लेखांचा क्रम, मुख्यपृष्ठ इ. विषयी प्रश्न

१. लेखांच्या यादीत मला कायम प्रकाशनाच्या वेळानुसार लेख दिसतात. मी 'शेवटचे लिखाण' वर टिचकी मारून त्यानुसार सॉर्ट करण्याने काहीही फरक पडत नाही. हे बदलता कसे येईल?

प्रश्न विचारण्याचे कारण असे की नुकतेच सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या कोड्याचे उत्तर दिले. ते सोडवण्यासाठी त्यांनी काही दिवसांचा अवधी दिला होता. सुदैवाने त्या अवधीत - सुमारे दहा दिवसात फारसे लेख चर्चा न आल्याने मला मूळ यादीत त्यांनी टाकलेला प्रतिसाद नवीन असलेला दिसला. पण समजा दुर्दैवाने वीसपेक्षा जास्त लेख आले असते तर त्यांना नवीन धागा टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हते. उपक्रमवर दहा दिवसात वीसपेक्षा जास्त लेख येणं हे दुर्दैव वाटावं अशी रचना का आहे? का मी काही चुकीचे करतो आहे?

२. मुख्यपृष्ठावर कायम जुने लेख असतात. यामुळे नवीन येणाऱ्यांना इथे काही घडत नाही असं वाटण्याची शक्यता आहे. हे सांगणारा मी पहिला नसावा, असं वाटतं. मुखपृष्ठ ताजं राहाण्याबाबत उपक्रमी व उपक्रमच्या संपादकांची मतं जाणून घ्यायला आवडेल. पुन्हा - का मी काही चुकीचे करतो आहे? हा प्रश्न आहेच. तसे असल्यास जाणत्यांनी कळवावे.

धन्यवाद
राजेश

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

उपक्रमवर दहा दिवसात वीसपेक्षा जास्त लेख येणं हे दुर्दैव वाटावं अशी रचना का आहे?

म्हणजे नेमके काय?
उपक्रमावर लेखांच्या संख्येपेक्षा आशय, लेखन धोरण,गुणवत्ता याला अधिक महत्व आहे. कालच भुर्जपत्र ते वेबपेज या कार्यक्रमात उपक्रम या संकेतसथळाचा खरोखर चांगला उपक्रम अशी दखल घेतली आहे. माझे कडे वृत्तांत तयार आहे पण ४५ एम्बी ची फाईल ईस्निपवर १०० टक्के अपलोड झाल्यावर failed to upload file publish failed suspected copy right infringement upload denied असा संदेश येतो. पुर्वी ही येत होता नंतर कधी कधी जात असे. त्यामुळे आत्ता तो कार्यक्रम आपल्याला ऐकता येणार नाही दुसरी काही सोय असल्यास सांगा. (म्हणजे चकट फु.)
उपक्रपंतांनी थोडे सक्रिय व्हावे. आम्हाला थोडे तांत्रिक सक्षम बनवल्यास काही भार हल्का होईल.
प्रकाश घाटपांडे

खुलासा

उपक्रमवर दहा दिवसात वीसपेक्षा जास्त लेख येणं हे दुर्दैव वाटावं अशी रचना का आहे?

म्हणजे नेमके काय?

जर त्या दहा दिवसात वीसपेक्षा जास्त लेख आले असते तर सहस्रबुद्धेंनी त्यांच्या धाग्याला दिलेलं उत्तर मला दिसलं नसतं. कारण ते मागच्या पानावर गेलं असतं. यासाठी त्यांना नवीन धागा काढायला दुर्दैवाने काढावा लागला असता. जुन्या, चांगल्या लेखावर कोणी नवी प्रतिसाद टाकला, तर तो दिसणं अशक्य आहे - अशक्य नाही, पण त्यासाठी दररोज सगळी पानं बघत राहावी लागतील. जर लेखक्रम प्रतिसादानुसार बदलत गेला तर अधिक चर्चा असलेले लेख अग्रभागी राहातील. सहस्रबुद्धेंनी टाकलेला कूटप्रश्न हे केवळ उदाहरण होतं. पण कूटप्रश्नांविषयीच बोलताना - यनावालांनी साठच्या वर प्रश्न टाकलेले आहेत. पण प्रथम उपक्रमवर येणाऱ्याला २५ पलिकडे दिसतच नाहीत. ते संपले की त्यात रस असलेली व्यक्ती पुन्हा इथे का येईल?

