ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार

ब्राह्मणी घार! खडकवासला धरणाच्या जवळ सकाळी सकाळी घेतलेला फोटो!
--भालचंद्र पुजारी!

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

मस्त फोटो! हे नाव पहील्यांदाच ऐकले (आणि इतका चांगला घारीचा फोटो पण पहील्यांदाच पाहीला). अजून काही या पक्षाबद्दल माहीती असल्यास अवश्य लिहा.

धन्यवाद!

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मस्त...!

फोटो मस्तच..पण, ब्राह्मणी घार हे आम्हीही पहिल्यांदाच ऐकले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

खूप झूम करून तरी कातरावा लागला असे दिसते - (कॅमेरा तिपाईवर रोवून स्तब्ध केला होता का?) - पण काय डौलदार पक्षी आहे!

फांद्यांच्या रंगावरून हा घारीचा आवडता टेहळणी बुरूज आहे, असे दिसते आहे.

पक्ष्याबद्दल आणखी थोडी माहिती द्यावी.

नाव!

सर्वांना धन्यवाद!

नावाविषयी जरा सांगतो.
ह्याचे "ब्राह्मणी" हे नाव जातीवाचक नसून ते त्या पक्षाच्या रंगाला उद्देशून आहे! आणि त्यातून तो शब्दही इंग्रजी आहे. इंग्रजीत ह्या पक्षाला "Brahminy Kite" असे म्हणतात. असेच Brahminy blind snake, Brahminy duck असेही प्राणी/पक्षी अस्तित्वात आहेत. (कदाचित हा शब्द संस्कृत मधूनच इंग्रजीमध्ये गेला असेल!)

तशी ही घार भारतात सर्वत्र सापडते. महाराष्ट्रातही अगदी सहजच आढळुन येते. हमखास शोधायचे असेन तर नदिकिनारे पहावे. मला ब-याच नदीकिनारी ही आढळुन आली आहे.

@धनंजय!
हो, तशी ही घार ब-यापैकी लांब असल्याने आलेल्या छायाचित्रावर बरेच संस्कार करावे लागले आहेत. कॅमेरा तिपाईवर नव्हता. दुचाकी वरुन सिंहगड-दरी कडे कूच करत असताना ही रस्त्यात डौलाने बसलेली दिसली .. धावतपळत जाउन फोटो काढला. आणि आजुबाजूची विष्ठा पहाता हा तिचा नेहमीचा टेहाळणी बुरुज असणार हे नक्की!

(टेहाळणी बुरुज! इतका चांगला शब्द उपलब्ध असताना आम्ही त्याला टॉईलेट का नाव ठेवले?:))

http://bspujari.googlepages.com/

मस्तच

फोटो फारच आवडला. ब्राह्मणी बदक असे नाव मीही वाचले आहे. ब्राह्मणी घार मात्र माहित नव्हती. कुर्रेबाज पक्षी आहे.

अवांतरः कबुतरे आणि पोपट हे ब्राह्मण (शाकाहारी) पक्षी आहेत असे शाळेत शिकवलेले आठवते. त्याचा संबंध या घारीशी नाही हे भालचंद्र यांनी स्पष्ट केले आहेच.

मनुष्यजातींच्या घारी

नाव रंगावरून आहे, खरे. पण नावाचा रंगाशी संबंध मनुष्यजातींवरून आहे.

'ब्राह्मणी घार' आणि 'परैया घार' हे दोन प्रकार भारतात सामान्यपणे आढळतात. ('परैयर्' ही दक्षिण भारतातली एक दलित जात आहे.)

ब्राह्मणी मैना - हिचा उल्लेख महाभाष्यात पतंजलीने "संन्याशासारखा दिसणारा पक्षी" असा केला आहे. ही मैना कषायवस्त्र पांघरल्यासारखी दिसते.

ब्राह्मणी सापही तपकिरी/कषाय रंगाकडे झुकतो.

धन्यवाद

हे बाकी मला माहित नव्हते! माहिती बद्दल धन्यवाद! :)

-भालचंद्र

वेताळ टेकडी

पुण्यातल्या वेताळ टेकडीवर ही घार मी बर्‍याच वेळा बघितलेली आहे. उडताना व बसलेली असताना ती खूपशी गरूडासारखी दिसते त्यामुळे माझ्यासारख्या या विषयातल्या अनभि़ज्ञ माणसाला तो गरूडच आहे असेच वाटले होते. नंतर एका जाणकाराने तो गरूड नसून ब्राम्हणी घार असल्याचे स्पष्ट केले होते.
चन्द्रशेखर

पुनरागमन...

भालचंद्र, इतक्या दिवसांनी तुमचे छायाचित्र आले म्हणायचे. बाकी तुमचे मित्रवर्य आरागॉर्नही सध्या गायब झाले आहेत.
हे चित्रपण कॅनन ५०-२५० चेच का? उत्तम आले आहे..... गळ्याखालच्या पांढर्‍या पिसांवरचे रेघांरेघांचे डिझाईन झकास दिसते आहे.
माझ्याकडच्या पुस्तकातून माहिती मिळाली तर देतो. बाकी खडकवासल्याला चक्कर मारली पाहिजे.
ब्राम्हणी मैनेचे नावही तिच्या रंगावरुन पडले आहे का?

-सौरभ.

==================

अलेप्पीतील घार

फोटो फारच आवडला !

अलेप्पी येथे फिरताना एका घराबाहेर मला पाळलेला पक्षी दिसला. तेथील माणसाने तो गरुड आहे असे सांगीतले.
आता कळले ती घार आहे. धन्यवाद भालचंद्र !
पक्षी निवांत बसला असल्याने मलाही आरामात फोटो काढता आला.

घार की गरुड

या घारीचा फोटो बघताना ही घार आहे का गरुड असा प्रश्न सतावत होता कारण रंग, डोके आणि छातीवरील पांढरा कोट, पिवळी बाकदार चोच आणि ऐट यांकडे बघता ही घार गरुडासदृश वाटते. अधिक माहिती शोधता विकीवर तिला लाल पाठीचा समुद्र गरुड म्हणतात असेही कळले. अधिक माहिती येथे वाचा.

फोटो अगदी खासच्!

दक्षिणेत ब्राह्मणी घारीला विष्णूचा गरूड समजतात विकीवर लिहिले आहे.
ब्राह्मणी घारीसारखे ब्राह्मणी मैना आणि ब्राह्मणी बदकही असते. ब्राह्मणी मैना म्हणजे एक प्रकारची साळूंकी. ती कायम भिजल्यासारखी दिसते आणि तिला डोक्यावर् मागे एक् शेंडीसारखा तुरा असतो.

ब्राह्मणी काईट

या दुव्यावरही असाच एक फोटो सापडला. शीर्षक ब्राह्मणी काईट असे आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर