मदत हवी आहे..

मदत हवी आहे..

शाळांमधून संस्कृत हा विषय बंद केला जावा का? ह्या प्रस्तावावर चर्चा जोरदार असतांना (प्रस्ताव व प्रतीक्रीया याला सहमती अथवा विरोध न दाखविता)मी माझी वेगळी अडचण देतो आहे कृपया जाणकारांनी मदत करावी.
आर्यभट्टयांच्या आर्यभट्टीय ह्या संकृत( श्लोकात) पुस्तकात खगोलशास्र तसेच गणित ह्या विषयाची माहीती आहे,पण ती ई.स.पू.५९९ या काळातील संकृतात आहे त्याचे भाषांतर करायचे आहे कोणाची मदत होईल काय?
खाली काही श्लोक दिले आहेत.जर माहीती असेल किंवा कोणी व्यक्ती जाणकार असून मदत करु शकतो तर मी त्यांच्याशी संपर्क करेन....यावर आधारीत पुस्तकांची माहीती असल्यास ती पण द्यावी.

कालगणणा ह्या लेखमालेसाठी त्याची आवश्यकता आहेच. अभ्यासपण होईल.

खाली गोलपाद यातील काही श्लोक देत आहे .. आर्यभट्टीय यात १२१ श्लोक आहेत ..

आर्य ४.१क/ मेष-आदेस् कन्या-अन्तम् समम् उदच्-अपमण्डल-अर्धम् अपयातम्/
आर्य४.१ग/ तौल्य-आदेस् मीन-अन्तम् शेष-अर्धम् दक्षिणेन एव//

आर्य४.२क/ तारा-ग्रह-इन्दु-पातास् भ्रमन्ति अजस्रम् अपमण्डले अर्कस् च/
आर्य४.२ग/ अर्कात् च मण्डल-अर्धे भ्रमति हि तस्मिन् क्षिति-छाया//

आर्य४.३क/ अपमण्डलस्य चन्द्रस् पातात् याति उत्तरेण दक्षिण-तस्/
आर्य४.३ग/ कुज-गुरु-कोणास् च एवम् शीघ्र-उच्चेन अपि बुध-शुक्रौ//

शैलु.

लेखनविषय: दुवे:

Comments

इंग्रजी भाषांतर

एक इंग्रजी भाषांतराचा दुवा येथे सापडला.

येथे पृष्ठ ९२पासून पुढे बघा.

तांत्रिक शब्द असल्यामुळे मला खुद्द भराभर भाषांतर करता येत नाही.

उदाहरणार्थ "अपमण्डल" शब्दाचा खगोलशास्त्रीय अर्थ मला माहीत असलेला इंग्रजी शब्द "एक्लिप्टिक" असा आहे. तो कळल्यामुळे मला तरी उरलेल्या श्लोकाचा अर्थ समजणे सोपे गेले. तरी "पात" शब्दाचा अर्थ नेहमीचा नसून तांत्रिक आहे. त्याच प्रमाणे "कुज" आणि "कोण" ही ग्रहनामे.

इंग्रजी भाषांतरामध्ये थोडी संदिग्धता आहे.
"उत्तरेण दक्षिणतः"चे दुव्यावरती इंग्रजी भाषांतर "नॉर्थवर्ड अँड साउथवर्ड" असे केलेले आहे. याचे नेमके भाषांतर बहुधा "उत्तरेकडून दक्षिणेकडे" असे असावे. असे असल्यास "पात" म्हणजे "डिसेंडिंग नोड" असावा असे वाटते - ही तांत्रिक माहिती मला कळत नसल्यामुळे भराभर आणि सम्यक् भाषांतर मी देऊ शकत नाही. क्षमस्व.

अभ्यासाबाबत अनेकानेक शुभेच्छा.

धन्यवाद..

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************

धनंजयजी ..
धन्यवाद दुवा पाहिला..थोडावेळ लागेल पूर्ण समजयला.. एका बनारसच्या संस्कृत शिक्षकाचा पत्ता मिळाला आहे तेथे पण जाणार आहे.. पुन्हा धन्यवाद.

