चष्मेबद्दूर

उपक्रमावर फॅशन नावाचा विषयच नाही. फॅशनशिवाय कुणाचे पान हलते असं पाहीलेलं नाही. यावेळेस काही फेमस चष्म्यांच्या फॅशन बघू.

लहानपणी डोळ्याजवळ पुस्तक धरलं, झोपुन वाचलं, फार टिव्ही पाहीला तर आई म्हणायची की सांभाळून चष्मा लागेल् . चष्मा लागला तर लग्न होणार नाही. शाळेत चष्मा लावणार्‍या मुलांना आम्ही बावळट म्हणायचो किंवा "फार अभ्यासू हं ढापण्या तू" असं म्हणून चिडवायचो.

लहान मुलांना चष्मे लागलेले पाहिले की मोठे म्हणायचे - "कसे होणार मोठेपणी? सोडावॉटरच्या बाटलीच्या काचा लावाव्या लागणार." चष्मे सावरत धावणारी पळणारी मुले बघितली की आजही वाइट वाटतं.

आजच्या जगात चष्म्याच्या सुरेख फ्रेम आणि काचा मिळतात कि अनेकांचा चष्मा हा ट्रेडमार्क बनलेला आहे. खालचे फोटो बघा किती कूल दिसतात -

काही प्रसिद्ध लोक चष्म्याशिवाय कसे दिसले असते याची कल्पना करता येईल का? त्यांचा चष्मा ही त्यांची ओळख ठरली आहे.

आता सांगा -

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?
२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?
३. चष्मा लावणार्‍या, सुंदर, स्मार्ट दिसणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात आणि आवडतात
?

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तरे

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?

होय. नाही. लहानपणी थोडेसे चिडवले असेल असे वाटते, पण स्पष्ट आठवत नाही. त्रास होण्याइतके चिडवले नाही.

२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?

होय/नाही. दोनेक वर्षांनी नवा चष्मा बनवतो. चष्म्याची फ्रेम विकत घेताना "कसा दिसतो?" हा विचार डोक्यात असतो. त्यात "फारच कंटाळवाणा/भडक दिसतो का? = अन्कूल दिसतो का?" हा विचार मनात असतो. फक्त फ्रेम बदलण्यासाठी नवीन चष्मा घेत नाही. पण आदली फ्रेमही कूलच वाटत असते, असा अनुभव आहे. त्यामुळे "आजची फ्रेम कूल वाटली नाही तर चष्मा बदलीन का?" याबाबत अनुभव नाही, अशा परिस्थितीत कसा वागेन हे सांगता येत नाही.

३. चष्मा लावणार्‍या, सुंदर, स्मार्ट दिसणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात आणि आवडतात?

नाही आठवत. पण ओळखीच्या व्यक्तीने चष्मा घातला नाही, तर त्यांचा चेहरा थोडासा अनोळखी वाटतो. त्या अर्थी जे लोक चष्मा घालतात, आणि आवडतात, त्यांच्या चेहर्‍याच्या देखणेपणात (माझ्यासाठी) चष्मासुद्धा एक घटक असला पाहिजे, अशी खात्री वाटते.

माझी उत्तरे...!

>>तुम्ही चष्मा लावता का?
आहे. पण लावत नाही.
>>तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का?
हो. चष्म्यामुळे [ भारी लूक आणि महागडी फ्रेम घेऊन सुद्धा] मी आहे त्याच्यापेक्षा कै च्या कै दिसतो असा माझा समज आहे. [अर्थात हा चष्म्याच्या दोष नाहीच असे मला आता पटू लागले आहे] :)
>>कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात आणि आवडतात?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

अवांतर : स्त्रियांना चष्म्याची कोणतीही फ्रेम चांगला दिसते असे माझे निरिक्षण् आहे.

-दिलीप बिरुटे
[चष्मेबद्दूर]
Image1273

मजेशीर धागा

अवांतर : स्त्रियांना चष्म्याची कोणतीही फ्रेम चांगला दिसते असे माझे निरिक्षण् आहे.

अगदी ही फ्रेम देखिल का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

भूभूला चष्मा

मध्यंतरी बाप्पाला स्वेटर मग त्यावरून भूभूला स्वेटर वगैरे धागे प्रसिद्ध झाले होते. तसाच एक फोटो मिळाला -

उत्तरे:

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?

नाही. सध्या खूप दूरचे दिसत नाही अशी तक्रार होती पण डोळे तपासनीसाने ती निकालात काढली.

२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?

लागला की बघेन. फॅशन बदलत राहेन का सांगता येत नाही पण जी फ्रेम घेईन ती प्रचलित फॅशनची घेईन.

३. चष्मा लावणार्‍या, सुंदर, स्मार्ट दिसणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात आणि आवडतात?

बीटल्स फेम जॉन लेनन

कालच एका चित्रपटात अक्षय कुमारला चष्मा लावून पाहिले (भूल भुल्लय्या) बरा दिसत होता. ;-)

शबाना आझमी आणि चाळीशी

शबाना आझमीची व्हेरिलक्सची जाहिरात छान आहे. मस्त हिरव्या कुड्ता घातलेली शबाना म्हणते....