बाकी तुम्ही सहमत आहात हे वाचून आनंद वाटला. उपक्रमने जे वैचारिक लेखनाचं व्रत घेतलेलं आहे त्यामुळे मला काही विशिष्ट प्रकारचं लेखन केवळ इथेच करायला आवडतं. इथे प्रतिक्रिया अधिक खोलवर विचार करून येतात असा माझा अनुभव आहे. पण संपादक कोण, मालक कोण, या व्यासपीठाच्या व्यवस्थापनाबाबत काही शंका असल्यास त्या कुठे विचारायच्या, या बाबतीत मला तरी अडाण्यासारखं वाटतं. अर्थात मी इथे नवाच असल्यामुळे हे होत असेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

एम्पी३

प्रकाशराव
एम्पी३ संपादन करण्याची सॉफ्ट्वेअर्स् जालावर फुकट मिळतात. "एडीट् एम्पी३" वगैरे गूगल केल्यास सापडावीत.

तसे नाही

लेखांच्या यादीत मला कायम प्रकाशनाच्या वेळानुसार लेख दिसतात
असे नाही.
नवे लेखन --> प्रतिसाद
अशी टिचकी मारल्यास, शेवटच्या प्रतिसादानुसार लेखन दिसते.

परंतु, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती अशी की, जर प्रवेश न करता (पाहुणा म्हणून) जर अनुक्रमणिका पाहिली तर्, त्यात कित्येक नवीन प्रतिसाद दिसत नाहीत जे सदस्य म्हणून प्रवेश केल्यावर चटकन दिसतात. हे असे का होते?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धन्यवाद पण तरीही...

तुम्ही सांगितलेल्या सूचनेमुळे फक्त प्रतिसाद दिसतात. त्याचा अर्थातच थोडा फायदा होतो. पण मुतालिक सारखी चर्चा होत असताना त्या पानावर दुसरं काहीच दिसलं नसतं. सर्व लेख सध्या कुठच्या लेखांवर नवीन प्रतिसाद आले आहेत यानुसार सॉर्ट करता आले पाहिजेत. काही लेखांचा जीव दोनतीनच दिवसांचा असतो. उदाहरणार्थ हीच चर्चा घ्या - जर दोन दिवसात व्यवस्थापनाने अथवा संपादकांनी उत्तर दिलं तरी ती संपली. पण तरीही ती पहिल्या यादीत जागा अडवून बसेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

योग्य सूचना

उपक्रमपंतांनी लक्ष घालावे.
मिसळपाव आणि मी मराठी या दोन्ही संकेतस्थळांवर तशी सोय आहे. प्रतिसादांच्या नवतेनुसार धागे सॉर्ट होतात.

५० प्रतिसादांचा प्रॉब्लेमही मी मराठीने सोडवलेला दिसतो.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

समजूत

२. मुख्यपृष्ठावर कायम जुने लेख असतात. यामुळे नवीन येणाऱ्यांना इथे काही घडत नाही असं वाटण्याची शक्यता आहे.

माझीही अशीच समजूत दीर्घकाळ होती.

(भोचक)
रविवार पेठ नि कुठेही भेट !

उपक्रमाचे मुख्यपृष्ठ

ताजं राहाण्याबाबत उपक्रमी व उपक्रमच्या संपादकांची मतं जाणून घ्यायला आवडेल.

ताजं राहिलं तर उत्तम पण सध्या जे आहे त्याची सवय झाली आहे. नव्या सभासदांना याचा त्रास होत असेल हे निश्चित.

उपक्रमवर दहा दिवसात वीसपेक्षा जास्त लेख येणं हे दुर्दैव वाटावं अशी रचना का आहे?

