मृत्यूपूर्वीचे काही क्षण

लखमिर चावला हा वॉशिंग्टनमधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मधे संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे. शल्यक्रियेच्या वेळी वगैरे भूल देतात त्या विषयातला तो तज्ञ (anaesthesiologist) आहे. हा लखमिर एका अनोख्या विषयाबद्दल सध्या संशोधन करतो आहे. कोणत्याही मानवी शरीराचा मृत्यू होण्याआधीचे काही क्षण किंवा मिनिटे त्या शरीरात किंवा विशेषेकरून मेंदूमधे काय घडते याचा शोध तो घेतो आहे. या आपल्या संशोधनासाठी लखमिर electroencephalograph (EEG) हे मेंदूची ऍक्टिव्हिटी मोजणारे उपकरण वापरतो आहे.

आपल्या संशोधनात लखमिरला असे आढळून आले आहे की मृत्यूपूर्वी 30 सेकंद ते 3 मिनिटे या कालावधीत पेशंट्सच्या मेंदूच्या ऍक्टिव्हिटीमधे प्रचंड वाढ झालेली आढळते. ही ऍक्टिव्हिटी एखाद्या जागृत मेंदूच्या ऍक्टिव्हिटीएवढी असते. प्रत्यक्षात तो पेशंट त्या वेळी अतिशय शांत रित्या झोपलेला असतो. Journal of Palliative Medicine या मासिकात लिहिलेल्या लेखात लखमिरने अशा 7 पेशंट्सचे वर्णन केले आहे. मात्र अशा 50 पेशंट्सच्या बाबतीत हेच बघितल्याचे त्याने लेखात नमूद केले आहे.
मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलेल्या अशा अनेक लोकांबाबत आपण ऐकतो, वाचतो. आपले त्या क्षणांचे अनुभव सांगताना असे लोक आपण खूप दैदिप्यमान प्रकाश बघितल्याचे किंवा शरीरातून बाहेर पडून हवेत तरंगत असल्याचा अनुभव आल्याचे सांगतात. काही लोक जुन्या आठवणी आल्याचे सांगतात. या सगळ्या अनुभवांचा आणि लखमिरच्या संशोधनाचा परस्पर काहीतरी संबंध असला पाहिजे असे त्याचे म्हणणे आहे.

या मृत्यूपूर्वीच्या क्षणी त्या शरीराची वैद्यकीय अवस्था काय असते? या बाबत सांगताना लखमिर म्हणतो की या कालात मेंदूचा रक्त पुरवठा कमी कमी होत जात असतो व त्या रक्तातील प्राणवायूची पातळीही कमी कमी होत असते व त्यामुळे मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होत असल्याने मेंदू सर्व पेशींना एक जोरदार विद्युत झटका देतो. या झटक्यामुळे (impulse) त्या पेशंटला अनेक प्रकारचे भास व संवेदना झाल्याचे भासू लागते.

लखमिर चावलाचे हे संशोधन मला फार रोचक वाटले. मेंदूला होणार्‍या रक्त पुरवठ्यातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने, सर्व पेशींना एक जोरदार झटका देण्याची जर मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया (Reaction) असली तर ती मृत्यूपूर्वीच फक्त घडते असे समजण्याचे काहीच कारण नाही. केंव्हाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी मेंदूची प्रतिक्रिया तीच असणार असे मला वाटते. म्हणजेच काही वेळा माणसाला अमानवी किंवा विचित्र संवेदना होतात असे म्हणले जाते त्याचे कारण ही फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया असू शकेल.

