बाबुल मोरा
बाबुल मोरा
"अर्थो हि कन्या परकीय एव " असा खिन्न उद्गार प्रत्येक भारतीय पित्याला काढावा लागत होता. फार पुरातन काळीही कण्वासारख्या ऐहीक संसारातून बाहेर पडलेल्या, अरण्यात आश्रम स्थापन करून, परमार्थकडे लक्ष लावलेल्या, सर्व सुखदु:खे समान मानणार्या एका ऋषीलाही आपली मानसकन्या सासरी जाणार म्हटल्यावर कढ आवरेनात. सर्वसामान्य माणसाला, आपल्या छोटाश्या संसारातील लाडकी लेक तीच्या घरी जाणार म्हटल्यावर दु:ख अनावर व्हावे हे सहाजीकच आहे. पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे लेकीचे बापावरील गाढ प्रेम.माय लेकींच्या प्रेमापेक्षा या प्रेमाची जात वेगळीच. नाही म्हटले तरी उद्या लेक सासरी जाणार म्हणजे तीला तिथे जांच होऊ नये म्हणून "वळण" लावणे, घरादाराची कामे जबाबदारीने पेलता यावीत या करता चार गोष्टी शिकवणे, त्या तीच्याकडून करवून घेणे ही सर्व कामे आईवरच पडतात व लाड करावयाचे दिवस संपले हे सत्य झेलावेच लागते. बापाचे तसे नसते. उलट " उद्या ही सासरी जाणार, आज काय करावयाचे ते करूं दे " असेच तो म्हणतो व याचा परिणाम म्हणजे लेक दाराबाहेर पाऊल टाकतांना म्हणते
बाबुल मोरा पीहर छुटो ही जाए..
बाबुल मोरा पीहर छुटो ही जाए !
चार कहार मिल मेरी डोलिया सजाए
मोरा अपना बेगाना छुटो जाए !
बाबुल मोरा...
अंगना तो पर्वत भयो ड्योढी भई बिदेस
ले बाबुल घर आपनो मै चली पियाके देस !
बाबुल मोरा ....
(पीहर.. माहेर, कहार .. डोली वाहणारे, अपना बेगाना .. आपले परके, ड्योढी..देहरी.. उंबरठा, बिदेस.. परदेश,)
मुलगी म्हणते आहे " बाबा, माझे माहेर तुटले कीं हो ! हे चार डोलीवाले, डोली चांगली सजवत आहेत, पण आता आपले-परके असा भेद
करावयास काही उरलेच नाही, आपणातून उठून परक्यांत जायचे म्हणजे माझ्यापुरते आपपरभाव संपलाच कीं ! हे माझे लहानपणापासूनचे खेळावयाचे साधे अंगण, ते आता दुर्गम पर्वत झाले आणि हा लहानसा उंबरठा, तो तर आपले घर परदेश झाले आहे याचीच खूण ठरणार.बाबा, आता आपले घर तुमचे, मी, मी तर चालले प्रियकराकडे ! ".
शेवटचा मोगल बादशहा जफर याला इंग्रजांनी दिल्लीतून उचलून पार देशाबाहेर हद्दपार केले. त्याला जेंव्हा घरची आठवण यावयाची तेव्हा तो फार उदास होई व त्यावेळी त्याने रचलेली ही रचना. ही भैरवी अनेक गायक गातात व कुंदनलाल सैगलने देवदासमध्ये त्याच्या दर्दभरी आवाजात अमर करून सोडली आहे. जफरच्या दुसर्या एका गझलेतील , " लगता नही है दिल मेरा उझडे दयारमें " हीच आर्तता दुसर्या रूपकाद्वारे व्यक्त केली आहे.
शरद
Comments
पीहर का नैहर
रसग्रहण नेहमीप्रमाणेच सुरेख...!
माहेर् सोडतांना लेकीच्या भावना अनेक गीतांमधून सुंदर व्यक्त झालेल्या दिसतात.
फक्त 'पीहर' या शब्दाऐवजी 'नैहर' असा शब्द आहे असे वाटते.
पाहा दुवा क्रमांक एक. दुवा क्रमांक दोन.
अर्थात 'पीहर' आणि 'नैहर' याचा अर्थ 'माहेर' असेल तर आमची कोणतीच हरकत नाही. :)
-दिलीप बिरुटे
पीहर
पीहर <===> WIFE\'S MATERNAL HOUSE
पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर पीहर
छान.
मस्त लिहिलंय शरदराव.
ह्या गाण्यासंबंधी मी इथे काही लिहिलंय.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
हेच आठवले
हेच आठवले - दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद धनंजय!
:)
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मस्त
रसग्रहण नेहमीसारखेच छान.
बिरुटेसरांनी दिलेले दुवेही माहितीपूर्ण.
अवधाचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह याने हद्दपार झाल्यानंतर केलेली रचना आहे, हे कळल्यामुळे वेगळा अर्थ कळला.
अर्थात नेमकी कशापासून ताटातूट होत आहे, ते कवीने गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे रचना आर्त असली तरी सार्वकालिक होते.
माहेर सोडणार्या नवविवाहितेचा क्लेश शरदरावांनी खुलवून सांगितलाच आहे.
