माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते.
भारतातील घरगुती डॉक्टर ही कल्पना पाशिमात्यांचे अंधानुकरून करून आपण बरखास्त करण्याच्या प्रयत्नात असताना ऑगस्टा मधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल मधे गेली ६३ वर्ष काम करणारे पपा डॉक
http://chandrashekhara.wordpress.com/2010/06/01/%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4... यांच्या संबंधी माहितीचा हा मेल आला.http://chandrashekhara.files.wordpress.com/2010/06/walter-watson_1643586c.jpg आपणास पाठवत आहे.
खरच माझ्या लहानपणी आमचे डॉक्टर हे नुसते डॉक्टर नव्हते तर आमच्या घरचे एक नातेवाईक च होते. घरातील प्रत्येक निर्णय हे डॉक्टरांच्या संमतीनेच घेतले जात होते. मग घरातील विवाह असो किंवा आर्थिक निर्णय असो डॉक्टर म्हणतील तेच जवळपास ठरत होते. नुसती जीभ आ करून दाखवली तर डॉक्टर डोक्यावर टपली मारून पळ कांही झाले नाही म्हणत कागदाच्या लहान पुडीत २ गोळ्या बांधून देत होते .आणि आश्यर्याची बाब दोन- चार घंट्यात धिगाना करण्यास मोकळे होत असू. फीस देण्यास गेलो तर लग्नात लाडू खाण्यास येतो म्हणत. एव्हडेच नव्हे तर घरच्यां स्त्रियांची बाळंतपणे ( जि आज सिझेरियन शिवाय होत नाहीत ) ती कधी होत असत हे समजत सुद्धा नसे.डॉक्टरांच्या हातात बळेबळे १०० रुपये कोंबून द्यावे लागे. डॉक्टर आणि देव हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजल्या जात असे. आणि आता दैत्य आणि डॉक्टर एकच नाण्याच्या बाजू समजल्या जातात.
यात डॉक्टरांना दोष देण्याचा उद्देश नाही तर हा दोष आजच्या समाजव्यवस्थेचा जास्त आहे. पळा पळा कोण पुढे तो या प्रवृतीचा आहे. त्याच बरोबर नर्सरी पासून ते M S M D पर्यंत चा अवाढव्य होणारा खर्च. आणि त्या नंतर दवाखाना टाकण्या साठी लागणारा खर्च पाहूनच डोळे पांढरे होतात. यामुळे डॉक्टर यांनीही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. यातच वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टरांच्या हातात ना राहता औषध उत्पादक कंपनी, विविध तपासण्या करणाऱ्या लब्ज आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्या मुळे ते सुद्धा मनात नसताना या चक्रात अडकले आहेत. कालाय: तस्मे नम! म्हणून दुर्लक्ष करावे . हेच आपल्या हातात आहे.
Comments
बाळपणीचा काळ सुखाचा
बाळपणीच्या काळाबद्दल माझा अशाच हृद्य आठवणी आहेत.
तरी कसे फुलतात...
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे!
एवढं सगळं वाईट होत असतानाही भारतीयांचं सरासरी आयुर्मान वाढतं आहे...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
छान प्रतिसाद
सहमत आहे.
गळ: एन्ड डिटर्माइन्स द मीन्स!
आयुर्मान
वाढलेल्या आयुर्मानाचा संबंध नवी औषधे, नवे तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनाशी आहे. डॉक्टरांच्या बदललेल्या वागणुकीमुळे आयुर्मान वाढले, असे नाही.
लेखकाचा मुद्दा डॉक्टर लोकांच्या नैतिक आचरणासंबंधी आहे, आणि त्यात नक्कीच तथ्य आहे.
मात्र एकंदरच "तो काळ- हा काळ" अशी तुलना कुठल्याही क्षेत्रात केली तरी यासारखेच निष्कर्ष निघू शकतात. त्यामुळे कालाय: तस्मे नम! म्हणून दुर्लक्ष करावे . हेच आपल्या हातात आहे.