काही लोकांना साक्षात्कार होतात. काहींना स्वप्नात देव येऊन काहीतरी सांगतो. अशा परिस्थितीत बहुतेक वेळा ते थोतांड किंवा षडयंत्र असले हे मान्य केले तरी 1 किंवा 2 टक्के लोकांना असा काहीतरी भास किंवा संवेदना होत असावी असे मला वाटते. अगदी प्रेषितांपासून ते नाक्यावरच्या बाबाला झालेल्या साक्षात्काराचा खुलासा त्यांच्या मेंदूची अशी फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया असे म्हणून देणे शक्य आहे.
आपण असे नेहमी पाहतो की काही सर्व साधारण व समजुतदार लोक आयुष्यात घडलेल्या कोणत्या तरी आघातानंतर एकदम कोणत्या तरी बाबाच्या किंवा पंथाच्या कच्छपी लागलेले दिसतात. या एकदम झालेल्या बदलाचे, हीच फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया हे कारण असू शकेल का?
अर्थात हे फक्त माझे विचार आहेत. याला कोणताही संदर्भ किंवा पुरावा नाही. उपक्रमींना या बाबतीत काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

रोचक

योगायोगाची बाब अशी की नेमके हेच काल वाचले होते.

या बाबत सांगताना लखमिर म्हणतो की या कालात मेंदूचा रक्त पुरवठा कमी कमी होत जात असतो व त्या रक्तातील प्राणवायूची पातळीही कमी कमी होत असते व त्यामुळे मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होत असल्याने मेंदू सर्व पेशींना एक जोरदार विद्युत झटका देतो. या झटक्यामुळे (impulse) त्या पेशंटला अनेक प्रकारचे भास व संवेदना झाल्याचे भासू लागते.

मेंदूला होणार्‍या रक्त पुरवठ्यातील प्राणवायूची पातळी कमी झाल्याने, सर्व पेशींना एक जोरदार झटका देण्याची जर मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया (Reaction) असली तर ती मृत्यूपूर्वीच फक्त घडते असे समजण्याचे काहीच कारण नाही. केंव्हाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरी मेंदूची प्रतिक्रिया तीच असणार असे मला वाटते.

-तुमचे निरीक्षण योग्य आहे. शिवाय केवळ 'प्राणवायुची पातळी' हा एकच निकष नसावा. इतरवेळीही (जसे ड्रग्ज घेतल्यावर-, विषबाधा झाल्यावर- ....हम्म्) असेच होत असावे.

आणखी कोणत्या गोष्टी?

या मृत्यूपूर्वीच्या क्षणी त्या शरीराची वैद्यकीय अवस्था काय असते? या बाबत सांगताना लखमिर म्हणतो की या कालात मेंदूचा रक्त पुरवठा कमी कमी होत जात असतो व त्या रक्तातील प्राणवायूची पातळीही कमी कमी होत असते व त्यामुळे मेंदूला होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होत असल्याने मेंदू सर्व पेशींना एक जोरदार विद्युत झटका देतो. या झटक्यामुळे (impulse) त्या पेशंटला अनेक प्रकारचे भास व संवेदना झाल्याचे भासू लागते.

हे पटण्याजोगे आहे. विसुनानांनी म्हटलेले ड्र्ग्ज, विषबाधा वगैरे प्रकारही अर्तक्य भासांना कारणीभूत असू शकतात.

आणखी कोणत्या गोष्टी यासोबत येतील.

चुंबकीय क्षेत्राचा काही संबंध असू शकतो का? मी फारा वर्षांपूर्वी मोठे विद्युत मनोरे आजूबाजूच्या जागेत चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात व त्याचा त्रास तेथील रहिवाशांना होतो असे वाचले होते. (सत्यासत्यता माहित नाही पण यावर प्रकाश टाकल्यास आवडेल आणि मग जर हे चुंबकीय क्षेत्राची कल्पना खरी मानली तर पौर्णिमा-अमावास्येच्या दिवशी होणारे मानवी मनावरील परिणाम हा बघा लेख मिळाला. मनोगतावर* होता. , मोबाईल फोनच्या लहरींमुळे होणारे दुष्परिणाम वगैरे वगैरे खरे का?)

