छायाचित्र : कचरा वेचणारी मुलगी

नोकिया एन ७२ काढलेला फोटो आहे. फोटोचे तपशिल सांगता येणार नाही. पण, चित्र आवडले की मोबाईलने क्लीक करतो. हे चित्र आवडले तर सांगा. अजून काही चित्र टाकीन. नाही,आवडले तरी टाकीन. :)

लेखनविषय: दुवे:

Comments

अरेच्चा! (हा शब्द सर्वमान्य आहे)

ती मुलगी तुमच्यावर वैतागलेली दिसते. बाय द वे, तिचा फोटु काढताना आणि इथे लावताना तिची परवानगीघेतली होती काय? ती ज्या आविर्भावात उभी आहे ते पाहून तुम्हाला कोर्टात वगैरे खेचल्याशिवाय राहणार नाही असे दिसते.

असो, गांभीर्याने विचार केला तर चिमुरडी गोड आहे, चुणचुणीतही दिसते. शाळेत जाण्याच्या वयात (आणि शाळेचा गणवेश घालून, तोही बहुधा असाच कचर्‍यातून गोळा केलेला असावा का?) तिच्या हाती कचर्‍याची गोण बघून खेद झाला.

:)

>>ती मुलगी तुमच्यावर वैतागलेली दिसते. बाय द वे, तिचा फोटु काढताना आणि इथे लावताना तिची परवानगीघेतली होती काय? ती ज्या आविर्भावात उभी आहे ते पाहून तुम्हाला कोर्टात वगैरे खेचल्याशिवाय राहणार नाही असे दिसते.

हा हा हा. खरं तर त्या तीन मुली होत्या. कचर्‍याचे सॉर्टींग करतांना त्या खूप गर्क झालेल्या होत्या. अचानक शुकशुक केल्याने त्यांची तंद्री भंग पावली आणि त्यातली एक उभी राहिली नी फोटो क्लीक केला. तो तिचा रुबाब असा कैद झाला.

>>गांभीर्याने विचार केला तर चिमुरडी गोड आहे, चुणचुणीतही दिसते. शाळेत जाण्याच्या वयात (आणि शाळेचा गणवेश घालून, तोही बहुधा असाच कचर्‍यातून गोळा केलेला असावा का?) तिच्या हाती कचर्‍याची गोण बघून खेद झाला.

अगदी असेच विचार तेव्हा डोकावले होते. अशा मुलींचे पुढे काय होते, त्यांचे भवितव्य, वगैरे.
प्रोत्साहान देणार्‍या प्रतिक्रियेबद्दल धन्यु....!

>>अरेच्चा! (हा शब्द सर्वमान्य आहे)
:)

-दिलीप बिरुटे

काय तोरा आहे

ती मुलगी तुमच्यावर वैतागलेली दिसते. बाय द वे, तिचा फोटु काढताना आणि इथे लावताना तिची परवानगीघेतली होती काय? ती ज्या आविर्भावात उभी आहे ते पाहून तुम्हाला कोर्टात वगैरे खेचल्याशिवाय राहणार नाही असे दिसते.
असेच! मस्त फोटो आहे.पोरीचा. काय तोरा आहे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

वा

वा सर! फोटो आवडला.. तांत्रिक बाजु तज्ञ सांगतीलच.. मात्र मला छायाचित्र जी कथा सांगतेय तीच आवडली
अजून चित्रे जरूर टाका

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

आभार...!

>>मात्र मला छायाचित्र जी कथा सांगतेय तीच आवडली
धन्यु....!

>>अजून चित्रे जरूर टाका
नक्की टाकतो.

