विपशना ध्यान

२००२-०४ कालात फिरतीच्या नोकरीमुळे माझे सर्वच व्यवहार अनियमीत झाले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणी मला थ्रांबोसीस मुळे आय सी यु मध्ये जावे लागले. सुदैवाने आयुष्याची दोरी बळकट असल्याने मी सुखरुप बाहेर पडलो. मात्र मला नियमीत पणे दर तीन महिन्याने लिपिड प्रोफाईल करावे लागे. नागपुर चे माझे हेमेटेलोजीस्ट नी मला सांगीतले कि तुम्ही आपली लाईफ् स्टाईल बदलुन नियमीत व्यायाम, फिरणे व आहाराची नीट काळजी घेतली तर तुमचे रक्त नॉर्मल होण्यास पाच वर्षे लागतील. हे ऐकुन मी जरी हादरुन गेलो असलो तरी त्यांनी सांगीतलेली दिनचर्या मी काटेकोर पणे पाळु लागलो.

या काळात माझ्या एका वरिष्ठ् सहकार्‍यानी मला एका विदेशी साधकाने लिहिलेले आर्ट् आफ लिवीग हे विपश्यने बद्दल माहिती देणारे पुस्तक वाचावयास दिले. त्यानी मी इतका प्रभावीत झालो की मी ताबडतोब इगतपुरी ला शिबीरात जाण्याचा निर्णय घेतला. विपश्याने ची दिक्षा इगतपुरीला घेतल्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार मी रोज एक तास ध्यानाला बसत असे. त्यानंतर अंदाजे ६ महिन्यानंतर मी जेंव्हा पुन्हा लिपीड प्रोफाईल केली तेंव्हा माझा रीपोर्ट नोर्मल बघुन माझे हेमेटोलोजीस्ट देखील चकित झाले आणी मी विपश्यनेच्या प्रेमात पडलो. त्यानंतर् मी त्यांचे पुन्हा २ शिबीरे केली व एक एडव्हान्स कोर्स 'सतिपट्ट्न' देखिल केला.

दहा दिवसांची दिनचर्या म्हणजे सकाळी ४.३० ला उठणे व ६ वाजता पैगोडा मध्ये ध्याना ला बसणे. एका पैगोडामध्ये अंदाजे ३०० लोक असतात पण तेथे टाचणी पडलेली ऐकु येइल इतकी शांतता असते. सकाळी ४.३० ते रात्री ९ वाजता झोपायला जाणे या दर्म्यान चहा नाश्ता, जेवण व संध्याकाळचा फलाहार ची वेळ् सोडल्यास रोज १० तास ध्यान करवुन घेतल्या जाते. पहिले तीन् दिवस असह्य होतात पण तिसर्‍या दिवशी विपश्यनेची दिक्षा देतात. व त्यानंतर विपश्यना रोज १० तास अशि करवुन घेतात. तेथे इतर काहिच काम नसल्याने व कुणाशी बोलण्याची बंदी असल्याने ध्याना शिवाय दुसरा पर्याय नसतो. पण अकराव्या दिवशी मात्र आपण उल्हसीत असतो व एक वेगळीच अनुभुती होते.

या बाब शिबीरासंबंधी अधिक माहिती या ठीकाणी उपलब्ध आहे. ११ दिवस वेळ काढु शकणार्‍यांनी आणी मनःशांती ची इछा असणार्‍यांनी अवश्य जावुन यावे. तेथिल १० दिवसांची व्यवस्था ही बिनामुल्य आहे हे विशेष. शेवटच्या दिवशी आपण आपल्या ऐपतीनुसार देणगी देउ शकता.

लेखनविषय: दुवे:

Comments

असेच

माझ्या दोन स्नेह्यांनी काही महिन्यांपूर्वीच या विपश्यना शिबीराचा लाभ घेतला आहे. त्यांचे अनुभवही असेच आहेत.

स्वानुभवाचे बोल लिहा

बाबासाहेब,
आपले स्वानुभवाचे बोल लिहा ना.
इतरांचे ठीक आहे. आपण केंव्हा जाणार
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

 
^ वर