बुद्धिबळ

विश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदाबरोबरच माझे बुद्धिबळाबाबतचे कुतुहल वाढले आहे. लास्कर् डिफेन्स, क्विन्स् गॅम्बिट असले शब्द बर्‍याच वेळा ऐकले आहेत. पण बुद्धिबळाचा हा पट इथे उपक्रमावर कोणी उलगडवून दाखवेल काय?

युरोपात आलेल्या ज्वालामुखीच्या राखेच्या ढगामुळे सोफियापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. स्पर्धेच्या आयोजकांनी नियमावर बोट ठेवून स्पर्धा पुढे ढकलण्याची आनंदची मागणी फेटाळली. टोपालोवने आनंदला बरोबरी मान्य करणार नाही असा इशारा दिला होता. ५.५-५.५ अशा गुणासह शेवटचा डाव काळ्या मोहर्‍यानी खेळताना आनंदने टोपालोवला चारलेली धूळ हा विलक्षण विजय आहे.

वेगवेगळ्या चाली, निरनिराळे डाव किंवा बुद्धिबळाशी निगडीत रंजक गोष्टी कोणाला माहित असल्या तर या चर्चेत भाग घेऊन आमचे ज्ञान वाढवावे ही विनंती..

लेखनविषय: दुवे:

Comments

हे बघा

या दुव्यावर् विश्वनाथन आनंद आनि टोपालोवच्या खेळाचे सुन्द्रर् विश्लेशन् केले आहे.

http://www.misalpav.com/node/12161

चेस ब्लॉग

अजून एक सुंदर ब्लॉग सापडला आहे...हा पहा.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

चतुरंग

वेगवेगळ्या चाली, निरनिराळे डाव किंवा बुद्धिबळाशी निगडीत रंजक गोष्टी कोणाला माहित असल्या तर या चर्चेत भाग घेऊन आमचे ज्ञान वाढवावे ही विनंती..

चतुरंग या बाबतीत अधिक माहिती देउ शकतील. त्यांनी याबाबत लेखमालिका लिहावी
प्रकाश घाटपांडे

यात तथ्य असेल का?

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

बुद्धिबळ खेळल्यास आपण येण्यारया प्रतेकाकडे संशयीत नजरेने पाहतो असे शाळेत असतांना मला शिक्षक म्हणाले होते.यात तथ्य असेल का?

शैलु

 
^ वर