कुंडली आणि वास्तु

जातकाची कुंडली आणि वास्तुशास्त्र
( कुपया आकृती साठी http://vastuclass.blogspot.com ला भेट देण्याची विनंती ) आपल्या माहीती साठी

कुंडलीचे विवरण :-
प्रथम स्थानी मिथुन लग्नी राहु ( मकर लग्न ), २ धनस्थान = काहीनाही, ३पराक्रमस्थान = हर्षल + प्लुटो , ४=काहीनाही, ५ विद्यास्थान = नेप, ६= काही नाही, ७जमित्र = मंगळ, बुध, रवि, केतु, ८मृत्यु = शनी, शुक्र, चंद्र, ९= काहीनाही १० कर्मेस्थान = गुरु ११= काहीनाही, १२= काहीनाही )

वर नमुद केल्या प्रमाणे जातकाची चंद्ररास मकर असून सुर्यरास (पाश्चात) धनु आहे. जेव्हा जातक आपली कुंडली घेऊन येतो तेव्हा आपण त्यांच्या कुंडलीच्या आधारे जातकाच्या वास्तुचे परीक्षण करावे लागते. श्री सहस्त्रबुध्दे ह्यांनी ह्याविषयी बरेच संशोधन करुन एक ग्रंथ लिहला आहे. आज आपण एका जातकाच्या कुंडलीची त्याच्या वास्तुशी सांगड घालणार आहोत.

दिलेल्या कुंडलीच्या आधारे आपण जातकाचे सुख-दुखः पाहु.

१. लग्न मिथुन लग्नस्वामी सप्तमात मंगळ + रवी + केतु युक्त म्हणजे त्याची सप्तमात दुष्टी लग्नात आहे. राहु लग्नी म्हणजे पुर्वभाग दुषित किंवा बंद आहे.

२. लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार.

३. धनेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त राहाते घरची कमी जागा पण इतर जागा जास्त असणार. शनी मुळे बाह्य जागा बिल्डींगचे कंपाऊड यांचे (र्माझिन) अंतर पश्चिम व पुर्व बाजुस कमी असणार आहे.

४. द्वितीयेश सप्तमात मंगळ + बुध + केतु अधिक हर्षल + प्लुटो युक्त घराला उत्तर ते पुर्व दिशेला अनेक कट असणार.

५. चतुर्थ स्थान चंद्रनाडीच्या प्रभावाखाली येत असल्याने व त्याचा राशीस्वामी बुध, मंगळ + केतु युक्त झाल्याने दशमातील स्वगृही गुरु त्यांची चतुर्थात सातवी दुष्टी घराच्या उत्तरेस मंदीर असणार किंवा घरातुन मंदिर दर्शन होणार.

६. तसेच चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार कारण कु़ंडलीचा चंद्र मकर राशीत आहे. मकर शनी प्रधान रास असल्याने जीना पश्चिमेस असणार.

७. पंचमातील राशीस्वामी (शुक्र) पंचमेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त म्हणजे पश्चिम दिशा मोकळी, तेथे कचरा, झाडे-झुडपे, गटार असण्याची जास्त शक्यता आहे. तसेच घर गच्चीवर असण्याची जास्त शक्यता आहे.

८. सप्तम स्थांनात मंगळ + रवी + केतु + बुध सप्तमेश दशमस्थानात स्वगृही म्हणजे पश्चिम दिशा मोकळी तसेच पश्चिमेचा रवीचे किरणे पश्चिमे कडुन घरात प्रवेश. व पश्चिमेत खिडक्या असणार.

९. अष्टमेश अष्टमात शुक्र + चंद्र युक्त घरात सर्व प्रकारच्या सुखसोई असणार पण त्याचा योग्य उपभेग जातकाला स्वता: न मिळता त्याच्या परिवाराला मिळेल.

१०. भाग्येश शनी अष्टमात शुक्र + चंद्र युक्त भाग्येश च्या व्ययात भागेश म्हणजे घरातील सर्व पैसा घरातील सुखसोईवर खर्च झालेला असेल. शिल्लक राहाणार नाही. तसेच घरामधील सर्व उपकरणे जरुरी पेक्षा अधिक असणार त्यामुळे सुध्दा खर्च अधिक प्रमाणात होईल.

११. कार्यस्थानातील गुरु मुळे खर्चजरी जास्त झाला तरी आवकसुध्दा व्यवस्थित असणार, दशमातील गुरु स्वराशीचा स्वगूही जातकाच्या घरात कधीही काहीही कमी पडु देत नाही.
कारण दक्षिणेच्या सुर्यनाडीतील गुरु स्वराशीत बसल्याने चंद्रनाडीचे दोष गुरुकृपेने कमी होतात. तसेच घरात व परिवारात गुरुसेवा परपरा असणार.

१२. लाभेश सप्तमात रवी + बुध + केतु युक्त घरचा मालकच्या सप्तमात मंगळ + रवी + बुध + केतु म्हणजे जातकाच्या पती/पत्नी चा स्वभाव रागीट पण बुधामुळे मनमिळावू कतृत्वशील, रवीमुळे सदासर्वदा कार्यरत, केतुमुळे गुरुसेवा + धार्मिकसेवा करणार असणारा आहे.

