मराठी एकजूटचा एल्गार!

बरेच दिवसांनी उपक्रमवर हजेरी लावत आहे, पण पुण्यात आल्यापासून तशी सवडच झाली नाहिये. आज मात्र एका महत्वाच्या लेखाकडे उपक्रमीयांचे चित्त वेधून घ्यायचं आहे, त्यासाठी हा प्रस्ताव

गेल्या रविवारी लोकसत्ता दैनिकातील एका लेखाद्वारे श्री सलील कुळकर्णी (संगीतकार नव्हे) ह्यांनी एक चळवळ स्वरूप संस्था सुरू करायचं सुचवलं आहे. त्याला अर्थातच माझा पूर्ण् पाठिंबा असल्याने मी इथे त्या लेखाचा दुवा देत आहे.

http://bit.ly/6KCvwh

महाराष्ट्रात आज मराठीबद्दलची अनास्था अत्यंत क्लेशदायक आहे. किंबहूना त्यात मराठी द्वेशाचे कारस्थान आहे का असा संभ्रम पडणं सहाजिक आहे. त्याबद्दल काही करण्याआधी निदान संघटित होण्याबद्दलचा हा एल्गार. वाचा व प्रतिक्रिया इथे नाहितर लेखात् दिलेल्या विरोपपत्यावर अवश्य पाठवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

मराठी एकजुट

मराठी भाषा समृद्ध करणार्‍या चा वसा हाती घेतलेल्या किती संस्था आहेत? त्या एकत्र येउन काम का करीत नाहीत? असा प्रश्न आमच्या मनात येतो.
प्रकाश घाटपांडे

सम्मत

मराठी भाषा समृद्ध करणार्‍या चा वसा हाती घेतलेल्या किती संस्था आहेत? त्या एकत्र येउन काम का करीत नाहीत? असा प्रश्न आमच्या मनात येतो.
अस्सच इचारतो.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

ही वेगळी 'मराठी एकजूट' हवी कशाला?

मराठी विकास केंद्र व मराठी अभ्यास परिषद ह्यासारख्या संस्था असताना तही वेगळी 'मराठी एकजूट' हवी कशाला? कुलकर्णी काही नवीन गोष्ट सांगत आहेत असेही नाही. तरीही ह्या मराठी एकजुटीला शुभेच्छा.

एकंदरच स्टंटबाजी, मोर्चे, घोषणा, हिंदीद्वेष व मुस्काडफोडीमुळे मराठी भाषेचा उद्धार आता अटळ आहे असे दिसते आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगली कल्पना

मला माहिती असलेल्या संस्था पुढील प्रमाणे

  • मराठी भाषा अभ्यास परिषद
  • राज्य मराठी विकास संस्था
  • मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
  • भाषा संचालनालय
  • मराठी साहित्य महामंडळ

सगळ्या संस्थांना एकत्र गुंफण्याची कल्पना उत्तम आहे. (असाच या मागचा विचार आहे ना?)

यामुळे कोण काय काम करते आहे हे पण स्पष्ट होत राहील.
याची काही प्रमाणात गरज आहेच.

मात्र खरीजबाबदारी जागतिक मराठी परिषदेची आणि निरनिराळ्या विद्यापीठांची आहे.
ते काय करत आहेत?

मराठीचे विभाग आणि विभाग प्रमुख झोपले आहेत का?

आपला
गुंडोपंत

हे पाहिले आहे का?

विकि वरील मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
हे पान पाहिले आहे का?
नसेल तर यथेही काही काम करता येईलच अशी आशा आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर