उबंटूचे ऍप्लिकेशन्स

मी घरी उबंटू १०.२ वापरतो. माझ्या एका स्नेह्याने ते पाहिले व माझ्या कडून बूटेबल सीडी घेउन् गेला. घरी जाऊन त्याने एक्स् पी च्या बाजूलाच उबंटू इंस्टॉल केले आणि मला फोन केला, की काहीच चालत नाही- ना गाणी ना व्हिडिओ (तो संगणकाचा ८०% वापर यासाठीच करतो). त्याला सांगितले की कोणत्याच लिनक्स वर रेडीमेड काही चालत नाही, प्रत्येक गोष्ट डाऊनलोड् करून वापरावी लागते. तर त्याच्याकडे नेट कनेक्टिव्हिटी नाही. त्याला म्हणालो की तुझा डबा (फक्त) माझ्याकडे आण, आपण सर्व काही इंस्टॉल करू. तो म्हणाला, त्यापेक्षा तुझ्याकडे या गोष्टी डाऊनलोड नाही का करता येणार? मग त्याला व्ही एल सी आणि बीप मिडीया प्लेयर डाऊनलोड करून दिले. त्यानंतर त्याच्याकडे गाणी आणि व्हिडीओ चालू लागले, पण लवकरच तो त्याला कंटाळला व एक्स पी चालू करून उबंटू ची ड्राइव्ह फॉर्मॅट केली. थोडावेळाने त्याने संगणक बंद केला आणि दुस-या दिवशी सकाळी सकाळी परत फोन....'बूट एरर'....कारण ग्रब लोडर उबंटूचा होता आणि 'ती' ड्राइव्ह फॉर्मॅट करताना तो लोडर पण उडाला.
त्याला पुन्हा एक्स पी इंस्टॉल करायचा सल्ला दिला तर त्याने 'प्रेमाचे ४ शब्द' बोलून फोन बंद केला.

तात्पर्यः १. फक्त गाणी-व्हीडिओ साठी लिनक्स वापरण्याचा सल्ल कोणालाही देऊ नये.
२. नेट नसताना लिनक्स च्या भानगडीत पडू नये.

लेखनविषय: दुवे:

Comments

१०० टक्के सहमत

नेट नसताना लिनक्स च्या भानगडीत पडू नये

वरील मताशी पूर्णतः सहमत आहे.
तरी सुद्धा ज्यांच्या कडे नेट आहे त्यांनी उबंटु वापरायला हवे.
एक्सपी पेक्षा किती तरी सुखद आणि सोपे.

उबंटुच्या डिफॉल्ट ड्रायव्हर्स लिस्ट मध्ये नव्याने आलेल्या बऱ्याच प्रिंटर्स व तत्सम उपकरणांचे ड्रायव्हर्स नाहीत आणि हे नेटवरुन इन्स्टॉल करणे हे नवशिक्या वापरकर्त्यांना शक्य होत नाही ही सुद्धा एक मोठी अडचण आहे.

सहमत

सहमत आहे.

मला उबंटू आवडते, तरीही आजकाल जास्त कष्ट घ्यावे लागत आहेत. मध्ये एकदा एका अपडेटनंतर एमप्लेअर चालणे पूर्ण बंद पडले. व्हीएलसी चालते पण मधूनच आवाज नाही. यांना उत्तरे शोधल्यास सापडतीलही पण यात किती वेळ घालवायचा असा प्रश्न पडतो. मधूनच जीनोमचे सर्व आयकॉन गायब होतात किंवा जागा बदलतात. शिवाय उबंटूच्या विविध आवृत्त्या एकावर एक इन्स्टॉल केल्याने ते आता जवळजवळ विंडोजइतक्या वेगाने चालते आहे.

एकूणात विंडोज आणि लिनक्स म्हणजे इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती झाली आहे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

लुसिड लिंक्स

वर उल्लेख केलेल्या अडचणींचे एक कारण बहुधा एका व्हर्जननंतर दुसरे असे अपग्रेड करत गेलो हे असावे. हार्डी-जाँटी-इंत्रेपिड-कार्मिक इतके अपग्रेड केल्यमुळे बर्‍याच डिपेंडंसी गंडल्या होत्या. लुसिडचा लाँग टर्म रिलिझ आल्यावर शिडी मागवली आणि स्वच्छ इन्स्टॉल केले. आता सर्व सुखात चालले आहे.