-दिलीप बिरुटे

काही सूचना

मोबाइलने काढलेल्या चित्रांवर बऱ्याच वेळा एक धुरकट झाक असते. लेन्स स्वच्छ नसल्याने किंवा तिच्यावर चरे गेल्याने ती येते. त्यामुळे चित्राची खोली कमी होते. यावर उपाय म्हणजे पिकासा सारख्या चित्र सम्पादका द्वारे
१. contrast वाढवा
२. हाय लाईट वाढवा
तसेच मोबाईलच्या फोटो मध्ये एक रंग कधी कधी पुढे येतो. या चित्रात निळसर झाक आलेली आहे. पिकासा मध्ये "warmify" किंवा इतरही चित्र सम्पादका मध्ये रंगसंगती बदलून ती अधिक पिवळसर/ लालसर करण्याची सोय असते. तिने हे चित्र अधिक खुलून दिसेल.
हे चित्र कापून मुलीभोवती उभ्या आकाराचं केलं तर जास्त प्रभावी होईल असं मला वाटतं. पण ती जास्त वैयक्तिक गोष्ट आहे.
आपण मला जर चित्र पाठवले तर मला नक्की काय म्हणायचे आहे हे करून दाखवता येईल. व्यनी वर जमला नाही तर
ghaski@gmail.com वर पाठवा.
राजेश

बदल केले

१. contrast वाढवा
२. हाय लाईट वाढवा

आपण सांगितले तसा प्रयोग फोटोशॉप मधे करुन पाहिला.
4281633552_3744ce1fac1

व्यनीद्वारे आपण कळवलेत त्याबद्दल आभारी. आपण पिकासावर चित्रात काही बदल केले आहेत. केलेला बदल चांगला आहे. जमल्यास चित्र इथे डकवावे म्हणजे वाचकांना आपण केलेले चित्रातील बदल पाहता येतील.

-दिलीप बिरुटे

थोडे बदल...

" alt="">
thode badal

फ्रेममध्ये मुलीचं स्थान अधिक महत्त्वाचं करण्याचा प्रयत्न...
फोटोशॉप मध्ये color saturation वाढवता येतं, त्याचाही फायदा होऊ शकेल. पण ते सध्या माझ्याकडे नाही...

राजेश

फारच छान

छायाचित्र आणि लेखकाने केलेली तदानुषंगिक टिप्पणी फारच आवडली. कलेच्या दालनात सर्वाचा मुक्त संचार असावा आणि जातिवंत कलाकार आपल्याला कलेच्या एखाद्या आविष्कारसाच्यात कैद करुन ठेवू शकत नाही हेच यावरुन सकृतदर्शनी अधोरेखित होत नाही काय? (होय होते!)
नोकिया एन ७२ काढलेला फोटो आहे - फोटोचे तपशिल सांगता येणार नाही
या वाक्यांमधील तपशीलाच्या आणि व्याकरणाच्या चुका लेखकाची क्षुद्र कूपमंडुकी जगाविषयीची बेफिकिरी दर्शवतात. अस्सल कलाकार अशा बंधनांच्या रज्जूंनी कैद होत नसतो. व्याकरणाकडे केलेले दुर्लक्ष हे अनावधानाने आहे की हेतुपुरस्सर? किती सूचकतेने हा प्रश्न बा वाचकांवरच सोडला आहे पहा! हा एन ७२ कुणाचा असावा? स्वतःच्या मालकीचा? उसना घेतलेला? ( चोरलेला?)मालकीचा असल्यास नवाकोरा की जुन्या बाजारातून घेतलेला? या अनुत्तरित प्रश्नांमधून जीवनाची निरर्थकता लेखकाने किती सांद्रपणे व्यक्त केली आहे. व्याकरणाकडे दुर्लक्ष करण्याच्या संदर्भातून आपल्या इतरत्र असलेल्या निष्ठा व्यक्त करण्याचा लेखकाचा / छायाचित्रकाराचा प्रयत्न आहे का? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! खरा कलाकार एकच फाटकी पायताण फेकतो आणि प्रश्नांचे मोहोळ उठवतो, ते असे!
अजून काही चित्र टाकीन. नाही,आवडले तरी टाकीन. :)

हे आश्वासन आहे की धमकी? या प्रश्नात वाचकांचे मन गुंतत जात असताना याही वाक्यात व्याकरण व शुद्धलेखनाची ऐशीतैशी करुन लेखकाने / छायाचित्रकाराने 'त्याचा येळकोट जाईना' हा आपला बाणा कसा दुखर्‍या दाढेमधील कळेसारखा अखंडित ठेवला आहे ते पहा!
आता मूळ छायाचित्राकडे वळू. (वळा, वळा!) सदर मुलीने घातलेला शाळेचा गणवेष, आणि त्याखाली घातलेली अंमळ आखूडशी पैरण. वा! हिंदु-मुस्लिम ते अमेरिकन- अफ्रो-अमेरिकन या सगळ्या वादांवर पडदा टाकण्यासाठी आवश्यक वैश्विक शांततेतेचेच हे प्रतिक. दूरवर उभी असणारी रिक्षा कोणत्या संघटनेची असावी? तिच्या चालकाने गणवेष घातला असावा की नाही? आणि बिल्ला? गणवेषातील मुलगी आणि पाठमोरी रिक्षा. पुन्हा प्रश्न, पुन्हा प्रश्न!
मुलीच्या डाव्या बाजूला दिसणार्‍या इमारतींचे काही सार्वजनिक सुविधा पुरवणार्‍या इमारतींशी साधर्म्य वाटते. त्यासमोरील उजव्या बाजूच्या भिंतीवरील उडालेला गिलावा हे तर उघडउघड जागतिक मंदीचे प्रतिक आहे. या मुलीची ताठ मान भारत जागतिक मंदीला सामोरा जाण्यासाठी कसा सज्ज आहे हेच दर्शवते. चित्राच्या उजव्या कोपर्‍यात दिसणार्‍या रस्त्याचे उडालेले डांबरी टवके भारताला या नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती करणे कसे आवश्यक आहे हे सुचवून जाते. एकंदरीत हे चित्र डावीकडून उजवीकडे पाहिल्यास 'कळ' हा अनुभव येतो तर वरुन खाली पाहिल्यास 'गणवेष' हा अनुभव येतो. या चित्राला म्हणूनच 'गणवेषाची कळ' किंवा 'गणवेष- एक कळीचा मुद्दा' हे शीर्षक अधिक समर्पक झाले असते असे वाटते. ही बारीकशी बाब सोडल्यास सदर चित्र 'लुव्र' मधील एखादे इम्प्रेशनिस्ट पेंटिंग पाहिल्याचा (फुकट!) अनुभव देऊन जाते, हे बाकी खरे! अभिनंदन!

सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

यावरुन आठवण झाली

मानवी विकृतीबद्दल आणि मानवी विकृतींच्या लक्षणाबद्दल जालावर काही वाचायला मिळते का शोधत होतो. पुलंनी 'मनाचिये गुंफी’ ला प्रस्तावना लिहितांना म्हटले आहे की, ''मनाचा तोल कुठल्या पायरीपायरीनं ढासळत जातो याचं अतिशय मार्मिक वर्णन गीतेतल्या, ध्यायतो पुंस: संगस्तेषूपजायते, ह्या आणि त्यानंतरच्या श्लोकांत आढळते. सा-या मनोविकृतीचं मूळ विषयवासनेत तिथे दाखवलं आहे. आणि त्यानंतरच्या काम-क्रोध-संमोह- स्मृतीविभ्रम बुध्दिनाश आणि विनाश ह्या अवस्था आजच्या मनोविकारतज्ज्ञांनीही स्वीकारलेल्या आहेत. मनोरुग्णतेचा इतका तर्कशुध्द विचार इतक्या प्राचीन काळी होऊनही त्यानंतर त्या विषयावर संशोधन किंवा शास्त्रीय स्वरुपातलं लेखन आणि ग्रंथनिर्मिती दुर्देवाने देशात झालेली नाही. उलट इतर व्याधीसारखी मनोरुग्णता हीदेखील एक इहलोकी घडणाऱ्या संस्कारातून घडणारी व्याधी आहे असं न मानता हा कुठल्या तरी देवदेवतांचा कोप आहे, आकाशस्थ ग्रहांनी दिलेली पीडा आहे, भूतपिशाच्च बाधा आहे अशा समजुतीनी ह्या व्याधींचा बुध्दिनिष्ठ, वैज्ञानिक प्रयोगनिष्ठ असा पाठपुरावा केला गेलाच नाही.”

