तर्कक्रीडा:७८/८९:लैला-शैला/शुक-बक

तर्कक्रीडा:७८/७९: नीलद्वीपावरील यक्ष-गंधर्व
हिंदी महासागरातील नीलद्वीपावर यक्ष आणि गंधर्व हे स्थानिक रहिवासी आहेत.यक्ष सदा असत्य तर गंधर्व सदा सत्यच बोलतात;हे तुम्हाला ठाऊक आहे.पण या बेटावरील काही यक्ष सुजाण असून काही हंभ्रमी आहेत.तसेच गंधर्वांतही सुजाण आणि हंभ्रमी आहेत.
सुजाण व्यक्तीला कोणत्याही प्रश्नाचे सत्य उत्तर प्रतीत होते. प्रश्नाचे जे खरे उत्तर आहे ते नाही, असे हंभ्रमीला प्रतीत होते.हंभ्रम झाला तरी सत्यासत्यकथनाचा मूळ गुणधर्म लोप पावत नाही. तो तसाच राहातो.मात्र ज्याला जे प्रतीत होते तेच त्याचे सत्य असते.
समजा नीलद्वीपावरील स्थानिकाला एक लाल रंगाचे फूल दाखविले आणि प्रश्न केला:
"या फुलाचा रंग लाल आहे का?" तर:
सुजाण यक्ष ’नाही’ असे उत्तर देईल......(फूल लाल आहे हे समजते.खोटे बोलतो)
सुजाण गंधर्व "हो" म्हणेल......(फूल लाल दिसते.खरे बोलतो)
हंभ्रमी यक्षाला लाल फुलाचा रंग लाल नाही असे प्रतीत होईल.पण असत्यकथन गुणधर्मामुळे तो "हो" असे उत्तर देईल.
हंभ्रमी गंधर्वाला फुलाचा रंग लाल नाही असे प्रतीत होईल.सत्यकथन करीत असल्याने तो "नाही" असे उत्तर देईल.
********************
तर्कक्रीडा:.७८: लैला आणि शैला:
या नीलद्वीपावर एक तर्कशास्त्री गेले.त्यांना यक्ष-गंधर्वांविषयी वरील सर्व ठाऊक होते.त्यांना तिथे लैला आणि शैला नावाच्या दोन मैत्रिणी भेटल्या.(त्यांच्या नव्हे, एकमेकींच्या!) त्यांतील एक यक्षकन्या तर दुसरी गंधर्वतनया होती.त्यांच्या सुजाणतेविषयी कांही ठाऊक नाही. पुढील संवाद झाला.
तर्कशास्त्री: तुम्ही तुमच्या विषयी काही सांगा.
लैला: मी गंधर्वधर्मी आहे.
शैला: मी सुद्धा गंधर्वतनयाच आहे.
लैला: शैला सुजाण आहे.
तर यक्षकन्येचे नाव निश्चित करा.
********************
तर्कक्रीडा:७९:शुक आणि बक
नीलद्वीपावर शुक आणि बक हे दोन स्थानिक तरुण परस्परांचे मित्र आहेत.त्यांतील एक यक्ष तर दुसरा गंधर्व आहे.त्यांची सुजाणता/हंभ्रम याविषयी काही ठाऊक नाही. त्यांनी पुढील विधाने केली:
शुक:आम्ही दोघेही हंभ्रमी आहोत.
बक: शुकाचे विधान खोटे आहे.
तर यक्ष कोण शुक की बक?
***********************
(उत्तर कृपया व्यनि. ने. पर्याप्त युक्तिवाद अपेक्षित.)
........................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

मूलस्रोत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्यांचा मूलस्रोत द्यायचे राहून गेले.
ही दोन्ही कोडी प्रा.रेमंड स्मुलियन यांच्या "द लेडी ऑर द टायगर?" या पुस्तकांतील प्रश्नांवर आधारित आहेत.

व्यंइ. उत्तरः१

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांनी दोन्ही कोड्यांची अचूक उत्तरे कळवली आहेत. त्यांनी लिहिलेले युक्तिवादही मित शब्दांत पण पर्याप्त आहेत. धन्यवाद!

व्यनि. उत्तरः२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेश घासकडवी यांनी उत्तरे कळविली आहेत. दोन्ही उत्तरे अचूक आहेतच. त्यांनी सहज पटणारा प्रभावी युक्तिवाद थोडक्या शब्दांत लिहिला आहे. धन्यवाद!

व्यनि.उत्तरः३

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शैला-लैला आणि शुक-बक ही दोन्ही कोडी सोडवण्यात श्री.सुनील हे यशस्वी ठरले आहेत. अभिनंदन!

