आजचा एक एप्रिल भारतीय सरकारने जनते करता अनेक नवीन क्रांतिकारक निर्णय घेतले

आजचा एक एप्रिल भारतीय सरकारने जनते करता अनेक नवीन क्रांतिकारक निर्णय घेतले गेले तर कांही निर्णयांची अंमलबजावणी सुरु झाली. नवीन निर्णय घेण्यास सरकारला तीनच मुहर्त सापडतात १५ auguest , २६ january या बरोबर ही नवीन वर्ष सुरु होण्याची तारीख.... आणि हो... गांधी,नेहरू घराण्याच्या जयंत्या त्यांच्या नावाने शासकीय योजना जाहीर करण्यास पक्षाचा फायदा करून घेण्यास आहेतच की. आजच्या महत्वाच्या घटना.
एप्रिल एक तारीख लोकांची हसत खेळत मस्करी करण्याचा अधिकृत दिवस. सरकारी हिशोबाचा आज पहिला दिवस. कालचा एकतीस मार्च हिशोबाचा अखेरचा बिले काढण्याचा घाई गडबडीचा गोंधळाचा नेहमी प्रमाणे intarnet बंद चालू होण्याचा, कसा तरी संपला. संगणक येण्या आधी बरे होते मार्च अखेर एप्रिल वीस पंचवीस तारखे पर्यंत आरामात चलायचं पण आता या संगणक मुळे अवघड झाले आहे काम करणे .. ....