असे काही मला वाटत नाही. इतर संकेतस्थळांच्या सदस्यांपेक्षा उपक्रमाच्या सदस्यांनी अधिक "स्मार्ट" असावं असं मात्र मला वाटतं. लेख मिळत नसेल तर तो शोधता येऊ शकतो. उपक्रमावर गूगल शोध घेता येतो. तसेच, पुढील यूआरएलने सदस्याची वाटचाल दिसते. http://mr.upakram.org/tracker/1201 (ही उपक्रमावरची सर्वात डायनॅमिक वाटचाल आहे. - ह. घ्या.) अशा अनेकप्रकारे आपल्याला हवे ते शोधता येते.

बाकी, प्रश्न उपक्रमपंतांनी सुधारणा कराव्यात का तर हो निश्चितच कराव्यात पण काय आहे ना की ते रिकामटेकडे नसावेत. ;-) ह. घ्या हं! वादावादी सुरु झाली तर मी त्यात पडणार नाही.

अवांतर : आता पुढील चर्चा - उपक्रमपंत रिकामटेकडे आहेत का?

लेखांचा क्रम, मुख्यपृष्ठ इ. विषयी प्रश्न

सहमत.ताजं राहिलं तर उत्तम.तसेच इतर मराथि software ism etc...वापरायची सोय् हवी. आपण इतर जागेवर लीहिलेले कापि पेस्त करता येईल. हया पध्यतीने लीहीले तर मराथी typing जमायला अडचण होईल(मराथी typing खराब करन्याचे काम आहे असे वातते.). तशी सोय असल्यास क्रुपया कलवावी.मला लोकमत २६/०२/२०१० मैत्र पुरवनीतील उपक्रम बद्द्ल आलीली माहीती द्यायची होती पन देता नाही आली.

सोपे टायपिंग

अहो इथे मराठी टायपिंग तर फारच सोपे आहे. मी तर असे टायपिंग नसते तर टाईपच करू शकलो नसतो.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

टंकलेखन साहाय्य

टंकताना अडचण येत असल्यास टंकलेखन साहाय्य पाहावे. टंकलेखन उच्चारानुसारी (फोनेटिक) असल्याने थोड्याफार प्रयत्नाने सहज जमेल.

मला लोकमत २६/०२/२०१० मैत्र पुरवनीतील उपक्रम बद्द्ल आलीली माहीती द्यायची होती

याचा दुवा/लिंक असेल तर ती देऊ शकता. लोकमतचे संकेतस्थळ युनिकोडित असल्याने तिथला काही मजकूर इथे चिकटवणे सहज शक्य आहे.

लेखांचा क्रम, मुख्यपृष्ठ इ. विषयी प्रश्न

मराथी शब्द ईग्रजीत लीहन्याने कदाचीत सोपे वातत असेल पन मराथी टायपिंग येत असेल तर अदचन होते.समातर सोय हवी असे मला वातते. असो. नाहितर मी केवल वाचत बसेल. लीहीन्यास चान्स नाही.

लिपी.

जर तुम्हाला मराठी कीबोर्ड ची सवय् असेल् तर मराठी लिपी कंप्युटरव इन्टॉल करा. डावीकडे लिहण्याची पद्धत् इंग्रजी करा वर् तुमच्या कंप्युटरवरील् मराठी लिपी ने लिहा. (लिपी इन्स्टॉल करण्याकरता तुमच्या कंप्युटरवर, कंटोल् पॅनेल मध्ये लँग्वेज् सेटींग्ज मध्ये जाउन् सुचनांचे पालन् करा)

जर उपक्रमावर लिहण्याची पद्धत (भाषा) एखाद्या शॉर्टकटने बदलता आली तर थोडीशी सोय होइल, (माझ्या 'a' बटणाचे आयुष्य किमान् ५० पटीने वाढेल! ;) )

अनुक्रम

लेखांच्या यादीत मला कायम प्रकाशनाच्या वेळानुसार लेख दिसतात. मी 'शेवटचे लिखाण' वर टिचकी मारून त्यानुसार सॉर्ट करण्याने काहीही फरक पडत नाही. हे बदलता कसे येईल?

नवे लेखन या दुव्यावर गेल्यानंतर खालीलप्रमाणे विभाग (टॅब्ज़) दिसतात.

