तर्कक्रीडा :६:गणित अभ्यासमंडळ

गणित अभ्यासमंडळ या संस्थेचा मी सदस्य आहे. वर्षातून तीन वेळां संस्थेची सभा भरते.त्या बैठकीत मुख्यतः दोन विषयांवर चर्चा होते. १. पुढच्या सभेची तरीख ठरविणे. २. पुढच्यावेळी भोजन कुठे घ्यायचे त्या डायनिंग हॉलचे नाव ठरविणे.हे दोन निर्णय घेईपर्यंत जेवणाची वेळ होतेच. तो कायर्यक्रम आटोपेपर्यंत सभेची वेळ संपते.सभासद घरी जातात." या संस्थेचे नाव बदलावे "असा ठराव एका तरुण सभासदाने मांडला होता. त्यावर चर्चा करायला अद्यापि वेळ झालेला नाही.असो.

पुढच्या सभेची तारीख कोणती ते मी विसरलो. जून महिना निश्चित.पण नेमका दिनांक कोणता ते स्मरत नव्हते.काही सभासदांकडे फोनवरून विचारणा केली तेव्हा त्या तारखेच्या संदर्भात पुढील उत्तरे मिळाली:
प : तारीख विषम(ऑड ) आहे.
फः तेरापेक्षा मोठी आहे.
बः पूर्णवर्ग संख्या नाही.
भः सतरापेक्षा लहान आहे
मः तीनाने विभाज्य आहे.
शेवटी "जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा ...." या समर्थ उक्तीचे स्मरण करून मी माझ्या अनुदिनीचे पानन पान चाळले. त्या तारखेची नेमकी नोंद सापडली. तेव्हा लक्षात आले की वरील पाच उत्तरांपैकी( प ते म) एकच उत्तर सत्य आहे. बाकी चार असत्य.
तर गणित अभ्यास मंडळाची आगामी बैठक कोणत्या दिनांकाला भरणार आहे?

लेखनविषय: दुवे:

Comments

बरेच पर्याय (ब१), उत्तर (ब२)

२०, २२, २६, २८ असे बरेच पर्याय सुचले, फ हे एकमेव विधान बरोबर आहे असे मानून. काही तरी घोळच दिसतो!
---

सुधारित ब विधान घेऊन- (बैठकीची तारीख पूर्णवर्ग नाही.)

१३ पेक्षा मोठी व १७ पेक्षा लहान ही दोन्ही विधाने एकत्र सत्य नाहीत. दोन्ही एकत्रित असत्य असू शकत नाहीत. म्हणजे यापैकी एक बरोबर असायला हवे. १३ व १७ पेक्षा मोठी सम पूर्ण वर्ग संख्या नाही. १७ व १३ पेक्षा लहान आहे, ४. म्हणून बैठक चार जूनला आहे. :-)

माझेही हेच

उत्तर आहे!

चार हा पूर्ण वर्ग आहे ना!

मला वाटते उत्तर १५ तारीख असावे.

उलटे

आपल्याला एक सत्य विधान आणि चार असत्य विधाने दिली आहेत. विधान ब 'पूर्णवर्ग संख्या नाही' हे असत्य म्हणून पूर्णवर्ग संख्या उत्तर हवे.

४ जून

मृदुलाच्या म्हणण्याप्रमाणे १३ पेक्षा मोठी आणि १७ पेक्षा लहान ही दोन्ही विधाने एकत्रितरित्या असत्य असू शकत नाहीत.

१. संख्या १३ पेक्षा मोठी आहे हे सत्य मानू.
त्यामुळे शक्य तारखा = १४, १५, ..., ३०
प असत्य, म्हणजे तारीख सम हवी. त्यामुळे शक्य तारखा = १४, १६, १८, ..., ३०
ब असत्य, म्हणजे संख्या पूर्णवर्ग हवी. त्यामुळे शक्य तारखा = १६
भ असत्य, म्हणजे तारीख १७ पेक्षा मोठी हवी. मात्र १६ ही १७ पेक्षा मोठी नाही. त्यामुळे तारीख १३ पेक्षा मोठी हे सत्य होऊ शकत नाही.

२. ह्याचा अर्थ तारीख १७ पेक्षा लहान हे सत्य.
त्यामुळे शक्य तारखा = १, २, ३, ..., १६
प असत्य, म्हणजे तारीख सम हवी. त्यामुळे शक्य तारखा = २, ४, ६, ..., १६
फ असत्य, म्हणजे तारीख १३ पेक्षा लहान हवी. त्यामुळे शक्य तारखा = २,४,६, ..., १२
ब असत्य, म्हणजे संख्या पूर्णवर्ग हवी. त्यामुळे शक्य तारखा = ४
म असत्य, म्हणजे तारीख तीनाने विभाज्य असता कामा नये. ४ ही ३ ने विभाज्य नाही.

म्हणून भ हे सत्य विधान व आगामी बैठक ४ जून रोजी.

पाठभेद

याचाच
"(अर्जुना, मी असे) कित्येक मे (महिने) घालवलेत (पावसाळे पाहिलेत च्या धर्तीवर) (नि) तुझा जन्म (तर परवा-परवाचा, म्हणजे) ४ जूनचा आहे"
असाही पाठभेद ऐकून आहे.
उत्तर- ४ जून, पद्धत वरदा यांनी वापरलेली.

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

मूळातच घोळ दिसतो.

उदाहरणामध्ये मूळातच जरा घोळ दिसतो. तरीपण, वरदा यांची विचार करण्याची पद्धत खुपच तर्कसंगत वाटते.वरदा यांच्या ४ या उत्तराशी सहमत.

तर्क.६

श्री.केशव यांस,

आपण म्हणता " उदाहरणामध्ये मूळातच जरा घोळ दिसतो " हा घोळ कोणता ते कृपया निदर्शनाला आणून द्यावे,ही विनंती.
.....................यनावाला.

तर्क.:६ गणित अभ्यास मंडळ

मृदुला,ॐ,वरदा,सर्किट आणि तो या सर्वांचे उत्तर चार जून हे अर्थातच बरोबर उत्तर आहे.{"बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ," तसेच "सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो " या विषयी विनोदी लेखक वि.आ.बुवा यांनी प्रथम लिहिल्याचे स्मरते. } सर्किट आणि तो यांनी याचा समर्पक उपयोग केला आहे.

**** वरदा यांनी जो लांब लचक युक्तिवाद केला आहे त्याची आवश्यकता नाही.

फः तेरापेक्षा मोठी आहे.
भः सतरापेक्षा लहान आहे.
या दोन विधानांत सर्व तारखा येतात. त्यामुळे यांतील एक विधान सत्य असलेच पाहिजे.
म्हणून अन्य सर्व विधाने असत्य.
म्ह. तारीख विषम नाही. पूर्णवर्ग आहे...अशा तारखा : ४ आणि १६.
पण १६ धरल्यास 'फ'आणि 'भ' ही दोन विधाने सत्य ठरतात.
पण एकच विधान सत्य असे दिले आहे.
म्ह. बैठकीची तारीख ४ जूनच.
मृदुला यानी असा युक्तिवाद केला आहे. पण नीटपणे मंडला नाही इतकेच.
सर्वांना धन्यवाद!
....................यंनावाला

 
^ वर