तर्कक्रीडा:७: (|)रामनाम (||) पेढे

(|) श्रीरामाचे नाम गाऊनी पाय आठवा सप्तपदी |

** ||श्रीराम||. हे रघुवर तू सीतारमणा दशरथकुलभूषणा रामा कौसल्यानंदना |

वरील पद्यरचनेत (ठळक अक्षरे) गणितातील कोणत्या महत्त्वाच्या संख्येविषयी काय माहिती दिली आहे?
.........यनावाला

******************************************************************
(||) जो आवडतो सर्वांना तोची...
यातील जो आणि तो म्हणजे पेढा हे सर्वांना माहीत आहे. खालील कोडे व्याकरणावर आधारित आहे. खरे तर ते तुमच्यासाठी नसून घरी मुलांना घालण्या साठी आहे.

पेढे होते बशीत.
नीना आली खुषीत.
पण तिने पेढे खाल्ले नाहीत.
बशीत पेढे राहिले नाहीत.
ही चारही विधाने सत्य आहेत. तर बशीत किती पेढे होते?

लेखनविषय: दुवे:

Comments

बरोबर?

१. २२/७ अर्थात Pi हे उत्तर असावे असे वाटते
२. बशीत "२नाहीत" पेढे होते ? (हे जरा जास्तच abstract वाटतेय, पण बरोबर आहे का?)

ओह्

: - )

आत्ता कळले !! खरंच माझं डोकं भलतीकडेच चाललं होतं

सॉलिड!!!!!!

सॉलिड डोकं चालतं राव तुम्हा सगळ्यांचं!!! एकदम भन्नाट
मस्तच :)

पल्लवी

:-)

यातील जो आणि तो म्हणजे पेढा हे सर्वांना माहीत आहे

:-)) तर्कक्रीडेतून बरीच नवनवीन माहिती मिळते. त्याबद्दल धन्यवाद.
उत्तराबद्दल सर्किट यांच्याशी सहमत.

माहिती आणि विचारांची देवाणघेवाण..

नाही, ही तर्कसंगत कोड्यांची मालिका आहे टाईमपास हे आम्हीही कबूल करतो. पण उपक्रमच्या ध्येयधोरणांनुसार
"माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीत" ही तर्कक्रीडा बसते का, ह्याबद्दल उपक्रमराव काही खुलासा करतील तर बरे होईल!

जर बशीतल्या पेढ्यांसारख्या तर्कसंगत कोड्यांनी 'माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणी'ला चालना मिळते (!), तर तशी चालना एखाद्या ललित लेखामुळे अथवा काव्यामुळे मिळत नाही का, याबद्दलही माननीय उपक्रमरावांनी काही खुलासा केल्यास बरे होईल!

आपला,
(लॉजिकल!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

असेच

म्हणतो!
सन्जोप राव

पेढे

श्री.तात्यासाहेब तसेच श्री,सन्जोप राव यांस. स. न.वि.वि.
आपल्या दोघांच्या विचारांशी मी सहमत आहे.'पेढे' कोड्याच्या प्रारंभी लिहिले आहे " हे कोडे तुमच्या साठी नाही.मुलांना सांगण्यासाठी आहे." पण हे लंगडे समर्थन झाले. असली कालापव्यय (टाईमपास) करणारी कोडी लिहू नये हेच खरे.
कळावे. राग नसावा. आपला:
(लज्जित)......... यनावाला.

सज्जन! ;)

असली कालापव्यय (टाईमपास) करणारी कोडी लिहू नये हेच खरे.
कळावे. राग नसावा. आपला:
(लज्जित)......... यनावाला.

छे बुवा यनावाला,

आपण फरच सज्जन दिसता! आपली खोडी काढून जरावेळ आपल्याशी भांडायचा मूड होता. पण आपण आमच्या म्हणण्याशी सहमती दर्शवून उलट आमचीच विकेट काढलीत की राव! ;)

छ्या!! काय मजा नाय आली बुवा...!! ;)

चालू द्या आपली तर्कक्रीडीची मालिका! आम्ही पुन्यांदा आपल्या वाटेस नाय जाणार!

काय आहे माहित्ये का यनावालासाहेब, आम्हाला दुर्जन माणसं जास्त बरी वाटतात. सज्जनांशी आपलं फार काळ जमत नाही, कारण त्यांच्याशी भांडताच येत नाही! ;)

आता सांगू पाहू, इथे कोणती तर्कक्रीडा apply कराल?!

;)

आपला,
(तार्किक!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

रामनाम

श्री.सर्किट यांस,
आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे याचा स्पष्ट बोध झाला नाही.
प्रस्तुत कोड्यातील दीड ओळीची रचना स्वरचित आहे. 'पाय' च्या सात दशांश स्थळांपर्यंतच्या अचूक किमती साठी ती हेतुपुरस्सर रचली आहे.इंग्रजीत अशी वाक्ये आहेतच. (May I have a large container of coffee? )
मराठीत यासाठी पद्यरचना करणे अवघड नाहीच.रामनामा साठी अनेक सामासिक शब्द घडविता येतील.(आवश्यक तेवढ्या अक्षरसंख्येचे)."सीतारमण.दशरथकुलभूषण,कौसल्यानंदन" हे त्यांतलेच काही.
वैदिक गणिताविषयी मला थोडी फार माहिती आहे."ते वैदिकही नाही आणि गणितही नाही." हे यासंदर्भातील कळीचे विधान खरे आहे अशी माझी धारणा आहे.
......................यनावाला.