वरील संदर्भावरुन लक्षात येते की, मनाचा तोल ढासळण्याची प्रक्रिया ही कुठून तरी हळूहळू सुरु होते. आणि पुढे स्मृतीविभ्रम आणि बुद्धीनाशामुळे माणूस काहीच्या काही बरळायला लागतो. इतकेच नव्हे तर इहलोकातून घडणा-या संस्कारातूनच अशी व्याधी जन्माला येते यावरही माझा आता विश्वास बसायला लागला आहे. पूर्वी मला वाटायचं की, पूर्वजन्मीच्या कर्मामुळे विचारांमधे अशी अवस्था प्राप्त होत असावी. पण त्याचबरोबर वाढते वय, बिघडलेली मानसिकता त्यामुळे स्वत:वरील जाणारे नियंत्रण हेही एक कारण होऊ शकते, असे वाटते. एखाद्या क्षणी माणसं विद्वान वाटतात, काही प्रश्न तर्कसंगत वाटतात पण असे असले असले तरी त्याचे स्वरुप एखाद्या मनोरुग्णासारखेच असते. तसे ते वाटू शकते. ''मोबाईल कोणाचा असावा ? नवा असावा की जुना असावा ? चोरलेला ? किंवा व्याकरणाकडे दुर्लक्ष करुन इतरत्र असलेल्या निष्ठा व्यक्त करणे” असे असंबद्ध प्रश्न वाचले की अशी वृत्ती आपल्या आजुबाजुला वावरत तर नाही ना, अशी शंका यायला लागते. पुल पुढे म्हणतात ’''मनोव्यापाराविषयींचं योग्य शिक्षण मिळालं तर कितीतरी माणसं मनोरुग्णतेच्या अवस्थेला पोहोचण्याआधी बचावली जातील'' आपण अशा व्यक्तीमधे योग्य शिक्षणाने लवकरात लवकर योग्य बदल होऊ दे, या पेक्षा अधिक काय अपेक्षा करु शकतो नाही का ? (हो हो आपण फक्त अपेक्षा करु शकतो)

अरे हो, आठवण सांगता-सांगता आभार मानायचे राहून गेले. चित्रातील विश्लेषण मात्र चांगलेच मनोरंजन करते. त्याचे मात्र कौतुक आहेच. मन:पुर्वक आभार

-दिलीप बिरुटे

अगदी बरोबर

अगदी समर्पक आणि चपखल शब्दांत केलेली समीक्षेची समीक्षा अतिशय आवडली. शब्द पु.लंचे होते म्हणूनच ती इतकी मुद्देसूद वाटते असे कुणीसे म्हणत असल्याचा भास झाल्यास वाचकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, अन्यथा स्वयंघोषित मानसोपचारतज्ञ बाह्या सरसावतील. शिक्षणशास्त्र आणि वैद्यकीय व्यवसाय यातील पदवीच्या साधर्म्यामुळे माणसाला आपण मानसोपचारतज्ञ असल्याचा भास होत असेल तर ती मनोरुग्णाची कोणती पायरी म्हणावी हे आता डॉ. प्रकाश साठ्यांनाच विचारावे लागेल!
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

चित्रापलिकडले

आजूबाजूची घरे आणि दूरवरची रिक्शा यात मला या मुलीकडे पाठ फिरवणारे अख्खे जग दिसते आहे.
या मुलीच्या नजरेत जी जरब आहे ती साऱ्या जगाविषयीच.... का कुणास ठाऊक पण तिच्या नजरेला नजर देतांना शरमिंदा झाल्यासारखे वाटते.

चित्र म्हणून चित्र चांगलेच (आहे ते आणि त्या पलिकडचेही प्रेक्षकापर्यंत पोचवणारे...)
पण तरीही अशा चित्रांची संख्या आपण कमी करायला हवी..

आभार...

आजूबाजूची घरे आणि दूरवरची रिक्शा यात मला या मुलीकडे पाठ फिरवणारे अख्खे जग दिसते आहे.
या मुलीच्या नजरेत जी जरब आहे ती साऱ्या जगाविषयीच.... का कुणास ठाऊक पण तिच्या नजरेला नजर देतांना शरमिंदा झाल्यासारखे वाटते.

स्सही...!!!

कोणीतरी जालावर म्हणून गेला आहे. एक चित्र हजार शब्द बोलते, ते काय खोटं नाही.
प्रतिक्रियेबद्दल आभारी...!

-दिलीप बिरुटे

असेच

का कुणास ठाऊक पण तिच्या नजरेला नजर देतांना शरमिंदा झाल्यासारखे वाटते.

असेच म्हणते.

छायाचित्र चांगलेच आहे पण तसे म्हणायला जीव धजत नाही.

+१

असेच म्हणतो.

छान!

चित्र मस्तच आहे. मुलीच्या चेहर्‍यावरील भाव फारच छान आले आहेत. अवतीभवतीचा कचरा आणि ओबड धोबड कच्च्या सडकेवरती ही मुलगी अनवाणी उभी आहे हे पाहून बाबासाहेब म्हणतात तशीच आगतिकता वाटते.

सुचवण्या :

१) मोबाईलपेक्षा स्वतंत्र कॅमेरा घ्या. ह्याचे रेजल्युशन खूपच कमी आहे. त्यामुळे सुधारणा करायला फारसा वाव नाही.
२)मुलीच्या डोक्याच्या वरचा बहुतांश भाग कापून टाकायला हवा. प्रखर प्रकाशाने तो ओवर एक्स्पोज्ड झाला आहे.
३)राजेश ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे निळ्या रंग थोडा जास्त पडला आहे. फोटोशॉपमधे कलर बॅलन्स उघडून तो ऍडजस्ट करा.

छान

चेहर्‍यावरचे भाव चांगले टिपले आहेत.

श्री. राजेश आणि कोलबेर यांनी दिलेल्या सूचना योग्यच (कातरलेले चित्र अधिक प्रभावी आहे.)

चित्र भ्रमणध्वनीवरचे आहे, असे बघता आकाशाची प्रतिमा अतिप्रकाशित (ओव्हर-एक्स्पोझ) झाल्याचे दु:ख नाही. कधीकधी स्वयंचलित कॅमेरा (त्यातल्या त्यात जुनी यंत्रे) कुठलाही भाग अतिप्रकाशित होऊ नये म्हणून एकूण प्रकाशनच कमी करतात. मग महत्त्वाच्या तपशिलांचे अल्पप्रकाशन होते.

"खराखुरा" कॅमेरा असला तरीही, समोरील दृश्याचा कॉन्ट्रास्ट फार असला तर मुख्य तपशिलाचे प्रकाशन योग्य व्हावे. आकाश "कंटाळवाणे" असले तर त्याचे अतिप्रकाशन झाले तरी काही दोष नाही - अर्थात कृष्णधवल चित्रांत लख्ख पांढरे आकाश ठीक दिसते.

वरील चित्राच्या "कथे"त रंगांचे काही मूलगामी महत्त्व आहे की नाही हे चित्रकाराने ठरवायचे आहे. मी स्वतः ते चित्र कृष्णधवल करून बघितले, तर मुलीच्या चेहर्‍यावरील भाव तितकेच परिणाकारक वाटले. मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश आहे, असे निळ्या रंगाच्या अभावातही स्पष्ट जाणवत होते. आणि आकाश अतिप्रकाशित झाल्याचे मुळीच वाटत नाही.

"खराखुरा"

चित्र भ्रमणध्वनीवरचे आहे, असे बघता आकाशाची प्रतिमा अतिप्रकाशित (ओव्हर-एक्स्पोझ) झाल्याचे दु:ख नाही. कधीकधी स्वयंचलित कॅमेरा (त्यातल्या त्यात जुनी यंत्रे) कुठलाही भाग अतिप्रकाशित होऊ नये म्हणून एकूण प्रकाशनच कमी करतात. मग महत्त्वाच्या तपशिलांचे अल्पप्रकाशन होते.

बरोबर. प्रखर उजेडामुळे आकाश अतिप्रकाशित झाले हा भ्रमणध्वनीचा नक्कीच दोष नाही. उन्हं कले पर्यंत वाट पाहणे ह्याशिवाय त्यावर दुसरा उपाय नाही.

स्वतंत्र ("खराखुरा") कॅमेरा वापरण्याची सुचवणी ही चित्राचे रेजल्युशन वाढवण्यासाठी होती. रेजल्युशन जास्त असेल तर अतिप्रकाशित भाग कापूनही उरलेल्या भागात काम करण्यास वाव राहतो. ह्या चित्रात तसे करण्याचा प्रयत्न करुन पाहिला पण कातरलेल्या चित्रात पुरेसे तपशिल उरत नाहीत (विशेषतः चेहर्‍यावरचे) असे दिसुन आले. कृष्णधवल करुन पण त्यामुळेच मला फारसा परीणाम जाणवला नाही.

उपाय

जेव्हा पार्श्वभूमी अतिप्रकाशित असते तेव्हा "फिल् इन् फ्लॅश" उपयुक्त ठरतो. मला त्याचा अनेक वेळा उपयोग झालेला आहे. "खराखुरा" कॅमेरा वापरण्यामागे रेझोल्युशन पलिकडे हाही फायदा आहे. या विशिष्ट चित्रात सूर्यप्रकाश अगदीच कमी नाही - त्यामुळे फ्लॅशने जी एक कृत्रिमता येते ती येणार नाही. उलट मुलगी उठून दिसण्यास अधिक मदत होईल...

सहमत

जेव्हा पार्श्वभूमी अतिप्रकाशित असते तेव्हा "फिल् इन् फ्लॅश" उपयुक्त ठरतो.

फिल इन फ्लॅश किंवा 'स्पॉट मीटरींग' इत्यादी गोष्टी ओवर एक्स्पोज्ड भागांची तीव्रता कमी करण्यास नक्कीच मदत करतात पण त्यासाठी थोडा महागडा कॅमेरा हवा. 'खराखुरा' ह्यातून मला बर्यापैकी रेजल्युशन असणारा पॉइंट अँड शूट कॅमेरा अभिप्रेत होता. वरील सुविधा असणारा असणारा कॅमेरा उपल्ब्ध असेल तर फारच छान.

मोबाईल कॅमेरा < पॉइंट अँड शूट < फिल इन् प्लॅश + स्पॉट मीटरींगची सोय असणारा कॅमेरा.

फिल् इन्..

बर्‍याच पॉइंट अँड शूट कॅमेरामध्ये फ्लॅश चालू ठेवून (दिवस असला तरीही, पुरेसा उजेड असला तरीही) फोटो काढण्याची सोय असते. मीटरींग वगैरे न करताही ती सोय वापरता येईल.

काही साधे पॉइंट अँड शूट व महागडे यांच्या मध्ये असतात. त्यात मॅन्युअल मोड असतो - त्यात् बर्‍याच गोष्टी आपल्या हातात असतात. जर साधासा त्रिपाद वापरला, तर त्यातून अतिशय सुंदर फोटो येतात.

तुमच्या उतरंडीत मी भर घातली आहे. मला माझ्या लेखासाठी चढत्या क्रमाने जाणार्‍या क्लिष्ट गोष्टींची यादी हवी च होती....

मोबाईल कॅमेरा < पॉइंट अँड शूट< मॅन्युअल मोड असलेला < फिल इन् प्लॅश + स्पॉट मीटरींग + SLR < अति महागडा (व्यावसायिक दर्जाचा)

राजेश

फोटो

फोटोचे तपशील याचा अर्थ फोटोचे तांत्रिक तपशील असा अर्थ बिरुटे सरांना अभिप्रेत असावा.
नाही आवडले तरी टाकीन हे स्वांतसुखाय व प्रेमाची धमकी मान्य.
अवांतर- या फोटो वरुन कचरापेटीत एक भिकारी व कुत्रा एकाच अन्नासाठी एकमेकांवर गुरगुरत होते हे पाहिल्याची आठवण आली. तेव्हा कॅमेरा नसल्याची खंत वाटली. @ प्रियाली- या संवेदना भारतात बोथट होतात.
प्रकाश घाटपांडे

आभार...!

छायाचित्रात योग्य बदल सुचविणार्‍या सर्व उपक्रमी मित्रांचे मनःपूर्वक आभार...!
भ्रमनध्वनीच्या दोन मेगापिक्सल कॅमेर्‍याच्या छायाचित्राच्या मर्यादा नक्कीच आहेत आणि ते मान्य आहे...!

-दिलीप बिरुटे

 
^ वर