सोमनाथ मंदिराचे फोटो

ब्रिटिश ग्रंथालयाच्या संकेतस्थलावर सोमनाथ मंदिराच्या भग्नावशेषांचे काही फोटो मिळाले. हे फोटो १०० वर्षांपूर्वीचे असल्याने कॉपीराईटचा भंग होत नाही. त्यातले काही खाली देत आहे.

फोटोंच्यावरून मंदिराच्या बांधकामाबद्दल आणि भव्यतेबद्दल उत्तम कल्पना येते. या मंदिराच्या द्वारांच्याबद्दल एक आख्यायिका आहे. त्याबद्दल माझ्या ब्लॉगमधे मी एक पोस्ट लिहिले आहे. जर कोणाला रुची असली तर ते वाचू शकतात.

चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

ऐतिहासीक छायाचित्रे...

छायाचित्रे ऐतिहासीक आहेत. त्या नंतर अर्थातच स्वातंत्र्याच्या तांबडफुटीच्या दरम्यान सरदार पटेलांनी गांधीजींना जिर्णोद्धाराबद्दल विचारले होते. गांधीजींनी जनतेच्या पैशाने करा मी सहभागी असेन असे सांगितले. पुढे गांधीजी आणि सरदार पटेलांच्या पश्चात खालील मंदीर बांधून पूर्ण झाले!

२६/११ च्या हल्ल्या नंतर समुद्रकिनारी पाकच्या सीमेलगत असलेल्या या देवळास विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पोस्टाचे तिकीट.

सोमनाथ मंदीराचे फोटो मस्तच
लहानपणी पोस्टाची तिकीटे जमवण्याचा छंद होता. त्या माझ्या संग्रहात सोमनाथ मंदीराचेही तिकीट होते.

असे दिसणारे. संगणकतज्ञ उपक्रमींपैकी कुणाला हे चित्र मोठे करता येइल का? मी बराच प्रयत्न केला पण जमले नाही.

वा - आश्चर्यकारक स्थापत्य

चित्रांबद्दल चंद्रशेखर आणि विकास यांचे आभार.

जुन्या देवळाचे स्थापत्य अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. गोलाकार छताचे बांधकाम तर अचाट. जीर्णोद्धार करताना जुने खांब वगैरे पुरातत्त्वखात्याने जपून ठेवले आहेत का? विशेषतः रेखाचित्रात दिसणारा बाकदार खांब?

ब्लॉगपोस्टही रोचक.

स्थापत्य - संदर्भ

गोलाकार छताचे बांधकाम तर अचाट. जीर्णोद्धार करताना जुने खांब वगैरे पुरातत्त्वखात्याने जपून ठेवले आहेत का? विशेषतः रेखाचित्रात दिसणारा बाकदार खांब?

वरील चित्राच्या मूळ दुव्याच्या खाली, खालील माहीती मिळाली त्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. (मूळ माहीती जशीच्या तशी मिळावी या साठी भाषांतर टाळत आहे)

In the report, 'Somanatha and other mediaeval temples in Kathiawad' of 1931, Henry Cousens wrote, “ Little now remains of the walls of the temple; they have been, in great measure, rebuilt and pached with rubble to convert the building into a mosque. The great dome, indeed the whole roof and the stumpy minars…are portions of the Muhammadans additions…The great temple, which faces the east, consisted, when entire, of a large central closed hall, or gudhamandapa, with three entrances, each protected with a deep lofty porch, and the shrine – the sanctum sanctorum – wich stood upon the west side of the hall, having a broad pradakshina or circumambulatory passage around it...The interior of the temple having being used as a mosque, the Muhammadans...re-erected many of the fallen pillars, roughly rebuilt the dome, and strengthened the cracked lintels with roughly constructed arches, beneath them...”.

तुमच्या (धनंजयच्या) वरील प्रश्नामुळे मी अजून थोडे शोधले तर अयोध्येबद्दल खालील माहीती आणि चित्र मिळाले:

"This view shows the Lakshmana Ghat on the banks of the Ghaghara river. The mosque at the top of the hill is the Babri Masjid, constructed by Babur, the first Mughal king of India, who ruled between 1526 and 1530. The mosque was infamously destroyed by militant Hindus on 6 December 1992. "

अजून शोध घेतल्यावर अशा बर्‍याच वास्तू मिळाल्या जिथे मंदीरांच्या मशिदी केल्या गेल्या आहेत. खाली अजून काही माहीती करता देत आहे: (सर्व ब्रिटीश पब्लीक लायब्ररीच्या संकेतस्थळावरून)

खालील चित्र हे १७८९ सालचे आहे. तिथे, "कृष्णजन्मस्थानावर औरंगजेबाने बांधलेल्या मशिदीचे चित्र" असे शिर्षक दिले आहे.

खालील चित्र हे बनारसच्या घाटांजवळचे आहे (१८६५). त्यात औरंगजेबाने बांधलेली अजून एक मशिद दिसते. ती काशीचे विष्णूमंदीर पाडून तिथे मशीद बांधलेली आहे. त्या देवळाचे मूळ नाव हे बिंदूमाधव असे होते. त्यामुळे त्या मशिदीस स्थानीक लोकं "माधवराव की मस्जीद" असे संबोधतात (असे १८६५ सालच्या माहीतीत लिहीले आहे).

हे गुजराथ (ढोल्का) मधील. धनंजयला पडलेल्या गोल घुमटाचा प्रकार येथे पण थोडाफार जाणवला: (१८८५)

शोधल्यास अजून ही दस्ताऐवज मिळू शकेल. मूळ माहीती तसेच दुव्या बद्दल चंद्रशेखर आणि सौरभदा यांचे आभार.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

घुमटाचा संदर्भ - अधिक अभ्यास हवा

लागला. चांगली माहिती आहे.

पुरातन भारतीय स्थापत्यात कमानींचा उपयोग दिसत नाही (घुमट आणि कमानीचे अभियांत्रिकी तत्त्व एकच) - कमानींबाबत चित्रा यांनी स्थापत्यशास्त्रातील लेख लिहिला होता, दुवा शोधला पाहिजे.

मला वाटले की इथले गोलाकार छत पुरातन भारतात या स्थापत्यवैशिष्ट्याचे आगमन दाखवत असावे. संदर्भामुळे आता तसे वाटत नाही.

- - - -

ताजा कलम :

खाली चंद्रशेखर म्हणतात की देऊळ कुमारपालाने बांधले. या शैलीत घुमट होते असे दिसते :

दिलवारा : देवळाचा घुमट

दिलवारा देवळाचा घुमट वरच्या चित्रात दिसतो. कोरीवकामाखालील दगडी गोलाकार लेखातील भग्नावशेषातल्यासारखे दिसतात. परंतु भग्नावशेषात भिंतीतली कमानी आहेत, तशा दिलवार्‍यातील (या) देवळात नाहीत.

दिलवारा येथे उभे खांब, कमानी नाहीत

अधिक अभ्यास हवा असे दिसते.

थोडी ऐतिहासिक माहिती

सोमनाथाचे मंदिर एकूण पाच वेळा नष्ट केले गेले असे म्हटले जाते. यापैकी शेवटची घटना औरंगजेबाच्या कारकीर्दीत झाली असे म्हटले जाते. १९५१ साली नवे मंदिर बांधण्याआधी पुराणवस्तू खात्याने जुन्या मंदिराच्या जागेवर मोठे उत्खनन केले होते. या उत्खननात फक्त ३ देवळांचे बांधकाम आढळून आले होते.
पहिले मंदिर नवव्या किंवा दहाव्या शतकात मूलराजा या राजाने बांधलेले
दुसरे मंदिर (नूतनीकरण या स्वरूपातले) अकराव्या शतकात भीमदेव या राजाने बांधलेले. सुलतान महंमद गझनीच्या हल्ल्यानंतर
तिसरे मंदिर कुमारपाल या राजाने बांधलेले (इ.स. ११४२-११७१) महत्वाची गोष्ट अशी की हे मंदिर अल्लाउद्दिन खिलजीच्या हल्ल्याच्या आधी बांधलेले होते व खिलजीच्या हल्ल्यात मंदिराची फारशी कोणतीच हानी झाली नसावी.
यानंतर चवदाव्या शतकात फक्त शंकराची पिंड नवीन केली गेली होती. ही पिंड खिलजीच्या हल्ल्यानंतर दीडशे ते दोनशे वर्षांनंतर बदलली गेली असल्याने त्याचा खिलजीच्या हल्ल्याशी संबंध जोडणे कठिण आहे.
वरील फोटोंच्यात दिसणारे मंदिर कुमारपाल राजानेच बांधलेले असणार आहे.
औरंगजेब बादशहाने १६५० च्या आसपास सोमनाथ मंदिर नष्ट करण्याचा हुकुम दिला होता. परंतु हा हुकुम बहुदा पाळला गेला नसावा. १६८२ पासून १७०७ पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्युकालापर्यंत तो दक्षिणेत होता. आपल्या मृत्युपूर्वी १७०७ मधेच त्याने सोमनाथ मंदिर नष्ट करण्याचा हुकुम परत एकदा आपल्या कोणत्यातरी सुभेदाराला दिला होता. या परत काढलेल्या हुकुमानुसार त्या सुभेदाराने मंदिर नष्ट करून तिथे मशीद खरोखरच बांधली होती का हे खात्रीपूर्वक सांगणे खरोखरच कठीण आहे. एक्झिस्टिंग मंदिरावर घुमट चढवणे मला शक्य वाटत नाही. त्यासाठी पायापासून बांधकाम करणे आवश्यक आहे. अशा बांधकामाचा कोणताही पुरावा उत्खननात मिळत नाही. औरंगजेबाच्या हुकुमाचे पालन झाले असलेच तर कदाचित वरचा घुमट थोडा पाडला जाऊन त्याला गोलसर आकार दिला गेला असण्याची शक्यता वाटते. असे बांधकाम औरंगजेब कालात झाल्याचे कोणतेही संदर्भ मला मिळाले नाहीत. जर दुसर्‍या कोणी शोधून काढले तर मला आनंद वाटेल.
परंतु जर असे बांधकाम झालेलेच नसले तर फोटोमधील मंदिर(मुख्य बांधकाम) कुमारपाल या राजाने बांधलेलेच असले पाहिजे हे सरळ आहे.(घुमटासह)

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांचे लेखन फारसे विश्वसनीय होते असे वाटत नाही. एकतर त्यांनी फक्त फारसी अरेबिक कागदपत्रे अभ्यासून आपले ग्रंथ लिहिले होते. (माझ्या लेखातील दुवा बघावा)संस्कृत किंवा जैन रचना त्यांनी कधी अभ्यासल्याच नव्हत्या. दुसरे म्हणजे हे लेखन करत असताना त्यांनी आपले पूर्वग्रह कधीच सोडले नव्हते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे दुसर्‍या बाजीरावाचा इंग्रजांनी लिहिलेला इतिहास) या सर्व कारणांमुळे सोमनाथ मंदिराचा इंग्रजांनी लिहिलेला इतिहास फारसा विश्वसनीय मानता येणार नाही.
चन्द्रशेखर

भग्न चित्रे पाहून व्यथीत होतो...जरासे अवांतर.