१५ सेकंद बूटींगला आणि पाच सेकंद शटडाउनला!

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

लुसिडमध्ये बऱ्याच चांगल्या सुधारणा आहेत

इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात लुसिडमध्ये बऱ्याच चांगल्या सुधारणा आहेत. विशेषतः प्रिंटर, नेटवर्क व डिस्प्ले ड्रायवर संदर्भात. लुसिडसोबत फ्लॅश व मल्टिमिडीया प्लगिन आपोआप येत नाहीत (व नंतर हाताने टाकावे लागतात... काहीतरी लायसन्सिंगचा घोटाळा असावा) याचा कंटाळा आल्याने मी लुसिडवर आधारित मिंट-इसाडोरा वापरत आहे. त्यात या सुधारणा अनुभवास येत आहेत.

उदा. टाटा फोटॉन प्लस सारख्या वायरलेस इंटरनेट सुविधा लुसिडमध्ये अगदी प्लग अँड प्ले स्वरुपात उपलब्ध झाल्या आहेत. कोणत्याही ड्रायवरची शोधाशोध करावी लागत नाही.
किंवा ext4 मध्ये हार्ड डिस्क रिलेटेड ऑपरेशन्स लायटनिंग फास्ट आहेत.

बाकी फायरफॉक्स व इतर ऍप्लिकेशन संदर्भातही नव्या आवृत्त्या उपलब्ध झाल्या आहेत. गिंपसारखे सामान्य वापरकर्त्यांसाठी निरुपयोगी असलेले बोजड ऍप्लिकेशनही आपोआप येत नाही हा आणखी एक प्लस पॉईंट.

स्टँड बाय व हायबरनेट या सुविधांवरही विसंबून राहता येते.

(इंट्रेपिड आणि कार्मिक मुळे उबुंटुचे रेप्युटेशन फारच गंडले. लिनक्सचे तांत्रिक ज्ञान नसलेल्या अनेक वापकर्त्यांना प्रचंड मनस्ताप झाला.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

सहमत आहे.
लुसिड लिंक्स बरेच सुटसुटीत केले आहे. गिंप गेले हे बरे झाले.
लुसिडच्या सीडीमध्ये आता फाफॉ आणि ओपनऑफिस आधीच टाकलेले आहेत त्यामुळे नंतर टाकावे लागत नाहीत.

नाही म्हणायला इंटरनेटचा थोडा त्रास झाला. माझ्याकडे टाटा इंडिकॉमचा युएसबी मोडेम आहे. त्याला लागणारे wvdial प्याकेज सीडीत नव्हते. ते उतरवून घेतल्यावर त्याला लागणार्‍या बाकीच्या डिपेंडसी लायब्ररी नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी व्हिस्टावर जाऊन हे उतरवून घेणे आणि नंतर उबंटूत इन्स्टॉल करणे असे चार-पाच वेळा करावे लागले.

याव्यतिरिक्त काहीच अडचण आली नाही. याखेरीज मराठी सायटी काहीही प्रयत्न न करता अत्यंत सुबक फाँटमध्ये दिसत आहेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

१०.४

म्हणूनच /boot, /home आणि / वेगळ्या वेगळ्या पार्टिशन वर ठेवणे चांगले.
पुन्हा एक्स पी इन्स्टॉल करण्याची गरज नाही. एक्स पी च्या सेटअप सीडीमध्ये रेस्क्यू पर्याय असतो. मास्टर बूट रेकॉर्ड नीट केले की झाले.

मेड्युबुंटू मध्ये गाणी, व्हिडिओ, इ. आऊट ऑफ द बॉक्स चालतात म्हणे.

अवांतर: नेट नसताना मी संगणकालाच कंटाळेन. फक्त सिंगल प्लेयर खेळ, गाणी आणि सिनेमाच? नेट नसेल तर कोडिंगसाठीही खूप त्रास होईल.

प्रेमाचे ४ शब्द

>> १. फक्त गाणी-व्हीडिओ साठी लिनक्स वापरण्याचा सल्ल कोणालाही देऊ नये.
>> २. नेट नसताना लिनक्स च्या भानगडीत पडू नये.