ही शेवटची ओळ समर्पक आहे, असे वाटते.
हताशतेपेक्षा आपण जुन्या प्रथांचे पुनरुज्जीवन करु शकतो का?
जुन्या प्रथा, चांगल्या संस्था लोप पावल्याची हताशता व्यक्त करण्यापेक्षा आपण त्यांचे पुनरुज्जीवन करु शकतो का, याचा विचार झाला पाहिजे. आपल्या समाजाची वीण उसवली आहे. व्यक्तीस्वातंत्र्यवादाने टोक गाठले आहे. स्पर्धेमुळे 'मी आणि माझे' यापलिकडे विचार करायला कुणाची तयारी नाही.
मी शाळेत असताना चार दिवस सर्दी-पडशाने आजारी होतो. घरगुती औषधे घेतली आणि बरा झालो, पण शाळेने आजारपणाचा दाखला मागितला मग काय करणार? गेलो आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे. तर डॉक्टर भडकलेच माझ्यावर. म्हणाले, 'आजारी असताना तू मला तब्बेत दाखवायला आला होतास का? मी तुला तपासले का? औषधे दिली का? बरा झाल्याचे जाहीर केले का? मग मी दाखला देणार नाही. तुझ्या बाबांना मला भेटायला सांग. संध्याकाळी बाबा डॉक्टरकाकांना भेटायला गेले. डॉक्टरांनी सगळे ऐकून घेतले. प्रमाणपत्र दिले आणि बाबांना म्हणाले, की 'सर्दी-पडशासाठी चार दिवस शाळा का बुडवली त्याने? मला याचाच जास्त राग आहे. माझ्याकडे आला असता तर दुसर्या दिवशीच बरा करून शाळेत हाकलला असता.'
बरं असे हे कर्तव्यकठोर डॉक्टरकाका प्रसंगी इतके मिश्किल होत. एकदा माझ्या बहिणीच्या घशात उडणारा एक पंखाचा कीडा (पावसाळ्यात येतात ते) गेला. बाईसाहेब गेल्या घाबरून धावत काकांकडे. तर डॉक्टर म्हणाले, ' ते चीनी लोक तर साप, बेडूक, नाकतोडे खातात. बस्तर भागात आदिवासी लाल मुंग्यांची चटणी खातात आणि तुला एक कीडासुद्धा नीट गिळता येत नाही. यावर कसले औषध मागतीयस. गरम पाण्याने गुळण्या कर. जा पळ.'
हेच प्रसंग चालूघडीला घडले असते तर जवळ दवाखाना असलेल्या डॉक्टरांनी फार चौकशा न करता तपासले असते. १०० रुपयांत आजारपणाचा दाखला दिला असता किंवा माझ्या बहिणीला २००-३०० रुपयांच्या गोळ्या, गुळण्यांची औषधे लिहून दिली असती.
फॅमिली डॉक्टर
मला एक प्रश्न विचारायचा आहे.
आपल्यापैकी किती जण आजरपणात प्रत्येक वेळी एकाच डॉक्टरकडे जातो? आणि स्पेशालिस्टाकडे न जाता जनरल प्रॅक्टिशनर कडे जातो?
तसे जात असू तर ठणठणपाळ यांनी लहानपणचे म्हणून जे अनुभव सांगितले आहेत ते आजही येत असणार याबद्दल बर्यापैकी खात्री आहे. (उदा. "जा, काही झालेलं नाहीये" वगैरे...)
मी गेल्या वर्षी भिलाईला होतो त्यावेळी आमच्या बरोबरचे अनेक लोक (भरपूर पगारवाले आय टी कन्सल्टन्ट) स्वतःला किंवा कुटुंबियांना सर्दी ताप आल्यास तिथल्या 'अपोलो हॉस्पिटल' मध्ये जात असत. आसपासच्या जीपीकडे जात नसत. त्यांना नेहमीच कापले गेल्याचा अनुभव येणार.
