आमचे ग्रह फिरले!

कायद्याचा वापर करून ज्योतिषशास्त्राची दडपशाही करण्याला माझा पूर्ण पाठिंबा होता. न्यायालयाला ते मान्य नाही. तुमचे मत काय?
हे प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट करणे शक्य आहे काय? इतर कोणी त्यासाठी उत्सुक आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

युजीसी

या प्रकरणाची सुरवात झाली याबाबत युजीसी आणि फलज्योतिष हे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद मधीलल् प्रकरण पहावे.
भारतात अशा प्रकारची बंदी अशक्य आहे. जर बंदी आली तर ज्योतिषाचा धंदा दुप्पट होईल. याबाबत न्यायालयीन लढाई केवळ तांत्रिक बाब आहे.
प्रकाश घाटपांडे

अशक्य?

लॉर्ड बेंटिंक अधिक आशावादी होता.
सध्या आपण प्रस्थापित आहोत. Of the people by the elite समाज मला चालेल. 'हजार फुले फुलू द्या' हे रडगाणे लूजर्स गातात.
ग्राहक संरक्षण कायद्यात ज्योतिषाचा समावेश का करू नये? याचे उत्तर वरील दुव्यात सापडले नाही. असंतुष्ट जातकांना फसवणुकीविरुद्ध दाद मागण्याचा हक्क असावा. Counting the hits and ignoring the misses ही प्रथा मोडण्यासाठी अशा प्रसिद्धीचा उपयोग होईल.

सहमत

भारतात अशा प्रकारची बंदी अशक्य आहे. जर बंदी आली तर ज्योतिषाचा धंदा दुप्पट होईल.

प्रकाशरावांशी या मुद्यासंदर्भात पूर्ण सहमत आहे. मुद्दा जर ज्योतिष्य हे शास्त्र नाही, त्याच्या मागे लागून स्वतःचे आयुष्य आणि कर्तुत्व कोणी गमावू नये असे असेल. तर त्याला उपाय लोकशिक्षण आहे. जर आपल्या (कुणाच्याही) ओळखीत जर कोणी असे असहाय्यतेमुळे करत असेल (अथवा असहाय्य नसतानाही) तर त्याला तसे करू नये हे सांगणे महत्वाचे.

आज मटक्यावर बंदी आहे, आकडे लावण्यावर बंदी आहे, म्हणून ते करणारे थांबतात का? माझा एक गुजराथी मित्र सांगायचा की त्यांच्या गावात, टपरीवर, "आधा ग्लास कोक" मागितला की उरलेला अर्धा ग्लास हा कुठल्यानकुठल्या मद्याने भरून येयचा.. कारण गुजराथ मधे दारूबंदी!

हे प्रकरण ग्राहक संरक्षण कायद्यात आणले तर काय कुडमुडे पण दरवाजाबाहेर "डिसक्लेमर" लावतील. मग मूळ उद्देश साध्य होईल का? याचा अर्थ ते करू नये असाही नाही, पण त्याच्या यशाच्या म्हणून मर्यादा आहेत. कॅसिनोच्या बाहेर पण जुगाराविरुद्ध तत्वज्ञान असते आणि "धुम्रपान हे आरोग्याला हानिकाऱक आहे" असे सिगरेट्सच्या पाकीटांवर लिहीलेले असते...

बाकी कालच्या बातमीमुळे मला अजून एक प्रश्न पडला. हेच जर मुरली मनोहर जोशी अथवा रालोआच्या काळात घडले असते तर ती बातमी एव्हढीच आली असती का अजून मोठी? (हे निरीक्षण करताना, जोशी/रालोआ यांची बाजू घेण्याचा उद्देश नाही आहे).

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

:)

:)))

आपला
गुंडोपंत

बातमीवरून पूर्ण उलगडा होत नाही.

ही बातमी आज सकाळी हिंदुस्तान टाईम्स मधे वाचली. याचिकाकर्त्यांना भेटायची इच्छा आहे. बहुदा भेटू शकेन असे दिसते.

आपल्या कडे ड्र्ग आणि म्याजिकल आक्ट आहे. यात असे म्हटले आहे की अशा प्रकारच्या करणी वा दिव्यौषधीं कोणी जाहिरात करु नये.
खूप ठिकाणी असा गैरसमज आहे की या कायद्याखाली हा व्यवसाय करायला बंदी आहे. तशी ती नाही. मात्र त्याची जाहिरात केल्यास हा कायदा लागू होतो. माझ्या माहितीनुसार याची शिक्षा तीन महिन्यापर्यंत आहे म्हणून तो अजामीनपात्र गुन्हा ठरत नाही.

आता ज्योतिषविद्येची जाहिरात केली जाऊ नये. असे काहीसे याचिकाकर्त्यांचे म्हणणे दिसते. (हा माझा कयास आहे.)
मला यात फारसे गैरदिसत नाही.

रिकामटेकडा यांच्या एलिटिस्ट सुराज्य या कल्पनेशी मी असहमत आहे.
त्याच बरोबर ज्योतिषव्यवसायबंदी हा कायदा मला फारसा पसंत नाही.

ग्राहक न्यायालयात दाद मागायला मला वाट॑ते कुठलाच कायदा आडवा येत नाही. ज्योतिषी आणि ते पैसे देऊन ऐकणारा यात ग्राहक-विक्रेता संबंध येतोच. मात्र यातला मी तज्ञ नाही.

प्रमोद

खास तरतूद

ड्रग्ज ऍन्ड मॅजिकल रेमेडीज कायद्यात अशी खास तरतूद आहे की त्यात नमूद गुन्हे दखलपात्र असतील.
डिस्क्लेमर न छापणार्‍यांवर ज्योतिषव्यवसायबंदी करण्याची कल्पना ही इन्फॉर्म्ड कन्सेन्टच्या अपेक्षेशी सुसंगत वाटते.
एलिटिस्ट सुराज्य आदर्श नाही पण लेसर ऑफ टू इव्हल्स तरी आहे ना?
“The best government is a benevolent tyranny tempered by an occasional assassination.” -- Voltaire

 
^ वर