सोमनाथाचे मंदिर एकूण पाच वेळा नष्ट केले गेले असे म्हटले जाते.

पाकिस्तान अर्थात भारताची फाळनी या पुस्तकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अंखडतेचे [ऐक्याचे] तुकडे या लेखात [पृ.क्र.४३ वर ] संदर्भ तिथे वेगळे असले तरी ते म्हणतात की, ''सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करुन महमदने चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्या मंदिरातील मूर्तीचे ४ तुकडे केले. एक भाग गझनीच्या जामा मशिदीत ठेवला, दुसरा भाग राजवाड्याच्या प्रवेशद्वारास टांगून ठेवला तिसरा मक्केला व चौथा भाग मदिनेस पाठविला''

'लेन पुल याने म्हटले आहे की, दरवर्षी हिंदुस्थानातील काफिरांविरुद्ध पवित्र युद्ध करण्याची शपथ घेतलेला गझनीचा महमद सोमनाथ मंदिराचे जोपर्यंत पावित्र्य भगं झालेले नव्हते तो पर्यंत मूर्ती भंजनाची मोहीम थांबवू शकत नव्हता. या विशिष्ट उद्दिष्टासाठी आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस मुल्तानपासून अनहालवाड, किनार्‍यापर्यंत अखेरचे प्रसिद्ध मंदिर उद्ध्वस्त होईपर्यंत त्याने मोहीम चालू ठेवली होती.

लेन पुल पुढे म्हणतो '' ३ लाख यात्रेकरु नेहमीप्रमाणे एकत्रित जमलेले होते.एक हजार ब्राह्मण मंदिराची सेवा करीत होते व तेथील मौल्यवान संपत्तीचे रक्षण करीत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शेकडो लोक नाचगाणी म्हणत होते. मध्यभागी दागीन्यांनी सुशोभित केलेले भव्य लिंग होते. चकाकणार्‍या दागिन्यांच्या प्रकाशाचे प्रतिबिंब छतावर टांगलेल्या झुंबरावर पडत होते. जणु काही आकाशातील चांगण्या लुकलुकत असल्याचे जाणवत होते.... त्याचवेळी परकीय काफिरांनी सोमनाथ मंदिर काबीज केल्याने भीतीपोटी मंदिराच्या भिंतीवरुन ब्राह्मण पळून जाऊ लागले. मुस्लीम आक्रमक न घाबरता भिंतीवर चढले. भक्तांच्या विनंतीला देव धावून गेला नाही. भक्तांचा अक्रोश त्याला ऐकू आला नाही. ५० हजार हिंदुच्या श्रद्धेला धक्का बसला. पावित्र्य भंग पावले. भव्य लिंगाचे तुकडे करण्यात आले व विजेत्यांनी ते आपल्या महालात नेले. मंदिराचे भव्य दरवाजे गझनी येथे बसविण्यात आले व लाखो पौंड संपत्ती मूर्तीभंजकांना वाटण्यात आली.''

''गझनीच्या महमदाने केलेले कार्य धार्मिक परंपरा बनली व त्याच्यानंतर आलेल्या सर्व आक्रमकांनी त्या परंपरेचे निष्ठेने पालन केले.''

अर्थात इंग्रज अभ्यासकांनी केलेले वर्णन किती संदर्भ-पुरावे देऊन आहेत मला माहित नाही. पण, त्याच पुस्तकात डॉ.टायसन म्हणतात की, ''भारतात हे आम्ही सर्व पाहिले आहे.''

असो...!

-दिलीप बिरुटे

ऐतिहासिक...

सोमनाथाचे मंदिर एकूण पाच वेळा नष्ट केले गेले असे म्हटले जाते. यापैकी शेवटची घटना औरंगजेबाच्या कारकीर्दीत झाली असे म्हटले जाते.

म्हटले जाते म्हणजे काय? (तीन का पाच का सात का अजून काही हा वेगळा मुद्दा आहे पण) इतिहास नसून दंतकथा आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का?

१९५१ साली नवे मंदिर बांधण्याआधी पुराणवस्तू खात्याने जुन्या मंदिराच्या जागेवर मोठे उत्खनन केले होते. या उत्खननात फक्त ३ देवळांचे बांधकाम आढळून आले होते.

याचा अर्थ तिथे फक्त तीनच देवळे आहेत असे म्हणायचे आहे का?

वरील फोटोंच्यात दिसणारे मंदिर कुमारपाल राजानेच बांधलेले असणार आहे.

अच्छा म्हणजे उत्खनन हे १९५१ मधे झाले आणि फोटो मात्र १८६९चा.

~`^

खिलजीच्या हल्ल्यात मंदिराची फारशी कोणतीच हानी झाली नसावी. यानंतर चवदाव्या शतकात फक्त शंकराची पिंड नवीन केली गेली होती. ही पिंड खिलजीच्या हल्ल्यानंतर दीडशे ते दोनशे वर्षांनंतर बदलली गेली असल्याने त्याचा खिलजीच्या हल्ल्याशी संबंध जोडणे कठिण आहे.

खिल्जी काय सोमनाथला नवस फेडायला आला होता का? फारशी हानी होणे अथवा फारशी न होणे यात नक्की काय फरक करू शकता?

औरंगजेब बादशहाने १६५० च्या आसपास सोमनाथ मंदिर नष्ट करण्याचा हुकुम दिला होता. परंतु हा हुकुम बहुदा पाळला गेला नसावा. ...

....The temple though as above mentioned three times destroyed by the Muhammadans was nevertheless three times rebuilt and so late as ad 1700 was still a place of great sanctity But in 1706 Aurangzeb ordered its destruction and looking at the style in which the ruins have been patched up and the poorness of the remains there seems every reason to believe that this order was carried out The Prabhas...संदर्भ ब्रिटीश गॅझेटीयर आणि मूळ संदर्भ मिरत-इ-अहमदी च्या पुस्तकाचा.

तिथे मशीद खरोखरच बांधली होती का हे खात्रीपूर्वक सांगणे खरोखरच कठीण आहे.

स्वातंतत्र्योत्तर जिर्णोद्धाराच्या वेळेस सर्वात प्रथम मशिदीस हलवून पुर्नस्थापना (relocation) करण्यात आली होती. ती मशीद मग कुणी बांधली होती?

औरंगजेबाच्या हुकुमाचे पालन झाले असलेच तर कदाचित वरचा घुमट थोडा पाडला जाऊन त्याला गोलसर आकार दिला गेला असण्याची शक्यता वाटते.

म्हणूनच तर "the ruins have been patched up " सारखे शब्द प्रयोग दिसतात.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांचे लेखन फारसे विश्वसनीय होते असे वाटत नाही. एकतर त्यांनी फक्त फारसी अरेबिक कागदपत्रे अभ्यासून आपले ग्रंथ लिहिले होते....या सर्व कारणांमुळे सोमनाथ मंदिराचा इंग्रजांनी लिहिलेला इतिहास फारसा विश्वसनीय मानता येणार नाही.

हे बरं आहे... म्हणजे फोटो घेताना ब्रिटीश लायब्ररीतून घेतले तर ते विश्वसनीय ठरतात, तेंव्हा हे सोमनाथाचेच कशावरून हा प्रश्न पडत नाही... बरं त्यात जे काही लिहीले आहे ते मंदीर उध्वस्त करण्यावरून लिहीलेले आहे. त्याचा संदर्भ संस्कृत-जैन रचनांमधे कसा काय असणार?

जर हा इतिहास विश्वसनीय नसला तर का नाही याचे उत्तर "वाटते", "नसावे" अशा वाक्य रचनेतून दिसत नाही. त्या साठी तितक्याच संदर्भांची गरज आहे. त्या शिवाय जो जगजाहीर इतिहास आहे, जो मुसलमान समाजाने पण कधी नाकारला नाही त्या इतिहासाबद्दल लिहीताना जेंव्हा "असे झाले" इतके स्पष्ट शब्द न वापरता, "असे म्हणले जाते" सारखे वाक्प्रयोग होतात, म्हणजे असेलही पण कदाचीत नसेलही, तेंव्हा त्यात पूर्वग्रह ठेवला गेला आहे असे म्हणता येत नाही का?

तात्पर्यः "थोडी ऐतिहासिक माहिती" हा प्रतिसाद एक चपखल उदाहरण आहे. सामान्यांची दिशाभूल करणारी वाक्यरचना करत जे घडले होते ते कसे घडलेच नाही अथवा जरी घडले असले तरी तितकेसे बिघडले नाही (उ.दा. : खिलजीच्या हल्ल्यात मंदिराची फारशी कोणतीच हानी झाली नसावी. ) असे दाखवण्याने समाजात माजणारी बुद्धीभेदी दुही ब्रिटीशांना त्यांच्या फोडा-झोडा राजकारणाने पण करता आली असेल का याची शंकाच वाटते...