व्यनि.उत्तरः४

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अक्षय यांनी दोन्ही कोड्यांची अचूक उत्तरे कळविली आहेत. शुक-बक कोड्यासंदर्भात त्यांनी पुढीलप्रमाणे सुचवले आहे:-
प्रेषक: अक्षय
विषय: तर्कक्रीडा ७९ सुचवणूक
दिनांक: शुक्र, 03/12/2010 - 00:33

शुक: आम्ही दोघेही सुजाण आहोत.
बक: शुकाचे विधान खोटे आहे.
तर यक्ष कोण शुक की बक?
अधोरेखित बदल केल्यास कोडे अधिक रोचक होईल असे वाटते.

हंभ्रम शब्दाविषयी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हंभ्रम शब्द "अहं ब्रह्मास्मि|" या वचनावरून बेतला आहे.या मंत्राचा निदिध्यास घेतला की "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या" वाटू लागते.
म्हणजे जे वास्तव आहे,जिथे कोट्यवधी वर्षे उत्क्रांत होत निर्माण झालेला मानव पिढ्यान् पिढ्या राहातो, भविष्यात काय प्रगती करायची याचे नियोजन करतो, तो हा इहलोक खोटा, आणि जो केवळ काल्पनिक आहे,जो प्रत्यक्षात असण्याची सुतराम शक्यता नाही तो परलोक खरा असे विपरीत ज्ञान म्हणजे हंभ्रम होय.
जे खरे आहे ते हंभ्रमी व्यक्तीला खोटे वाटते तर खोटे असते ते खरे वाटते.

रोचक पण

"अहं", "ब्रह्मन्", आणि "अस्मि" शब्दांच्या व्याख्या गुलदस्त्यात आहेत. हीच तर गडबड आहे.

म्हणून "अहं ब्रह्मास्मि" हे वाक्य तार्किकदृष्ट्या प्रत्यक्षज्ञानाच्या विरोधात आहे, की नाही, असे कळून येत नाही.

वाक्य संदिग्ध आहे, हे खरे. आणि लोक वेगवेगळे व्याख्या/अर्थ सांगतात ते अर्थ कित्येकदा परस्परविरोधी आहेत असे दिसते.

"मिती/माया/मोजमाप (=मायेने जाणलेले जगत्) हे प्रत्यक्षज्ञान नाही (मिथ्या )" या अर्थाने
"जगन् मिथ्या" हे वाक्य ठीक वाटते. हे तत्त्व सामान्य वापरात आहे.

मात्र "ब्रह्म सत्य" म्हणजे काय ते सहज कळत नाही.

असो. "अहं ब्रह्मास्मि"चे अनेक बुवांकडून असेच काही विवेचन दिसते : प्रत्यक्ष-ज्ञानही मिथ्याच आहे. {"अहम्" लौकिकार्थापेक्षा वेगळे असे काही समजावून सांगत नाहीत. लौकिकार्थातील} "अहम्" हाच शाश्वत सत्य आणि ब्रह्म असल्याचे सांगतात. या बुवांचे वागणे मात्र त्यांच्या बोलण्यापेक्षा वेगळे जाणवते. त्यावरून माझा असा कयास आहे ती त्या बुवांच्या सांगितलेल्या अर्थाने तरी ते वाक्य भ्रामक आहे.

असो. व्युत्पत्ती रोचक आहे. बर्‍याचशा बुवांच्या वागण्या-बोलण्यातील तफावतीला लागूसुद्धा आहे. पण...

वास्तवाशी संबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितात,:""मिती/माया/मोजमाप (=मायेने जाणलेले जगत्) हे प्रत्यक्षज्ञान नाही (मिथ्या )" या अर्थाने
"जगन् मिथ्या" हे वाक्य ठीक वाटते.

व्याकरणदृष्ट्या असा अर्थ सिद्ध करता येईल.पण हे वाक्य जाणणारे बहुसंख्य लोक त्याचा काय अर्थ घेतात या वास्तवाशी आपला संबंध आहे.
"धर्माचा खरा अर्थ कोणाला समजतच नाही. धारयति इति धर्मः|समाजाला एकत्र धरून ठेवतो तो धर्म" असे काहीजण सांगतात. पण संकष्टीला उपास , अंगारकीला गणपतीच्या देवळासमोर रांगा , गुरुवारी"दत्त दत्त ऐसे ध्यान ,शनिवारी रुईच्या पानांची माळ,सोमवारी बेलाची पाने ,मंगळवार/शुक्रवारी"माते दुर्गे तुझाच गे मी',गणेश चतुर्थीला'सुखकर्ता दुखहर्ता'
अशी अनेक कर्मकांडे म्हणजे धर्म असे किमान ८०% हिंदुधर्मी मानतात.
तसेच "हे जग म्हणजे सगळी माया आहे,भास आहे" अशीच संतांची शिकवण आहे. बहुसंख्य धार्मिक असेच मानतात.

 
^ वर