आर्थिक व्यवहारात pan कार्ड बंधनकारक.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील जनगणना सुरु.
प्रत्येक नागरिकास युनिक आयनडेटीफिकेशन नंबर मिळण्यास सुरुवात होणार खर तर तुमची ओळख मिटून जावून ती यापुढे फक्त गणिती आकड्याने होणार."नावात काय आहे ?" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल होत काय त्याला भविष्य समजल होत? जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणता ते कांही खोटे नाही. पण आज आता नावात काय आहे हे प्रत्यक्षात येणार आहे शेक्सपीअर आज असता तर नावातच सगळ आहे हे सत्य त्यास समजले असते. केवळ हा नंबर म्हणजे हा हा मानव. आई बाप भाऊ बहिण जात पात धर्म सर्व कांही विसरून त्याची पूर्ण ओळख च मिटून जाईल. कांही दिवसांनी भारतीयास Alzheimer's disease, झाल्यास नवल नाही.
स्वच्छ पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती साठी स्वच्छ इंधन आणि त्या साठी भाववाढ अटळ आहे.अखेर देशाच्या विकासा साठी त्याग करणे हाच COMMON MAN चा आदर्श आहे. माझ्या मना बन दगड .
आज देशाचे नवीन लष्कर प्रमुख श्री कमांडो ले.जन.व्ही.के. सिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
आजच शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या कायद्याची अमलबजावाणीस सुरुवात. प्रत्यक्षात काय होईल ते विद्या देवी सरस्वतीच जाणे.
आणि आज पासून बँकेत सेव्हिंग्स account खात्यात असलेल्या पैशावर दररोज व्याज जमा होईल.करोडो खातेदारांना याच्या फायदा होईल. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियायात संपूर्ण भारतात 1.56 करोड सेव्हिंग्स account खातेदार आहेत. यावरून भारतीय बँका जनतेचा हजारो करोडो रुपयाचा नाममात्र व्याज देवून स्वतःह चा कसा फायदा करून घेत होत्या हे लक्षात येईल . या पैशांवर बँका गब्बर झाल्यात.पण जेंव्हा हा प्रकार उघडकीस आला तेंव्हा सुद्धा बँकांनी अनेक कारणे सांगत हे व्याज देण्यास टाळाटाळ केली. आजचा हा निर्णय सुद्धा सुखासुखी अमलात आणला गेला नाही.
यासाठी वेयकत्तिकरित्या श्री आशिष दास प्रोफेसर IIT मुंबई आणि Indian Statistical Institute Delhi Centre या दोन संस्थांचा मोठा हातभार लागला आहे. www.math.iitb.ac.in/people/faculty/homepages/ashish.html या साईट वर अधिक माहिती मिळेल.
भारतीय उच्च शिक्षण म्हंटले की IIT .या नावाचा दबदबा जगात झाला आहे. भारताच्या प्रगतीचे श्रेय या संस्थान मधील अभ्यासू ,मेहनती शिक्षकाना आहे. केवळ पुस्तकी अभ्यास नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्या सामान्य माणसाच्या (COMMON MAN) अडीअडचणीचा विचार करून त्या कश्या दूर करता येतील याचा सतत अभ्यास येथे चालू असतो.पण केवळ पुस्तकी अभ्यास करून ही उच्च विभूषित गप्प बसत नाही तर त्यांचे निष्कर्ष भारतातील शासन नोकरशहा, राजकारणी नेते यांना अमलात आणावयास भाग पडतात. हेच यांचे यश आहे.
बँक सेव्हिंग्स खात्यात दररोज व्याज जमा करण्याचा निर्णयाचे खरे शिल्पकार मुंबई IIT चे प्रोफेसर श्री आशिष दास http://www.math.iitb.ac.in/people/faculty/homepages/ashish.html त्यांचे सहकारी आणि http://www.isid.ac.in या सरकारी संस्थेचे अथक प्रयत्न, RBI कडे सतत पाठपुरावा करून अभ्यासपूर्वक प्रबंध सादर करून अखेर कोट्यावधी भारतीय सेव्हीग्ज खातेदारांना रोज व्याज मिळवून दिले.
भारतीय रिजर्व बैंक च्या जुलै 2006 च्या वार्षिक अहवाला नुसार 31/03/2005 भारतीय बँका मध्ये Rs.364,869 करोड रुपये वेयक्तिक बचत खात्यात जमा होते. पूर्ण जमा रक्कमेच्या 77% एव्ह्ढी ही रक्कम होती. या रक्कमेवर बँका फक्त 3.5% एव्हढेच व्याज देत होत्या. पण प्रत्यक्षात खातेदारास 2.8% पेक्षाही कमी व्याज दर मिळत होता. ठराविक तारखेला जमा असणाऱ्या रक्कमेवर व्याज देवून बँका या खात्यातील पूर्ण महिन्याच्या रक्कमेचा उपयोग ज्यादा व्याज दराने कर्ज पुरवठा करून 3000 करोड रुपयान पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात नफा कमावत होत्या . त्याच वेळी बँका ईतर fix डिपांझिटवर आधिक व्याज देत होत्या .सरकार सुद्धा या fix डिपांझिटवरील व्याजावर Income-Tax मध्ये सवलत देत होती. पण COMMON MAN चा पैसा वापरूनही RBI , बँका शासन त्यांना जास्त व्याज देण्यास तय्यार नव्हत्या , आणि सरकारही INCOME- TAX वर सुट देत नव्हती. आम आदमीला सरकारने वाऱ्यावर सोडून दिले.यावेळी IIT मुंबई चे प्रोफेसर आशिष दास यांनी या अन्यायावर अभ्यास करून Indian Statistical Institute Delhi Centre मदतीने सतत RBI आणि मुजोर हम करेसो कायदा या गुर्मीत राहणाऱ्या सरकारी नोकरशाह यांना त्यांची चूक दाखवून देत अनेक प्रयत्न करून COMMON MAN आम आदमी सामान्य जनतेस न्याय मिळवून दिला.

लेखनविषय: दुवे:

Comments

रोज

रिझर्व बँकेने दररोज व्याज देण्याचा नियम केला हे स्तुत्यच आहे.