* लेख विनोदी वाटण्याची जबरदस्त शक्यता मी नाकारत नाही. ;-) कंपनीने तेथेही प्रबोधन करावे अशी कळकळीची विनंतीही आहे. :-)

प्राणवायूच्या कमतरतेचा परिणाम

डॉ. चावला यांचा लेख वाचला. माहिती गमतीदार आहे.

मेंदूमधील विद्युत्-चलबिचल प्राणवायू कमी झाल्यामुळे होते, असा त्यांचा निष्कर्ष आहे. प्राणवायू कमी झाला (आणि मृत्यू आला नाही) तरी त्याच प्रकारचा मेंदू-विद्युत्-आलेख दिसतो, असे संदर्भ त्यांनी दिले आहेत.

मेंदूमध्ये अशा प्रक्रिया होत असल्याकारणाने मरणांतिक अनुभव काही लोकांना येतात, हे त्यांचे म्हणणे विचार करण्यालायक आहे.

"बोगद्यातून दूरवर प्रकाश दिसणे" वगैरे संवेदना मरता-मरता वाचलेले कितीतरी लोक सांगतात. प्राणवायू हरपला की दृष्टी-संवेदनेवर हा परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे काय? हे भविष्यात शोधून बघण्यासारखे आहे.

मरणांतिक?

सिंकोपमध्ये नाही का टनेल व्हिजन होत?
टिनिटस होतो, हवेत तरंगल्यासारखेही वाटते.

बरोबर

डोळ्यासमोर तारे चमकणे, कानात कर्कश वाजण्याचा आवाज येणे व नंतर डोळ्यासमोर अंधारी येणे व दूरवरच्या बोगद्यात प्रकाश दिसणे असा अनुभव मला काही महिन्यांपूर्वी व्हेसोवेगल सिंकोपमध्ये आला होता. मात्र हवेत तरंगल्याऐवजी नंतर खाली पडल्याचा अनुभव आला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

होय - असेच काही

होय - असेच काही म्हणायचे आहे.

बेशुद्धावस्था म्हणजे तात्पुरती मरणांतिकताच म्हणावी :-)

ड्रायव्हिंग विथ मि. अल्बर्ट

Tiny metal electrodes are attached to Albert Einstein's head to pick up impulses from his brain and to magnify and record them for study in 1950 in Princeton, N.J. Dr. Alejandro Arellano kneels beside him. (AP/NAP)

आजच योगायोगाने (का चमत्कार ते माहीत नाही ;) ) एनपीआर वर आईन्स्टाईन च्या मेंदूवर बातमी ऐकली. ती या संकेतस्थळावर ऐकता अथवा वाचता देखील येईल.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कल्पना नाही

आपण असे नेहमी पाहतो की काही सर्व साधारण व समजुतदार लोक आयुष्यात घडलेल्या कोणत्या तरी आघातानंतर एकदम कोणत्या तरी बाबाच्या किंवा पंथाच्या कच्छपी लागलेले दिसतात. या एकदम झालेल्या बदलाचे, हीच फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया हे कारण असू शकेल का?

असू शकेल. पण फिजिऑलॉजिकल प्रतिक्रिया वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या प्रमाणात होत असाव्यात. बाबा/गुरूंच्या कच्छपी लागणे हे त्या दु:खद संवेदनांचा विसर पाडण्यासाठी होत असावे. बाबा वगैरे नाही, पण माझ्या ओळखीतील एक श्रीलंकेची जन्माने ख्रिश्चन बाई आयुष्यातील मनासारख्या न झालेल्या आणि दु:खद घटनांनंतर एकदम पालटून गेली, अचानक घरी गणपतीचे पूजापाठ करू लागली हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तिचा सकाळचा वेळ त्यामुळे चांगला जात असे. दु:खद घटनेनंतर एखाद्या कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीत मन रमवून घेणे, हे प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमत असेलच असे नाही.
कधीकधी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाच्या स्पर्शानेही बरे वाटते, मन मोकळे होते, कधीकधी ते होत नाही. अशा वेळी बाबा/पंथातील लोक उपयोगी पडत असावेत. मानसोपचार तज्ञांची मदत घेणे हे जसे आधुनिक समाजात गैर धरले जात नाही. पण पंथ आदींमध्ये मन गुंतवणे हे जुनाट किंवा चुकीचे मानले जाते. मला असे वाटत नाही. ज्यांना त्या गोष्टीचा मानसिक संतुलन राखण्यासाठी फायदा होतो आहे, त्यांनी तो घ्यावा. बाबालोकांना केला नसल्यास हा व्यवसाय म्हणून रजिस्टर करायला लावावे असे मला वाटते - कारण तो व्यवसायच आहे. आणि कुठच्याही व्यवसायाप्रमाणेच याही व्यवसायात काही बरे, काही चांगले आणि काही हीन लोक असावेत असे वाटते (प्रत्यक्ष अनुभव नाही).