हा दोष केवळ प्रतिसादकर्त्यास (श्री. चंद्रशेखर यांना) देण्याचा यात अजिबात उद्देश नाही . कृपया गैरसमज नको. पण ज्या एका पद्धतीच्या विचारांनी इतिहासाचे निवडक विवेचन करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न किमान् गेल्या २-३ पिढ्यातील बुद्धीवंतांनी केला त्याची फळे म्हणून असेच लिहीणे म्हणजे योग्य वाटू लागते. वास्तवीक वैचारीक आणि तात्विक मतभेद असले म्हणून काहीच बिघडत नाही. पण तरी देखील ऐतिहासीक सत्य स्पष्टपणे स्विकारून, 'जे झाले ते झाले त्यावर कावकाव करू नका' असे म्हणत पुढे जाण्याचा योग्य असा सामाजीक मार्ग दाखवण्याऐवजी जेंव्हा "असे झालेच नसावे, यात पूर्वग्रह असावा" अशा पद्धतीची चिवचिव होते तेंव्हा केवळ इतिहासच नव्हे तर पुढे घडणारा समाज देखील भ्रष्ट होतो असे वाटते...

असो. म्हणून वाटते की, जरी, आपण एका विचारसरणीस मानत असलो, तरी पण वैचारीक चर्चेत/लेखात, आपण समाजाचा विचार करत प्रामाणीकपणे समतोल असतो का आपला प्रामाणिकपणा हा केवळ आपल्या विचारसरणीपुरताच मर्यादीत आहे ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने स्वतःबद्दल प्रामाणिक पणे शोधावे...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

खो-खो

म्हणजे फोटो घेताना ब्रिटीश लायब्ररीतून घेतले तर ते विश्वसनीय ठरतात,
लय भारी.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

ऐतिहासिक सत्य

तरी देखील ऐतिहासीक सत्य स्पष्टपणे स्विकारून, 'जे झाले ते झाले त्यावर कावकाव करू नका' असे म्हणत पुढे जाण्याचा योग्य असा सामाजीक मार्ग दाखवण्याऐवजी जेंव्हा "असे झालेच नसावे, यात पूर्वग्रह असावा" अशा पद्धतीची चिवचिव होते तेंव्हा केवळ इतिहासच नव्हे तर पुढे घडणारा समाज देखील भ्रष्ट होतो असे वाटते...
ऐतिहासिक सत्य काय आहे हेच शोधण्याचा इत्तिहासाचा प्रयत्न असतो. या साठी सर्व प्रकारचे पुरावे शोधावे लागतात. फक्त एकाच उगमाकडून आलेले पुरावे ग्राह्य धरले तर ऐतिहासिक सत्य हे डिस्टॉर्ट झाल्याशिवाय रहात नाही.
श्री विकास यांना मी एवढेच सांगू इच्छितो की माझ्या प्रतिसादात दिलेल्या प्रत्येक वाक्यासाठी मी संदर्भ देऊ शकतो. परंतु ते येथे देत बसले तर खूपच लांबण लागेल. त्यांना हवे असल्यास मी व्य.नि. वर संदर्भाची यादी पाठवू शकतो. अर्थात संदर्भ दिले म्हणजे ऐतिहासिक सत्य सापडले असे नसल्याने, 'असे झाले असावे' या प्रकारची वाक्य रचनाच करणे योग्य ठरावे.
चन्द्रशेखर

तेच

ऐतिहासिक सत्य काय आहे हेच शोधण्याचा इत्तिहासाचा प्रयत्न असतो.
इतिहासाचाच कशाला आपला (म्हणजे आपल्या सगळ्यांचाच) असायला हवा. माझी त्याला कुठे ना आहे? माझ्या प्रतिसादात मी एकाच बाजूने/उगमाने आहे अथवा एकच बाजू योग्य आहे आणि ती मला पटत असल्याने तीच बरोबर आहे असे मला म्हणायचे नाही. मात्र आपल्या लेखनातील रोख जेथे आणि ज्या कारणांसाठी खटकला ते लिहीले आहे. ते पण दोन्ही बाजूंची (तुम्ही म्हणत असलेल्या आणि सर्वसाधारण समाजमान्य असलेल्या) थोडीफार माहीती आधीपासून असल्यामुळे. जर तशी नसती तर वादात अथवा फंदात पडलो नसतो...

फक्त एकाच उगमाकडून आलेले पुरावे ग्राह्य धरले तर ऐतिहासिक सत्य हे डिस्टॉर्ट झाल्याशिवाय रहात नाही.
हे वाक्य सर्वत्रच लागू होते हे मान्य आहे का? का केवळ सोमनाथाच्या बाबतीतच लागू होते? आपण इतरत्रही हाच नियम पाळता का? "ब्रिटिश इतिहासकारांचे लेखन फारसे विश्वसनीय होते असे वाटत नाही" असे म्हणताना आपण संशोधन पूर्वग्रहदुषीत करून तर करत नाही ना? एक ब्रिटीश असणे हा समान उगम सोडल्यास अनेक (ब्रिटीश) व्यक्तींनी विविध इतिहास लिहीला आहे. त्यातील काही नक्कीच पूर्वग्रहदूषीत असू शकतात (अर्थात तसे सिद्ध झाल्यास). दुसर्‍या बाजीरावासंदर्भात काय लिहीले ते माहीत नसल्याने मी त्यावर भाष्य करत नाही, पण ते ज्या लेखकाने लिहीले त्याच लेखकाने सोमनाथावर लिहीले असे म्हणायचे आहे का?

"गझनीने आणि/अथवा खिल्जीने केलेला सोमनाथावरील हल्ला हा धार्मिक नसून आर्थिक आहे असे म्हणणे; केवळ अरेबिक ग्रंथांचे पुरावे आहेत, हिंदू जैन-ग्रंथांचे नाहीत, इतकी काही देवळे पाडली नाहीत, थोडीशीच पाडली असे म्हणणे, " असले सगळे संबंध हे एका उगमाचेच काय केवळ एका व्यक्तीने आणि एकाच पुस्तकात आणि विविध मुलाखतीत चालू केलेत असे म्हणता येईल. आपल्या वाक्यांशी साधर्म्य असलेली इंग्रजीतील वाक्येही तेच सांगतात... तरी देखील आपले इतर संदर्भ मिळेपर्यंत थांबतो. ( हिंदू जैन संदर्भाबाबतः कसे असणार परकीय अमानुष सत्तेच्या काळात हिंदू-जैन ग्रंथ काय स्पष्टपणे लिहू शकणार होते का? साधी ब्रिटीशांच्या काळातील कोल्हटकरांची नाटके पहा कशी लपून छपून होती. येथे तर काय सगळा परकीय रानटीपणाशी आणि दहशतवादाशी गाठ होती. आजच्या नियमाने आणि स्वातंत्र्याच्या कल्पनांनी तत्कालीन समाज कसा वागला असणार आणि त्यांच्याकडून पुरावे तयार झाले असणार असे म्हणणे जरा जास्तच वाटते.)

असो. तुमचे संदर्भ अवश्य कळवा. मात्र चर्चेच्या संदर्भात योग्य वाटत असतील तर येथेच चर्चा चालू राहीली तरी उत्तम...

धन्यवाद

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

संदर्भ आणि स्पष्टीकरण

वरील साद-प्रतिसादांच्या संदर्भात श्री. चंद्रशेखर यांनी मला व्य.नी.ने त्यांचे संदर्भ पाठवले होते....

इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ हिस्टॉरीक प्लेसेस - एशिया अँड ओशेनिया

वरील पुस्तकातील मुख्य मुद्दे काय सांगतात? तरः (१) महंमदाने १०२५ साली त्याच्या मुर्तीभंजनाच्या आधीपासून (९९७) चालू असलेल्या वेडातून तसेच दौलत लुटण्यासाठी सोमनाथवर हल्ला केला. (२) इतक्या वेळा पडझड आणि जिर्णोद्धार झाला आहे की नक्की कितीवेळेस हल्ले झाले ते सांगता येत नाही. (३) प्रत्येक वेळेस सगळे मंदिर तोडण्यात आले नाही पण लूटणे आणि योग्य भाग काढणे मात्र या हल्लेखोरांनी चालू ठेवले होते.

एशियाटीक जरनल (व्हॉल्यूम ४०)

या संदर्भात मला समजल्याप्रमाणे: (१) हे जरनल एकंदरीत निनावी लोकांच्या लेखाचे आहे. त्यामुळे त्याचा अजिबातच उपयोग नाही अथवा ग्राह्य नाही, असे म्हणायचे नाही. तरी देखील काहीतरी वेगळेच वाटले...(२) या लेखनात गझनीच्या महंमदाने हल्ला केला, मंदीर उध्वस्त केले हे म्हणलेले आहेच. अगदी स्थानीक हिंदू मंदीर वाचवण्यासाठी तह करायला असताना देखील तो हट्ट सोडत नव्हता. कारण त्याला त्या देवळातच त्याच्या प्रार्थना करायच्या होत्या (म्हणजेच त्याचा वापर मशिदी सारखा करायचा होता). (३) कुमारपालाने नंतर देऊळ बांधल्यासंदर्भात (११६९) काही स्तंभलेख मिळाले. (४) कुमारपालाने बांधलेले देऊळ हे कदाचीत जैन पद्धतीचे वाटले. मात्र त्यात आतल्या भागात वैभव बघण्याच्याबाबतीत मात्र निराशा झाली...

हिंदू बूक्स.ऑर्ग (मला वाटते हे कन्हैय्यालाल मुन्शींनी लिहीलेले पुस्तक आहे).

हे पुस्तक वरील संकेतस्थळावर स्वेच्छेने पुर्नटंकीत केलेले असल्याने ते मूळ संदर्भ म्हणून धरणे मला योग्य वाटले नाही...तरी देखील त्याच्या दुसर्‍यापानावर खालील वाक्य लिहीलेले आढळले: (अधोरेखीत मी केलेले आहे).

When the temple was converted into a mosque, two, mosque domes were constructed, one over the gudha mandapa and the other over the garbhagriha. The old Chalukyan pillars supporting the dome over the gudha mandapa were converted into arches by crude artistic stone structures.

Somanatha, the many voices of a history - रोमिला थापर

वरील पुस्तक नवीन असल्याने गुगलबुक्स वरती पूर्ण दिसत नाही. या संदर्भात खालील स्पष्टीकरणात जास्त लिहीनः

-----------------------------------------

आता हा साद-प्रतिसाद चालू होण्याचे मूळ कारण, श्री. चंद्रशेखर यांचा वरील प्रतिसाद आहे. त्यातील माझ्या लेखी आक्षेपार्ह मूळ मुद्दे कुठले होते?

