हील, हील पोरी हीला

उपक्रमावर फॅशन् नावाचा विषयच नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा विचार मागे पडलेला दिसतो. उच्च राहणी आणि साधी विचारसरणी हेच आज बरेचजण मानतात.

नवनवीन फॅशनवर काही लिहावे म्हणून हा उपक्रम आहे. मला चांगले लिहीता येत नाही पण गंमतीदार फॅशन्स दाखवता येतात. फोटो मी काढलेले नाहीत.

बायकांना उंच टाचांच्या चपला, सँडल्, बूट् घालायला खुप आवडतात. आजच मला काही निराळ्या स्टाईल्सच्या टाचा (म्हणजे हील्स) दिसल्या म्हणून मी गूगल इमेज सर्च करुन आणखी शोधले.

आता तुम्ही म्हणालः गूगल सर्च काय आम्ही पण करु.
मी म्हणते: टाचांवर कधी केले होते का? नव्हते ना तर मग बघा तर.....

बायकांच्या प्रश्नांवर पुरूषच जास्त बोलताना दिसतात. त्यांना या टाचा खूप आवडतील. गूगलवर शोधले तर आणखी खुप आहेत

सिंड्रेलाच्या चपला

दृष्टीभ्रम

लोडशेडींग वर उपाय्

गोलमाल

डेंजरस

लेखनविषय: दुवे:

Comments

फोटो सुंदरच् आहेत्..

पण हे सँड्ल्स कोणी मॉडेल् केले असते तर् अजूनच सुंदर दिसले असते..(पहिल्या फोटो सारखे..) ;)

(रसिक) भटका.

डिस्क्लेमर

इथे लिहीण्याची सवय नाही म्हणून डिस्क्लेमर विसरले.

हे फोटो मी गूगल सर्च करून मिळवले आहेत. मी काढलेले नाहीत. ज्यांनी ते काढुन इंटरनेट वर दिले त्यांची मी आभारी आहे.

संपादकांना हे वाक्य लेखात टाकता येईल का.

लटपट लटपट

फोटो छानच आहेत. मला त्यावरून एका जुन्या लावणीची आठवण झाली.
लटपट लटपट लटपट लटपट
तुझ चालण ग मोठ्या नखर्याच...
गौरी

हील्सचे अनेक उपयोग

फोटोंतले हील्स आवडले. माझ्या एका मैत्रिणीकडे गुलाबी सँडल्सना चंदेरी रंगाचे चौकोनी घनाच्या आकाराचे हील्स आहेत. आपली उंची इतरांपेक्षा कमी आहे याचा गंड बाळगणार्‍या अनेक बायकांची सोय या हील्समुळे होतेच परंतु,

१. योग्य उंचीचे हील्स वापरून योग्य प्रकारे पायांवर भार देऊन चालल्यास चाल डौलदार दिसते.

२. आपल्या न आवडत्या माणसाच्या पायावर या हील्स घातलेल्या सँडलचा पाय देऊन पहावे. ;-)

बहुधा, आणखीही असतील. नंतर विचार करून सांगेन.

दिवसभर बायका इतक्या उंच टाचा करून कशा राहतात हे कोडे मात्र मला उलगडलेले नाही. असो.

व्हेरी गूड :)

>>२. आपल्या न आवडत्या माणसाच्या पायावर या हील्स घातलेल्या सँडलचा पाय देऊन पहावे. ;-)
टोकदार टाच एखाद्याच्या उघड्या पायावर पडली तर त्याच्या वेदना मोजता येणार नाहीत.

>>दिवसभर बायका इतक्या उंच टाचा करून कशा राहतात हे कोडे मात्र मला उलगडलेले नाही.
आमची एक मैत्रीण, उंच दिसण्यासाठी उंच टाचाच्या चपला वापरायची, अजूनही वापरते. पाय मुरगळण्यापासून पायाचा त्रास अनेकदा तिने व्यक्त केला आहे. हा अनुभव सार्वत्रिक असावा काय ?

-दिलीप बिरुटे

व्वा ! मस्त उपक्रम :)

>>नवनवीन फॅशनवर काही लिहावे म्हणून हा उपक्रम आहे.
चांगला उपक्रम आहे, आवडला.
>>बायकांना उंच टाचांच्या चपला, सँडल्, बूट् घालायला खुप आवडतात.
बूटक्या स्त्रीया बर्‍याचदा उंच टाचाच्या चपला वापरतांना दिसतात. असा आमचा समज आहे.
सामान्य उंची असलेल्या स्त्रीया बहुदा उंच टाचाच्या चपला वापरत नसाव्यात असे वाटते.

कोणी माहितीत भर घालेल का ? महिला उपक्रमींच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

बाकी, फोटो आवडले...!

-दिलीप बिरुटे

बुटकेपणा सापेक्ष आहे

पाच फूट तीन इंच उंच असणार्‍या माझ्या बॉसला आपण बुटके आहोत असे नेहमी वाटते याचे कारण हापिसातले अनेक अमेरिकन्स ६ फूट, सव्वा सहा फूट उंचीचे आहेत. तिला ६ इंची हील्स घालून आपली उंची पाच-सात, पाच-आठच्या वर गेली की हायसे वाटते.

सामान्यतः पाच-सात, पाच-आठ उंची असणार्‍या लोकांतही तिला बुटकेपणाची जाणीव होत असावी काय याची कल्पना नाही.

पाय मुरगाळणार

घाशीराम कोतवाल मधे नानाच पाय मुरगाळतो तसे या बायांचे पाय नक्कीच कधीतरी मुरगाळत असणार.अशा बाया किती पायी चालत असणार? लक्ष्मी रोडवर फुटपाथवर चालुन दाखवा म्हनाव. त्येंचाक हे हायहील भानगड चालत असन आपल्याक नाय. उगा ब्यालन्स संबाळत टेन्शन घ्यायच आन लोकान्ला बी द्यायच. यखांद्या पायाव पाय पल्डा म्हंजे फ्याक्चर.
प्रकाश घाटपांडे

टुक टुक

लक्श्मीरोडवर चालण्यासाठी हील्स बनवलेलेच नाहीत.

आपल्याकडंबी ही भानगड मोप चालतीया. उगा हेंच्याक तेंच्याक् नगं.

धन्यवाद

धन्यवाद टिंकरबेल!

उपक्रमाची धडकी भरलेल्यांना परत उपक्रमवर् वाचायला उत्तम धागा!! :-)

आता उपक्रमावर प्रतिसाद म्हणजे माहीतीपूर्ण (किंवा द्वेषमुलक) वगैरे लिहले पाहीजे नाहीतर फाउल धरला जायचा. तर हाय हिल्स घालून कसे चालावे हा दुवा सरांच्या मैत्रीणीला उपयुक्त व्हावा.

>बायकांच्या प्रश्नांवर पुरूषच जास्त बोलताना दिसतात.

ह्या वर एकच दाद!! जियो!! :-D

वाद

>बायकांच्या प्रश्नांवर पुरूषच जास्त बोलताना दिसतात.

ह्या वर एकच दाद!! जियो!! :-D

ह्यावर अनेक वाद !! मरो !! :-D
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

दुव्याबद्दल आभारी. अनेक दुवे आपल्यामुळेच पाहता आले.
[मी काय गुगलवर सर्च नसते केले, हाऊ टू वॉक इन हाय हील्स्]

[सहजराव, येत चला इकडे. गंभीर चर्चा चालत असल्या तरी आपण हलके-फुलके प्रतिसाद लिहित राहू. ]

-दिलीप बिरुटे

छान माहिती...

वेगळाच विषय. प्रतिसादही माहितीपूर्ण आणि रंजक. :)

बायकांच्या प्रश्नांवर पुरूषच जास्त बोलताना दिसतात.

याचे कारण, बहुतेक सर्व पुरूषांना बायकांबद्दल विशेष प्रेम वाटते असे तर नसेल? ;)

बिपिन कार्यकर्ते

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

सर्वांना धन्यवाद.

 
^ वर