पूर्वीचे अभ्यासातील धडे..आणि आताचा अभ्यासक्रम

पूर्वीच्या पाठ्यपुस्तकातील धडे किवा कविता या अतिशय प्रभावी आणि मनोरंजक असायचे..
तसेच ते मुलांच्या मनावर एक संस्काराचा ठसा उमटवून जात होते.
आजही त्यातील कितीतरी भाग आपल्याला मुखोद्गत असतो...परंतु, आजच्या पाठ्यपुस्तकात तेवढीच ताकद आहे का?
साहित्य विश्व इतक मोठ आहे आणि आजच्या दिवशी तर त्याच महत्व अधिकच वाढत आहे तसेच
साहित्यिकांची यादीही वाढते आहे..त्यातील निवडक,दर्जेदार साहित्य समोर येण्यासाठी काय करता येईल...

त्यातील धडे व कविता कितपत परिणामकारक आहेत...या सगळ्यांचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा का?

मला आठवत असलेला असाच एक धडा...ज्यामधून अभ्रःम लिंकन सारख्या थोर व्याक्तीमात्तावाचे विनोदी परंतु सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे पैलू आपल्या समोर येतात..

लिंकनचा विनोद

एकदा एका वकिलीच्या कामासाठी अब्राहम लिंकन एका भाडोत्री घोड्याच्या गाडीतून शेजारच्या गावी चालला असता शेजारच्या उतारुशी त्याचा वाद सुरु झाला.लिंकन म्हणाला,
"जगात असे एकही कृत्य घडत नाही कि ज्यामागे स्वार्थी हेतू नसेल. "
एवढ्यात वाटेत मधेच एक चिखलाचे दाबके लागले.त्यात एक डुकराचे पिलू चिखलात अडकून बसले होते.ते बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करीत होते.
पण त्याला बाहेर पडता येईना.गाडीवाल्याने मोठ्या शर्थीने त्या डबक्याच्या बाजूने गाडी काढली त्यामुळे ते पिलू वाचले.तथापि, पिल्लाची ती निष्फळ धडपड पाहून सगळेच उतरू जोर जोराने हसू लागले. त्याबरोबर लिंकनने गाडीवाल्याला आपली गाडी थांबवायला सांगितली आणि तो खाली उतरून डबक्याजवळ गेला.चिखलातून त्याने त्या पिल्लाला बाहेर काढले आणि रस्त्यावर आणून ठेवले.तेव्हा ते तुरुतुरु पळत निघून गेले.मग लिंकन आपले हात साफ करून समाधानाने गाडीत येऊन बसला.
तेव्हा ज्या उतारुशी लिंकनचा वाद चालला होता, त्याने लिंकनला विचारले कि,"आता मला सांगा कि ह्या पिल्लाला तुम्ही त्या डबक्यातून बाहेर काढले यात तुमचा काय स्वार्थ होता/?"

त्यावर लिंकन एकदम उत्तरला ,"हा माझा अतिशय स्वार्थी हेतू होता .मी जर तसेच त्या त्या पिल्लाला डबक्यात राहू दिले असते तर त्याच्या आठवणीने माझा सबंध दिवस वाईट गेला असता.त्या मानसिक अस्वस्थ्यामधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी त्या पिल्लाला बाहेर काढले"

प्र के अत्रे.(विनोदगाथा)

लेखनविषय: दुवे:

Comments

तुलना

नवीन व जुन्या अभ्यासक्रमातील उतार्‍यांची तुलना करावयाची तर जुन्याबरोबर नवेही उतारे दिले पाहिजेत. नाही तर मला माझ्या काळातील उतारेच छान वाटणार.तर आता नवीन अभ्यासक्रमातील सुंदर उतार्‍य़ांची वाट पाहणारा,
शरद

आताचा अभ्यासक्रम

मझ्या मते असे नवे किंवा जुने उतारे ज्यांच्या जवळ असतील
त्यांनी ते इथे पोस्ट करावेत.म्हणजे तुलना अणि चर्चा दोन्हि करता येइल...