परंतु पूर्वी बँका असे व्याज देत नव्हत्या आणि त्यातून बँकांचा फायदा होत होता ही गोष्ट उपरोल्लेखित प्राध्यापक आणि संस्था यांच्याच प्रथम लक्षात आली हे म्हणणे पटत नाही. तसे असल्याचे मला पैसे कमावू लागल्यापासूनच माहिती आहे. आणि ते बहुतेक सर्व लोकांना माहितीच असणार. रिझर्व बँकेला तर नक्कीच माहिती असणार. दररोजच्या शिलकीवर व्याज देणे ही गोष्ट आज सर्व बँकांचे संगणकीकरण झाले आहे अशा परिस्थितीतच शक्य आहे. ती परिस्थिती पूर्वी नव्हती. पूर्वी जेव्हा व्याजाचा हिशेब मानवी श्रम वापरून केला जाई तेव्हा तो दररोज करणे अशक्य गोष्ट होती. तो केला असता तरी त्यात होणार्‍या चुकांची शक्यता आणि त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची संख्या भयंकर झाली असती. (आज काही कोटी खटले न्यायालयांत तुंबले आहेत असे म्हणतात ती संख्या काही अब्ज झाली असती ;) ). यापुढेही अशा तक्रारी वाढत राहतील. कारण रोज जमा होणार्‍या व्याजाची स्वतंत्र नोंद पासबुकांत केल्यास पासबुकेच पासबुके लागतील. तेव्हा बँका बहुधा महिन्याची एकच नोंद दाखवतील आणि ती रक्कम एक्सप्लेन करताना कर्मचार्‍यांच्या नाकी नऊ येतील. (माझ्या हिशेबाप्रमाणे १२ रु १० पैसे व्याज व्हायला हवे तुम्ही ११ रु ९५ पैसे कसे दिले असे विचारण्याइतका वेळ असलेले असंख्य पेन्शनर देशात असतील). कर्मचारी बहुधा संगणकाने हिशेब केला आहे म्हणून तो बरोबर असे सांगून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतील. त्याने पेन्शनरांचे समाधान होईल की नाही हे माहिती नाही.

मला हा निर्णय काहीसा अनावश्यक वाततो. म्हणजे बँकांचा एकूण फायदा कमी होईल हे खरे पण ज्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे त्याचा वैयक्तिक फायदा अगदी मामुली असेल. या निर्णयाने सामान्य म्हणवल्या जाणार्‍या माणसाचा वार्षिक फायदा जास्तीत जास्त २०० रु च्या आसपास असेल असे मला वाटते. कारण सामान्याच्या खात्यात पैसे पडून आहेत अशी वेळ बहुधा नसते. त्याच्या खात्यात १ तारखेला जमा झालेले पैसे १० तारखेपर्यंत संपलेले असतात. ज्यांच्याकडे असे पैसे असतात ते तसेही मुदत ठेवीत वगैरे ठेवतात.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

स्तुत्यच पण..

रिझर्व बँकेने दररोज व्याज देण्याचा नियम केला हे स्तुत्यच आहे.

आतापर्यंत बॅंकेत तीस सप्टेबर व एकतीस मार्च अशा दोन दिवशी शिलकीची सरासरी काढून व्याज आकारले जात होते. बॅंकेत जितकी बचत खाती तितक्या खात्यांचे लेजरवर या व्याजाची नोंद करावी लागते. यासाठी हे दोनही दिवस बँकेचे व्यवहार बंद असतात. (दररोज फक्त ज्या खात्यांवर व्यवहार होतो त्यांचीच लेजर उघडावी लागतात) मग त्या खात्यावर किमान रक्कम फक्त असून त्यावर बऱ्याच काळापासून काहीच व्यवहार सुरु नाही अशा खात्यावरील किमान रकमेलाही दररोज व्याज सध्याच्या नव्या नियमानुसार देय राहील. संख्येने प्रमाणात जास्त असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येची कमतरता व संगणकीकरणाचा अभाव यापायी अशी व्याज आकारणी करणे अशक्य असल्याचे आमच्या बॅंकेतून सांगण्यात आले. ( या सहकारी बँकेच्या औरंगाबाद जिल्ह्यात हजारावर शाखा असून एकही शाखा संगणककीकृत नाही)

म्हणजे हा निर्णय एप्रिल फूलच ठरणार म्हणायचा :)

चांगला रिव्ह्यू

श्री ठणठणपाळ यांनी माहिती संकलित करून चांगला रिव्ह्यू केला आहे.
आवडला
चन्द्रशेखर

धन्यवाद

हि माहिती संकलन् करुन ,आपण खरोखरच चांगले कार्य केलेत.
धन्यवाद!!

 
^ वर