१३. व्यायातील वृषभ राशीचा स्वामी अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त घरातील स्वयपाकघरात अन्नजास्त शिजवत जात असणार, अन्न विपुल प्रमाणात ( चंद्र+शुक्र ), शनीमुळे त्यातील काही भागाची नाशाडी होण्याची शक्यता आहे. पण ह्या जागी शिजवलेले अन्न फार रुचकर आणि स्वादिष्ट मनाला तृप्त करणारे तसेच दहाजणाचा स्वयपाक वीस जणाना पुरेल इतका वरद हस्त दक्षिणेच्या गुरु व सप्तमातील व अष्टमातील ग्रहा मुळे अनुभवास येणार.

१४. सप्तमातील व अष्टमातील ग्रहाची संख्या दाटीवटीने असल्याने जातकाची जागाफार कमी असणार पण जातक त्याजागेत आंनदाने राहात असणार.

वास्तुस्थितीत जातकाचे घर :-

१. बिल्डींगचे प्रवेश द्वार दक्षिणे कडे आहे.

२. घराचे प्रवेशव्दार उत्तरे कडे आहे.

३. ईशान्य ते उत्तर भागातुन मंदिराचे दर्शन होते.

४. ईशान्य पुर्व भागात बांथरुम व पुर्व आग्नेय भागात संडास आहे.

५. अग्नेय दक्षिण भागार स्वयपाक घर आहे.

६. चंद्रराशी स्वामी शनी व दक्षिणेचा गुरु असल्याने दक्षिण पश्चिम या स्थांनात देवघर असणार ( ज्या स्थांनात गुरु असतो त्या स्थांनात मुख्य करुन जातकाचे देवघर असते. )

७. घराचे क्षेत्रफळ कमी आहे. तसेच जातकाचे घर सर्व सोईयुक्त व सर्वघर (स्वयपाक घर सुध्दा ) वातानुकुलीत आहे.

८. ईशान्य ते वायव्य पश्चिमेकडील घराबाहेरचा सर्व भाग मोकळा आहे. जातकाला गच्चीचा हा भाग मिळालेला आहे तसेच बिल्डींगच्या बाहेर सुध्दा मोकळे पंटागण आहे.

९. पश्चिमेस कचरा, व झाडेझुडपे आहेत. तसेच त्यामध्ये गटाराचे पाणी सोडलेले आहे.

१०. दक्षिणेला गेटच्या बाजुला कचरा कुंडी आहे.

९. जातकाचे घर गच्चीत आहे व ते संकुलाच्या दक्षिण प्रभागात आहे.

१०. जातकाचे घर विदिशेत आहे.

इतर अनेक गोष्टी आपणास जातकाच्या घरी नजाता कुंडली वरुन पाहाता येतात. वेळे अभावी जास्त लिहत नाही.

संजीव

लेखनविषय: दुवे:

Comments

अचंबित करणारे

एका घराच्या मालकाची कुंडली पाहून घराविषयी इतके काही आणि तेही इतक्या बारकाव्यांनीशी सांगता येते हे अचंबित करणारे आहे. संडास घरात कोणत्या दिशेला असेल, घराचे दार आणि संकुलाचे(!) दार कोणत्या दिशेला, इमारत आणि कंपाऊंड वॉल मधील कमीअधिक अंतर, घरातून मंदिराचे दर्शन इ. इ. फक्त घरमालकाची कुंडली पाहून सांगण्याची ही 'कला' अचाट आहे!!

हे वाचून आश्चर्य तर वाटलेच पण काही शंका/प्रश्नही मनात आले.

  • एखाद्या घराचा घरमालक बदलला तर घराची अंतर्गत रचना, संकुलाची रचना, खिडकीतून दिसणारे दृश्य इ. नवीन मालकाच्या कुंडलीनुसार बदलते का? उदा. जुन्या घरात ईशान्येला असणारा संडास वायव्येला, किंवा संकुलाचे दार दक्षिणेऐवजी पश्चिमेला, घरातून मंदिराऐवजी मदिरागृहाचे दर्शन वगैरे
  • बहुमजली संकुलात एकखाली एक असलेल्या सदनिकांची अंतर्गत रचना सर्वसाधारण सारखीच असते. मग अश्या सर्व घरमालकांची कुंडली सारखी असते का?

सोप्पं

हा हा हा. सोप्पं आहे.

जरी घर विकले तरी ते अशाच व्यक्तीला विकले जाणार ज्याच्या कुंडलीतही तस्सेच ग्रह असणार.
आणि संकुलातील इमारतीत असेच लोक घरे घेणार ज्यांच्या कुंडल्या सारख्याच असणार.
(ह. घ्या)
याला ऍन्थ्रॉपिक प्रिन्सिपल की कायसे म्हणतात.

नितिन थत्ते

पटले.

आणि संकुलातील इमारतीत असेच लोक घरे घेणार ज्यांच्या कुंडल्या सारख्याच असणार.

या सर्वांना एकाच बिल्डरने मूर्ख बनविलेले असते. म्हणजे एकाच प्रकारचे लोक असावेत हे पटते.

 
^ वर