सोमनाथाचे मंदिर एकूण पाच वेळा नष्ट केले गेले असे म्हटले जाते.
माझा आक्षेप या इतिहासावर घेतलेल्या शंकेवर होता. यातील एकाही संदर्भात असे घडलेच नसावे असे म्हणलेले नाही. अगदी रोमिला थापर यांनी देखील असे म्हणलेले नाही.
खिलजीच्या हल्ल्यात मंदिराची फारशी कोणतीच हानी झाली नसावी. वरच्या स्वतःच्याच वाक्याशी आणि त्याचे समर्थन केलेल्या नंतरच्या स्वत:च्याच प्रतिसादाशी हे वाक्य जुळत नाही. शिवाय फारशी हानी झाली नाही म्हणजे किती झाली म्हणून फारशी धरली जात नाही? बरं हे उलटे झाले असते - म्हणजे हिंदूंनी मुसलमानांच्या प्रार्थनास्थळावर (श्री. चंद्रशेखर तसेच रोमिला थापर यांना वाटते त्याप्रमाणे) खिलजी इतकाच हल्ला केला तर असेच म्हणण्यात येईल का की त्यात मशिदीची फारशी हानी झाली नाही म्हणून? तेच त्यांच्या, म्हणजे थापरबाईंच्या या दिव्यांपुढे - की म्हणे सोमनाथावरील हल्ला हा धार्मिक नव्हता तर आर्थिक होता. उद्या असे म्"णले तर की बाबरी मशिदीचे प्रकरण हे धार्मिक नव्हते तर राजकीय होते. तेंव्हा त्यात "हिंदूंना" नावे ठेवू नयेत म्हणून? (यात मी कुठल्याच कृतीचे समर्थन करत नाही. मात्र आपले मत जाणून घेयला आवडेल).
औरंगजेब बादशहाने १६५० च्या आसपास सोमनाथ मंदिर नष्ट करण्याचा हुकुम दिला होता. परंतु हा हुकुम बहुदा पाळला गेला नसावा. परत याचा कुठेच संदर्भ मिळत नाही...एक रोमिला थापर यांचा संदर्भ सोडल्यास. त्यांचे खालील पान पहा:

शिवाय थापर बाईंनी, "Aurangzeb's supposed intolerance is little more than a hostile legend based on isolated acts such as the erection of a mosque on a temple site in Benares" असे हिस्ट्री ऑफ इंडीयात म्हणल्याचे वाचले आहे, त्या विचाराबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? (आधी सपोज्ड इन्टॉलरन्स, मग आयसोलेटेड ऍक्ट्सवर होस्टाईल लिजंड).

तिथे मशीद खरोखरच बांधली होती का हे खात्रीपूर्वक सांगणे खरोखरच कठीण आहे. या संदर्भात स्ट्रक्चरल दृष्टीकोनातून चित्राचे उत्तर असेलच. पण ऐतिहासीक दृष्ट्या पहाता स्वातंत्र्योत्तर काळात नसलेली मशिद कशी काय हलवली? आडात नव्हते तर पोहर्‍यात कुठून आले?

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांचे लेखन फारसे विश्वसनीय होते असे वाटत नाही. संस्कृत किंवा जैन रचना त्यांनी कधी अभ्यासल्याच नव्हत्या. दुसरे म्हणजे हे लेखन करत असताना त्यांनी आपले पूर्वग्रह कधीच सोडले नव्हते.
रोमिलाबाईंचा (त्यांच्या भाषेत) "हिंदूत्ववादी इतिहासावर" आक्षेप अशा साठी आहे की गेल्या हजार वर्षाचा इतिहास सांगताना ते सिलेक्टिव्हली सांगतात. तसे जर कोणी केले तर माझा त्याला आक्षेपच असेल. म्हणून इतर ("हिंदूत्ववादी") अनेक संदर्भ माहीत असूनही मी अशा वादात देण्याचे टाळतो. ते चूक असतील म्हणून नव्हे, तर जे खरे आहे ते दाखवायचे असेल, तर त्याच्या विरुद्ध लिहीणार्‍यांचे संदर्भ देऊनही, असे विचार प्रामाणिकपणे खोडता येतात म्हणून.

आता वरील वाक्यांसंदर्भात आपले काय दिसते? खिल्जीचा हल्ला म्हणल्यावर ब्रिटिशांचा इतिहास अविश्वसनीय पण कुठेतरी संशयाचा फायदा मिळत असेल तर तो मात्र ग्राह्य! याला सिलेक्टीव्ह म्हणायचे का काय म्हणायचे?

हिंदू-जैन रचनात या संदर्भात नसल्याचा थापर बाईंचाही आक्षेप आहे. मला विचारायचे आहे की हिंदू-जैन धार्मिक लेखनात, जे थापरबाईंनी तपासले त्यात गझनी-घोरी-खिल्जी आदींचे उल्लेख आहेत का? नसल्यास, याचा अर्थ ते आलेच नव्हते असा घेयचा का? शिवाय आधी म्हणल्याप्रमाणे अतिशय दडपशाहीच्या वातावरणात रहाणार्‍यांना, ज्यांनी असे अनेक पिढ्या अनुभवले नव्हते, त्यांना खरा इतिहास लिहीणे सुचले असते का? बरं थापरबाई म्हणातात की ज्या अरबांनी लिहीले ते दरबारातील असल्याने त्यांनी भाटगिरी केली. तसे म्हणले तरी ती भाटगिरी गझनीच्या मोहंमदापासून ते औरंगझेबापर्यंत सर्वांनी मान्य कशी केली? कोणी कसे म्हणले नाही की असे लिहीणे चुकीचे आहे म्हणून?

प्रामाणिकपणे, आपले वरच्या प्रतिसादातील विचार हे केवळ मला रोमिला थापर यांचे विचार वाटले. आपण दिलेल्या कुठल्याच इतर संदर्भात त्यातील साधर्म्य दिसले नाही. शिवाय तशा (आपण मांडलेल्या) विचारांचे पुस्तक लिहून थापरबाईंनी (सोमनाथासंदर्भात) नवीन विचार लोकांसमोर ठेवला असे कायम म्हणले जाते.

माझा आक्षेप यात होणार्‍या दिशाभुलीस आहे. याचा अर्थ तेंव्हा अन्याय झाला म्हणून आता आम्ही करू, अथवा ते उकरत बसूया, असे माझे म्हणणे आहे असे वाटले, तर तो निव्वळ गैरसमज आहे याची खात्री बाळगावी. मात्र जर खरेच धार्मिक तणाव नको असतील तर असे गुडीगुडी वरवर लिहीण्यापेक्षा खरे लिहून, त्यातून शिकूनच समाज नुसता मोठा नाही तर खर्‍या अर्थाने प्रौढ आणि जबाबदार होईल असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

असे वाटते

रोमिलाबाईंचा (त्यांच्या भाषेत) "हिंदूत्ववादी इतिहासावर" आक्षेप अशा साठी आहे की गेल्या हजार वर्षाचा इतिहास सांगताना ते सिलेक्टिव्हली सांगतात. तसे जर कोणी केले तर माझा त्याला आक्षेपच असेल.

हेच वाक्य "जे कोणी असे करतात त्यांना माझा आक्षेप आहे" असेही लिहिता आले असते. जर, तर आणि असेल वगैरे वाक्यरचना वापरून असे कोणी करतच नाही ही शक्यता पुढे रेटली जात आहे असे वाटते. :-)

अतिशय दडपशाहीच्या वातावरणात रहाणार्‍यांना, ज्यांनी असे अनेक पिढ्या अनुभवले नव्हते, त्यांना खरा इतिहास लिहीणे सुचले असते का?

या वाक्याविषयी एक उदाहरण म्हणून, औरंगजेबाने काशी विश्वनाथाच्या मंदिराची हानी केली याचे संदर्भ कोठे कोठे सापडतात या विषयी काही माहिती आहे का? (मला खरेच माहित नाही म्हणून विचारते.) अतिशय दडपशाहीच्या वातावरणात, हलाखीची परिस्थिती, मरणप्राय अवस्था वगैरे हिंदु जनतेविषयी शब्दप्रयोग अनेकदा केले जातात. हे करताना राजस्थानातील राजवाडे सुरक्षित होते, महाराष्ट्रातील काही जहागिरी सुरक्षित होत्या, संतकाव्य (त्यात ऐतिहासिक संदर्भ येतीलच असे नाही आणि असावेतच असे ठोस कारणही नाही.), इतर हिंदु राजे वगैरेंचा इतिहास वगळला जातो. उदा. औरंगजेबाने काशी विश्वनाथाला हानी पोहोचवली त्याचे साद पडसाद शिवाजीराजांच्या लेखनात, पत्रांत, बखरींत असणे शक्य आहे. जाट आणि शिखांच्या इतिहासात तसे उल्लेख असणे शक्य आहे. (आहे की नाही या विषयी मला माहिती नाही. केवळ अंदाज मांडते.)

असो.

बाकी, प्रतिसादाचा आशय पटणारा वाटला. विशेषतः औरंगजेबाबद्दल थापर बाईंनी लिहिलेले अर्तक्य आहे.

सहमत

हेच वाक्य जे कोणी असे करतात त्यांना माझा आक्षेप आहे असेही लिहिता आले असते.

अगदी पूर्ण आणि सक्रीय सहमत. जर हातचे राखून लिहीले असे वाटले असेल तर तसा उद्देश नव्हता याची खात्री असावी..."आक्षेपच असेल" असे लिहीण्याचे कारण इतकेच, की "जर" पुढे अशी चर्चा झाली "तर" म्हणून, आधी कोणी केली नाही असे नाही. जिथे खात्रीने माहीती आहे, अथवा कुठल्यातरी बाजूने वाचन आहे, तिथे नक्कीच चुकीवर आक्षेप घेईन याची खात्री असावी. :-)

(थोडे अधिक/अवांतरः म्हणूनच मी रोमिला थापर नुसत्या साम्यवादी विचारांच्या आहेत म्हणून आक्षेप घेतला नाही तर त्यातील जे अयोग्य वाटले त्यावर आक्षेप घेतला आहे. सगळे वैचारीक पटले नाही तरी त्यांच्या अभ्यासू वृत्तीबद्दल मला शंका नाही. मला खात्री आहे, असा इतिहास हा चीन, पुर्वीचे सोव्हीएट युनियन अगदी गेला बाजार क्युबामधे कधीच्या काळी होऊन गेला असता, तर अगदी तिथल्या साम्यवाद्यांनीपण असे लिहीले नसते कारण त्यांना त्यांच्या राष्ट्राचे पडले आहे, फक्त राष्ट्रगाडा चालवताना ते साम्यवाद वापरतात इतकाच काय तो फरक...