शैलु.

आर्यभट्टाचे चरित्र

काही वर्षांपूर्वी आर्यभट्टाचे चरित्र वाचले होते. लेखकाचे नाव नीटसे आठवत नव्हते. आय.आय.टी मुंबईच्या लायब्रररीच्या क्याटलॉग वर ते मिळाले.
हे पुस्तक गणिताच्या प्राध्यापकाने लिहिले आहे. ते ज्या ठिकाणी शिकवतात त्याचा http://www.stc.ac.in/mca-man.pdf हा दुवा.

Velukutty, K.K.
Heritages to and from Aryabhatta
Palakkad : Sahithi, 1997 1997

माझ्या आठवणीप्रमाणे पुस्तकात इतिहासाचा बराच उहापोह आहे. त्यात आकडे न लिहिता अक्षरात लिहिले जायचे. सूत्रे वाचताना नीट माहिती लागते. आर्यभट्टावर बर्‍याच इतिहासकालीन टीका आहेत. त्याचे म्हणणे समजून घेताना या टीकांचा वेध घ्यावा लागतो. आर्यभट्टाचे पृथ्वीच्या गतीबद्दल म्हणणॅ त्याच्या श्लोकांपेक्षा त्याच्या टीकाकारांकडून समजून घेता येते. आर्यभट्ट दोन होऊन गेले. त्यामुळे पण बराच गोंधळ असतो. या सर्व माझ्या आठवणी आहेत तेव्हा काही चुका असू शकतात.

ऐने अकबरी हे पुस्तक तुमच्या अभ्यासात काही भर टाकू शकेल. हे पुस्तक मुंबईत ऐशियाटिक मधे आहे.

प्रमोद

?

>>त्यात आकडे न लिहिता अक्षरात लिहिले जायचे.

(आकड्यांत लिहिण्याची पद्धत नसेल तर स्थानिक किंमतीच्या पद्धतीशा शोध कशाला लागेल?)

इंटरेष्टिंग माहिती. म्हणूनच सध्या वापरात असलेल्या आकड्यांना अरेबिक न्यूमरल्स म्हणत असावेत का?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अक्षरात लिहिले जायचे

महाराष्ट्र हे असे राज्य आहे
जेथे खेड्यात दर १२ तासांत
तर गावांत ३ तासांत
उत्सव साजरा करतात
लाईट आली लाईट आली.
*************************
प्रमोदजी

धन्यवाद.

नितीनजी

आकडे न लिहिता अक्षरात लिहिले जायचे.

अक्षरात लिहिले जायचे याचा एक नमुना पहा मी तो लेखात देणार आहे.पण त्याचे विष्लेशण मला अजुन हवे तसे समजले नाही म्हणुणच मी मदत मागतो आहे.त्यापुर्वि चर्चा झाली तर उत्तम.

निरनिराळ्या संख्या निर्देशित करण्याकरिता आर्यभटटांनी आपली एक स्वतंत्र पध्दत तयार केली.ह्या पध्दतीत अक्षराचे स्वरात आणि व्यंजनात वर्गीकरण केले.तसेच ह्स्वाक्षरे व दीर्घाक्षरे असे ही भाग केले उदा. अ ,इ ,उ ह्स्वाक्षरे आ, ई, ऊ ही दीर्घाक्षरे अश्या अक्षरांना विशिष्ट संकेत देउन त्या संकेताचा उपयोग मोठ्या संख्या सांगण्यासाठी केला.

उदा.-एका महायुगात त्रेचाळीस लाख वीसहजार वर्ष हे त्यांनी युगरविभगण: ख्युघ्य अश्या संकेताने मांडली.

ख्यु-३’२०,०००
फ-४
ऋ-१०’००,०००
यावरुन ख्युघ्य ३’२०,०००+(४*१०’००,०००)=४३’२०,००० मोठ्या संख्या पाठकरण्या करीता ही पघ्दत असावी.

संर्दभ -आर्यभट्ट (बाल पुस्तकमाला)

 
^ वर