राग यमन - भाष्य व प्रात्यक्षिक.

राम राम मंडळी,

मंगळवार दि १ मे, २००७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता,

काळे गुरुजी विद्यालय,
शिवाजी पार्क, दादर.

येथे माझा 'यमन' रागावर आधारित भाष्य व प्रात्यक्षिकाचा (लेक-डेमो) कार्यक्रम होणार आहे. दादरमधील 'चित्तपावन दादर कट्ट्या'वरील माझ्या काही मित्रमंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

यमन राग आणि त्या संदर्भातील बाबुजींच्या,

'दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा,
परधीन आहे जगती, पुत्र मानवाचा'

या गाण्यावर बोलण्याचा माझा मानस आहे.

वेळ मिळाल्यास 'पुरियाधनश्री' या रागावरही थोडेफार भाष्य करण्याचा माझा विचार आहे. तसेच या रागसंदर्भातील बाबुजींच्या,

'तात गेले माय गेली, भरत आता पोरका,
मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका'

या गाण्यावरही बोलण्याचा माझा विचार आहे.

या पत्राद्वारे मी या कार्यक्रमाची माहिती व आमंत्रण सर्व उपक्रमींना देत आहे. सर्व इच्छुकांनी अवश्य येण्याचे करावे, ही विनंती.

आपला,
तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

गरीब प्रचारक आणि प्रसारक..

अरे पण काही इच्छुकांना तिथे यायला पैसे लागतात, (हजारो डॉलर्स), भरणार का?

अरे मिलिंदा, का रे अशी थट्टा करतोस गरीबाची? मी एक गरीब विमा दलाल, लोकांचे विमे उतरवतो त्याबद्दल मला पाचशे-हजार रुपयांची दलाली मिळते रे. मी एक गरीब शेअर बाजार सल्लागार. लोकांना 'अमुक शेअर घ्या', 'तमुक विका' असले सल्ले देऊन दोन वेळचा आमटीभात कसाबसा मिळवतो रे. आणि एवढं सगळं सांभाळून गरीबीत का होईना, पण जमेल तसा आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताचा प्रसार आणि प्रचार करतो रे!

मी तुझ्या तिकिटाचे पैसे कसे भरणार रे? आणि ते सुद्धा डॉलरमध्ये? अरे बाबा तुझा तो अमेरिकन डॉलर काळा की गोरा कसा असतो हेदेखील मला माहीत नाही रे! का अशी थट्टा करता गरीबाची?

असो!

तू इथे येशील तेव्हा वाटल्यास पुण्याला आपण हा कार्यक्रम पुन्हा करू. तुझ्याकडे मानधन म्हणून फार पैसे मागणार नाही. फक्त आमचे वर्षभराचे तांदूळ सुटतील, एवढे पैसे दिलेस तरी पुरेसं आहे! आणि हो, माझ्याकरता स्कॉचची बाटली तू येतांना आणणारच आहेस. ती मात्र विसरू नकोस हो! ;)

आपला,
(गरीब!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

पॉडकास्ट

भविष्यकाळात अशा माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी पॉडकास्ट ही सुविधा देण्याचा विचार प्रगतीशील उपक्रम प्रशासनाने करावा. :)

उदा: संपदा डॉट नेट वरील पॉडकास्टिंगचा दुवा

(कानसेन!) योगेश

मराठी टंकलेखनासाठी वापरा

मी येइन.

तात्या,मला गाण्यातलं काही कळत नाही.मी कसा येऊ. तरी ही माझ्या आपल्याला सही दिलसे शुभेच्चा आहेच. बाटली चं बोलत आहात तर आपलाही एक ग्लास भरा.

 
^ वर