अजून एक महत्वाचे हा घोटाळा मिडिया,शोध पत्रकारिता,लोकशाहीचा चोथा स्तंभ यांनी बाहेर काढला नाही

जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे. सामान्य माणसाने थोडा खर्च केला तर त्यास परेशान करणारा हा विभाग, सरकार काय, IPL चा तमाशा चालू झाल्या पासून चीअर गर्ल्स चा नाच पाहत गप्प बसले होते काय? का आत्ता his masters voice च्या इमानी श्वाना प्रमाणे धाडी टाकण्याचा तमाशा सुरु केला आहे.( माफ करा ही तुलना करून मी श्वानांचे मन दुखावले .त्यांचा अपमान मी करू शकत नाही.)
भारताचे माननीय पंतप्रधान हे अर्थ तज्ञ आहेत म्हणतात. पण लालू यादवांनी ५ वर्षे खोटे रेल बजेट सादर केले .ही बाब नवीन रेलमंत्री ममता बनर्जीने स्पष्ट केले. हा प्रकार म्हणजे वराती मागून घोडे असा आहे. अर्थतज्ञ पंतप्रधान, नियोजन अध्यक्ष,असताना लालू सारखा घोटाळे बाज रेल्मंत्री ५ वर्ष खोटे रेल बजट मांडतो,पंतप्रधानास कांहीच समजत नाही आश्यर्य आहे. IPL चा तमाशा घोटाळा ४ वर्ष चालला तरी पंतप्रधान झोपलेले.याचा अर्थ या घोटाळ्यात सर्वच जन सामील आहेत फक्त थरूर सरळ असल्या मूळे पकडले गेले. बाकी बेरकी असल्या मूळे कागद पत्री कोणाचा हि सबंध सापडणार नाही. विरोधी पक्ष, मिडिया, वर्तमानपत्र वाले सुद्धा या महा घोटाळ्यास जबाबदार आहेत हे सर्व सरकारचे बटिक झाले आहेत
शोध पत्रकारिता हा प्रकार भारतीय वर्तमान पत्र उद्योगात नामशेष झाला आहे. आणि जेंव्हा हे वार्ताहर एखादा विषय हाताळतात तेंव्हा मनात शंकेची पाल चुकचुकते कांही तरी गडबड झाली,हिशोब चुकले म्हणून हे प्रकरण पेपर मध्ये आले.मांडवली पूर्ण जाहली कि बातम्या बंद होतात.नवीन विषय घेवून पुन्हा पहिला अध्याय सुरु केला जातो. माहिती अधिकार वापरणाऱ्याचे सरळ सरळ खून पाडले जातात .आणि भारतीय जनते ची अहिंसेची (हिंसेची) नसबंदी महात्म्याने केली असल्या मुळे ती षंढ झाली आहे.
ट्विटर लिहिणे हा कांही थरूर यांचा गुन्हा नाही.तर मुहमे राम बगल मी छुरी अशी भारतीय नेत्याची करामत त्यांना जमली नाही. आज ४ वर्षा पासून हा घोटाळा चालू आहे आपल्या अर्थतज्ञ पंतप्रधान मनमोहनसिंग यांना समजले नाही का? एक म्हण आहे राजाच्या राणीचे चारित्र्य संशयातीत असले पाहिजे येथे तर राजाचेच चार्रीत्र्य संशयात आले आहे.फक्त उघड कोणी बोलत नाही. सर्वच जण म्हणतात राजाने स्वच्छ कपडे घातले आहेत.पण एखादा लहान मुलगा मात्र जो निष्पाप आहे तो मात्र राजा नंगा राजा नंगा असे सत्य बोलू शकतो. केवळ तुम्ही चारित्र्यवान असून चालत नाही तर तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहतात हे सुद्धा पाहीले जाते. आज राजकारणाचा डोलाराच बेईमानी,विश्वासघात,यावर आधारलेला असल्यामुळे कोण स्वच्छ कोण अस्वच्छ हे ठरविणे कठीण आहे. शशी थरूर यांची मांडवली करण्याची ताकद कमी पडली यामुळे त्यांना तडकाफडकी काढले गेले आणि डागाळलेली प्रतिमा सावरण्याचा खटाटोप कॉंग्रेस ने केला. पण ज्यांची मांडवली करण्याची ताकद मोठी आहे ते मात्र छातीठोक पणे मी नाही त्यातली कडी लावा आतली, असे सांगत आहेत.आणि मिडिया वाले TRP वाढला म्हणून खुश आहेत. अजून एक महत्वाचे हा घोटाळा मिडिया,शोध पत्रकारिता,लोकशाहीचा चोथा स्तंभ यांनी बाहेर काढला नाही तर लोण्याच्या गोळ्या वरून दोन माकडांचे लागलेले अंतर्गत भांडण यास कारणीभूत आहे.

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

लेखनविषय: दुवे:

Comments

शीर्षक

लेख चांगला आहे पण आपली शिर्षक ही आक्रस्ताळी वाटतात. कदाचित लक्ष वेधुन घेण्यासाठी असतील. पण उपक्रमाचा वाचक हा तुलनात्मक दृष्ट्या पुरेसा प्रगल्भ आहे. साधी सोपी व छोटी शिर्षके दिली तर उचित होईल असे वाटते. अर्थात हा अधिक्षेप नसुन प्रतिक्रिया आहे.
प्रकाश घाटपांडे

उचलेगिरी?