आपल्याकडे मात्र कायम अल्पसंख्य-बहुसंख्य अशा सतत भितीने एकाची बाजू सावरून धरत इतिहास लिहीण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला कारण साम्यवाद नसून कुठेतरी भिती आहे आणि अशा पद्धतीचा इतिहास लिहीणारे, भारतात बहुतांशी असे डावे असल्याने "डावे विचारवंत/साम्यवादी" अशी हेटाळणी होते. आणि तोच प्रकार, विशेष करून ८०च्या शेवटापासून, "उजवे विचारवंत" म्हणूनही उलटा होऊ लागला. कारण सरकारची पकड ढिली झाली (ज्यात हे "डावे विचारवंत" भरले होते) आणि माध्यमे वाढू लागली. आजच्या काळात, माहीती ही केवळ विद्यापिठातील ग्रंथालयात न रहाता, वैश्विक होऊ लागली आहे, जे नक्कीच चांगले आहे. )

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

शिवाजी न होते

औरंगजेबाने काशी विश्वनाथाच्या मंदिराची हानी केली याचे संदर्भ कोठे कोठे सापडतात या विषयी काही माहिती आहे का? (मला खरेच माहित नाही म्हणून विचारते.)

वरील वाक्यांनी माझी देखील उत्सुकता चाळावली गेली. दोन संदर्भ लगेच डोक्यात आले होते, पण अजून काहीई मिळते का ते पहात होतो. (खालील व्यतिरीक्त अजूनही काही मिळाल्यास वाचायला आवडेल) जालावर त्या अर्थी मर्यादा पडतात कारण सर्व मराठी गोष्टी अजून जालावर उपलब्ध नाहीत, असल्या तरी "सर्च इंजिन"ला समजतात का हा अजून पुढचा प्रश्न! शिख अथवा इतर राजांच्या बाबतीत काय शोधायचे ह्याबाबतीत कमी माहीती आणि परत तेच...

तरी देखील किमान महाराष्ट्रात यावरून लिहीले गेले असावे असे वाटते. विशेष करून अफझलखानाने जेंव्हा तुळजाभवानी, पंढरपूर आदी तिर्थक्षेत्रे आणि रस्त्यात येणार्‍या मंदीरांवर हल्ले केले, भग्न केले त्यावरून. म्हणूनच शिवाजीने त्याला "मी आपल्याला घाबरून आहे, तुम्हीच माझ्या जवळ या" असे म्हणत सपाटप्रदेशातून डोंगराळ भागात येयला लावले.

मात्र दोन संदर्भ आठवले त्यातील एक रामदासांचा आहे. त्यांच्या वर्णानात्मक ओवी खूपपुर्वी भारतात (मला वाटते) अत्र्यांच्या एका लेखात वाचल्या होत्या. पण त्या आता नाहीत. तरी देखील आनंदवनभुवनी काव्यात मधे, "बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला, मोडली मांडली क्षेत्रे, आनंदवनभुवनी" असे म्हणले आहे.

"मारिता मारिता मरावे, तेणे गतीस पावावे" असा उपदेश करताना ते पुढे म्हणतात की:

देव मात्र उच्छादिला|जित्यापरीस मृत्यू भला|
आपुला स्वधर्म बुडविला| ऐसे समजावे||
देवद्रोही तितिके कुत्ते | मारोनी घालावे परते|
देवदास पावती फत्ते | यदर्थी संशयो नाही||

मात्र त्यांची जी तुळजाभवानीस केलेली विनवणी आहे ती प्रसिद्धच आहे, त्यात देखील हा अर्थ येतो: (औरंगजेबाशी प्रत्यक्ष संदर्भ नाही)
दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकितो|
परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी|
तुझा तू वाढवी राजा, सीघ्र आम्हासी देखिता |

त्या व्यतिरीक्त मला माहीत नाही की आधीच्या शतकात "दार उघड बये दार उघड" असे जे संत एकनाथ म्हणाले होते त्याचा संदर्भ अत्याचारांशी होता का ते...

सरते शेवटी शिवराज कवी भूषणाने बरेच वर्णन केले आहे:

देवल गिराविते, फिराविते निसान अली ।
ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।
गौर गणपती आप, औरनको देत ताप ।
आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।
पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।
सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।
कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।
गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥

कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही
कत्ल मथुरा दोहाई फेरि रब की ।
खोदि डारे देवी देव सहर महल्ला बाँके ।
लाखन तुरूक कीन्हे छूटि गई तब की ।
भूषन भनत भाग्यो कासीपति विश्वनाथ ।
और कौन गिनती में भूली गति भब की ।
चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि ।
सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥

अतिशय दडपशाहीच्या वातावरणात, हलाखीची परिस्थिती, मरणप्राय अवस्था वगैरे हिंदु जनतेविषयी शब्दप्रयोग अनेकदा केले जातात. हे करताना राजस्थानातील राजवाडे सुरक्षित होते, महाराष्ट्रातील काही जहागिरी सुरक्षित होत्या, संतकाव्य (त्यात ऐतिहासिक संदर्भ येतीलच असे नाही आणि असावेतच असे ठोस कारणही नाही.), इतर हिंदु राजे वगैरेंचा इतिहास वगळला जातो.

मोघलांच्या काळात, विशेषतः औरंगजेबाच्या काळात काही राजे आणि राजवाडे सुरक्षित होते यात शंकाच नाही. मात्र ते सगळे स्वतःपुरतेच होते. बर्‍याचदा त्यांची अवस्था ही कमीअधिक फरकाने ब्रिटीशांच्या काळातील मांडलीकावस्थेतील संस्थानांसारखी होती. आपण बरं आणि आपलं बरं असे म्हणत स्वतःच्या पोळ्या टिकवत राहत होते. ही राज्ये जनतेची नव्हती तर त्या विशिष्ठ राज्यांच्या कुटूंबांची होती. शिवाजीचे महत्व तेथे येते. त्याने भोसल्यांचे राज्य स्थापले नाही तर हिंदवी स्वराज्य स्थापले. साधारण ३६ वर्षे ते लढत राहीले, ठकासी महाठक आणि उद्धटासी उद्धट राहीले, कुटील आणि आदर्श राजनिती कोळून प्यायले आणि योग्य ठिकाणी नीरक्षीर विवेकाने वापरली... एक आदर्श राज्य स्थापले. जर अजून आयुष्य पाहू शकले असते तर कदाचीत काहीतरी वेगळेच, चांगले असे तत्कालीन महाराष्ट्रास आणि देशाला पाहता आले असते. नंतर दुर्दैवाने कुटूंबातील मारामारी, फितूरी यात संभाजीला मरण आले, शाहू मोघलांकडे वाढला, पण याच हिंदवी स्वराज्यातून प्रेरणा मिळालेल्या मराठ्यांनी औरंगजेबाला एका अर्थी विपन्नावस्थेत मरण स्विकारायला लावले... "शिवाजी न होते..." हे या अर्थी पण महाराष्ट्राच्या इतिहासास लागू होते असे वाटते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कवी भूषण

कवी भूषण यांचा संदर्भ कसा ध्यानात आला नाही कोणजाणे. तो येथे दिल्याबद्दल (बर्‍याच उशीराने :-)) धन्यवाद!

मोघलांच्या काळात, विशेषतः औरंगजेबाच्या काळात काही राजे आणि राजवाडे सुरक्षित होते यात शंकाच नाही. मात्र ते सगळे स्वतःपुरतेच होते. बर्‍याचदा त्यांची अवस्था ही कमीअधिक फरकाने ब्रिटीशांच्या काळातील मांडलीकावस्थेतील संस्थानांसारखी होती. आपण बरं आणि आपलं बरं असे म्हणत स्वतःच्या पोळ्या टिकवत राहत होते. ही राज्ये जनतेची नव्हती तर त्या विशिष्ठ राज्यांच्या कुटूंबांची होती.

एवढेच नाही. यांत फक्त संस्थानिक आणि मांडलिक राजेच होते असे नाही, तर शिलेदार, सरदार, जमीनदार, व्यापारी, उद्योगपती अशी समाजातील अनेक स्तरांतील लोक होते. त्यांची परिस्थिती दयनीय नक्कीच नव्हती आणि याचबरोबर, दयनीय परिस्थिती असणारी जनताही नक्कीच होती कारण ती देशमुखी, वतनदारी, जमीनदारी आणि अर्थातच परकीय आक्रमणे यांच्यात भरडली जात होती. हे देशमुख, वतनदार, इनामदार, जहागिरदार लोक परकीय नव्हते तर आपल्या पोळ्या पिकवून घेणारे होते आणि त्या खातर बहुधा मूग गिळून गप्प होते. अशा लोकांना धर्म, नीती वगैरेंची चाड नसते. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारीही असते. त्यांत चांगले जमीनदार, जहागीरदार नव्हते असे नाही किंवा परकीय शक्तींनी त्यांची विल्हेवाट लावली असेही नाही किंवा विकास यांच्या प्रतिसादाच्या आशयाशी असहमती आहे असेही नाही. फक्त परकीय शक्ती अमानुष होत्या आणि आमची परिस्थिती दयनीय होती यासारख्या गोष्टींवर हलकासा आक्षेप आहे.

सोमनाथ मंदिर इतक्यांदा लुटले गेले तेव्हा ही मंडळी बहुधा आपण बरे आणि आपले शौक ऐशोआराम बरे असे म्हणून लांब राहिली असावीत ही देखील एक शक्यता आहे. त्यामुळे आमची परिस्थिती दयनीय होती असे सरसकट विधान पटणारे नाही. उलट, परकीय शक्ती धुमाकूळ घालत असता, त्यांना रस्ते दाखवून देणारे लोक स्थानिक असतात हे इतिहासात अनेकदा दिसून आलेले आहे. तशीच परिस्थिती इथेही असणे शक्य आहे. लढाईत हार-जीत होते हे योग्य आहे परंतु एकीचे बळ कसे असते हे अलेक्झांडरच्या भारतीय स्वारीत दिसते. महमूदच्या विरुद्धही राजपूत एकत्र झाले होते पण ते सतत लढत राहिले नाहीत.

The Indian kingdoms of Nagarkot, Thanesar, Kannauj, Gwalior, and Ujjain were all conquered and left in the hands of Hindu, Jain and Buddhist Kings as vassal states and he was pragmatic enough not to shirk making alliances and enlisting local peoples into his armies at all ranks.

हे वाक्य विकीवर मिळाले. कोणत्याही परकीय शक्तींना स्वकीय शक्तींच्या मदतीशिवाय हातपाय पसरणे शक्य नसते. परक्या भूमीवर आतवर शिरुन आक्रमण करण्यासाठी त्या प्रदेशाचा भूगोल, हवामान माहित असावे लागते. सैन्यासाठी सोयी सुविधा, सैन्याचे पोट, आजारपण अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (येथे मंगोल, शक, हुण यांचे उदाहरण लागू पडणार नाही किंवा रानटी टोळ्यांना लागू पडणार नाही. त्यांच्या तर्‍हा वेगळ्या असतात. त्यांची उद्दिष्टे वेगळी असतात. त्यामुळे फक्त महमूद किंवा तत्सम सुलतान, राजे गणतीस धरते.) अशा परिस्थितीत त्यांना मदत करणारे, खजिन्याच्या चाव्या हाती देणारे आणि बंद दरवाजे उघडून देणारे आपलेच लोक असतात. :-(

त्यामुळे दयनीय जीवन जगणार्‍यांना इतिहास लिहिणे शक्य नव्हते आणि स्वतःचा स्वार्थ बघून जगणार्‍यांना इतिहास लिहिण्यात स्वारस्य नव्हते असे म्हणता येईल.

ब्रिटीश लायब्ररी.....

ब्रिटीश लायब्ररीच्या या पानावर जाऊन ऑनलाईन गॅलरीमध्ये कोणार्क, खजुराहो, आणि अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या अजंठा वेरुळ नावाने जरी शोध घेतला तरी बरीच पाने मिळतात. तुम्हाला जर एखाद्या दिवशी वेळ असेल तर अगदी पुणे, मुंबई नावानेही शोध घेऊन अगदी मागची छायाचित्रे पाहता येतील. भारतातले जे जे काही तुम्ही पाहिले आहे त्याचा शोध घेऊन बघा. भयंकर फोटो मिळतात एवढेच सांगता येईल.

आता चंद्रशेखर यांचा लेख पाहून मागे कोणार्कच्या सूर्यमंदिराला भेट देताना त्यासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी आंतरजालावर शोध घेतला असता मंदिराचे अगदीच जुने फोटो ब्रिटीश लायब्ररीच्या संकेतस्थळावर मिळाले होते त्याची आठवण झाली. त्यावेळेसचे मंदिर म्हणजे अगदी मातीचा ढिगाराच दिसत आहे. पुरातत्व खात्याने नंतर बरेच काम केल्याने मंदिर आता उभे आहे.
अजंठा वेरुळ बद्दल तर बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी मी अजिंठा वेरुळला जाऊन आलो. तुम्ही अलीकडेच अजिंठा वेरुळला जाऊन आला असाल आणि त्याचे १८६९ चे फोटो तुम्ही या संकेतस्थळावर पाहिले तर तुमची घोर फसवणूक झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. (मला तरी तसेच वाटले.) कारण त्या काळचे अजिंठा वेरुळ इतके भग्न आणि निर्जन, ओसाड आहे की विश्वासही बसणार नाही. बर्‍याच ठिकाणी पुरातत्व खात्याने इतके जोडकाम केले आहे की या कामाबद्दल त्यांचे आभार मानावेत की त्या वेळचे भग्न अजिंठा तसेच ठेवायला हवे होते असे म्हणावे की आपल्या वैभवशाली इतिहासाचा अभिमान बाळगावा किंवा जेव्हा अजिंठा वेरुळ अगदी सुस्थितीत होते तेव्हा ते कसे असेल यावर विचार करुन डोके शिणवावे हेच मला कळेनासे झाले आहे. तिकडे जाऊन आल्यापासून आणि ती जुनी छायाचित्रे पाहिल्यापासून मी अस्वस्थ झालो आहे हेच थोडक्यात सांगता येईल.

नक्की काय वाटते आहे, काय हवे आहे, काय असायला पाहिजे होते या संबंधींच्या विचारांचे सॉर्टिंग मला अजूनही करता आलेले नाही.

कुणीतरी यावर चर्चा केल्यास/माहिती दिल्यास/स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल.

-सौरभ.

==================

रोचक

रोचक धागा. प्रतिसादही तसेच. वाचतो आहे.

+१

असेच् म्हणतो. अत्यंत वाचनीय् धागा, प्रतिसाद आणि दुवे. धन्यवाद.

धन्यवाद श्री.चंद्रशेखर

भग्न मंदिराची चित्रे बघुन आपल्या पुरातत्त्व खात्याच्या कामाची प्रशंसा कराविशी वाटली

बाकी ब्रिटिश लायब्ररीचा दुवा म्हणजे अनोखी मेजवानीच आहे.
जुनी मुंबई बघितली.. मजा वाटली

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा १८ व्या शतकात जीर्णोद्धार केला होता. नेमका किती आणि कसा त्याचे तपशील माहित नाहीत. त्यानंतर १९ व्या शतकामध्ये इतक्या प्रसिद्ध मंदिराची अशी अवस्था का झाली असावी?

चंद्रशेखर यांच्या अनुदिनीतील लेख आवडला.

बाजूला...

अहिल्याबाईंनी मूळ वास्तूच्या बाजूस देऊळ बांधले. पण मूळ ऐतिहासीक वास्तू तेंव्हा देखील मशिदीच्या रूपातच होती. मात्र स्वातंत्र्यानंतर ती मशीद हलवण्यात आली आणि देऊळ हे मूळ जागी पुर्नस्थापीत करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळातील (म्हणजे देऊळ पुर्नस्थापीत होण्याच्या आधी) ब्रिटिश गॅझेटीयर मधली खालील माहीती देखील रोचक आहे...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाईंनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हा समज चुकीचा आहे. सोमनाथ किंवा प्रभास पट्टण हे स्थान प्राचीन कालापासून एक महत्वाचे तीर्थस्थान म्हणून मानले जात होते. या ठिकाणी असलेले पुरातन मंदिर अतिशय जीर्ण झाल्याने वापरात नव्हते. या कारणास्तव अहिल्याबाईंनी मूळ मंदिराच्या बाजूला एक छोटेसे नवे मंदिर बांधून यात्रेकरूंना पूजा करता येईल याची फक्त सोय केली होती.
मूळ सोमनाथ मंदिराची वास्तू सतराव्या शतकापासूनच वापरात नव्हती. ही वास्तू मशीद म्हणून वापरली गेली किंवा नाही या बद्दल काहीही खात्रीलायकपणे सांगणे शक्य नाही. याचप्रमाणे या पुरातन मंदिराची कामचलाऊ डागडुजी सतराव्या शतकानंतर हिंदुंनी केली का मुसलमानांनी हे ही सांगणे शक्य नाही.
चन्द्रशेखर

खरे आहे...

अहिल्याबाईंनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हा समज चुकीचा आहे.

खरे आहे, म्हणूनच मी देखील "बाजूला " असे म्हणले. बाकी जिर्णोद्धार ही त्या जागेतली मशिद इतरत्र हलवून स्वातंत्र्योत्तर काळात झाला. जरी या संदर्भात सरदार पटेलांचे नाव येते (कारण त्यांनी पुढाकार घेतला होता) तरी देखील देवाळाची आणि ज्योतिर्लिंगाची प्रतिष्ठापना ही त्यांच्या पश्चात राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या हस्ते झाली. जनतेच्या पैशाने हे काम चालूच राहीले आणि १९९५ ला हे मंदीर पूर्ण झाले. तेंव्हा त्याची पूजा ही तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मांच्या हस्ते झाली. रा. शर्मांनी त्यावेळेस हे मंदीर राष्ट्राला अर्पण केले म्हणून जाहीर केले.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हम्म!

विकास यांच्या संदर्भातही अहिल्याबाईंनी बाजूला मंदिर बांधल्याचे कळते. त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला ही माहिती चुकीची असावी. त्यामु़ळे जर त्यांनी त्याच ठिकाणी मंदिर बांधले/ जीर्णोद्धार केला तर त्याची दुर्दशा का व्हावी हा प्रश्न निकालात निघाला.

दूर्मिळ छायाचित्रे आणि साक्षात्कारी चर्चा

विकास यांनी दिलेली छायचित्रे भारतावरील आक्रमणांचा इतिहासाची साक्षात जाणी व करून देणारी आहेत. यासाठी विकास यांना व छायाचित्रे काढणाऱ्या व जपणाऱ्यांनाही धन्यवाद.
छायाचित्रांवर चालू असलेली चर्चा बरेच साक्षात्कार घडवणारी व माहितीत भर टाकणारी होते आहे. वाचतो आहे.

पटत नाही - कारणे

घुमट हा आधीचा (कुमारपालाने) बांधलेला होता हे मला पटत नाही. माझ्या मते हे बांधकाम धेडगुजरी - दोन वेगवेगळ्या शैलींचा समावेश केलेले आहे, पण याला दुसरा शब्द सुचला नाही - आहे. असे मला का वाटते ते माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते. खाली काही फोटो लावले आहेत, ते पहावे.

