मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदत हवी आहे
१ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चे संकेतस्थळ २००८ सालच्या महाराष्ट्रदिनी सुरू झाले. गेल्या जवळपास दीड वर्षाच्या काळात ह्या संकेतस्थळावर १९८३ साली सुरू झालेल्या 'भाषा व जीवन' ह्या संस्थेच्या त्रैमासिक पत्रिकेतील निवडक लेख, शक्य होईल तसे, प्रकाशित करण्याचे काम चालू आहे. ह्याशिवाय वेळोवेळी मराठी अभ्यास परिषदेच्या उपक्रमांविषयी माहिती देण्यासाठीही संकेतस्थळाचा उपयोग होत असतो.
मराठी वाचकांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आंतरजालावर दिवसेंदिवस मराठीचा वापर वाढतो आहे. आंतरजालीय मराठी वाचकांच्या भाषाविषयक गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने, नवीन मराठी वाचक, नवीन मराठी लेखक संकेतस्थळाच्या माध्यमाने मराठी अभ्यास परिषदेशी निगडित करण्याच्या दृष्टीने, संस्थेच्या मूळ उद्दिष्टांपासून फारकत न घेता, मराठी अभ्यास परिषदेचे संकेतस्थळ कसे अधिक लोकाभिमुख करता येईल, ह्यावर आपले मत हवे आहे. कृपया आपली मते मांडावीत ही विनंती.
ह्याशिवाय 'भाषा व जीवन' ह्या त्रैमासिकात १९८३ सालापासून आजतागायत प्रकाशित झालेला मजकूर संकेतस्थळावर व्यवस्थितपणे चढवण्यासाठी, संकेतस्थळाच्या माध्यमाने नवीन उपक्रम आखण्यासाठी व आखलेले उपक्रम नीट राबवण्यासाठीही आपला सहभाग हवा आहे. ह्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी माझ्याशी व्यक्तिगत निरोपातून किंवा csbhat@gmail.com ह्या विरोप पत्त्यावर संपर्क साधावा.
Comments
आमची तयारी
आपण सक्रिय तयार आहोत. अनेकांचा हातभार लागावा. अशा प्रकल्पांत प्रत्येकाचा खारीचा वाटा महत्वाचा ठरतो.
प्रकाश घाटपांडे
आभारी आहे
आभारी आहे. संपर्क साधून ह्याबाबत बाकीचे बोलीन.
माझं प्रामाणिक मत
माझं प्रामाणिक मत. त्रैमासिकात १९८३ सालापासून आजतागायत प्रकाशित झालेला मजकूर संकेतस्थळावर चढवणे हा वेळेचा आणि साधनांचा अपव्यय् आहे. संकेतस्थळावर काहीही ठेवण्यात वेळ् आणि साधने खर्च घालण्याअगोदर् त्यासाठी किती वाचक मिळतील आणि अभ्यास परीषदेच्या कार्यासाठी त्यांचा काय् उपयोग् होईल याचा विचार् केला आहेत् का? मला तुमच्या उत्साहावर् पाणी घालायचे नाही तर् अभ्यास परिषदेसारख्या तुटपुंजी साधनसामुग्री आणि मनुष्यबळ असलेल्या संस्थेने साधने अधिक योग्यतेने वापरावी म्हणून् म्हणतो आहे.
माझे मत् असे असेल्.
०. मुळात् अभ्यास परिषदेचा वाचकवर्ग् कुठला आहे आणि त्याने संकेतस्थळावर का यावे याचा सखोल् विचार् करावा.
१. १९८३ सालापासून प्रकाशित् झालेल्या , कालातीत् असलेल्या लेखनातून् अगदी निवडक, मैलाचे दगड म्हणता येतील् असे, लेखन् निवडून फक्त् तेच् संकेतस्थळावर ठेवावे. अशा लेखनाची सर्व् मिळून एकूण् पाने १० असावित्. थोडक्यात् जुन्या लेखनातून् फक्त् १० पाने संकेतस्थळावर प्रकाशित् करावित्. अधिक लेखन पाहण्यासाठी वर्गणीदार् व्हा असे सुचवावे.
२. २-३ महिने यातली किती पाने वाचली जात् आहेत् , कुठल्या प्रकारची पाने वाचली जात् आहेत् याचा विदा गोळा करून् पुढे काही करायचे , कुठल्या विषयावर् करायचे हे ठरवावे.
३, उपक्रमांची माहिती देणे योग्यच आहे. पण् त्यातही प्रयोगशील् असावे. सगळे उपक्रम् एकाच पानावर् न देता वेगळ्या पानावर् दिलेत् तर् कुठल्या उपक्रमाला आंतरजालावर् जास्त् मागणी आहे, कुठल्या उपक्रमाला नाही याचा थोडा अंदाज् येईल् आणि त्यावरून् पुढील् प्रकल्प् ठरवता येतील्.
४. मायबोली संकेतस्थळावर् चित्रमय जाहिराती असतात् त्यात् मधूनच् काही सेवाभावी संस्थांच्या जाहिरातीही असतात्. त्याना काही बॅनर्स् देणगी म्हणून् देणार् का ते विचारता येईल्. म्हणजे अभ्यास परिषदेचे बॅनर् मधूनच् तिथेही दिसेल्. मनोगत्, मिसळपाव्, उपक्रम् यानाही विचारता येइल् पण् या संकेतस्थळांनी रितसर् जाहिराती सुरु केल्या नसल्यामुळे त्यांचा काय प्रतिसाद् येईल् हे सांगता येणार् नाही.
माझे मत
माझं प्रामाणिक मत. त्रैमासिकात १९८३ सालापासून आजतागायत प्रकाशित झालेला मजकूर संकेतस्थळावर चढवणे हा वेळेचा आणि साधनांचा अपव्यय् आहे. संकेतस्थळावर काहीही ठेवण्यात वेळ् आणि साधने खर्च घालण्याअगोदर् त्यासाठी किती वाचक मिळतील आणि अभ्यास परीषदेच्या कार्यासाठी त्यांचा काय् उपयोग् होईल याचा विचार् केला आहेत् का?अभ्यास परिषदेसारख्या तुटपुंजी साधनसामुग्री आणि मनुष्यबळ असलेल्या संस्थेने साधने अधिक योग्यतेने वापरावी म्हणून् म्हणतो आहे.
तुमची कळकळ समजू शकतो. त्रैमासिकात प्रकाशित झालेल्या मजकुराला निश्चितच चांगले संदर्भमूल्य आहे. त्यामुळे हा मजकूर मजकूर संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास मराठी वाचकांना, अभ्यासकांना फायदाच होईल. अभ्यास परिषदेला साधनसामुग्रीची अडचण नाही. अडचण मनुष्यबळाची आहे. सध्या संकेतस्थळाचे काम १-२ जणांच्या श्रमदानातूनच होते आहे. संकेतस्थळाशी व संस्थेशी ताज्या दमाची मंडळी निगडित व्हायला हवी आहेत.
१. १९८३ सालापासून प्रकाशित् झालेल्या , कालातीत् असलेल्या लेखनातून् अगदी निवडक, मैलाचे दगड म्हणता येतील् असे, लेखन् निवडून फक्त् तेच् संकेतस्थळावर ठेवावे. अशा लेखनाची सर्व् मिळून एकूण् पाने १० असावित्. थोडक्यात् जुन्या लेखनातून् फक्त् १० पाने
संकेतस्थळावर प्रकाशित् करावित्. अधिक लेखन पाहण्यासाठी वर्गणीदार् व्हा असे सुचवावे.
अधिक लेखन पाहण्यासाठी वर्गणीदार व्हा असे सुचवता येईल. पण 'भाषा व जीवन'चे संपूर्ण लेखन सगळ्यांना वाचता यावे असे मला वाटते. महाविद्यालयांच्या मराठी विभागांना 'भाषा व जीवन' वर्गणी दान देण्याची सोय ठेवता येईल. नवीन व तरुण वाचकवर्ग आकृष्ट कसा करता येईल ह्यावर भर असायला हवा, असे मला वाटते.
उपक्रमांची माहिती देणे योग्यच आहे. पण् त्यातही प्रयोगशील् असावे. सगळे उपक्रम् एकाच पानावर् न देता वेगळ्या पानावर् दिलेत् तर् कुठल्या उपक्रमाला आंतरजालावर् जास्त् मागणी आहे, कुठल्या उपक्रमाला नाही याचा थोडा अंदाज् येईल् आणि त्यावरून् पुढील् प्रकल्प् ठरवता येतील्.
चांगली सुचवणी आहे.
मुळात् अभ्यास परिषदेचा वाचकवर्ग् कुठला आहे आणि त्याने संकेतस्थळावर का यावे याचा सखोल् विचार् करावा.
सध्याच्या वाचकवर्गाशिवाय नवीन/तरुण वाचकांना संकेतस्थळावर आणण्यासाठी काय करता येईल ते सांगावे.
४. मायबोली संकेतस्थळावर् चित्रमय जाहिराती असतात् त्यात् मधूनच् काही सेवाभावी संस्थांच्या जाहिरातीही असतात्. त्याना काही बॅनर्स् देणगी म्हणून् देणार् का ते विचारता येईल्. म्हणजे अभ्यास परिषदेचे बॅनर् मधूनच् तिथेही दिसेल्. मनोगत्, मिसळपाव्, उपक्रम् यानाही विचारता येइल् पण् या संकेतस्थळांनी रितसर् जाहिराती सुरु केल्या नसल्यामुळे त्यांचा काय प्रतिसाद् येईल् हे सांगता येणार् नाही.
अशा जाहिराती देता येतील. उपक्रमासारख्या संकेतस्थळांवर ताज्या अंकाची/लेखनाची चुणूक देऊन जाहिरात करता येईल.
विपणन्
सध्याच्या वाचकवर्गाशिवाय नवीन/तरुण वाचकांना संकेतस्थळावर आणण्यासाठी काय करता येईल ते सांगावे.
विपणन् (Marketing) आणि दळणवळणाचे साधन (communication) यात् फरक् आहे. संकेतस्थळ हे कळवण्याचे साधन्/माध्यम आहे. विपणनाचे नाही.
संकेतस्थळ अस्तित्वातच नाही असे घटकाभर् समजून्, असा विचार् करा की संस्थेने नवीन कुठले उपक्रम् सुरु करावेत ज्याच्या योगे नवीन/तरुण वाचकांना संस्थेकडे आकृष्ट् करता येईल्? उदा. एखादी स्पर्धा, नवीन् प्रकल्प इत्यादी आणि मग संकेतस्थळाचा योग्य तो उपयोग करून या नवीन/तरुण वाचकांपर्यंत् कसे पोहोचता येईल् असे पहा.
माझा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडतो. पटतंय का पहा. असं समजा, संस्थेकडे भरपूर् पैसे आहेत्. ते वापरून् जर् सध्याच्या प्रकल्पांची Radio MirchI वर् भरपूर् जाहिरात् केली तर् नवीन/तरूण् वाचक मिळतील् असे वाटते का? आणि समजा मिळाले तरी ते टिकून् रहातील का?
आधी तुम्ह्लाला नवीन् वाचकांना काय आवडेल् अशा प्रकल्पांचा शोध घेतला पाहिजे. माध्यम् हा नंतरचा मुद्दा आहे.
संगणक आणि मराठी यांसदर्भात् काही प्रकल्प् सुरु केलेत् तर् मराठी साठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे आणि आधिच् आंतरजालावर असणारे नवीन् वाचक् मिळवता येतील्.
वर्गणीदार?
कुणी भाषा आणि जीवनचे कुणी वर्गणीदार झालेच तर त्यांना १९८३ पासूनचे अंक मिळणार आहेत का? नसतील तर त्या अंकांतला बहुतेक कालातीत मजकूर संकेतस्थळावर फीडीएफ़् स्वरूपात ठेवायला काय हरकत आहे? त्याला असे कितीसे श्रम आणि कितीसा वेळ लागणार आहे? आज स्थिती अशी आहे की, मराठी अभ्यास परिषदेच्या स्थळावर जेमेतेम तीन पाने आहेत, आणि कित्येक महिन्यांत त्यांत काही वाढ झालेली नाही. असे होत असेल तर हे संकेतस्थळ कोण उघडेल? मायबोली डॉट कॉम वर अशी स्थिती कित्येक वर्षे होती, पण आज ते एक भरभराटीला आलेले संकेतस्थळ आहे. --वाचक्नवी
५३ पाने आहेत
मजकूर पीडीएफ स्वरूपातही ठेवता येईल. पण शोध घेण्याच्या दृष्टीने (गुगलण्याच्या दृष्टीने) युनिकोडमधला मजकूर ठेवणे अधिक चांगले. त्यासाठी श्रम व वेळ लागेल. कार्यकर्ते लागतील.
एकूण ५३ पाने आहेत:
प्रत्येक पानाच्या अखेरीस दुवे आहेत.
खरे असावे.
तुमचे म्हणणे खरे असावे. तरीसुद्धा, मी कधीही ते संकेतस्थळ उघडले की मला त्यावर नवीन काहीच सापडत नाही. एखादा लेख वाचायचा राहून गेला असे जाणवत नाही. सर्व लेखांची निव्वळ सूची एका पानावर असायला हवी होती, असे वाटते.--वाचक्नवी
एकूणएक बघा
एकूणएकवर टिचकी मारा.
धन्यवाद.
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळावरचे लेख आत्तापर्यंत मला केवळ अपघातानेच सापडायचे. यापूर्वी अनेक ठिकाणी टिचक्या मारल्या होत्या पणएकूणएकवर कधी टिचकी मारलीच नव्हती. --वाचक्नवी
कदाचित सारखी अडचण् आहे का?
मायबोली डॉट कॉम वर अशी स्थिती कित्येक वर्षे होती, पण आज ते एक भरभराटीला आलेले संकेतस्थळ आहे.
माझ्या माहिती प्रमाणे मायबोलीवर् असे नव्हते. पण त्यांचा सगळा मजकूर् (हजारो पानांचा) अनेक वषे एका विभागाआड लपला होता आणि ज्याना ही माहिती होती त्यांनाच् दिसायचा. आणि त्यामुळे मुखपृष्टावरून आकाराचा अंदाज् अजिबात् येत् नसे.
मला वाटते तसे अभ्यास परिषदेचेही होते आहे. तिथे ५३ पानांचा मजकूर् आहे हे मला ही लक्षात् आले नव्हते. त्या मजकूरात् जेंव्हा वाढ होईल तेंव्हा मधून् मधून् ते मुखपृष्ठावर् आणता आले तर् पहा.
कार्यकर्ता
मी कार्यकर्ता बनायला तयार आहे.
लेखन चढवण्यासाठी काय मदत करावी लागेल?
आभारी आहे
आभारी आहे. ह्याबाबतीत संपर्क साधतो आहे.