असे का?

"ते वैदिकही नाही आणि गणितही नाही." हे यासंदर्भातील कळीचे विधान खरे आहे अशी माझी धारणा आहे.

मीही वैदिक गणिताबद्दल वाचले आहे, पण "ते वैदिकही नाही आणि गणितही नाही." असे का वाटते आपल्याला? यावर माझा काहीही अभ्यास नाही, फक्त एक शंका म्हणून विचारत आहे. कारण जे काही मी वाचले आहे ते निदान गणित तरी वाटत होते.

असे का?

आवडाबाई यांच्या "असे का?" या प्रश्नाचे संक्षिप्त उत्तरः

पुरीचे शंकराचार्य श्री भारती कृष्णतीर्थ (मूळ नाव वेंकटरमण थिनवेल्ली :१८८४-१९६०) हे अत्यंत बुद्धिमान होते. वयाच्या विसाव्या वर्षी ते रॉचेस्टर विद्यापीठाची M.Sc.(maths) परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.गणिताप्रमाणेच संस्कृत भाषा,तत्त्वज्ञान इ.अनेक विषयांत ते पारंगत होते.१९१९ साली ते शंकराचार्य झाले.त्यानीच वेदिक गणिताची सूत्रे लिहिली.वेद काळी हे गणित होते असे म्हटले असले तरीतसे संभवत नाही.कारण त्याकाळी गणित इतके प्रगत असल्याचा पुरावा नाही. तसेच ब्रह्मगुप्त,आर्यभट, भास्कराचार्य इ.भारतीय गणिती झाले त्यांच्या ग्रंथात या वेदिक सूत्रांचा उल्लेख नाही."अखिलं नवतः चरमं दशतः|" हे उघड उघड गणिती सूत्र आहे.भास्कराचार्यांनी यासंबंधी काहीतरी लिहिलेच असते. पण तसे आढळत नाही.
म्हणून "हे गणित वेदिक नाही" असे म्हटले.
२/ या गणितात गुणाकार, भागाकार, वर्गमूळ,घनमूळ इ.साठी सूत्रे आहेत.त्यामुळे आकडे मोड झटपट होते हे खरे.(आता कॅल्सी मुळे या झटपट पद्धती निरुपयोगीच आहेत)
पण गणित म्हणजे आकडेमोड नव्हे.गणित म्हणजे तर्कशास्त्र.(लॉजिक)भूमितीत आपनण प्रमेयाची सिद्धता लिहितो ती कशासाठी?तर त्यामागचे तर्कशास्त्र समजण्यासाठी.त्यामुळे तर्कसंगत विचार करण्याची क्षमता वाढते.वेदिक गणितात यांत्रिक पणे आकडेमोड करण्याच्या पद्धती दिल्या आहेत.कुठल्याही सूत्राची सिद्धता दिलेली नाही.तसेच सूत्रे संदिग्ध आहेत लावावा तो अर्थ.
म्हणून हे गणितही नाही" असे म्हटले आहे.
यावर पुषळ लिहिण्या सारखे आहे. पण थोडक्यात पुरे.
.................यनावाला,

सहमत

माझेही अगदी असेच मत झाले आहे.
ही सूत्रे नक्की वेदातलीच आहेत का? या प्रश्नाला स्पष्ट उत्तर न देता "असोत किंवा नसोत पण ती निश्चितपणे वेदात असण्याच्या योग्यतेची आहेत" असे काहीतरी पळवाटी उत्तर वाचल्याचे स्मरते.
नक्की कुठल्या वेदात? नक्की कोणत्या ऋचेत? अशा प्रश्नांना कोणतेही अचूक व स्पष्ट उत्तर अद्याप मला मिळालेले नाही.
सूत्रे कितीही चांगली/बरोबर असली (?) तरी व्यापक उपयोगाची (युनिव्हर्सली ऍप्लिकेबल) किंवा दुसर्‍या शब्दांत खूप ठिकाणी उपयोग होईल अशी वाटत नाहीत.
काही ठिकाणी असा दावा काही (हुषार) विद्यार्थ्यांनी केलेला दिसतो की वैदिक गणिताचा अभ्यास केल्याचा परीक्षेत खूप फायदा झाला. या दाव्याचा अर्थही मला समजलेला नाही. कोणी तपशीलवार खुलासा केल्यास उपकृत होईन.

- दिगम्भा

लवकर ...

लवकरात लवकर लिहा, वाट पहात आहोत

बरोबर !!

यनावाला, "वैदिक " आणि "गणित" बद्दल आपली भुमिका स्पष्ट झाली

गणिताबद्दल असा विचार कधी केला नव्हता, धन्यवाद !!

ते गणितच

वैदिक गणित ही रुढ गणिते सोडविण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. कुठक्याही प्रकारचे गणित असो, ते वैदिक गणिताच्या पद्धतीने सोडविणे सोपे जाते. फक्त गुणाकार, भागाकारच नाही तर डिफरंशिअल इक्वेशन्स वगैरेसुद्धा या पद्धतीने सोडविता येतात.
अनिरुद्ध दातार

डोक्यावरुन गेले हो !

डोक्यावरुन गेले हो !

वैदीक गणित अथवा तर्कशास्त्र ह्या विषयी अजून माहीती हवी आहे.

राज जैन

 
^ वर