छायाचित्र टीका

" alt="फुल ">

वरील चित्र फक्त खिडकीच्या प्रकाशात काढलेले आहे. मागे काळा पडदा म्हणून माझ्या संगणकाच्या बंद दृश्य पटलाचा वापर केला आहे.

तुमच्या टीका आणि प्रतीक्रीयांचे स्वागत-

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

तांत्रिक दृष्ट्या छान वाटतो आहे फोटो. क्लोजप एकदम मस्त वाटतो आहे. पण फुल फारसे सुंदर वाटत नाही दिसत.






फोकस

फोकस थोडा गंडलेला आहे असं वाटतं...मधल्या अलिकडच्या पाकळ्या आऊट ऑफ फोकस आहेत.

फोटो जरा खालून वरच्या कोनातून काढला असता तर् फुलाच्या मध्यभागी असलेले तंतू(पुंकेसर) काळ्या बॅकग्राउंडवर गेले असते आणि उठून दिसले असते.

काळा बॅकग्राउंड आणि पिवळे फूल: छान रंगसंगती आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

धन्यवाद

अभिजीत आणि चाणक्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
हो फोकस थोडा गंडलेला आहे कारण मी F 4.0 ठेवले होते. आणि फक्त चाणक्य म्हणाल्याप्रमाणे फुल एवढे चांगले नव्हते त्यामुळे तुम्ही सुचविला तसा कोन साधला नाही.

तितकासा आवडला नाहि

मुळात फूल चांगले निवडायला हवे होते याच्याशी सहमत.. शिवाय जरा जास्तच क्लोज-अप् आहे त्यामुळे जरा गर्दी / अनैर्गिक चित्र वाटते
फोटो तितकासा आवडला नाहि

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अंहं

सुंदर म्हणावे असे काही नाही राव या फोटोत.
छायाचित्र संपादन करुन त्यात 'शार्पनेस' वाढवून फोटो आकर्षक करता येईल का ?

-दिलीप बिरुटे

 
^ वर