ही कविता प्रत्येक श्रोत्याच्या जिव्हारी लागण्याचे कारण मात्र हे - ज्या गोष्टीची-माझी ताटातूट झालेली आहे, त्याची आठवण मला देण्यात काव्य सफल होत आहे. (गाणे समर्थ गायकांनी गायलेले आहे. सुरांनी ती करुण भावना माझ्या आठवणीत जागवण्यात त्यांचे यश आहे.)
"सजवलेल्या डोलीतून चार जणांनी वाहून नेलेली वधू" ही उपमा फुलांनी मढवलेल्या तिरडीवर वाहून नेलेल्या शवाकरिता कबीराने एका रचनेत वापरलेली आहे! सापडले, तर उद्धरण देतो.
या रचनेत अशी आध्यात्मिक अर्थनिष्पत्ती होऊ शकेल का? असा विचार करतो आहे.
दुरुस्त
(१) नैहर.. ध्वनिमुद्रिकेत नैहर आहे व त्याचा अर्थही माहेरच आहे. द्वाढी -देहरी सारखेच नैहर-पीहर. माझ्याकडील पुस्तकात द्वाढी-पीहर असल्याने तसे लिहले. काय होते, विशेषत: शास्त्रीय संगितात, पाठभेद भरपूर असतात व कित्येकदा शब्दही नीट कळत नाहीत. त्यामुळे लेखी चीज जास्त अचूक असावी असे समजतो. या गाण्यातही पं. भीमसेनजी यांचे शब्द थोडे निराळे आहेतच.
(२) चीज आसिद अलि खान यांची दिसते. माझ्याकडील जुन्या पुस्तकात जफरच्या नावार दिली आहे. पण ते चूक आहे असे दिसते. दोहोंच्या बाबतीत परदेशी वास्तव्य नशीबात लिहलेले असल्याने दोघांच्या भावना एक असणे स्वाभाविक आहे. दिलगीर आहे.
(३) श्री. प्रमोद देव यांचा लेख वाचून खुष झालो. आता पंडितजींच्या शेजारी बसून गाडीतला प्रवास व त्यांचा निकट संबंध आम्हा अभाग्यांच्या वाटेला कोठून येणार ? पण तरीही त्यामुळे एक जूनी आठवण जागृत झाली. १९५६ सालची गोष्ट. सदाशिव पेठेत रहात होतो व एसपी मधील ४-५ तास सोडले की भरपूर वेळ मोकळा असे. त्या वेळी तेथील फ़्रेंड्स म्युझिक सेंटर मध्ये ४ आणे देऊन एक ध्वनीमुद्रिका एकावयास मिळे. तिघेचौघे मिळून एखादा रुपया जमला की ३-४ गाणी ऐकण्याची चंगळ करत असू. एकदा तिथे बसंतबहार मधील केतकी गुलाब जुही ऐकत असतांना खाली रस्त्यावरून पंडितजी जाताना दिसले. आमच्यापैकी एकाने टणकन खाली उडी मारली व त्यांना म्हणाला, " पंडितजी, आम्ही आपलेच गाणे ऐकत आहोत, तुम्ही चला ना ". पंडितजी जरासे घुटमळले पण २ पायर्या चडून वर दुकानात आले. आम्ही परत ती ६ मिनिटांची ध्वनीमुद्रिका ऐकली. पंडितजींच्या शेजारी बसावयाचे भाग्य एकदा मिळाले. पुढचा भाग खास सदाशिवपेठी. गाणे संपल्यावर त्यांच्या बरोबर खाली उतरलो व मित्राने त्यांना प्रश्न विचारला, " का हो, मन्ना डेला शास्त्रीय संगीत येते का ? " त्यांनी जरा रोखून मित्राकडे पाहिले, त्याला संगितातले काही कळत नाही याचा अंदाज घेतला आणि तरीही प्रसन्नतेने सांगितले "अर्थातच येते ". आम्ही निरोप घेऊन नशेतच २ पायर्या चढून दुकानात आलो व आम्हाला दुसरा आश्चर्य़ाचा धक्का बसला. मालक श्री. केतकर यांनी दुसर्या गाण्याचे आठ आणे घेण्याचे नाकारले ! एक संध्याकाळ अगदी सुनहरी होऊन गेली.
शरद
वा,शरदराव!
तुम्ही तर खरे नशीबवान. :)
जे प्रत्यक्षात नाही ते निदान स्वप्नात तरी पाहता/अनुभवता येते...हेही माझ्यासारख्यासाठी नसे थोडके.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
व्वा !
व्वा ! काय सुरेख आठवण.
-दिलीप बिरुटे
[शरद यांचा चाहता]
पैसा वसूल ! ४११०३० जिंदाबाद !!!
पैसा वसूल ! ४११०३० जिंदाबाद !!!
बाकी भाग्यवान आहात शरदराव. आणि थेट तुमच्याकडून ही आठवण आमच्यापर्यंत आली. आम्हीही भाग्यवानच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
परत एकदा क्षमायाचना
कै. सैगल यांनी हे गाणे "स्ट्रीट सिंगर" मध्ये गायले होते.
शरद