शोधाचे प्रायोजन काय?

वरील लेखावरुन वा खालील बातमीवरुन असे कुठेच कळत नाही की या शोधामागील विवेकपूर्ण प्रायोजन काय?

http://timesofindia.indiatimes.com/home/science/Afterlife-episode-or-jus...

का इथे चर्चा करण्यासाठी म्हणून लखमीर हा उपद्व्याप करीत आहे? कोणाचीही अस्मिता दुखावण्याचे काही माझे प्रायोजन नाही, केवळ मनोरंजन म्हणुन चर्चा चालू असेल तर मला माफ करावे ही विनंती.

आपला,
मीआजुनकोण!

प्रयोजन

डॉ. चावला यांच्या इस्पितळात अशा परिस्थितीमध्ये मेंदूचा विद्युत्-आलेख नोंदण्याची पद्धत आहे.

हे मरणोन्मुख रुग्ण फक्त यंत्रसाहाय्याने जिवंत होते, आणि मूळ रोगाचे सर्व उपचार संपुष्टात आल्यामुळे त्यांच्या इस्पितळाच्या कार्यपद्धतीप्रमाणे यंत्रसाहाय्य बंद करण्यात येते (असे ते लिहितात). अशा परिस्थितीत मेंदूचा विद्युत्-आलेख (ई.ईजी.) नोंदवतात, आणि जेव्हा मेंदू निष्क्रिय होतो, तेव्हा रुग्णाचा मृत्यू घोषित करतात (असे ते लिहितात).

अशा रुग्णांचे विद्युत्-आलेख त्यांनी वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध केले आहेत. (निरीक्षणांच्या ज्ञानाने अन्य डॉक्टरांना काही फायदा होईल, असे त्यांचे मत आहे, हे अध्याहृत आहे.)

प्रयोजन

डॉ. चावला यांच्या शोधाचे प्रायोजन काय आहे हे मला माहिती नाही. परंतु माझ्या लेखाचे प्रयोजन डॉ. चावला यांच्या संशोधनाबद्दल माहिती करून देणे हे नाही.

मी अशी कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की काही मानवांना साक्षात्कार, समोर देव प्रगट होणे किंवा विचित्र, अमानवी व अत्तींद्रिय संवेदना होतात. या प्रकारच्या संवेदनांना, डॉ. चावला यांनी ज्या प्रकारची मेंदूची असामान्य विद्युत चल बिचल त्यांच्या पेशंट्सच्या मृत्युसमयाच्या आधी निरिक्षित केलेली आहे तशाच प्रकारची विद्युत चल बिचल कारणीभूत आहे का? किंवा काही लोक त्यांच्यावर अकस्मात झालेल्या मानसिक किंवा शारिरिक आघातानंतर एकदम बदलतात. या बदलालाही अशी मेंदूची असामान्य चल बिचल कारणीभूत आहे का?
श्री आजुनकोणमी यांना आता तरी या लेखाचे प्रयोजन समजले असेल अशी मी आशा करतो.

चन्द्रशेखर

 
^ वर