हे आधी कुठेतरी वाचलंय.. बहुदा लोकसत्तामधे.. दुवा शोधून बघतो

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पोटदुखी करून घेवू नका.

thanthanpal.blogspot.com १००% माझे लेखन आहे. कोणाचे लिखाण चोरून त्याला श्रेय न देण्या इतपत मी नमकहराम नाही.फक्त आपल्याला लिहिता आले नाही म्हणून पोटदुखी करून घेवू नका.

:)

मी ह्यातली वाक्ये याआधी इथे वाचली होती. आपला लेख वाचल्यावर नेमकं कुठे वाचलंय आठवेना.. तेथील प्रतिक्रीया ही तुमच्याच नावाने आहे तेव्हा वरील आरोपांबद्द्ल क्षमस्व.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

शोध पत्रकारिता

>>अर्थतज्ञ पंतप्रधान, नियोजन अध्यक्ष,असताना लालू सारखा घोटाळे बाज रेल्मंत्री ५ वर्ष खोटे रेल बजट मांडतो,पंतप्रधानास कांहीच समजत नाही आश्यर्य आहे.

रेल बजेट खोटे होते असे आजतागायत फक्त ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. खरे आणि वाजवी चित्र काय होते ते मात्र त्यांनी सांगितलेले होते. आणि त्या म्हणण्याला कुणी अजून उचलून धरलेले नाही. ज्यांना पूर्वीच तसे वाटत होते (कारण लालू 'आपल्या नसलेल्या' पक्षाचे होते) तेच लोक पुन्हापुन्हा तसे म्हणत राहतील.

असो. शोधपत्रिका हा प्रकार एकूणच बोलवित्या धन्यांना हवे ते मांडण्याचा असतो. ८० च्या दशकात जेव्हा रिलायन्सचे 'काळे धंदे' अरूण शौरी वगैरे शोधून काढून उजेडात आणत होते, त्या काळात अंबानींचे तेव्हाचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी नस्ली वाडिया हे इंडियन एक्सप्रेसच्या बोर्डावर होते हा बहुधा 'योगायोगच' असावा.
(नंतर स्वतः मंत्री झाल्यावर याच शौरींना याच अंबानींविषयी -कुठल्याश्या लीडरशिप एन्क्लेवसदृश कार्यक्रमात "त्यांनी नेहमीच कायद्याची मर्यादा ओलांडली; पण मागे वळून पाहताना ते कायदेच चूक होते असे जाणवते" असे म्हटल्याचे ऐकल्यावर कान धन्य झाले होते.)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

शीर्षकांचा कर्कश्शपणा कमी कराल काय? प्लीज!

ठणठणपाळ जरा शीर्षकांचा कर्कश्शपणा कमी कराल काय? एवढी कृपा कराच (प्लीज!) अहो कानापाशी भोंगे (लाउडस्पीकर) लावल्यासारखे वाटते वाचले की. मग पुढे जावेसेच वाटत नाही. आणि चोथा स्तंभ असे तुम्ही जाणून व बुजून लिहिलेले आहे काय?

आता लिखाणावर माझे मत:
तुमच्या भावना पोचल्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भोंगा म्हणजे लाऊडस्पीकर नाही

भोंगा म्हणजे कर्णा. लाऊडस्पीकर म्हणजे ठोकळा असतो तो. (पुणे शहरात गणेशोत्सव, दहीहंडी व नवरात्रात लाऊडस्पीकरची भिंत उभी करण्याची गौरवशाली प्रथा आहे.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

भोंगाही लाउडस्पिकतो

भोंगा म्हणजे कर्णा. लाऊडस्पीकर म्हणजे ठोकळा असतो तो.

नाही हो. अहो भोंगाही लाउडस्पिकतो ना! तोही लाउडस्पीकरचाच प्रकार झाला. जरा गुगलून बघा. चित्रे बघा. आयकॉन बघा.

बॉशचा हॉर्न लाउडस्पीकर किंवा कर्णा
बॉशचा हॉर्न लाउडस्पीकर किंवा कर्णा

आणि शेवटी चूभूद्य़ाघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आगे आगे

देखिए होता है क्या.

वॉटरगेटप्रमाणे प्रकरण वाढत चालले आहे. च्यानेलवाले जे करतात त्याचा त्रास होत असला तरी या बाबतीत हे प्रकरण उघडकीला आणण्यात च्यानेलचा वाटा आहे हे मान्य करायला हवे. गोपनीय बाबी उघडकीला येत आहेत, त्यामुळे हे प्रकरण दाबणे कठीण जाईल असे वाटते.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

गम्मत् आहे

त्यामुळे हे प्रकरण दाबणे कठीण जाईल असे वाटते.

तुम्ही भलतेच आशावादी आहात. :)
_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥

मान्य

मान्य आहे. किंबहुना याला आशावाद न म्हणता naiveness म्हणावेसे वाटते.

बहुतेक सगळे चोर, यात आता कोण चांगल्या रीतीने म्यानेज करू शकते ते बघायचे.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर