मंगोलीयाचा पाहुणा!

bar headed gose

हा आहे पट्टकदंब (कलहंस?) अर्थातच Bar-headed goose. हा पक्षी थेट मंगोलीयावरुन, हिमालय ओलांडुन ४५००+ किलोमीटरचा प्रवास करत पुण्याजवळच्या विर धरणाकाठी उतरला.

त्याच्या गळ्याभोवती सी-६ अशी पट्टी आहे, ती त्याला मंगोलीयात असताना मार्टिन गिलबर्ट ह्यांच्या चमुने २००४ साली बांधली होती! असे बिल्ले धारण केलेल्या अनेक पट्टकदंबांपैकी हा एक सी-६ वीर धरणावर नेहमी येतो असे दिसते. २००८ साली मुंबईच्या आदेश शिवकर ह्यांनी सुद्धा हाच गडी इथेच पाहिल्याची नोंद केली आहे.

आम्ही हा पक्षी डिसेंबर मध्ये पाहिला. ब-यापैकी लांब होता त्यामुळे फार काही सुंदर फोटो मिळाला नाही, पण माहितीच्या उपयुक्त वाटला!

तिथले अजुन काही फोटो इथे: http://picasaweb.google.com/bspujari/Veer_Dam#

-भालचंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

सुंदर माहिती. हे पक्षी परत स्वगृही जातात का? याबाबत माहिती जाणुन घ्यायला आवडेल.
प्रकाश घाटपांडे

स्वगृही

ते वीर धरणाच्या परिसरात एखादी सेना आहे का यावर अवलंबून आहे.
याचे दुसरे उत्तर जेव्हा जाणता राजा 'स्वगृही' जाईल तेव्हा तेही जातील.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

हो!

इथला उन्हाळा वाढायला लागला की ते स्वगृही परततात!
-भालचंद्र

कलहंस(?)

कलहंस हे निळ्या रंगाच्या छटेचे नाव आहे. वरील पक्षात निळा रंग दिसला नाही. कलहंस नावाचा पक्षीही असतो का?

कदंब हे झाड असते हे माहित आहे. कालिया असणार्‍या डोहात कालियाच्या विषामुळे सर्व काही मरत असे. फक्त काठावर एक कदंब वृक्ष शिल्लक होता आणि कृष्ण कालियामर्दनाआधी कदंबाच्या झाडावर चढला होता अशी काहीशी गोष्ट आहे. कदंबावर शोध घेता कबुतरालाही कदंब म्हणतात अशी नवी माहिती कळली.

पट्टकदंब हे नाव आवडले.

पट्टकदंब!

पट्टकदंब हा शब्द काही आठवड्यापुर्वीच्या 'बालमित्र' ('सकाळ' ची पुरवणी) मध्ये डॉ. सतिश पांडे ह्यांनी वापरलेला पाहिला! मलाहिइ तो भलताच आवडला!

कलहंस हा शब्द संतोष शिंत्रेंच्या ह्या लेखात पाहिला.

-भालचंद्र
http://bspujari.googlepages.com/

अफलातून!!!

अफलातून!!!

बिपिन कार्यकर्ते

वा..

सही !!

वा वा!

खास पक्षीनिरीक्षणासाठी तुम्ही वीर धरणाचा दौरा काढलात हे खास कौतुकास्पद आहे. माझे पक्षीप्रेम कुठे गेलो आणि पक्षी दिसले तर त्यांचे फोटो काढायचे इथपर्यंतच मर्यादित आहे. :-(

दिलेली माहिती देखील रोचक आहे. पिकासावरचे फोटो मस्त आहेत. एवढे सगळे एका दिवशी बघायला मिळाले?

==================

हो!

हो! हे सगळे पक्षी एकदमच पहायला मिळाले! सकाळच्या काही तासात बरेच पक्षी पहायला मिळतात!

भालचंद्र

चित्र आणि माहिती

चित्र आणि माहिती फारच छान!

बारकाव्यांमुळे लेख वाचायला आवडला

"त्याच्या गळ्याभोवती सी-६ अशी पट्टी आहे, ती त्याला मंगोलीयात असताना मार्टिन गिलबर्ट ह्यांच्या चमुने २००४ साली बांधली होती!"
ह्या बारकाव्यांमुळे लेख वाचायला आवडला. अशी माहिती तुम्हा पक्षीमित्रांत देवाण-घेवाण होते का? तुम्हास कशी मिळाली ह्याची उत्सुकता आहे.

मस्त...!

चित्र आणि माहिती मस्तच....!

''काय 'राव' ! संकेतस्थळाच्या खच्चीकरण करण्याच्या 'उपक्रमा'त तुमचा सहभाग गृहीत धरु ना?''

पाहूण्याचे स्वागत

वा छानच!!

आमचे पक्षीनिरिक्षण रस्त्यावर येताजाता चालत असे ;) त्यासाठी तुम्ही वीर धरण गाठलेत ही खरी वीरता ;) (ह घ्यालच)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पुणेरी पाहुणचार

छान!
पिकासा वरचे सुद्धा फटु पाहिले.
त्यातले स्टिल्ट, ब्राम्हणी डक, श्राईक इ. पुण्यात पाषाण तलावावर काही वर्षांपूर्वी पर्यंत दिसायचे (पाईपलाईनचे काम सुरू होईपर्यंत) शिवाय बाकीचे बरेच दिसायचे (पिझन्ट टेल्ड जकाना - कमळपक्षी इ.)

जाता जाता: टंकनदोष -

मार्टिन गिलबर्ट ह्यांच्या चमुने २००४ साली बांधली होती!

त्यांच्या ब्लॉगवरून ही नोंद ऑक्टॉबर २००७ साली झाल्याचे दिसते. असो.

ओह्ह्!

ओह्! गलतीसे मिस्टेक! चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल आभार!

-भालचंद्र

 
^ वर