* माझे अलीकडील लेखन: सदस्यांनी स्वतः केलेले लेखन प्रकाशन वेळेच्या उतरत्या क्रमाने
* सगळे नवे लेखन: सर्व प्रकारचे लेखन प्रकाशन वेळेच्या उतरत्या क्रमाने
* लेख: सर्व _लेख_ शेवटच्या लेखनाच्या (शेवटच्या प्रतिसादाच्या वेळेच्या) उतरत्या क्रमाने
* चर्चा: सर्व _चर्चा प्रस्ताव_ शेवटच्या लेखनाच्या (शेवटच्या प्रतिसादाच्या वेळेच्या) उतरत्या क्रमाने
* प्रतिसाद: सर्व प्रतिसाद प्रकाशन वेळेच्या उतरत्या क्रमाने

उपक्रम, मनोगत, मिसळपाव वगैरे संस्थळांवर लेखांच्या यादीमध्ये प्रत्येक लेखासाठी एकच ओळ असल्याने एका पानावर १५-२५ लेख दिसू शकतात. जिथे फक्त एका ओळीऐवजी लेखातील मजकूर 'टीज़र' स्वरूपात असतो तिथे तर एका पानावर ५-७ लेखच दिसू शकतात. उदा. http://drupal.org/

एका पानावर किती लेख दिसावेत आणि कसे दिसावेत असे तुम्हाला वाटते?

क्षमस्व

पर्याय ३ आणि ४ वर जसे अपेक्षित आहे तसे दिसते. धन्यवाद.
आम्ही नीट पाहिले नव्हते. उपक्रमपंतांना तसदी दिल्याबद्दल क्षमस्व.

तेवढा ५० प्रतिसादांचा प्रॉब्लेम सोडवता आला तर पहावा. मी मराठीवर कितीही प्रतिसाद असले तरी एकाच पानावर दिसतात. त्यामुळे नवीन प्रतिसाद शोधणे सोपे जाते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

तेवढा ५० प्रतिसादांचा

>>>तेवढा ५० प्रतिसादांचा प्रॉब्लेम सोडवता आला तर पहावा.

खुप् अवघड गोष्ट नाही आहे ती.. दोन क्लिक मध्ये काम होऊन जाते ते.

राज जैन
*********

मदत

उपक्रमपंतांनी राज जैन यांची मदत घेण्याचा प्रयत्न करावा.

ते दोन क्लिकात काम होते असे म्हणतायत. फक्त क्लिकवण्याचे ५ रुपये आणि कुठे क्लिकवायचं ते माहिती असण्याचे ५० लाख रुपये असे नाही झाले म्हणजे मिळवली. :)

राजेंनी ह घेणे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मला ५० प्रतिसाद बरे वाटतात

उपक्रमावर इतके सदस्य नाहीत की एखाद्या लेखा-चर्चेला ५०+ प्रतिसाद यावेत. येत नाहीत असे नाही - ते निश्चितच येतात. अनेकदा, माहितीपूर्ण आणि उत्तम चर्चांवर ५० प्रतिसादांनंतर वेगळा लेख किंवा पुढील भाग सुरु करता येतो. यात सदस्यांना थोड्या अडचणी येतात, जसे पूर्वीचा प्रतिसाद रेफर करायचा असेल तर तो त्याच पानावर मिळत नाही इ.

परंतु, जर मुतालिकला काळे फासले ते योग्य का? वगैरे वगैरे न संपणार्‍या किंवा वादावादीच्या चर्चा असतील तर ५० प्रतिसादांनंतर उत्साह गळून जाणे फायदेशीर असते. सर्वांच्या आणि संकेतस्थळांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने. :-)

करायचेच झाले तर करण्यासारखे खूप असते.

१. प्रतिसादांची उघडझाप होणे
२. एडिटरच्या नवनवीन सुधारणा
३. शुद्धलेखन चिकित्सक
४. स्मायलींची सोय

वगैरे वगैरे, परंतु या सर्वांची गरज आहे का किंवा या सर्वांशिवायही आपण परिणामकारकरित्या लिहू शकतो का असा प्रश्न असेल तर दोन वर्षांहून अधिक काळ उपक्रमाने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.

असो.

माझ्या म्हणण्याचा उद्देश उपक्रमाने सुधारणा करू नये असा नाही परंतु सुधारणेच्या नावापायी सर्वरवर बोजा वगैरे येणार असल्यास नको.