यातील पहिल्या तात्पर्याशी सहमत आहे. जे कॉम्प्युटरचा उपयोग फक्त गाणी - व्हिडीओ, चैटींग किंवा इ-मेल् चेक करण्यापुरताच करतात त्यांना लिनक्सचा फारसा फायदा होत नाही असा माझाही अनुभव आहे. ही गोष्ट इतर ऍप्लिकेशन्सना देखील लागू होते. म्हणजे मला फारफॉक्सशिवाय काम करताच येत नाही पण मी माझ्या वडिलांच्या वयाच्या कोणत्याही व्यक्तिला आय. ई. वापरायचा सल्ला देतो. एखाद्या औषधाने मला गुण आला म्हणजे ते औषध सरसकट वाटत फिरणे मला पटत नाही.
अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मी नवीन माणसाला कधीही लिनक्स इन्स्टॉल करायचा सल्ला देत नाही. आधी लाईव्ह सी.डी. वापरून बघायला सांगतो. युबंटू, नोपिक्स, फेडोरा व पपी लिनक्स हे चार डिस्ट्रो मी नेहमी माझ्याजवळ ठेवतो. (इतरांना देण्यासाठी) लाईव्ह सी.डी. आवडली तरी मी त्यांना ती काही महिने वापरण्यासाठी सांगतो आणि मग ते एखाद्या इंजिनियरकडून इन्स्टॉल करू शकतात.
लाईव्ह सी.डी. विषयी अधिक माहिती या प्रतिसादात दिली आहे.

http://mr.upakram.org/node/308#comment-3611

>> त्याला पुन्हा एक्स पी इंस्टॉल करायचा सल्ला दिला तर त्याने 'प्रेमाचे ४ शब्द' बोलून फोन बंद केला.
ह्या अनुभवातून आपण खूप काही शिकला असाल असे वाटते. :)

लाईव्ह सी.डी.

लाईव्ह सी.डी. वापरणे हा सर्वोत्तम उपाय आहे. टप्प्या टप्प्याने जाणे जास्त सुखकारक, तसेच डायरेक्ट हार्डडिस्कवर वापरण्या ऐवजी विंडोजमध्ये एक एप्लिकेशन म्हणून सुद्धा टाकता येते आणि काढता येते. फॉर्मॅटिंगची गरज नाही. मी आजवर उबंटू असेच वापरले आहे आणि मला देखील असा काही त्रास झाला नाही.


उबन्तु?

उबन्तु काय असते?

आपला
अण्णा

मिंट

माझा लिनक्सचा अनुभव उपरोल्लिखित अनुभवांच्या तुलनेत आनंददायी आहे. सुरुवातीच्या दिवसांतले त्रास सोडले तर नंतर मला आवाज न येणे, चित्र न दिसणे, आयकन्स गायब होणे वगैरे त्रास झाले नाहीत.

नेट नसेल तर उबुंटू व्यवस्थित वापरता येणार नाही हे खरे आहे. पण नेट नसेल तर विंडोजवरही सॉलिटेअर खेळणे वगळता काय करणार हे समजत नाही. निदान मराठी संकेतस्थळांवर काड्या घालण्यासाठी तरी नेट हवेच बुवा. :))

उबुंटूच्या वापरामध्ये सुरुवातीला येणारे व्हिडियो वा ऑडियोचे त्रास टाळण्यासाठी लिनक्समिंट हा उबुंटुआधारित एक उत्तम पर्याय आहे, जो मी गेले ५-६ महिने वापरत आहे. त्यामध्ये गाणी, व्हिडिओ, इ. आऊट ऑफ द बॉक्स चालतात व शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. (मला तरी पडली नाही.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अरे?

माझ्या एका मित्राच्या पत्नीचा संगणक बंद पडला. एक्सपी ने त्रास दिल्याने त्यांना साधे सोपे काही हवे होते. मी त्यांना उबंटु टाकायला सांगितले. आणि त्या अगदी खुश आहेत त्यावर गेले ६ महिने.
एकदाच मी ते टाकायला मदत केली त्या नंतर काहीच करावे लागले नाही. त्या बाई शेयर्सचे काम पाहतात.
शिवाय त्यांचा कॅनन प्रिंटरपण लगेच जोडला गेला. त्या तर अगदी खुश आहेत आणि उत्साहाने सगळ्यांना आपला संगणक विना विंडोज चालतो म्हणून दाखवत असतात.

