गुगल आयएमई

गुगलने ऑफलाईन (व ऑनलाईन) वापराकरीता आयएमई (इनपुट मेथड एडिटर) उपलब्ध केल्याचे नुकतेच कळले. यात मराठी सहित १४ भाषांचा समावेश आहे. मी हा आयएमई डाऊनलोड केला, परंतु लॅपटॉपमध्ये इंडीक सपोर्ट नसल्याने वापरता आला नाही. लवकरच वापरून बघेन. उपक्रमींपैकी कुणी वापरला असल्यास अनुभव कळवावा.

इथे डाऊनलोड करता येईल.

जयेश

Comments

गमभन

मी गुगलचे मराठी हे जीमेल मधे वापरून पाहीले. त्यापेक्षा मला गमभनच चांगले वाटले आहे. ते देखील ऑफलाईन वापरता येतेच.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

भाषा इंडिया चे आयएमई

मी मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले मराठी आयएमई वापरतो. हे उत्तम चालते असा माझा अनुभव आहे. शिवाय इंटरनेट एक्सप्लोअरर, फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस या सारख्या प्रणालीमधेही हे उत्तम चालते. परंतु ऑपरेटिंग सिस्टिममधे इंडिक सपोर्ट असल्याशिवाय कोणतेही आयएमई चालणार नाही. त्यामुळे कंट्रोल पानेलमधे जाऊन इंडिक सपोर्ट एनेबल करणे अत्यंत आवश्यक असते.
चन्द्रशेखर

उत्तम

वर उल्लेख असलेले सर्व पर्याय मी वापरले आहेत आणि वापरतो आहे. मला सगळेच आवडले. भाषा इंडियावर आता ते मिळते की नाही माहित नाही. पण अनुस्वार देताना थोडा गोंधळ उडतो.






 
^ वर