गवत्या साप

Bamboo pit viper
गवत्या

गवत्या साप अर्थात बांबू पीट व्हायपर (bamboo pit viper). फक्त भारतात आढळणारा विषारी साप. साधारण दोन-अडिच फुट लांब वाढणारा हा साप मला फणसाडच्या जंगलात दबा धरुन बसलेला दिसला!

-भालचंद्र!

लेखनविषय: दुवे:

Comments

डेंजर!

लय डेंजर फोटू आलाय.

डोळे वटारून, नाकपुड्या फुलवून आणि तोंड गच्च आवळून भयंकर रागाने कोणालातरी चावा घ्यावा अशा विचारांत असावा का काय असे वाटून जाते. ते हिरवेगार डोळे आणि निसर्गाने प्रदान केलेला हिरवट-पिवळा कॅमाफ्लॅज भारी आहे.

सहमत

लय डेंजर फोटू आलाय.

खरच. पाहता क्षणीच जरब बसते. :) मस्तच आला आहे फोटू.






छान

छान फोटो. याआधीचा हळद्याही आवडला होता.
सन्जोप राव
हुई मुद्दत कि 'गालिब' मर गया, पर याद आता है
वो हर इक बात पर कहना, कि यूं होता तो क्या होता

फोटो चांगला.पण..

फोटो जबराच आलाय.

>>गवत्या साप अर्थात बांबू पीट व्हायपर (bamboo pit viper). फक्त भारतात आढळणारा विषारी साप.

आपली माहिती बरोबरही असेल का ?

पण मला असे वाटते-
गवत्या साप हा विषारी नसतो.त्याचं इंग्रजी नाव आहे Green keelback
किंवा Grass snake.* आम्ही महाराष्ट्रीयन माणसं त्याला 'गवत्या साप' असे म्हणतो.
काही लोक त्याला 'हिरवो नाग' असेही म्हणतात. या सापाचे मुख्य खाद्य बेडूक, पाली आणि अजूनही काही असावे.
या सापाचा रंग हिरवा असतो. याच्या शरिरावरील खवले खूप सुंदर वाटतात. [पाहा एक जालीय दुवा ]
हा साप विषारी नसला तरी त्याचा दंश खूप दाहक असावा असे वाटते.

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वर्षाला एक-दोनदा तरी गवत्या सापाची भेट होते.
आम्हाला त्याला पकडण्याचे तंत्र माहित नसल्यामुळे तो जिवानिशी जातो.

*गुगलून पाहिल्यावर 'गवत्या सापाबद्दल' समाधान करणारे चित्र आणि माहिती मिळाली नाही. म्हणून इंग्रजी नावे खाडखोड केली आहेत.

-दिलीप बिरुटे

मस्त!

फोटो एकदम मस्त आहे!

बाकी तो जर समोर आला तर बिरुटेसर मी तो विषारी आहे का नाही याची चर्चा अथवा विचार करत थांबणार नाही :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

ओह्!

ओह्!!
कदाचित 'गवत्या साप' हे नाव चुकले असेल पण हा बांबू पिट वायपर आहे हे नक्की. तसेच बांबू पीट वायपर फक्त दक्षिण भारतात सापडतो आणि आणि तो विषारी आहे हे आम्हाला 'विकी' ने सांगितले!

-भालचंद्र
http://bspujari.googlepages.com/

बांबू पिट वायपरच.

>>>बांबू पीट वायपर फक्त दक्षिण भारतात सापडतो आणि आणि तो विषारी आहे हे आम्हाला 'विकी' ने सांगितले!
विकीने बरोबर सांगितले. :)

आपण काढलेला फोटू 'बांबू पिट वायपरच' आहे, गवत्या साप नाही.
''बांबू पिट वायपर विषारी साप आहे. त्याची मराठी नावं खालीलप्रमाणे.
हरानाग [वर्धा], चापडी [गोवा], कमका बोडाल [गडचिरोली],
आणि हिरवा घोणस.''

संदर्भ : 'साप' लेखक : श्री निलीमकुमार खैरे.[सर्पतज्ञ]
प्रकाशक
मिलिंद ल. परांजपे
ज्योत्सना प्रकाशन
धवलगिरी, ४३०-३१ शनिवार पेठ
पुणे ४११०३०
[मूल्य शंभर रुपये]

फोटो आवडला

सुरेख फोटो.
एखाद्या म्हातार्‍या आजीला जशी नातवंडांची थेरं चालत नाहीत आणि काही इलाज न चालल्याने गप्प तोंड आवळून काय चालले आहे ते पाहते तसा दिसतो आहे असे वाटले. ;)

लै भारी!