असो,
कॉशन म्हणून तुमचा लेख महत्त्वाचा वाटला.

आपला
गुंडोपंत

नेट आणि लिनक्स

२. नेट नसताना लिनक्स च्या भानगडीत पडू नये.

माझ्याकडच वायरलेस (रिलायन्स) मी उबंटू मधे चालवायचा प्रयत्न केला पण ते काही जमल नाही, तेंव्हा शेवटी नाद सोडून दिला आणि गपगुमान विंडोज मधूनच नेट वापरायला लागलो.

_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥

ब्रॉड्कॉम?

ताररहित इंटरनेट वापरताना होणारा त्रास वितरक कोण यावर अवलंबून नसतो. बहुतेक बिनतारी प्रक्षेपकांचे चालक (ड्रायव्हर) बंदिस्तस्रोत (प्रोप्राएटरी) असल्यामुळे ते चालू करण्यासाठी उबुंटूला वापरकर्त्याने अनुमती द्यावी लागते. रिस्ट्रिक्टेड हार्डवेअर मध्ये शोधा.
शिवाय ब्रॉडकॉमनिर्मित प्रक्षेपक असेल तर उबुंटूला जाणवतच नाही. bcmwl-kernel-source जबरद्स्तीने इन्स्टॉल (म्हणजे मराठीत काय?) करावा लागतो.

ताररहित इंटरनेट व मोबाईल ब्रॉडबँड या वेगळ्या गोष्टी

सातारकर उल्लेख करत असलेली सेवा बहुदा रिलायन्स नेटकनेक्ट (मोबाईल नेटवर्क कनेक्शन) ही असावी. तुम्ही ज्या पॅकेजचा संदर्भ दिला आहे तो वायरलेस मोडेमवरुन होणारे प्रक्षेपण पकडणाऱ्या नेटसंदर्भातला (वायरलेस नेटवर्क कनेक्शन - घरापर्यंत वायर्ड कनेक्शन पण नंतर घरगुती वायरलेस मोडेम वापरुन घरातल्या घरात वायरलेस असे) आहे.

ताररहित इंटरनेट वापरताना होणारा त्रास वितरक कोण यावर अवलंबून नसतो

हे वाक्य तितकेसे खरे नाही

रिलायन्स नेटकनेक्ट सेवा सेवा हुवेई (huawei) व झेडटीई (ZTE) प्रकारचे युएसबी मोडेम पुरवते, व टाटा फोटॉन फक्त हुवेई प्रकारचे मोडेम पुरवते. हुवेई मोडेम हा उबुंटुच्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये काही कॉन्फिगरेशन फाईल बदलून वापरता येत असे. (झेडटीई वापरण्याची संधी मला मिळाली नाही, पण हा मोडेम उबुंटुमध्ये चालत नव्हता असे बऱ्याच ठिकाणी वाचले.)

ही परिस्थिती ९.१० (कार्मिक) पर्यंत तशीच होती.

लुसिडमध्ये कोणतेही कॉन्फिगरेशन न बदलता थेट प्लग अँड प्ले स्वरुपात मोबाईल ब्रॉडबँड सेवा वापरता यावी. (माझ्या अनुभवात इसाडोरामध्ये मला हा अनुभव आला आहे.) हा अनुभवही फक्त टाटा फोटॉन संदर्भात आला आहे. (म्हणजे बहुदा हुवेई मोडेम).
रिलायन्स नेटकनेक्ट वापरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे लुसिडमध्ये रिलायन्स नेटकनेक्ट वापरता येईल की नाही याची कल्पना नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उबुंटू

मी गेलं वर्षभर उबुंटू वापरत आहे आणि त्याआधी चारएक वर्ष जेन्टू लिनक्स! ऑफिसाच्या संगणकावर रेड हॅटची (फेडोरा, सायंटीफिक् लिनक्स) वेगवेगळी रुपं आहेत. मला अशा प्रकारचा कोणताही त्रास आजतागायत झालेला नाही. १०.४ या डिस्ट्रीब्यूशनला थोडाफार त्रास झाल्याचं ऐकलं आहे. लिनक्स माहित नसणार्‍या लोकांना मी शक्यतोवर नवीनतम उबुंटू वापरण्याचा सल्ला देत नाही; किंवा आधी शोधाशोध करून ते डिस्ट्रीब्यूशन स्टेबल आहे का नाही याची खात्री करून घेते.

