उपक्रम दिवाळी अंक

उपक्रम दिवाळी अंकातल्या लेखांखालील प्रतिसाद म्हणून अनेक जाहिराती व गार्बेज संदेश् घुसडण्यात आलेले माझ्या संगणकावर तरी दिसत आहेत. संपादकांनी ते काढून टाकावे अशी विनंती. या पद्धतीचे निरर्थक प्रतिसाद घुसडले जाणार नाहीत याच्यासाठी काहीतरी सुरक्षा कवच आवश्यक आहे असे दिसते

लेखनविषय: दुवे:

Comments

उपक्रमचे लक्ष नाही

उपक्रमच्या मालकांचे आणि संपादकांचे 'उपक्रमच्या दिवाळी अंकावर' लक्ष दिसत नाही. वेळ मिळालाच तर लेखांवर आलेले अनेक
निरर्थक प्रतिसाद काढले जातील अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.

[संपादित]

-दिलीप बिरुटे
[उपक्रमी]

दिवाळी अंकावर लक्ष

उपक्रमच्या मालकांचे आणि संपादकांचे 'उपक्रमच्या दिवाळी अंकावर' लक्ष दिसत नाही.

आता भालदार चोपदारच ठेवायला हवेत. ;-) उपक्रमी सदस्यांकडून मोबदला वगैरे मिळाला तर असे पहारेकरी मिळण्याची शक्यता आहे. :-)

मानवी संपादक आणि संगणकीय प्रतिसादकर्ते

मला वाटते उपक्रमपंतांनी कॅप्चा लावला तर हा प्रश्न सुटू शकेल. अन्यथा, एकेका लेखावरचे प्रतिसाद काढण्यास संपादकांना ५-६ मि. लागतील. संपूर्ण अंकाचे गणित करावे आणि संगणकीय प्रतिसादकर्त्यांना ते टाकण्यास काही सेकंद.

उपक्रमाचे वाचक

कोणीतरी 'उपक्रम दिवाळी अंक २००८ व २००९' ह्या अंकांना प्रतिसाद देण्याचा उपक्रम हाती घेतलेला दिसतो. प्रतिसादावरून 'अमराठी' रसिक वाचक वाढले आहे असे वाटते.

अमराठी प्रतिसाद थांबायला पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.

हे प्रतिसाद दिवाळी अंकांसाठीच मर्यादित आहे हे एक बरे! नाहीतर लेख आणि चर्चेच्या प्रतिसादात हे 'प्रतिसाद' आले तर उपक्रमावरचे वाचन आणि लेखन कमी प्रमाणात होईल.

उपक्रम या आयडीवर कळवा

अमराठी प्रतिसाद थांबायला पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.

"उपक्रम" या आयडीवर निरोप लिहून कळवा. याबाबतीत काही करणे बहुधा संकेतस्थळ चालकांच्या हाती असावे.

उपाययोजना

असे निरर्थक प्रतिसाद काढून टाकले आहेत. यापुढे असे स्वयंचलित प्रतिसाद देता येणे अवघड होईल असे उपाय केले आहेत. तरी कुठे अजूनही असे काही प्रतिसाद दिसून आले तर कृपया येथे प्रतिसाद देऊन कळवावे.

कळावे,
उपक्रम व्यवस्थापन

धन्यवाद

धन्यवाद

धन्यवाद...!

उपक्रम व्यवस्थापनाने पंधरा दिवसानंतर का होईना, तात्काळ नोंद घेतली त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार...!

-दिलीप बिरुटे
[उपक्रमी]

निरर्थक प्रतिसाद

मी आताच परत तपासणी केली. पुन्हा काही प्रतिसाद आले आहेत्त.उपक्रमने घातलेले सुरक्षा कवच पुरेसे गुणकारी दिसत नाही
चन्द्रशेखर

 
^ वर