१. देवळाच्या शिखराच्या उंचीच्या मानाने हा घुमट कमी उंचीचा आहे. पण केवळ तेच कारण शंका घ्यायला आहे असे म्हणत नाही.
२. येथे दगडातले पॅचवर्क दिसते आहे असा फोटोंवरून माझा समज झाला आहे:

२ अ. पहिले म्हणजे खालचा प्लॅन कसाही असला, तरी खांबांच्या मधली जागा आणि वरचा भाग यांचा वापर करून घुमटासाठीचा गोलाकार "बेस" तयार करता येतो. दगडी खांब आहेत, आणि समजा, वरचे शिखर काढलेले आहे, तर घुमट बांधायला काहीच प्रश्न येणार नाही. त्यासाठी खालचे सबंध स्ट्रक्चर तोडण्याची काहीच गरज नाही. कदाचित पॅचवर्क करावे लागेल.
यासाठी तुम्ही दिलेला वरून चौथा फोटो झूम करून पाहिल्यास उजव्या/डाव्या कमानींचे जे खांब चित्रात नीट दिसतील. Interior View Somnath
या दगडी खांबांचे बांधकाम बारकाईने पहा. समोरच्या बाजूला सरळ दगडी बीम आहे. पण उजवीकडे/डावीकडे मात्र चांगल्या गोलाकार कमानी आहेत.

असे का?

कारण बाजूला वरचा घुमट तयार करण्यासाठी पेन्डेंटिव्ह तयार करायचे आहेत. पेन्डेंटिव्ह म्हणजे दोन कमानीमधले त्रिकोणी भाग. इथल्याप्रमाणे.
पण इथे समोरच्या खांबांच्या दोन्ही अंगांना कमानी नाहीत. एकाच बाजूला आहेत. आणि मूळ खांब चौकोनी आणि चार-एकच असावेत - या छायाचित्रात ते नीट दिसत नाहीत. मूळ चौकोनाच्या वरून त्याच्या कोपर्‍यात गोलाकार करायला खाली थोडा अधिक आधार लागणार. म्हणून मग खांबाची रूंदी त्या दिशेने वाढवली पाहिजे - म्हणून साधारण ९० अंशाच्या कोनात जास्तीचा खांब पूर्वीच्याच खांबालगत घातला.. खालच्या दगडी जमिनीवरच उभा करून. दगडी फाउंडेशन असताना आधारासाठी अगदी खोलवर गेले पाहिजेच असे नाही. पायथ्याशी दोन्ही खांब वेगळे दिसतात. इतकेच नाही तर दुसर्‍या खांबाच्या पायथ्याशी ठेवलेला दगडही वेगळा दिसतो.
Interior Column Somnath,
जिथे मी म्हणते तसा जुना आणि नवीन खांब मिळतो ती जागा नीट पाहा. म्हणजे अगदी खालचे दगडही वेगळ्या उंचींचे आहेत हे लक्षात येईल, इतकेच नाही तर खांब एकमेकांना जुळतात तो सांधा अगदी स्पष्ट दिसेल. वर कमानीच्या भागातील दगडही वेगळ्या आकाराचे आहेत. कमानीच्या खांबांनाही कदाचित अगदी खालचे दगड तसेच ठेवून वरचे बदललेले असू शकतात. हे अशाच दुसर्‍या बाजूच्या खांबाचे चित्र.Interior Column 2 Somnath,
कमानींवर किंवा घुमटाच्या दगडांवर कसलेही नवीन नक्षिकाम दिसत नाही, मुख्यत्वे अप्सरा, देवादिकांची कोरीव चित्रे दिसत नाहीत. याचा अर्थ कमानीचे बांधकाम नंतरच्या काळात झाले आहे. कोणत्या काळात ते ठरवण्यासाठी मला अधिक विदा (डेटा) लागेल.
कोणी म्हणेल हे असे बांधकाम कुमारपालाच्या वेळीच झाले असेल, पण तेही माझ्या मते तर्काला धरून ठरणारे नाही.
मला जर कमान करायची असली, तर अशा कमानी मी सर्व दिशांना करेन, दोन बाजूला कमान आणि मध्ये जुनाट पद्धतीची दगडी चपटी बीम अशी घिसाडघाई करणार नाही, त्याहीपलिकडे जाऊन बाहेर जेथे जेथे म्हणून खांब आहेत तेथेही अशा छान कमानी करण्याचा प्रयत्न करेन. इतकेच नाही तर दोन खांब जोडताना तेही साधारण सारख्याच आकाराचे, सारख्याच उंचीचे दगड वापरून बनवेन. आणि माझ्यापेक्षाही अधिक विचार ही भव्य वास्तू बांधणारे लोक करतील असा माझा विचार आहे. असो.

अजून एक अगदी वरवरची जाणवलेली गोष्ट - या घुमटाला पांढरा रंग दिसतो - तो बहुदा चुना/प्लास्टर असावे. प्राचीन देवळांना असा चुना लावलेला नसतो - त्यावरील भित्तीचित्रे/शिल्पे ही दिसण्यासाठी असे रंग नसणे आवश्यक असते. हे बहुदा नंतरच्या काळातील मुस्लिम राजवटीत झाले असावे. फक्त ती राजवट कोणती, हे कळण्याचा मार्ग नाही, म्हणून हा पुरावा म्हणून धरत नाही.

एक घाव दोन तुकडे

वा! ह्याला म्हणतात पद्धतशीरपणे एक घाव दोन तुकडे करणे. कुमारपालाला नक्कीच घुमट ठाऊक नव्हता. इस्तंबूलच्या सोफिया मशिदीचा घुमट व सोमनाथाचा घुमट ह्यांचे मूळ एकच. भारतात पहिला घुमट केव्हा बांधला गेला ह्याचा इतिहास तपासायला हवा. हा घुमट नक्कीच मंदिरासाठी बांधलेला नसावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मलाही पटले नाही

चित्रा यांचा प्रतिसाद योग्य वाटतोच, याचबरोबर जर पहिले चित्र पाहिले तर लक्षात येईल की

somnath

निदर्शित केलेले बांधकाम हे हल्ल्यानंतर मोडलेल्या भिंतींची डागडुजी आहे. मूळ फत्तराशी हे दगड साधर्म्य दाखवत नाहीत. ते ताशीव नाहीत. तसेच मंदिराच्या मूळ दगडांत चुन्याचा दर्जा नाही. हेमाडपंथी मंदिरांशी साधर्म्य साधणारे स्थापत्त्य वाटले. ज्या भिंतीच्या डागडुजीसाठी दगड वापरले गेले आहेत त्यांचा आकार (आणि बहुधा रंगही) मूळ ताशीव दगडांशी जुळत नाही परंतु त्या दगडांचा आकार घुमटावरील दगडांशी जुळताना दिसला.

हिंदू देवळांवर घुमटांपेक्षा कळस असणे अधिक सयुक्तिक वाटते. स्वर्गाकडे झेपावणार्‍या कळसाचे मूर्तीसह भंजन करणे घडले असावे.

चू.भू.दे.घे.

मंदिराचे स्थापत्य

चित्राताईंचे विश्लेषण खूपच रोचनीय आहे. मी माझ्या प्रतिसादाच्या संदर्भासाठी वापरलेला एक दुवा येथे देत आहे. या दुव्यात मंदिराची प्रत्यक्ष मोजमापे व स्ट्रक्चरल प्लॅन आहे. हा प्लॅन व आधी दिलेले फोटो वापरून कुमारपालाने बांधलेले मूळ मंदिर कसे असू शकेल याचा काही अंदाज चित्राताईंना बांधता येईल का? आम्हाला तो निश्चितच बघायला आवडेल.
दुसरा एक महत्वाचा संदर्भ. कुमारपाल राजाने या मंदिराच्या बांधकामाचे काम त्याच्या हेमचंद्र या अमात्यावर सोपवले होते असे वाचनात आले. हेमचंद्र जैन होता.त्यामुळे या देवळाच्या बांधणीवर आणि मुख्यत्वे छत किंवा घुमट यावर जैन मंदिरांची छाया असू शकते जैन मंदिरांना कळस असतो का घुमट त्याची मला कल्पना नाही.
चन्द्रशेखर

जैन मंदिरांवर कळस असतो का घुमट(?)

जालावर शोध घेता, भावनगरमधील प्रसिद्ध जैनमंदिरांचा फोटो मिळाला.

११ व्या शतकापासून या जागी मंदिरे बांधली गेली. चित्रातील घुमटधारी मंदिर मात्र थोडे अर्वाचीन वाटत आहे. बाकी, तपशील वेळेअभावी शोधलेला नाही.

धन्यवाद

वरील एशियाटिक जर्नलच्या दुव्याबद्दल चंद्रशेखर यांचे आभार. तसेच नुकतेच चंद्रशेखर यांनी तत्कालिन आचार्य हेमचंद्र यांनी ह्या देवळाचे बांधकाम केल्याची आणि ते जैन असल्याचे स्पष्ट केले आहे. नुसतेच हे असेल किंवा ते असेल असे अंधार्‍या फोटोंवरून विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्लॅन डोळ्यासमोर असला की चांगले असते.
पण यावरून मला पूर्वीच्या देवळाचे रूप स्पष्ट करता येणार नाही, देवळातील माहिती लागेल.

पण वरील दुव्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात, तसेच काही उत्तरे मिळत नाहीत आणि नवीन प्रश्नही तयार होत आहेत.

दुव्याचे लेखन कोणाचे?
उदा. चंद्रशेखर यांनी दिलेल्या दुव्याचे लेखन नक्की कोणी केले आहे, हे समजत नाही. इतर लेखांमध्ये इतके वेगवेगळे विषय त्यात आलेले दिसतात की हे लिखाण भारताबाहेर राहणार्‍या ब्रिटिश लोकांच्या दैनंदिन डायरीतील पाने असू शकतात. पण यामुळे जरी या दुव्याची विश्वासार्हता कमी होत असली तरी तो मुद्दा दुय्यम आहे, आणि सध्या बाजूला ठेवते.

