उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
नसतेस घरी तू जेव्हा .....
मित्र
November 28, 2009 - 9:10 pm
नसतेस घरी तू जेव्हा .....
हे चित्र कॅनॉन् रिबेल एक्स् एस् आय् व ५० मिमि/१.८ लेन्स् वापरून काढले आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
- मित्र
दुवे:
Comments
छान कल्पना
कल्पना आवडली.
चित्रचौकटीच्या मागच्या कड्यांनी आणि "वंडरफुल" शब्दाने रसभंग होतो (माझ्यापुरता).
पुढील छायाचित्रांसाठी शुभेच्छा.
छान
सुदर थीम आहे आणि कृष्ण-धवल रंगछटा फार छान आहेत.
चांगली कल्पना
वंडरफुल शब्दाने होणार्या रसभंगाबाबत सहमत. तरीही चांगली कल्पना.
अनामिकेतील अंगठी सूचक.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है
छान
कृष्ण-धवल छायाचित्र आवडले.
बोटातली अंगठी 'नसतेस घरी तू जेव्हा...' या कल्पनेला साजेशी आणि परिणामकारी आहे.
पण ते वंडरफुल अगदीच शेजारी आल्याने अंगठीवरून लगेच लक्ष तिकडे जातं :(
बरोबर् आहे...
वंडरफुल शब्दाने रसभंग नक्कीच होतोय. फोटोशॉप मधे वंडरफुल शब्द काढून टाकला आहे. जास्त परीणामकारक वाटत आहे.
-मित्र
मूळ चित्र चूकून काढले गेले परत इकडे चिकटवत आहे.
-मित्र
मस्तच
मस्तच हो फोटो! (अंगठी नवीकोरी दिसते.)
शीर्षक तर छानच आहे. शीर्षकामुळे खरे-कुलकर्णींची व पर्यायाने पुरुषांच्या मंगळगौरीची व नंतर तुळशीबागेची आठवण होते हे मात्र खरे!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ह्या लेखाचे शीर्षक वाचले
आणि आपसुक केसुगुरुजींचे ढासु विडंबन जुने दिवस आठवले.
असो. बजबजपुरीचे अकाली निधन झाल्यापासून केसुगुरुजी मराठी अंतरजाल जगतातून लुप्त झालेले आहेत असे जाणवते. Kesuguruji, we miss your mockery. Do come back.
अवांतर : लेखातील छायाचित्र चांगले आले आहे.
______________________________________________________
आणिबाणी जाहीर करुन टाकली आहे. साला कुणाची मस्ती नाय पायजेल! आपल्याला जे वाटेल ते ठेऊ, बाकीचं उडवू! 'हेच नमोगतावर होत होतं तर त्यावर तू कांगावा केलास, आणि तुझ्या स्थळावर झालेलं बरं चालतंय तुला?' अशी एक आगाऊ प्रतिक्रिया आली होती. लगेचच उडवली!
काही मजकूर संपादित.