माधव शिरवळकर लिखित ‘संगणकावरील मराठी, आणि युनिकोड’ पुस्तक प्रकाशित…

संगणक प्रकाशनने नुकतेच १ मे रोजी ‘संगणकावरील मराठी आणि युनिकोड’ हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक माधव शिरवळकर यांनी सोप्या मराठी भाषेमध्ये लिहिलेले आहे. ह्यामध्ये एकूणच युनिकोड फाँट म्हणजे काय? त्याचा इतिहास, तो संगणकावर कसा बघाल, संगणकावर इन्स्टॉल कसा कराल?, मराठीमधून इमेल कशी पाठवाल, ब्लॉगवर मराठी लेखन कसे कराल, वेबसाईटवर मराठी कसे टाइप कराल अथवा मराठी सर्च कसा देऊ शकाल अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे त्या पुस्तकात लेखकाने सचित्र उदाहरणासह स्पष्ट दाखविलेली आहेत. पुस्तकाची एकूण २०८ पाने असून त्याची किंमत फक्त रू. २२५/- (पोस्टेजसहित) ठेवलेली आहे. त्याबद्दल अधिक माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
संगणक प्रकाशन
यु-१२८, पुजासॉफ्ट हाऊस,
दुर्गा माता मंदिराजवळ,
सेक्टर-४, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८
फोन : ०२२-२७७९०१२३/ ९९८७६४२७९३/ ९८ /९९

लेखनविषय: दुवे:

Comments

युनिकोड फ़ॉन्ट ?

युनिकोड हे एखाद्या फ़ॉन्टचे नाव आहे? पुस्तकातली माहिती फारच प्राथमिक स्वरूपाची आहे असे स्पष्ट दिसते आहे. संगणकावर मराठी टंकलेखन करायला किंवा मराठीतून ईमेल-सर्च आदी करण्यास एवढे महाग पुस्तक विकत घ्यायची उपक्रमींना कधी गरज़ पडेल असे वाटत नाही.
संकेतस्थळाचा पत्ता फारच लांबलचक आहे.--वाचक्‍नवी

 
^ वर