जुनी आणि नवीन पाठ्यपुस्तके

नवीन पाठ्यपुस्तकातील धडे परिणामकारक आहेत का? असा प्रश्न विचारताना त्याचे उदाहरण देण्याचे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला आवडणारी एक जुनी गोष्ट आपण आम्हाला सांगू इच्छिता एवढाच त्याचा अर्थ होतो.
चन्द्रशेखर

हेच वाटले

उदाहरण दिले तर समजायला सोपे जाईल.
मला सगळ्या विषयांचे माहिती नाही, पण हल्लीची विज्ञानाची पाठ्यपुस्तके मला तरी आमच्या वेळपेक्षा अधिक आवडली.
मराठी/ इंग्रजीचे माहिती नाही. बालभारतीची काही मराठी/ इंग्रजी बालवाडीची/पहिली/दुसरीची पुस्तके आमच्याकडे आहेत तीही चांगली वाटली.
प्राथमिक शाळेतील गणित इत्यादि विषयांत आमच्या वेळपेक्षा जरा अधिक सोपेपणा दिसला, पण ते नक्की सांगता येणार नाही, कारण मी ते मोठ्यांच्या नजरेतून आत्ता बघते आहे, आमच्या गणिताच्या पुस्तकाच्या आठवणी शिकतानाच्या आहेत.

सहमत आहे.

>>नवीन पाठ्यपुस्तकातील धडे परिणामकारक आहेत का? असा प्रश्न विचारताना त्याचे उदाहरण देण्याचे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला आवडणारी एक जुनी गोष्ट आपण आम्हाला सांगू इच्छिता एवढाच त्याचा अर्थ होतो.

सहमत आहे.

जुन्या अभ्यासक्रमाबरोबर नवीन अभ्यासक्रमही तितकाच चांगला आहे. पूर्वी एखादी 'कविता' किंवा 'धडा' शिक्षकानं शाळेत शिकविला की लक्षात राहात असायला त्याचे 'शिकवणे' हेच कारण असायचे.
त्याचबरोबर शाळेत शिकत असतांना 'गाइड'आणि 'अपेक्षीत' यांची ओळखही नसायची. आता असं झालंय की, मास्तर शाळेत कवितेचा अर्थ सांगतो एक आणि 'गाइडात' दुसराच अर्थ सापडतो. तेव्हा कविताही लक्षात राहात नाही आणि त्याचा अर्थही.[हा फक्त अपवाद हं] असो, बाकी शाळेतले शिक्षणात मजा असते.

अजूनही नव्या जुन्याचा संगम अभ्यासक्रमात आहे. फक्त तुमचा आमचा 'देखनेका नजरीया बदल गया है' उदा. आता इयत्ता चौथीच्या पुस्तकात 'पाऊस' नावाची शांता शेळके यांची कविता आहे. 'आजीचे घड्याळ' केशवकुमार (प्र.के.अत्रे) यांचीही कविता आहे. आणि या कविता पोरांच्या अगदी तोंडपाठ [मुखपाठ] असतात आणि त्याचा अर्थही ते समजून सांगतात. अर्थात त्यांचे लेखन पुस्तकात का यावर 'शांता शेळके आणि प्र.के.अत्रे' हे कविता लिहितात म्हणून त्यांच्या कविता पुस्तकात असतात अशी लहान मुलांची उत्तरे मला आवडतात. :)

महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमावर लिहायचं का ? चर्चा प्रस्ताव टाकणार्‍या लेखकाची परवानगी आहे का ? परवानगी दिली तर 'दोन रुपक कथा' या वि.स.खांडेकरांच्या धड्यावर अजून एक प्रतिसाद टंकीन.:)

-दिलीप बिरुटे

चर्चा प्रस्ताव

अर्थात!चर्चा प्रस्ताव टाकण्याचा मझा एवढाच उद्देश होता कि,
त्यातुन नव्या जुन्या सहित्याची ओळख होइल..आणि त्या निमित्ताने नवा अभ्यासक्रम
इतरांच्या समोर येइल.
नविन अभ्यासक्रम परिणामकारक नाहि असे माझे म्हणणे नाहिच.
कुणितरि नव्या साहित्यिकाचा अभ्यासक्रमातिल उतारा उदारहरण म्हणून द्यावा इतकेच.
तो महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमावर असला तरि हरकत नाहि.

