काहि वाक्प्रयोग आणि अर्थ

असे बरेच वाक्प्रयोग आहेत जे आपण सर्रास वापरतो पण त्याचा अर्थ नेहमी माहित असतोच असे नाहि. जसे मागे 'तुंबड्या लावणे' म्हणजे काय मला माहित नव्हते त्याची इथे (उपक्रमावर)चर्चा करून अंदाज आला.
तसेच काहि वाक्प्रयोग, म्हणी वगैरे आपण परंपरेने आल्याप्रमाणे बोलत असतो त्याचा अर्थ / संदर्भ माहित असो नसो. ही चर्चा अश्याच वाक्प्रयोग, म्हणी वगैरेंचा अर्थ /संदर्भ शोधण्यासाठी सुरू करूया. (अशी चर्चा अन्यत्र/पुर्वी झाली असल्यास प्रतिसादात दुवे मिळतीलच)
इथे स्वतःला शंका असलेल्या वाक्प्रयोग, म्हणी इतरांना विचारावेत आणि उपक्रमी माहिती देतीलच असा विश्वास आहे.

सर्वप्रथम मी सुरवात करतो. बर्‍याच कथांचा थेवट "साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण" असा केला जातो. ह्या पुजांमधील / व्रतांमधी कथांचा असा शेवट करण्याचे काहि प्रयोजन आहे का? त्याचा अर्थ काय? साठ उत्तरे मागणारी कोणती लोककथा आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

साठा उत्तराची कहाणी ..............

"साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"
याचा मला माहीत असलेला अर्थ : "सर्व सांगायचं म्हंटलं तर गोष्ट खूप लांब होईल. (म्हणून) ती (येथे) थोडक्यात सांगितली आहे."

माझा प्रश्न

'पटा तो टेक, नाही तर रामटेक 'म्हणजे काय?
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

असा असेल का ?

>>'पटा तो टेक, नाही तर रामटेक 'म्हणजे काय?
'पटलं तर ठीक, नाही तर फाट्यावर मारतो' असा अर्थ जवळचा वाटतो. :)

हौस केली मोठी, आन दगड्या आला पोटी = मोठ्या हौसेने काम करायचं आणि फळ मात्र वाईट.

ऋषी,मस्त धागा काढलाय....!

-दिलीप बिरुटे

पटले तर घ्यावे नाही तर रामराम घ्यावा

पटता तो टेक, नाहीतर रामटेक चा अर्थ पटले तर घ्यावे नाही तर रामराम घ्यावा असा आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

ही कहाणी साठवा, पचवा आणि नंतर इतरांना सांगा

ही कहाणी साठवा, पचवा आणि नंतर इतरांना सांगा, असा काहीसा एक अर्थ आहे असे म्हणतात.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

माझाही प्रश्न

'पडलो तरी टांग वर' चा अर्थ/संदर्भ किंवा उगम जाणुन घ्यायला आवडेल. :)

 
^ वर