‘Its great to go single after 40’

गौरी

चष्मा/फॅशन

टिंकरबेल यांनी हे प्रश्न विचारले आहेत, पण स्वतःची उत्तरे सांगितली नाहीत.. !

असो.

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?
होय, लांबचे पहायला चष्मा लागतो. नाही. लाज पूर्वी लहान असताना वाटत असे. अनोळखी मुले अतिशय बेदरकारपणे शाळेतून घरी येताना " चष्मिस, चारडोळे" अशा मूर्ख हाका मारत. काही मोठी माणसेही मुद्दाम सर्वांसमोर, "ए, चष्मा घाल" असे म्हणून चष्मा असल्याची मला आणि इतरांना जाणीव करून देत. आता त्यांचे हसू येते, तेव्हा अतिशय वाईट वाटे.

२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?
चष्म्यांच्या फ्रेम्स ह्या बर्‍याच अंशी चेहरा नीट दिसावा यासाठी उपयुक्त असतात. मी ज्या काळात चष्मा लावायला लागले तेव्हा चेष्टा होई, त्याचे एक कारण तेव्हा फ्रेम चांगल्या नसत. प्रकर्षाने रंगावर उठून दिसणार्‍या, जाड काड्यांच्या असत. आता तो प्रश्न नाही, याचा माझ्यासाठी नाही, पण ज्या लहान मुलांना चष्मा लवकर लावावा लागतो अशांसाठी आनंद होतो.

३. चष्मा लावणार्‍या, सुंदर, स्मार्ट दिसणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात आणि आवडतात?
असे लक्ष जात नाही. ते चष्म्यावर नाही, तर इतर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते असे वाटते.

माझी उत्तरे

१. मला नुकताच चष्मा लागला. नवरा सोडून दुसरे कोणी चिडवलं नाही हं.

२. मी डिकेएनवायची $२५० खर्चून फ्रेम बनवली दुसरी फ्रेम बनवण्याचा पुढले काही वर्षे विचार करणार नाही. ही फ्रेम् फॅशनेबल आहे.

३. वर दिलेले आहेत.

सही

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?
हो. नाही. नाही. लहानपणी नाही काही वर्षांपुर्वी लागला (म्हणून बहुतेक) लोकांनी कौतुकच केले आहे.
डोळस्, बॅटरी, ढापण्या, चार डोळे हे शब्द विशेष आठवतात म्हणजे मी मात्र लहानपणी कोणाला तरी चिडवले असणारच.
२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?
दर दीड ते दोन वर्षांनी दोन नवे चष्मे बदलतो.
३. चष्मा लावणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात ?
वॉरन बफेट, स्टिव्ह जॉब्स, बिल गेट्स
इंदीरा गांधी, अब्दुल कलाम आझाद, आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर
क्लार्क केंट, पिटर पार्कर, हॅरी पॉटर (हरकत नसल्यास)

आणि हो, सॉरी विसरलोच होतो की हे मराठी संकेतस्थळ आहे त्यामुळे
हे घ्या प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज देखील हो जगप्रसिद्ध आहेतच पण खूप खूप आवडतातही

माझे दोन डोळे...

१. तुम्ही चष्मा लावता का? तुम्हाला तुमच्या चष्म्याची लाज वाटते का? लोकांना तुम्हाला चष्म्यावरुन चिडवले आहे का?
हो. लाजपेक्षा कटकट जास्त होते. हो खूप. लहानपणीच लागला - बॅटरी, ढापण्या, इ.
२. तुम्ही कूल दिसण्यासाठी चष्म्याची फॅशन बदलता का?
लहानपणीच्या फ्रेम्स माझ्या वडलांच्या चष्म्यासारख्या होत्या. जड, जाड वगैरे. जेव्हा केव्हा बदलल्या तेव्हा जरा जास्त चांगल्या दिसणाऱ्या घेतल्या. पूर्वीचे काही फोटो बघवत नाहीत. सध्याची फ्रेमही हलकी सुटसुटीत पण थोडीशी फॅशनेबल (तीन वर्षापूर्वीची, त्यामुळे आताच्या जरा जाडसर, ठसठशीत व थोड्या विचित्र आकाराच्या फ्रेम्सपुढे कालबाह्य). चष्मा असल्यामुळे मला चांगल्या कूल शेड्स वापरता येत नाहीत याचं दु:ख थोडंसं वाटतं. पण दोन वेगवेगळे घेऊन ते सांभाळण्याचा त्रास अधिक वाटतो. अॅंटी रिफ्लेक्शन कोटींगमुळे डोळे अधिक स्पष्ट दिसतात असं लक्षात आलेलं आहे. तसंच फोटोक्रोमॅटिकमुळे सोय होते व थोडंसं गॉगल्स लावल्याचं समाधान मिळतं. बाकी सोडावॉटरचा जमाना आजकालच्या हाय रिफ्रॅक्टीव्ह लेन्समुळे गेला.
३. चष्मा लावणार्‍या कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला आठवतात ?
चष्मा लावण्यामुळे नाही. गांधी मात्र चष्म्याशिवाय कल्पनाच करू शकत नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

^ वर