दुव्यातील लेखात काही त्रुटी/चुका आहेत का?
या लेखाच्या लेखकाने कर्नल टॉड याने काढलेला प्लॅन दिला आहे. हा सध्या दिसत असलेल्या मंदिराचा प्लॅन आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातले कोठचेही खांब हे नंतर घातलेले नाहीत, मूळचेच आहेत असे मी सध्या समजते आहे. हा दुवा उपयुक्त आहे, पण या लेखात एक गडबड वाटते आहे. चू. भू. दे. घे.
टॉडच्या लिखाणाचा संदर्भ देऊन वरील संदर्भातील लेखक म्हणतो की याचा परीघ ३३४ फूट होता (लांबी ११७ फूट आणि रूंदी ७४ फूट, अर्थात सर्वात बाहेरची मापे दिली आहेत). या लेखकाने कमानीचा (आर्चचा) स्पॅन (दोन कमानींमधले अंतर) ३२ फूट आणि उंची ३० फूट म्हटल्याने माझ्या मनात जरा गोंधळ तयार झाला आहे. ३० फूट हा स्पॅन खूपच मोठा झाला! बर्‍याचशा घरातील मोठ्या खोल्याही अनेकदा १२ फुटाम्हून अधिक रूंद नसतात. तसेच स्थापत्यात स्पॅन हा सेंटर टू सेंटर किंवा क्लियर देण्याची पद्धत असते. मला फोटोत पाहिलेली कुठचीही कमान डोळ्यांनी पाहता कशाही प्रकारे ३२ फूट रूंद वाटत नाही, आणि क्राऊनची जमिनीपासून उंची तीस फूट नक्कीच वाटत नाही. आणि तशी रूंदी आहे असे मान्य केले तर या घुमटाची त्रिज्या जवळजवळ ३८ फूट येऊ शकेल, म्हणजेच नुसता मधल्या घुमटाचा व्यास हा जवळजवळ ७६ फूट आणि हे वरील मोजमापांमध्ये नक्कीच बसणार नाही.
यामुळे हा लेख कोणी ज्याने लिहीला आहे त्याने एकतर टॉडच्या लेखातील मापे बरोबर लिहीली नाहीत किंवा टॉडच्या मापांमध्ये चूक असू शकते (माझ्याकडे त्याचे पुस्तक किंवा प्लॅन दोन्ही नाही). दोन्ही प्रकारे जरा प्रॉब्लेमच आहे.

स्पॅनचे महत्त्व -
ह्या स्पॅनचा उहापोह एवढ्यासाठी की स्पॅन किती आहे यावर काय रचना करू शकतील हे अवलंबून आहे. ३० फूट स्पॅन असताना सरळ दगडी बीम ठेवण्यापेक्षा कमान करणे बरे पडेल, आणि कमानीपेक्षाही चांगले म्हणजे ट्रससारखे स्ट्रक्चर. नाहीतर बीम खूपच लांब लागेल - पण ही ३० फूट रूंदीची कमान फार कौशल्याने बनवावी लागेल. त्याउलट स्पॅन कमी असला, म्हणजे १२ फूट-१५ फूट, तर या जागेत सपाट बीम बसवणे फार कठीण नसावे. समोरच्या खांबांवर हे केलेलेच आहे.

आर्किटेक्चर -वास्तुकलेच्या दृष्टीने पाहिले तर - घुमटाविषयी
वरील टॉड यांच्या प्लॅनमधील कोठचेही खांब हे कुमारपाल/भीमदेवानंतर घातलेले नाहीत, मूळचेच आहेत असे मी सध्या समजते आहे. सध्याचे खांब हे अष्टकोनात दिसत आहेत. हे महत्त्वाचे आहे, आणि जर मूळ सर्व खांब असेच असले तर जैन देवळांप्रमाणे हे मंदिर बांधलेले असू शकते. जैन देवळांत घुमट असू शकतात - जसे दिलवारा येथे आहेत. पण जैनांची कमान बांधण्याची पद्धत ही सोमनाथच्या देवळात सध्या आहे तशी नव्हती. ती पद्धत ही कमानी ब्रॅकेटवर रचण्याची होती. उदा. अष्टकोनी प्लॅनवर सरळ बीम ठेवण्याची होती (वर धनंजय यांच्या प्रतिसादातही हा फरक मांडल्याचे दिसेल). या बीमवर दगड रचत घुमट बांधला जाई. यासाठी कमान वरच्या प्रतिसादात दिलेल्या पेन्डेंटिव्हप्रमाणे करण्याची गरज नसे, मुळात जमिनीपासून कमानीचे काम सुरू केले जात नसे.

ही रचना चंद्रशेखर म्हणतात तशी जैन पद्धतीची असली, तर दिलवाराचे उदाहरण किंवा
अबूचे विमल सा (साही?)/ आदिनाथ मंदिर ही उदाहरणे आहेत. आता या देवळांवर घुमटाची प्रथा आहे का? तर आहे असे दिसते. उदा. दिलवारा येथील बाहेरून दिसणारा फोटो - http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/d/zoomify60843.html

तत्कालिन साम्य असलेल्या मंदिरांपैकी मोढेराच्या सूर्यमंदिराचे सध्या जालावर सापडणारे फोटो पाहिले तर वर घुमट दिसतो. पण लक्षात ठेवावे, की हा सूर्य मंदिराचा सध्या दिसतो तो घुमट नंतर रिहॅबिलिटेशनसाठी (कदाचित स्वातंत्र्योत्तर काळात) बांधला गेला आहे. जुने फोटो इथे पहावे -(ब्रिटिश लायब्ररीचाच दुवा)
http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/g/largeimage64774... ह्याही मंदिराची नासधूस झाली आहे - हे स्पष्ट होईलच. हे मंदिरही साधारण सोमनाथच्या काळातलेच आहे.
(अवांतर - येथेही दिलवाराप्रमाणेच कमानी दिसतात, त्याही सोमनाथाप्रमाणे खालपासून सुरू केलेल्या दिसत नाहीत.
http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/i/zoomify63645.html )

पण त्याचबरोबर हेही ल़क्षात ठेवले पाहिजे की ही मंदिरे हवेशीर आहेत. सोमनाथाच्या मंदिरात प्रियाली यांनी दाखवल्याप्रमाणे नंतर वेगळ्या दगडांनी भिंती बनवलेल्या आहेत. असे का करावे लागले असेल? माझ्या मते इथेही कदाचित आत्ताचे (१०० वर्षांपूर्वीच्या फोटोंमध्ये देखील) देऊळ भिंतींमुळे जसे बल्की (जड) दिसते तसे मुळात नसावे. मूळ देऊळ हवेशीर असावे, बरेचसे खांब असावेत, भिंती कमी असाव्यात, किंवा आता जिथे भिंती दिसतात तेथे पूर्वी त्या नसाव्यातच आणि या खालच्या चित्रात दाखवलेल्या मागच्या देवळाप्रमाणे मध्ये मध्ये हवा आत यायला जागा असावी. हे सगळे हे बांधकाम नंतरचे आहे असे दाखवते. खिलजी आल्यावर त्याला ५६ खांबांचे देऊळ पहायला मिळाले असे म्हटले जाते. कदाचित हे खांब त्याकाळी चटकन नजरेत भरत असतील.
http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/g/largeimage64774...


आता हा घुमटच मूळ जैन घुमट होता का?

यात अनेक प्रश्न उठतात. जर हा मूळ घुमटच आहे असे धरून चालले, तर हा चाळीस फूट भाग सोडला तर बाकीच्या भागावर नक्की कोणत्या पद्धतीचे छप्पर होते? बाकीच्या छपराच्या जागी (११७ फूट, ७४ फूट) नुसती सपाट स्तरांची रचना मधला चाळीस एक फूटी घुमट सोडून केली होती, हे बरोबर वाटत नाही. शिखरे आणि घुमट होते का? तसे असल्यास शिखरे काढून टाकली असावीत. जसे सूर्य महालाचेही छत जुन्या फोटोंमध्ये नाही, तसेच सोमनाथाचे केले असण्याची शक्यता आहे. पण सोमनाथ येथे नंतर मस्जिद बांधली गेली असली, तर नवा घुमट आणि आत मस्जिदी पद्धतीची कमानींची रचना करणे भागच असावे.

त्यामुळे मला असे वाटते की चित्रांमध्ये दिसतो तो घुमटही नवीन असावा. मूळ खांबाना लागून कमानी बांधतानाच तो बांधणे सोपे आहे. शिवाय आतमध्ये घुमटाच्या दगडांवर कसलेही काम फोटोंमध्ये दिसत नाही. इ. इ.
अबूच्या आदिनाथाच्या देवळातला हा आतला फोटो. http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/c/largeimage59662...
सध्याच्या सोमनाथाच्या देवळात ह्यात दिसणारे थोडेबहुत शिल्पकाम किंवा काहीच दिसत नाही. अगदी मूर्ती काढून नेल्या असे म्हटले तरी छतांच्या दगडांवरही कसलेही काम दिसत नाही. त्या काळातल्या इतर जैन देवळांमध्ये आतल्या बाजूला महिरपी, सुंदर मूर्ती, नक्षीकाम दिसते.
--- अजून एक फरक दिसतो आहे --------
जैन मंदिरातील घुमटात रेडियल (त्रिज्येच्या दिशेने) दिशेने अनेक मूर्ती बसवल्या आहेत. मूर्ती काढून नेलेल्या असल्या तरी त्यांच्या ठिकाणी काही जोडकाम/छतातली ब्रॅकेटस दिसायला हवीत. ती सोमनाथात दिसत नाहीत.
बाकी, या विषयावर सध्या माझा एवढाच अभ्यास झालेला आहे. तेव्हा इत्यलम.
---------------------------

शेवटी, जालावर शोधताना याविषयी अजून एक दुवा मिळाला -एशियाटिक सोसायटीचा. अलेक्झांडर बर्न्स याने लिहीलेल्या सोमनाथबद्दलच्या लेखात काय म्हटले आहे ते खालील दुव्यात दिसेल.
हा दुवा माझ्या मताला पुष्टी देणारा असावा.यावरून येथे नंतरच्या काळात मस्जिद बांधली असावी हे स्पष्ट होते असे वाटते. अशा पद्धतीच्या कमानी आपल्याकडच्या देवळांमध्ये सहसा दिसत नाहीत - चू. भू. दे. घे.

धन्यवाद

या चर्चेत भाग घेणार्‍या सगळ्यांचे मनापासून आभार. चर्चेतून खूपच नवी माहिती कळली.
चन्द्रशेखर

 
^ वर