लै भारी फोटो..
तो साप बघुन सापांनाही राग वगैरे येतो (आणि मग ते डुख धरून बदला घेतात....) या कथांत तथ्य असावेसे वाटते ;)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

फार छान

"पिट" व्हायपरच्या नाकपुडीखालचा खड्डा स्पष्ट दिसतो आहे. पिट हीच फुललेली नाकपुडी वाटत असल्यामुळे साप भयंकर रागावलेला वाटला. पिवळा-हिरवा गवती रंग रंग मोहक म्हणावा की लक्षवेधक हेच कळत नाही.
मी स्वतः चित्र वेगळे कातरले असते.

वेगळे कातरलेले चित्र

मला वाटते की श्री. भालचंद्र यांच्या मांडणीमध्ये सापाचा डोळा हा चित्राच्या बरोबर मध्यावर आहे. झाडाची दांडी/पाने यांची "+"ची खूण बंदुकीचा नेम धरल्यासारखी चित्राच्या मध्ये घेणारी भालचंद्र यांची मांडणी धाडसी वाटते, प्रभावी आहेच.

चित्र कातरल्याने चित्रातली भावना किती बदलू शकते, हे दाखवण्यासाठी चित्र संगणकावर उतरवून संपादित केले. श्री. भालचंद्र यांनी सांगितल्यास प्रत संगणकावरून खोडून टाकेन. तरी श्री भालचंद्र चित्र ठेवण्याची अनुमती देतील अशी आशा आहे.

हो हो!

ऑफ कोर्स "अनुमती" आहे! :) ...
मलाही एकदा वाटून गेले होते की वरची रिकामी जागा काढून टाकावी पण मग विचार केला की जरा डोळ्याच्या वरती अवकाश असु द्यावे! पण मला तुमचे कंपोसिशनही आवडले!

धन्यवाद!

http://bspujari.googlepages.com/

मस्त

धनंजय मस्त कातरले हं चित्र..!

हा साप रागावला तर जोरजोरात शेपूट हलवतो आणि त्याच वेळी त्याचे तोंडही उघडे असते.
[माहिती संग्रहातून] याचे तोंड उघडे दिसत नाही. त्यामुळे हा रागावलेला नसावा.पण,सापाचे तोंड
लैच डेंजर आहे खरे. :)

-दिलीप बिरुटे

मस्त चित्र!

चित्र भारी आहेच. सापाच्या चेहर्‍यावरचे बारकावे आणि डेप्थ ऑफ फोकसचा छान वापर केला आहे.
धनंजयांच्या कातरण्याने अजूनच आवडले.

+१

मला वाटते की श्री. भालचंद्र यांच्या मांडणीमध्ये सापाचा डोळा हा चित्राच्या बरोबर मध्यावर आहे. झाडाची दांडी/पाने यांची "+"ची खूण बंदुकीचा नेम धरल्यासारखी चित्राच्या मध्ये घेणारी भालचंद्र यांची मांडणी धाडसी वाटते, प्रभावी आहेच.

+१
म्हणूनच मला कातरलेल्या चित्रापेक्षा मुळ चित्र आवडले.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

खतरनाक

फोटो फारच सुंदर आलाय. डोळे व चेहेरा अतिशय प्रभावी. कमी डेप्थ ऑफ फोकसमुळे आणखीनच मजा आली आहे.

धनंजयनी कातरला असला तरी मला मूळ मांडणी जास्त आवडली. एक तर त्यांनी म्हटल्याप्रमाणे थोड्या तिरकस + च्या आकाराची मांडणी होते व तिला एक घाट येतो. पण मला महत्त्वाची गोष्ट वाटली ती म्हणजे मूळ चित्रात डावीकडे बघणाऱ्या सापाचे डोळे फ्रेमच्या केंद्राच्या किंचित उजवीकडे आहेत - त्यामुळे ती नजर चित्रभर अधिक राहाते, आपल्या अंगावर काहीशी येते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हरणटोळ

पहिल्यांदा मला तो हरणटोळच वाटला!
मस्त आलाय फोटो!

 
^ वर