विवाह व नाडीदोष

टिव्ही वरील एका कार्यक्रमात शरद उपाध्ये सांगत होते की - जन्म नक्षत्रा वरून ज्या नाड्या ठरतात् (आद्य, मध्य, अंत्य) या आपल्या शरिरातील ज्या नाड्या असतात (वात नाडी , पित्त नाडी , कफ नाडी ) त्या जन्म नक्षत्रा वरून ज्या नाड्या ठरतात् त्या नाड्यांशी जुळतात. म्हणजेच आद्य नाडी = वात नाडी, मध्य नाडी =पित्त नाडी, अंत्य नाडी =पित्त नाडी. या मुळे एक नाड दोष असेल तर संतती होत नाही किंवा जरी झालीच तर त्यात दोष राहतो. त्याला पुढे संतती विषयक अडचण निर्माण होते. यात कितपत तथ्य आहे. आणि वैद्यक शास्त्रात कींवा आयुर्वेदात या बाबत म्हणजे समान नाडी बाबत काय मत आहे.
____________________________________________________________________________________________

शरद उपाध्ये म्हणतात त्या प्रमाणे मी घरातील सर्वाच्या नाड्या बी. ए. एम. एस. शिकणार्या एका कडुन नाडया माहीत करुन घेतल्या आणी आश्चर्य त्या सर्व जन्म नक्षत्राच्या नाड्या प्रमाणे जुळल्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

मनोरंजन

शरद उपाध्ये यांचे असेही म्हणणे आहे की त्यांचा कार्यक्रम केवळ ज्योतिषशास्रामूळे निर्माण होणाऱ्या गमतीजमतीवर आधारीत मनोरंजक कार्यक्रम आहे. त्याला शास्रीय आधार नाही.

जाड ठशाचा ट्याग बंद

जाड ठसा बंद करण्यासाठी प्रतिसाद

पास

जन्म नक्षत्र आणि त्यांच्या नाड्या त्यातले दोष वगैरे यावर आमचा काही विश्वास नाही.
जे विधिलिखित असते ते बदलता येत नाही इतकचे आम्हाला समजते. बाकी वैद्यकशास्त्र काय म्हणते वगैरे काही माहिती नाही. शरद उपाध्यांचा कार्यक्रम केवळ मनोरंजन करते असे वाटते. आणि तो कार्यक्रम पाहून मी आनंद लूटतो इतकेच त्यांच्या 'राशीचक्रांचा' आणि आमचा संबंध.

-दिलीप बिरुटे

निष्क्रीयवादी

जे विधिलिखित असते ते बदलता येत नाही. किंवा
वक्त से पहेले और भाग्य से जादा ना किसिको कुछ मिला है ना मिलेगा.

ह्या सारखे निष्क्रीयवादी विचार हिंदू शिकवणीमधे शिकवले जातात असे एक निरिक्षण आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नियतवाद

लाप्लासचा डिटर्मिनिझम मला भावतो कारण त्यात 'पलायनपि...' प्रकारचा तोडगा आहे.
कॅल्विनचा (लॉर्ड केल्व्हिन नव्हे) फेटॅलिझम मात्र निष्क्रियवादी वाटतो.

नाडी =भंपक

आजकाल 'नाडी' हा शब्दच ऐकला की भंपकतेचा वास येतो. मग त्या शरिरातल्या नाड्या असोत, नक्षत्रातल्या नाड्या असोत वा विंग कमांडरांच्या नाड्या असोत. सगळे भंपक!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कफनाडी की कफप्रकृती?

शरीरात वात नाडी कफ नाडी पित्त नाडी असते हे प्रथमच ऐकले. शरीराची कफप्रकृती वगैरे असल्याचे ऐकले होते.

येथे कुणी बी ए एम् एस् असतील तर त्यांच्याकडून खुलासा वाचायला आवडेल. कारण क्लेम फारच रोचक आहे. विशेषतः पतीपत्नीची दोघांची कफनाडी असेल तर संततीत दोष उद्भवतो वगैरे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

रोचक

ह्यात रोचक काय आहे? मूळात वात पीत्त कफ ह्या आयुर्वेदातील त्रिदोष संकल्पनलेला कसलाही शास्त्रीय आधार नाही. त्रिदोष म्हणजे ऋषी मुनींनी लिहिलेली प्राचीन वर्णने आहेत. नेहमीप्रमाणे त्यात प्रचंड सब्जेक्टीविटी आणि इतर पाल्हाळ ठासून भरलेले आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

क्लेम

रोचक एवढ्यासाठीच की कधी नव्हे तो ठाम आणि तपासून पाहण्यासारखा क्लेम केला आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

माहिती

माहिती साठी वाचावे
३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?
http://mr.upakram.org/node/814
प्रकाश घाटपांडे

रोचक

दावा रोचक आहे ह्या थत्तेच्या मताशी सहमत. कोणी याचा अभ्यास केला असल्यास संदर्भ द्यावा म्हणजे अधिक ऍनलिसिस करता येइल.
बाकी रक्तगटाशी संबंधीत म्हणाल तर वरील प्रकाशरावांचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण त्या दाव्यातील दांभिकता स्पष्ट करते.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

इडा पिंगला आणि सुषुम्ना

इडा पिंगला आणि सुषुम्ना या नावाच्या तीन नाड्यांबद्दल योगात वाचले होते. नावे जरी कठीण असली तरी मला समजलेला अर्थ फार सोपा होता.
आपल्या श्वासोच्छ्वासात कुठली तरी एक नाकपुडी दुसरीपेक्षा जास्त हवा घेते व सोडते. जेव्हा डाव्या (?) नाकपुडीने हवा घेतली सोडली जाते त्यास इडा म्हणतात. पिंगला उजव्याशी संबंधीत आहे. (हे कदाचित उलटेपालटे असू शकते.) सुषुम्नात दोन्ही नाकपुड्यांनी श्वास चालतो. माझ्या आठवणीत सुषुम्ना ही धोकादायक समजली जायची. तसे ती स्थिती फार टिकत नाही.

काही वेळेला इडा तर काही वेळेला पिंगला ही चांगली समजली जाते. (यात खूप मजेदार समजुती आहेत.) मग ही बदलायची कशी? त्यासाठीचा उपायपण सोपा आहे. डावा खांदा वर केला की उजवी नाकपुडी चालु लागते. (थोढ्या वेळाने.) आणि उलटेपालटे. आपण झोपताना डाव्या कुशीवर झोपलो तर थोड्याच वेळात उजवी नाकपुडी कार्यरत होते. (आणि उलटेपालटे.) योगी लोक मग हे साध्य करण्यासाठी कुबडी चा (बसून वापरायची) वापर करतात. आपण खुर्चीची पाठ यासारखी आयुधे वापरून ते करू शकतो.

याचा मुख्य उपयोग म्हणजे नाक जेंव्हा चोंदलेले असते तेंव्हा होतो. हे चोंदणे दूर (बदल) करण्यासाठी नाडी बदल वापर करता येतो.

या नाडीचा आणि नक्षत्रातील नाडीचा काहीही संबंध नसावा. नाडी ग्रंथ (पट्टी) वाचणे याचाही संबंध नसावा. योगात एक नाडीचक्र असते त्याच्याशी याचा संबंध असेल. नाडी बघणे म्हणजे हातावरील रक्तवाहिन्यांची तपासणी याच्याशी देखील या नाडीचा संबंध नाही. कफ, वात व पित्त ह्या प्रकृत्या (पण) आहेत. त्या नाड्या आहेत हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. अर्थात इतर धाग्यास्वरुप नाड्यांचा याच्याशी काय संबंध हा संशोधनाचा विषय ठरावा.

प्रमोद

युरेका!

हा प्रकार् मी अनुभवला आहे. मला सर्दी झाल्यावर् (नाक् चोंदले असल्यास्) मी एका कुशीवरुन् दुसर्‍या कुशीवर् करत् असतो, यावेळे आलटुन् पालटुन् माझी एक् नाकपुडी बंद् असते. असे केल्यास् ट्रान्सीशनवेळी दोन्ही नाकपूड्या उघड्या राहतील् या आशेत् मी हे करत् असतो.

-Nile

जरा हटके

खरे तर् हा दुवा थोडा वेगळा आहे. पण् चर्चेला पुढे सुरवात् करण्यापूर्वी जरूर वाचावा असे वाटते. दुवा खाली देत आहे.
विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास

 
^ वर