तर्कक्रीडा ५: तर्कसंगत निष्कर्ष

खालील विधानांत ठसठशीत लिहिलेले म्हणीचे वाक्य वाच्यार्थाने सत्य आहे असे मानावे.
त्यावरून काढलेले निष्कर्ष तर्कसंगत आहेत की नाहीत ते सांगावे.

(I) ज्याच्या हातात ससा तो पारधी.

(१) * च्या हातात ससा आहे.---> म्हणून पारधी आहे
(२)* च्या हातात कासव आहे.--->म्ह. पारधी नाही.
(३)* पारधी आहे.----म्ह.च्या हातात ससा आहे.
(४)* पारधी नाही.----->म्ह. च्या हाती ससा नाही.

(II) गरजवंताला अक्कल नसते.
(१) * गरजवंत नाही.--->म्ह.अ ला अक्कल आहे.
(२)* ला अक्कल नाही --->म्ह. गरजवंत आहे.
(३)* ला अक्कल आहे.--->म्ह. गरजवंत नाही.

(अपूर्ण)

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तरे

(I) - १)
(II) - ३)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

असेच

त्याच्याशी सहमत.

उत्तरे

(|) १
(||) यापैकी नाही.
(४) गरजवंत आहे.---->> म्ह. ला अक्कल नाही. असा पर्याय असता तर तो तर्कसंगत वाटला असता.

सहमत!

वरदा, तुमच्या उत्तराशी सहमत व्हावेसे वाटते. (II) चे उत्तर तर्कसंगत वाटते. कौतूक !!

अशीच

माझीही उत्तरे!

माझेही हेच!

उत्तर आहे.

छान मालिका.

तर्कक्रीडा मालिका खरंच खूप छान आहे. डोक्याला छान खुराक मिळतो.

ईश्वरी.

माझे उत्तर्

पहिल्याचे उत्तर - १)
दुसर्‍याचे उत्तर - ३)

तर्कक्रीड :५: तर्कसंगत निष्कर्ष (चालू)

म्हणीचे विधान वाच्यार्थाने सत्य मानून निष्कर्ष तर्कसंगत आहे की नाही ते ठरवा .
(|||) हपापाचा माल गपापा.
(१) 'ब' चा माल हपापाचा नाही.--->म्ह. 'ब' चा माल गपापा होणार नाही.
(२) 'क' चा माल गपापा झाला.---> म्ह.'क' चा माल हपापाचा होता.
(३) 'ड' चा माल गपापा झाला नाही.--->म्ह. 'ड' चा माल हपापाचा नव्हता.

(||||) कर नाही त्याला डर नाही.

(१) 'अ' ला कर आहे.--->म्ह. 'अ' ला डर आहे.
(२) 'ब' ला डर आहे.--->म्ह. 'ब' ला कर आहे.
(३) 'क' ला डर नाही.--->म्ह.'क' ला कर नाही.

*********************************************************
आता पुढील युक्तिवाद पहा:
(प) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आहे किंवा बेलपत्र आहे.
* निरीक्षणांती आढळले की हलवायाच्या घरावर बेलपत्र नाही.
--->म्ह.हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आहे.
(फ) सोनूबाईच्या हाती सोन्याचा वाळा आहे किंवा सोनूबाईच्या हाती कथलाचा वाळा आहे.
* निरीक्षणांती आढळले की सोनूबाईच्या हाती सोन्याचा वाळा नाही.
--->म्ह. सोनूबाईच्या हाती कथलाचा वाळा? ..आहे.
(ब) घरोघरी मातीच्या चुली आहेत किंवा घरोघरी मातीच्या चुली नाहीत.

* निरीक्षणांती आढळले की घरोघरी मातीच्या चुली नाहीत.
---> म्ह. घरोघरी मातीच्याचुली?...आहेत.

माझी उत्तरे

'ड' चा माल गपापा झाला नाही.--->म्ह. 'ड' चा माल हपापाचा नव्हता.
'ब' ला डर आहे.--->म्ह. 'ब' ला कर आहे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र आहे.
सोनूबाईच्या हाती कथलाचा वाळा आहे.

(ब) घरोघरी मातीच्या चुली आहेत किंवा घरोघरी मातीच्या चुली नाहीत. - म्हणजेच
प्रत्येक घरी मातीची चूल आहे किंवा मातीची चूल नाही.
निरीक्षणांती आढळले की प्रत्येक घरी मातीच्या चुली नाहीत.
म्ह. - उरलेल्या (किंवा सर्व) घरी मातीच्या चुली आहेत? -- सांगता येणार नाही.

चुलीबद्दल

(|||) २
(||||) ३

(प), (फ) ठीक,
(ब) बद्दल असहमत,
चुली असणे (अ) किंवा नसणे (ब) पैकी (ब) ही ऋणात्मक अट पूर्ण झाल्याने (अ) कडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
(हेच वाक्य मातीच्या चुली आहेत किंवा शेगड्या आहेत (मातीच्या चुली नाहीत), शेगड्या नाहीत (मातीच्या चुली नाहीत असे नाही) तर मातीच्या चुली आहेत असे ठीक आहे ;) )

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

नाही नाही

(|||) हपापाचा माल गपापा.
(३) 'ड' चा माल गपापा झाला नाही.--->म्ह. 'ड' चा माल हपापाचा नव्हता.

(||||) कर नाही त्याला डर नाही.
(२) 'ब' ला डर आहे.--->म्ह. 'ब' ला कर आहे.

युक्तिवाद
(ब) घरोघरी मातीच्या चुली आहेत किंवा घरोघरी मातीच्या चुली नाहीत.
* निरीक्षणांती आढळले की घरोघरी मातीच्या चुली नाहीत.
---> म्ह. घरोघरी मातीच्याचुली?...आहेत.

पहिले विधान खरे किंवा दुसरे विधान खरे.
दुसरे विधान खरे, म्हणून दुसरे विधान खोटे.
---> म्ह. घरोघरी मातीच्याचुली?... नाहीत्. :-)

प व फ मध्ये दुसरे विधान खोटे म्हणून पहिले खरे असा युक्तिवाद आहे.

कर व डर चा युक्तिवाद करताना मजा आली. पुन्हा काळ्या पांढर्‍या गोट्या घेऊन प्रयोग केला व उत्तर मिळाले.

घरोघरी मातीच्या चुली

सर्वश्री.अमित कुलकर्णी, तो आणि तो यांस.

अहो, (प, फ, ब) विधानांच्या संदर्भात काही उत्तर द्यायचेच नव्हते. " आता पुढील युक्तिवाद पहा. " एवढेच वर लिहिले होते. (प,फ) विधानांच्या ओघात 'ब' वाचले की पहिल्या दोन विधानां सारखाच निष्कर्ष काढावा असा आपला कल होतो. म्हणून "म्ह.घरोघरी मातीच्या चुली?" असा प्रश्न करून "आहेत." हे जणू वाचकाचे उत्तर आहे अशा पद्धतीने लिहिले. अर्थात विचारांती समजतेच. असो.गमतीने लिहिले.पण जमले नाही.
..............यनावाला.

 
^ वर