उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
संस्कृत शब्दांचे अचूक उच्चार कसे करायचे?
अभिजा
April 26, 2010 - 12:06 pm
नमस्कार!
स्तोत्र वगैरे वाचताना अचूक उच्चार कसे करायचे त्याबद्दल मार्गदर्शन हवे आहे.
उदाहरणार्थ, रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे या ओळीत काहीजण रामम् रमेशम् भजे असा उच्चार करतात, तर काहीजणांच्या मते रामंव् रमेशंम् भजे असा उच्चार बरोबर आहे.
दुसरे उदाहरणः-
स सर्वं लभते स सर्वं लभते अशी अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये एक ओळ आहे.
एका सीडी मध्ये मी त्याचा उच्चार स सर्वल्लभते स सर्वल्लभते असा ऐकला आहे.
एका गुरुजींकडून तो उच्चार मी स सर्वंव् लभते स सर्वंव् लभते असा ही ऐकला आहे.
अंत्य अनुस्वारांचा उच्चार नक्की कसा करावा? त्या संदर्भात काही नियमावली आहे का?
धन्यवाद!
दुवे:
Comments
म्/न्+ अर्धस्वर
म् किंवा न् नंतर य, व, र, ल यांच्यापैकी एखादा अर्धस्वर आला तर, म्/न् चा अनुस्वार होतो. त्या अनुस्वाराचा उच्चार खणखणीत अनुस्वारासारखा न करता, अर्धअनुस्वारासारखा नाकातल्या नाकात करतात, अशी माझी कल्पना आहे. त्यावरून, रामम् रमेशम् भजे चा उच्चार (म् नंतर र हा अर्धस्वर आल्याने) रामं रमेशम्, म्हणजेच रामंव् रमेशम् असा व्हायला हवा.
म्/न् नंतर व किंवा ल आले तर व किंवा ल चे विकल्पाने द्वित्त होते. उदा. सम् + वत्सर=सँवत्सर(उच्चार :संव् वत्सर)=संव्वत्सर्; सम्+यन्ता=सँय्+ यन्ता=संयन्ता=संय्यंता.
यं+लोकम्= यँल् लोकम्=यंल्लोकम्. त्यामुळे स सर् वं ल्लभते हे उच्चारण शुद्ध. (चन्द्रबिन्दूचा उच्चार हिंदी किंवा संस्कृतमध्ये करतात तसा अनुनासिक करायचा. मराठी बॅङ्क किंवा बॉम्ब मध्ये करतात तसा नाही!)--अनुस्वारस्य ययि परसवर्णः-पाणिनी ८.४.५८(चूभूद्याघ्या)--वाचक्नवी
संस्कृत अनुस्वार (इंग्रजी माध्यमातले) माझे ध्वनिमुद्रण येथे
संस्कृत अनुस्वाराबद्दल (इंग्रजी माध्यमातले) माझे ध्वनिमुद्रण येथे सापडेल :
ईस्निप्स दुवा
धन्यवाद
वाचक्नवी, धनंजय, प्रतिसादासाठी आणि उपयुक्त माहितीसाठी अनेक धन्यवाद!
मला एक चांगला दुवा सापडला आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद!
दुर्दैवाने....
दुर्दैवाने, श्री. धनंजय यांचे ध्वनिमुद्रण अतिशय कमी आवाजपातळीमुळे ऐकता आले नाही. ई-स्निप्सवरची अन्य मुद्रणे ऐकताना ध्वनिपातळी बरी होती, मग इथेच असे का झाले, समजले नाही.
सुसंस्कृत-डॉट-नेट चा दुवा मात्र छान वाटला. एकदा सवडीने उघडून तिथल्या इतर गोष्टी पहायला पाहिजेत. दुव्याबद्दल आभार! --वाचक्नवी