत / नसावीत?
४. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काय करावे?
५. मराठी भाषेतील ब्लॉगचे एसईओ (सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) कसे करावे?
६. शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी / कमी करण्यासाठी काय करता येईल? यासाठी कोणता स्पेलचेकर वापरावा?

ब्लॉगचा पत्ता: www.sevayog.org

संपर्कासाठी इमेल पत्ता: sevaconnect@gmail.com

Comments

शुभेच्छा !

१. मजकूरासाठी कोणत्या टंकाचा वापर करावा?
सीडॅकचा योगेश, एरियल युनिकोड, मंगल, लोहित हे चारही टंक वापरून बघा.

२. वेगवेगळ्या न्याहाळकांमध्ये दिसण्यास काही अडचण आहे का? असल्यास काय उपाय करावा?
ह्यासाठी ब्राउजरशॉट्स ओआरजी सारखी साइट बघा. अडचण आल्यास वेगवेगळ्या व्यासपीठांवर उपाय विचारता येतात.

३. ब्लॉगवर कोणती विजेट्स / गॅजेट्स असावीत / नसावीत?
गुगला म्हणजे सापडेल.

४. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काय करावे?
गुगला म्हणजे सापडेल.

५. मराठी भाषेतील ब्लॉगचे एसईओ (सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन) कसे करावे?
मराठीबाबत वेगळी माहिती नाही. गुगला म्हणजे सापडेल.

६. शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी / कमी करण्यासाठी काय करता येईल? यासाठी कोणता स्पेलचेकर वापरावा?
मनोगताचा शुद्धिचिकित्सक वापरून बघा.

चांगली संकल्पना आहे. शुभेच्छा!

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

शुभेच्छा

प्रकल्प चांगला वाटतो. लहान सेवा संस्थांना याचा निश्चित फायदा होईल.

तुम्ही http://www.karmayog.org हे स्थळ पाहिले आहे का? त्यांचाशी सहयोग तुम्हाला कदाचित करता येईल.

प्रमोद

 
^ वर