सहमती.

लेखांचा क्रम 'सर्वात नविन प्रतिसाद असलेला सर्वात वर' या प्रमाणे असावी या मताशी सहमत आहे.

धोका

सर्वात नवीन प्रतिसाद असलेला लेख सर्वात वर ठेवल्यास एखादा लेखक स्वतःच्या लेखावर स्वतः सतत काही ना काही उपप्रतिसाद देऊन आपल्या लेखाला नेहमी वर ठेवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

पडद्या आड

बर्‍याचवेळा पडद्या आड जाणार्‍या गोष्टी उपयुक्त असतात तसेच चर्चेच्या ओघात कालसुसंगत देखील असतात. दुव्या तील चर्चेत अनु यांनी महत्वाचा खालील मुद्दा मांडला आहे

प्रकाशनाप्रमाणे लेखांचे वर खाली होणे यात संभाव्य धोका असा की उपक्रमावर कोणी नवा उत्साही माणूस आला आणि जुने साहित्य चाळून उत्साहाने प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करु लागला तर अनुक्रमणिकेची पत्ते पिसल्यासारखी अवस्था सारखी होत राहिल.

या वर समर्पक वा सर्व मान्य उत्तर असेणे अवघड आहे. नवीन माणुस उत्साहाने एखादी चर्चा करायला लागल्यास ती चर्चा व मुद्दे अगोदरच झालेले असतात पण त्याला ते माहित नसते. तांत्रिकदृष्ट्या सरावायला देखील वेळ लागतो. अंतर्गत सर्च हा जर सुलभ केला तर तसे पडताळणे सर्वांना सोपे जाईल.
प्रकाश घाटपांडे

मुखपृष्ठ

उपक्रमाचे मुखपृष्ठ अद्ययावत होणे फार गरजेचे आहे. उपक्रमाचा पत्ता टाईप केल्यावर सर्वात प्रथम जे पान दिसतं त्यावर काहीच नविन घडामोडी दिसत नाहीत आणि त्यामुळे ही साइट मृतवत आहे की काय असे वाटते.

नविन लेख/चर्चा वाचलीत का? असे विचारले असता वाचनामात्र असलेल्या आमच्या एका स्नेहींची कायम तक्रार असते की 'उपक्रमावर काही सापडतच नाही, थेट दुवा द्या.'

माझ्यामते उपक्रम पंतांनी शक्य असल्यास ह्यात लक्ष घालून मुखपृष्ठाचा घोळ त्वरीत सोडवावा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

माझे मत

मुखपृष्ठ अद्ययावत हवे याबाबत सहमत असलो तरी संस्थळ व्यावसायिक नसल्याने असा आग्रह नाहि .
बाकी इतर सुविधा नसल्याने मला उपक्रमावर कोणताही त्रास झालेला नाहि.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हलन्त

सुधारणांचा विषय निघालाच आहे म्हणून हे - (याविषयावर पूर्वीही चर्चा झाल्याचे आठवते).

उपक्रमावार कोणतेही अक्षर टंकल्यास ते प्रथम हलन्तात येते, ज्यास "अ" टंकून पूर्ण करावे लागते. जर उपक्रमावर लिहिले जाणारे लिखाण हे ९९% मराठी असेल आणि मराठीत हलन्त अक्षरांचे प्रमाण १% असेल, तर पूर्णाक्षर प्रथम (बाय डिफॉल्ट) यायला हवे. हलन्तासाठी वेगळी सोय करता येईल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत

सहमत.

आता प्रयत्नपूर्वक सवय लावून घेतली आहे. पन त्याचा रोमन मध्ये नावे वगैरे लिहिताना प्रॉब्लेम होऊ लागला आहे. जसे सुनील हे नाव आता Sunila असे लिहिले जाऊ लागले आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हा हा!

हा हा हा! Nitina काका भारी! ;-)

हलन्त् सुधारा! हलन्त् सुधारा! हलन्त् सुधारा! हलन्त् सुधारा! हलन्त् सुधारा!

ऍ चा प्रॉब्लेमपण सोडवा बुवा.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

 
^ वर