उबुंटूची एकमेव इन्स्टॉलेशन सीडी वापरली असेल तर अगदी साधी ऍप्लिकेशन्सही नसतात, उदा. केडीई. त्यामुळे लिनक्स चढवताना सिस्टममधे (सिडी/डीव्हीडीमधे) काय काय आहे हे बघून घेणं इष्ट. उबुंटूची डीव्हीडीही असते त्यात जास्त पॅकेजेस असतात का?

थोडा छिद्रान्वेषीपणा: उबुंटू १०.२ नसेल १०.४ असेल.

ग्नोम

उबुंटूवाले सुरुवातीपासून जीनोम देतात. केडीई हवे तर कुबुंटूची सीडी वापरता येते. परंतु ती फुकटात घरी पाठवत नाहीत, उतरवून घ्यावी लागते.

डीव्हीडीमध्येसुद्धा कुबुंटू नसते. इंग्रजीशिवाय इतर भाषाही तीतून इन्स्टॉल करता येतात. शिवाय उबुंटू डेस्कटॉप, उबुंटू आल्टरनेट आणि उबुंटू सर्वर या तीनपैकी कोणत्याही सीडीप्रमाणे इन्स्टॉल करण्याचा पर्यायही असतो म्हणे.

थोडा छिद्रान्वेषीपणा: उबुंटू १०.२ नसेल १०.४ असेल.

माझाही छिद्रान्वेषीपणा: http://mr.upakram.org/node/2460#comment-38453

हळुहळु

उबुंटूवाले सुरुवातीपासून जीनोम देतात. केडीई हवे तर कुबुंटूची सीडी वापरता येते. परंतु ती फुकटात घरी पाठवत नाहीत, उतरवून घ्यावी लागते.

यापूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये कुबुंटुचीही सीडी पाठवायचे. मात्र हळुहळु फुकट सीडीचा पर्याय उबुंटुवाले बंद करत आहेत. ज्यांना यापूर्वी सीड्या मिळाल्या आहेत त्यांना नव्या सीड्या मिळत नाहीत. (कारण त्यांना ऑटोमॅटिक अपग्रेडचा पर्याय उपलब्ध आहे).


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

थोडा छिद्रान्वेषीपणा

उबुंटूची एकमेव इन्स्टॉलेशन सीडी वापरली असेल तर अगदी साधी ऍप्लिकेशन्सही नसतात, उदा. केडीई.

केडीई हे संपूर्ण डेस्कटॉप एन्वायर्नमेंट आहे. साधे ऍप्लिकेशन नाही. कोणत्याही लोकप्रिय डिस्ट्रोची एकमेव सीडी वापरली (ओपनसुसे, मँड्रिवा, उबुंटू, फेडोरा, डेबियन किंवा अन्य) तर त्यात एक तर जीनोम किंवा केडीई असते. (सीडी इमेज सामान्यतः ७०० एमबीच्या आसपास). दोन्ही एन्वायर्नमेंट (इतर एन्वायर्नमेंटसोबत उदा एलएक्सडीई) हवे असतील तर त्यासाठी संपूर्ण डिस्ट्रोची डीवीडी उतरवून घ्यावी लागते. (साधारण ४ ते ६ जीबी).

त्यामुळे उबुंटूवर केलेला वरील आरोप मला अमान्य आहे. अन्यथा या न्यायाने ओपनसुसे, मँड्रिवा, फेडोरा, डेबियन व अन्य लोकही पिंजऱ्यात उभे करावे लागतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नक्की?

उबुंटूच्या डीव्हीडीत केडीई असते या दाव्याविषयी मला संशय आहे. शिवाय कुबुंटूची डीव्हीडी वेगळी असते.

उबुंटुच्या सीडीत केडीई नसते

उबुंटुच्या सीडीत एक तर जीनोम किंवा केडीई असते. उबुंटुची डीवीडी डाऊनलोड केल्यास त्यात डेस्कटॉप एनवायर्नमेंटचा पर्याय विचारला जातो व त्यात केडीईचा पर्याय असतो मात्र डिफॉल्ट डेस्कटॉप एनवायर्नमेंट जीनोम असते. (हाच अनुभव सुसे किंवा मँड्रिवासोबतही येईल, ज्यात डेस्कटॉप एनवायर्नमेंटचा पर्याय विचारला जातो व त्यात जीनोमचा पर्याय असतो मात्र डिफॉल्ट डेस्कटॉप एनवायर्नमेंट केडीई असते.)