बाकी पूर्वी जीभ दाखवून निदान याबाबत एक प्रतिसाद दिला होता तो शोधून दुवा देईन.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
चाईल्ड स्पेशालिस्ट
असाच प्रश्न मला चाईल्ड स्पेशालिस्ट (पेडिऍट्रिशन) बद्दल पडतो. मुलांना (तेही धडधाकट मुलांना [वयवर्षे ६-१२ असे समजू]) सर्दी पडसे झाले तर तडक बालरोगतज्ज्ञाकडे धावत जायची गरज असते का?
नसते -
- आता H1N1 फ्लूवर लस उपलब्ध झाल्यावर नसते. -हे विधान दिसते त्यापेक्षा बरेच व्यापक आहे हेवेसांनल :);)
बालरोगतज्ञ
ज्या मुलाला बोलता येते आणि आपल्याला काय होत आहे हे सांगता येते त्याला बालरोगतज्ञाकडे जायची/न्यायची साधारणतः आवश्यकता नसते. एच्१एन्१ ची लस नव्हती तेव्हाही साध्याच डॉक्टरकडे जाऊन पुरत असावे. साधा डॉक्टर लक्षणे पाहून पुढील सल्ला देईलच.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
दोन डॉक्टर, दोन तर्हा
माझ्या लहानपणी गावात असणार्या दोन डॉक्टर्सबद्दल येथे लिहावेसे वाटते. एका डॉ. ना डॉ. वैद्य म्हणू आणि दुसर्यांना डॉ. हकिम
दोन्ही डॉ. मध्यमवर्गातून आलेले, स्वतःच्या हिमतीवर शिकलेले वगैरे. पैकी डॉक्टर वैद्यांना स्वतःचा दवाखाना आणि जवळपास घर घेण्यास बड्या नातेवाईकांची मदत झाली. दुसर्यांना हे ही स्वतःच्या हिमतीवर कमवावे लागले. त्यामुळे डॉ. हकिमांवर कर्जाचा बोजा.
डॉ. वैद्यांचा स्वभाव रोखठोक. एखादा रुग्ण सर्दी-पडशाचे कारण घेऊन आला तर तपासतील आणि म्हणतील "चल पळ. घरी जाऊन आराम कर. सर्दी पळून जाईल. औषध मिळणार नाही." एखादी बाई मूल खातपित नाही म्हणून तक्रार करू लागली तर तिच्याच अंगावर वसकन ओरडतील "मुलांच्या तंत्राने वाग. त्याला निरनिराळं करून खायला घाल. शेजारणीशी गप्पा मारणं बंद कर." त्यांच्या खाष्ट स्वभावाला रुग्ण वचकून असत.
डॉ. हकिम एकदम गोडबोले. एखादा रुग्ण सर्दी-पडशाचे कारण घेऊन आला तर तपासतील आणि म्हणतील "दोन दिवसांचे औषध देतो हं! आराम कर. दोन दिवसांनी परत ये. सर्दी दोन दिवसांत बरी व्हायची नाही." एखादी बाई मूल खातपित नाही म्हणून तक्रार करू लागली तर हसून म्हणतील, "त्याला टॉनिक देतो हं! दिवसाला एक चमचा दे आणि जरा त्याच्या आवडी-निवडीचंही खायला घाल." त्यांचे रुग्ण त्यांचे उत्तम मित्र होते.
परंतु, दोन्ही डॉक्टरांची प्रॅक्टिस बक्कळ होती/ आहे. लोक मागून एकाला खाष्ट आणि दुसर्याला गोड बोलून पैसे कापणारा म्हणाले तरी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये फरक पडला नाही किंवा एकाचे रुग्ण वैतागून दुसर्याकडे गेले असे झाले नाही. :-)