आजही

पूर्वीच्या पाठ्यपुस्तकातील धडे किवा कविता या अतिशय प्रभावी आणि मनोरंजक असायचे..
तसेच ते मुलांच्या मनावर एक संस्काराचा ठसा उमटवून जात होते

पूर्वीच्या आणि आताच्या काळातील फरकाने असा समज होऊ शकतो. आजच्या पाठ्यपूस्तकातील उतारे, लेख, कविता माझ्यामते तितकीच आशयसंपन्न आहेत आणि नव्या पिढीच्या गरजांनुरुप संस्कार करणारेही आहेत. आतापर्यंतच्या चर्चेत तरी आजची शालेय पाठ्यपूस्तके वाचणारा कुणी सहभागी नसावे असे मला वाटते. परिणामी चर्चेचा प्रस्ताव वाचताच आपल्या शाळेत काय छानछान धडे होते. किती छान कविता होत्या यांचीच सर्वांना स्वाभाविक पणे आठवण होते, आणि आजची पाठ्यपूस्तके वाचली नसल्याचे विसरुनच पूर्वीचे तेच छान होते असे वाटून जाते.

पेस्ट करायला माझ्याजवळ उपलब्ध नाहीत पण काही नावे सांगतो. घरात कुणी या वर्गात शिकणारे असेल तर नक्की वाचून पहा. छान आहेत.

इयत्ता तिसरी (की चौथी ?) मराठी- नाव लक्षात नाही पण "महाराज आपल्या राज्यात ज्यांना मिळते ते पोटभर जेवून आणि ज्यांना मिळत नाही ते उपाशी राहून जगत आहेत. एकूण सगळे आलबेल आहे." असा संवाद असणारी एक छान नाटीका आहे.

एक कविता सुध्दा
पंख मला जर असतिल दोन
पतंग उडवित बसेल कोण.
मिच पाखरु झालो असतो
आभाळावर गेलो असतो.
विमान मागे पडले असते
हाय खाउनी रडले असते. (थोडी विस्कळीत...क्षमस्व)

तुमच्या कडे देशाला देण्यासाठी दहा मिनीटे आहेत काय. हा अब्दूल कलाम यांचा उतारा सहावीला आहे.

सहावीच्याच बालभारतीत रेल्वेस्टेशन वरची चुकामुक, मुदत संपलेल्या औषधींविषयी असे चांगले विचारप्रवर्तक सहजभाषेतले उतारे आहेत.

सातवी ला सहज सुचलेल्या कवितेची आर्या नावाच्या मुलीची सुंदर कथा आहे.

माझे मनोरथ अशा निबंधलेखनाची एक छान कथा सातवीला आहे. यात एका अपंग मुलाचे "मैदानावर धावण्याचे, धडाधड जिन्याच्या पायऱ्या उतरण्याचे" मनाला चटका लावणारे मनोरथ आहे.

नववी च्या पुस्तकात, तुझ्या कामामधून तुझ्या घामामधुन... हे वसंत बापट यांचे श्रमगीत.
सातवीतले बाई मी धरण बांधीते हे गीत, बिनभिंतींची शाळा, पावसात खंडाळा, यशवंत यांची आई ही कविता हे सगळे मुलांच्या वयानुरुप संस्कार घडवणारे, अभिरुचीला वळण लावणारे आहे. सगळेच चांगले असे मात्र नाही... तसे ते पूर्वी तरी कुठे होते.
असो . नुसते आठवून आठवून लिहिल्याने नेमकी पाठांची नावे देता आली नाहीत. चर्चा चालू राहीली तर ती तशी व अजूनही बरीच उदाहरणे देता येतील.

सातवीच्या बालभारतीतल्या कविता सुंदर चालींवर
http://marathimaitree.blogspot.com/2010/01/blog-post_10.html
येथे ऐकता येतील. मराठी कविता या लेबल खाली इतर शालेय कविता आहेत. (जाहिरात वाटल्यास क्षमस्व.)

 
^ वर