उबुंटुच्या डीवीडीची एक्स्क्लुजिव जीनोम इमेजही मिळते ज्यात फक्त जीनोम व सर्व प्याकेजेसही मिळतात. त्याची माहिती शोधून देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शंका कायम

ही उबुंटूची डिफॉल्ट डीव्हीडी आहे. "उबुंटुच्या डीवीडीची एक्स्क्लुजिव जीनोम इमेजही मिळते ज्यात फक्त जीनोम व सर्व प्याकेजेसही मिळतात." ती हीच ना?

तुमची शंका योग्य माझा गोंधळ झाला

तुम्ही म्हणता ती डीवीडी योग्य आहे ज्यात फक्त जीनोम व सर्व प्याकेजेस मिळतात. उबुंटुच्या हार्डी हेरॉनमध्ये डीवीडी वापरली तेव्हा मला डेस्कटॉप निवडण्याचा चॉईस मिळाला होता. मात्र थोडी शोधाशोध केली तेव्हा कार्मिक व लुसिडमध्ये तो नसावा असे दिसते (मी जीनोम सीडीच वापरली होती)

किंबहुना हे लक्षात राहण्याचे कारण म्हणजे सुसेच्या ११.२ आवृत्तीमध्ये डिफॉल्ट एनवायर्नमेंट काय असावे याबाबत जालावर बराच खल झाला होता व शेवटी केडीई जिंकले.

ओपनसुसे (पान २ वरील ६ वी पायरी, किंवा खाली दिलेले चित्र पाहा व मँड्रिवा यांच्या डीवीडीमध्ये जीनोम व केडीई हे दोन्ही एनवायर्नमेंट मिळतात.

सुसे
मँड्रिवा

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दोन्ही पर्याय

बरेच डिस्ट्रोज् केडीई आणि जीनोम चे ऑप्शन देतात.

||वाछितो विजयी होईबा||

उबुंटूची डीव्हीडी मदे जास्त पॅकेजेस असतात

उबुंटूची डीव्हीडी मदे जास्त पॅकेजेस असतात

उबंटू १०.४

कालच १०.४ (ल्युसिड लिंक्स्) ला अपग्रेड केले. सुरेख चालते आहे. मला तरी अपग्रेड करताना कोणतीच अडचण आली नाही.

अर्थात 'नेट नसताना' ह्या फंदात पडू नये हेच खरे कारण् मग माहिती किंवा ड्रायव्हर्स् मिळवण्याचे काहीच् मार्ग रहात नाहीत. पण वर काही जणांनी म्हंटल्याप्रमाणे 'आवाज नसणे, चित्रे न दिसणे' वगैरे कोणतीच अडचण मला आली नाही. (कदाचित माझे मशिन नवे असावे - ३ वर्ष जुना डेल ५३०, ४जीबी रॅम). वरती कर्णाने म्हंट्ल्याप्रमाणे 'मिंट' योग्य आहे कारण् त्याच्यात 'रिस्ट्रिक्टेड रिपॉझिटरीज्' संलग्न आहेत.

उबंटू मधे थोडा 'लर्निंग कर्व्ह' आहे हे मी मान्य करतो पण विंडोज् मधेही तो होता/आहे च, फक्त आपल्याला ते अतिपरिचयाचे झाल्यामुळे जाणवत नसेल.

उबंटू १०.४ माजा कडे इनस्तोल नाही.

फाईल सीस्टम चा प्रोब्लम आहे. काय कराव लागेल. पन माजा कडे २ लिंनक्स् इन्स्ताल आहे.

सबायोन जिएनयु/लिनक्स्

सबायोन जिएनयु/लिनक्स् हे मनोरन्जनासाठी अतिशय उपयुक्त असून सिनेमा पाहण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी एकसबीएमसी व वीएलसी मेडिया प्लेयर अशी अनेक एप्प्लिकएशन्स् आहेत्.
http://www.sabayon.org/
http://www.youtube.com/watch?v=Slvl8D4nWZc

 
^ वर