"उपक्रम" : (आणखी) काही विचार

"उपक्रम" सारखी इतर एक-दोन चर्चांची व्यासपीठे पाहिल्यानंतर जे विचार सुचले ते मांडण्याकरता हा विषय सुरू करत आहे.

"उपक्रम"बद्द्ल अगदी अलिकडेच सर्किट यांनी चर्चा सुरू केली असताना हा नवा प्रस्ताव कशाला हा रास्त प्रश्न कुणालाही पडेल. त्या प्रश्नाच्या उत्तराकडेच या प्रस्तावाचा रोख आहे.

एखाद-दोन आठवडे या "स्थळा"वर आल्यानंतर एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ती अशी की, इथे बर्‍याचशा चर्चा/लेख खूप लवकर नजरेआड होतात आणि म्हणून विस्मृतित जातात. उदाहरणार्थ, मी जो मजकूर आता लिहीत आहे तो जर का मी सर्किट यांच्या चर्चेच्या मधे आजच्या घडीला मांडला असता, तर त्याची कुणीही - अगदी मूळ लेखकानेही - दखल घेतली नसती. याचे कारण अगदी सोपे आहे : जसजसे नवे विषय येतात, तसतसे जुने चर्चाविषय मागील पानांवर निघून जातात ; आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे जुने चर्चाविषय/लेख पुन्हा "फोकस्"मधे (मराठी शब्द) आणण्याची सोय इथे उपलब्ध नाहीच. एखाद्या जुन्याच विषयावर नव्याने कुणाला लिहावेसे वाटले तर तो/ती जरूर लिहितील, पण ते वाचणार मात्र कुणी नाही.

माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ते http://www.anothersubcontinent.com/forums या इंग्रजीतल्या "स्थळाचे". त्या स्थळाचे एकूण सर्व बरे-वाईट गुणधर्म बाजूला ठेवून एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते, ते म्हणजे , इथे जर का कुणी नव्याने एका जुन्या विषयाला तोंड फोडले तर तो विषय पुन्हा सगळ्यात वर येतो. त्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. आणि मग जे विषय बर्‍याच लोकाना महत्त्वाचे वाटतात ते मग बघता बघता नजरेआड जात नाहीत.

मला वाटते, ही गोष्ट प्रस्तुत "स्थळाच्या" परिणामकारकतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. येथील प्रशासकांना/निर्मात्यांना या दृष्टीने (लॉजिस्टिक्स् च्या दृष्टिने) बदल करणे कितपत सोपे आहे , आणि मुळात कितपत आवश्यक वाटते याची मला कल्पना नाही. तुम्हाला काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

हं!!

मला तरी बरोबर वाटतं.. चांगली सुचवणी.. आपला एकदम पाठिंबा :)
-ऋषिकेश

चांगली

लेखातील विचार पटले, पण इथे तसे होत नाही का? म्हणजे मी समजा मागच्या महिन्यातील एखाद्या लेखाला प्रतिसाद दिला, तर तो वर येतो. की माझा प्रश्न समजण्यात काही गोंधळ होतो आहे?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद वर येणे आणि चर्चाविषयच वर येणे

.... यात फरक आहे.

जेव्हा तुम्ही एखादा चर्चाविषय उघडता तेव्हा आपोआप तुम्ही "नवीन" प्रतिसाद उघडतां. मात्र एकदा चर्चाविषय खाली-खाली जात राहिला (आणि मग मागील पानांवर गेला) की परत वर येणे येथे शक्य नाही.

सोय आहे

"नवे लेखन" या दुव्यावर टिचकी मारली असता दिसणार्‍या पानावर "माझे अलीकडील लेखन" (येण्याची नोंद केली असेल तर), "सगळे नवे लेखन", "लेख", "चर्चा" आणि "प्रतिसाद" असे विभाग दिसतात. त्यापैकी "लेख", "चर्चा" आणि "प्रतिसाद" विभागात ज्या लेखाला किंवा चर्चाप्रस्तावाला नवा प्रतिसाद आला असेल तो लेख, चर्चाप्रस्ताव किंवा प्रतिसाद अनुक्रमे यादीत सर्वात वर दिसतो.

"सगळे नवे लेखन" या विभागात नवे लेखन (कालानुक्रमे) सर्वात वर दिसावे अशी व्यवस्था आहे.

दोन्ही

म्ह. नवे लेखन वर टिचकी मारली की नवीन लेख दिसतो.
चर्चा/लेख वर टिचकी मारली की नवीन प्रतिसाद मिळालेला (कदाचित जुनाच) लेख दिसतो.

हे लक्षात आले नव्हते.


आम्हाला येथे भेट द्या.

म्हणजेच,

या चर्चेवरून आणि सर्किटांच्या प्रतिसादावरून असं म्हणता येईल की

१. ज्याच्याकडे जे असते त्याचा त्याला पत्ता नसतो. जसे, कस्तुरीमृगाकडे कस्तुरी किंवा उपक्रमावर चर्चा/ लेखांचे वर-खाली जाणे.

२. ज्याच्याकडे जे नसते तेच त्याला हवे असते. जसे, कावळ्याला गोरा रंग किंवा मिसळपाव वर अशाच प्रकारची सोय आहे, पण तिथले सदस्य मात्र तिथले "उपक्रमासारखे" का नाही, म्हणून सारखे तक्रार करतात.

सध्याची

मला तरी उपक्रमाची सध्याची रचनाच चांगली वाटते. ती विचारपूर्वकच तशी केली असावी असे वाटण्यास वाव आहे. 'नवे प्रतिसाद' मध्ये कोणता विषय रंगलाय आणि नव्याने वर आलाय ते पाहता येतेच.
प्रकाशनाप्रमाणे लेखांचे वर खाली होणे यात संभाव्य धोका असा की उपक्रमावर कोणी नवा उत्साही माणूस आला आणि जुने साहित्य चाळून उत्साहाने प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करु लागला तर अनुक्रमणिकेची पत्ते पिसल्यासारखी अवस्था सारखी होत राहिल.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

मुद्दा..

प्रकाशनाप्रमाणे लेखांचे वर खाली होणे यात संभाव्य धोका असा की उपक्रमावर कोणी नवा उत्साही माणूस आला आणि जुने साहित्य चाळून उत्साहाने प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करु लागला तर अनुक्रमणिकेची पत्ते पिसल्यासारखी अवस्था सारखी होत राहिल.

हम्म! आपला मुद्दा पटण्यासारखा आहे, परंतु असे होण्याची शक्यता फारच कमी वाटते.

असो...

तात्या.

--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मनोगतवर.....

इथे जर का कुणी नव्याने एका जुन्या विषयाला तोंड फोडले तर तो विषय पुन्हा सगळ्यात वर येतो. त्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते.

मला वाटतं मनोगतवर ही सोय आहे.

इतर सदस्यांचे लेखन

इतर सदस्यांचे लेखन हे कालानुक्रमे दिसत नाही. फक्त "अवलोकन" होते. याला काही मार्ग आहे का?
प्रकाश घाटपांडे

जे आहे ते उत्तम आहे.

उपक्रमवर सध्याची जी व्यवस्था आहे, ती उत्तम आहे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर