विकिपीडियाची नवीन सुविधा
विकिपीडियाबद्दल लिहीणे म्हणजे महासागरावर लिहिण्यासारखे आहे. जितके मोती मिळतील तितके कमीच. अर्थात महानगरांमधील सांडपाणी जसे समुद्रात सोडले जाते तसे काही काळेबेरे देखील आढळते विकीत. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची तयारी असेल बरीच उपयुक्त माहिती मिळू शकते. ती सर्व पाने वर्डमध्ये कॉपी पेस्ट करणे जरा जिकिरीचे होते. पण आता एक नवे आयुध उपलब्ध झाले आहे. त्यात आपल्याला हवी असलेली सगळी विकीपाने पी.डी.एफ. स्वरूपात डाऊनलोड करता येतात किंवा ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये देखील साठवून ठेवता येतात.
१) ट्राय बिटा वर क्लिक करा
http://en.wikipedia.org/w/index.php?title=Special:UsabilityInitiativeOpt...
२) बुक क्रिएटर ही सुविधा विकी खात्याशी जोडून घ्या.
http://en.wikipedia.org/w/index.php?title=Special:Book&bookcmd=book_crea...
आता आपल्याला हव्या असलेल्या पानांची विकीपुस्तकात भर घाला. शेवटी "शो बुक" या लिंकवर टिचकी देऊन पी.डी.एफ. अथवा ओपन ऑफिसचा पर्याय निवडा. पुस्तक तयार. धन्यो.
टीपः ही सुविधा मराठी विकिपीडियात आहे की नाही माहिती नाही. बहुधा नसावी.
स्क्रिनशॉट
http://www.flickr.com/photos/shantanuo/4539317029/
Comments
चांगली माहीती
नक्कीच उपयुक्त ठरेल... लवकरच या सुविधेचा वापर करून बघतो.
धन्यवाद!
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आभार
उपयुक्त सुविधा. माहितीबद्दल अनेक आभार.
---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे
उपयुक्त !
आताच वापरून पाहिले.
पी.डी.एफ. स्वरूपात सुरेख पुस्तक मिळाले.
शंतनू धन्यवाद!
उपयुक्त
माहितीबद्दल धन्यवाद.
धन्यवाद
माहीतीबद्दल् धन्यवाद.
असो.
लई भारी हाये!
लई भारी परकार पाठवला राव !
उपयुक्त
उपयुक्त सुविधा, माहितीबद्दल आभार.
फार छान
फार छान सुविधा. धन्यवाद शंतनू.
सन्जोप राव
इलाही ये तूफान है किस बला का
के हाथोंसे छूटा है दामन हया का