षडाष्टकाबद्दल असलेली प॑चागातील भिन्नता

प्रति,
श्री. प्रकाश घाटपा॑डे

एका मु़ख्य मुद्याला वाट करून द्यावी म्हणून हा प्रस्ताव मा॑डतो आहे.
आजकाल लग्न म्हटल की मु़ख्य मुद्दा येतो तो म्हणजे पत्रिकेचा.
पत्रिकेत बर्याचदा षडाष्टकाबद्दल जी भीती घालून दिली जाते त्यामूळे खूपच गो॑धळ उडालेला दिसतो. आणि त्याला म्रूत्यू शब्द लावला की मग तर विचारता सोय नाही.
तसेच राज॑देकर व दाते प॑चागात लग्न ठरवताना तो योग अशुभ ठरवला आहे. पर॑तू दाते प॑चागात 'अभिनव विवाहमेलन कोष्टका'त त्यास काही ठिकाणी अनुकूलता दर्शविली आहे.
उदा. कर्क राशीतील अश्लेशा नक्षत्राचे १ले व ४थे चरण तसेच शततारका नक्षत्राचे १ले व ४थे चरण हे फक्त दाते प॑चागात 'अभिनव विवाहमेलन कोष्टकात लग्नास अनूकूल दाखवलेले आहेत.
मात्र ईतर ठिकाणी ते अशूभ दाखवलेले आहेत.
प्रथमतः म्रूत्यू षडाष्टकाबद्दल आपण आपल्या "यन्दा कर्तव्य आहे"ह्या पुस्तकात दिलेली माहीती अजून थोडी खुलासेवार देण्याची क्रूपा करावी.
कोण्याही मूला-मूलीचे पालक 'म्रूत्यू षडाष्टक' म्हटले की घाबरतील ह्यात काही वाद नाही. पर॑तू आपण ज्याप्रकारे म॑गळाबाबत विस्त्रूत लेखन आपल्या पुस्तकात केले आहे
त्याचप्रकारे 'म्रूत्यू षडाष्टका'बाबत देखिल ह्याठिकाणी द्यावे ही नम्र विन॑ती.

आपला,
मनिष

लेखनविषय: दुवे:

Comments

संदर्भ

http://mr.upakram.org/node/814 येथे प्रश्न क्र ३१) मृत्यूषडाष्टक काय आहे? पाहावे
गुणमेलन कोष्टकात पंचागकर्त्यांचे अन्वयार्थ वेगळे असतात. कालानुरूप ते बदलले आहेत.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर